जादुई कागद..
जादुई कागद..


अवघ्याआठ वर्षांची परी आपल्या लहान भावाला तिचा खाऊ वाटताना पाहून आईला बरं वाटलं. ती खुप समंजस होती. एक गोष्ट होती, जी त्याला खुप जपायची. तो म्हणजे तिचा आवडता हिरो म्हणजे 'santa claus'. ती रोज त्याच्याशी गप्पा मारत. क्रिसमस ला दरवर्षी ती न चुकता त्याच्याकडे गिफ्ट मागायची. पण ते काही तिला मिळत नव्हत. तरीही ती त्याच्यावर न रागावता त्याच्याशी पुन्हा आधीसारख वागायची. तिला टीव्ही वर कार्टून्स सोबतच बातम्या पहायला आवडायच्या. गरिबांच्या मुलाखती घेताना त्या लोकांचे हाल पाहून तिला वाईट वाटत. अश्या लोकांसाठी काहीतरी करावं, त्यांना जाऊन भेटाव आणि मदत करावी असा नेहमी आईला हट्ट करीत. आई ही तिला घेऊन जवळच्या आश्रमात जात. मग आणलेली खेळणी, खाऊ आपल्या परीला द्यायला सांगत. परी देखील खुप खुश व्हायची. तिच्या चेहऱ्यावरच समाधान पाहून आईला तिच्या समजूतदार होण्याचा खुप हेवा वाटायचा. तिची अजुन एक मैत्रीण होती ती म्हणजे त्यांच्या शेजारी राहणारी, मनमिळावू, गोड दिसणारी आणि तिच्या सारखी सर्वांना नेहमी मदत करणारी सोनाली ताई तिला आवडायची. ती सुद्धा कधी कधी येऊन तिच्यासोबत खेळायची. मुख्य म्हणजे आतापर्यंत सगळ्या वाढदिवसाला तिने वेगवेगळ्या प्रकारचे 'santaclaus' परीला गिफ्ट केले होते म्हणून ती जरा जास्तच खास होती.
दरवर्षी प्रमाणे ह्या वेळी सुद्धा तिने santa claus कडे गिफ्ट मागितलं. पण तिला काही मिळालं नाही. त्या दिवशी santa claus सोबत ती खुप भांडली. गिफ्ट पाहिजे म्हणून त्याला हट्ट करू लागली. टिव्ही मध्ये पाहिल्याप्रमाणे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो शिवाय माझ्या. असं म्हणून रडू लागली. मग तिने जोरात त्याला फेकून दिलं. एक महिना झाला होता परी आपल्या santa claus शी बोलली नव्हती. तिला ह्या वेळी त्याचा भरपूर राग आला होता. क्रिसमस जवळ आला होता. आई ने तिला नवीन santa claus आणणार असल्याचं सांगितलं. तिने आईला नकार देऊन ह्यावेळी तिला तो नकोय असल्याचं सांगितलं. आईला आश्चर्य वाटलं. एकदा क्रिसमस च्या रात्री ती झोपली असताना कपाट हलायला लागलं. त्या आवाजाने जागी होऊन ती त्या कपाटा कडे एकटक पाहू लागली. परत कपाट हलू लागलं. तिने धीर एकवटून कपाटाच दार उघडायला गेली. कपाट उघडताच तिच्या डोळ्यासमोर खुप उजेड पडला. थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिलं तर काय, तिचा प्रिय santa claus आला होता. तिला खूप आनंद झाला होता. त्याने त्याच्या लाल गाठोड्यातून तिला एक कागद दिला आणि सांगितलं, या वर तुला हवं असलेलं गिफ्ट च नावं लिहून हा कागद पुन्हा इथेच आणून ठेव मी तुला तुझ गिफ्ट नक्की देईल. पण लक्षात ठेव हा जादूचा कागद आहे. ह्या कागदाला तुझ्याशिवाय कोणीही हात लावू शकत नाही. जर लावला तर तो साध्या कागदात रूपांतर होईल. मग तुझ गिफ्ट तुला मिळणार नाही. हवा तितका वेळ घे पण मी सांगितलेलं लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी ती उठून बसली होती. तेवढ्यात तिला रात्रीचा प्रसंग आठवतो. स्वप्न असेल म्हणून ती आईला सांगायला जाते. पण तिला जाताना तिच्या कपाटाचा दार अर्धवट उघडलेल दिसत. तिने दार पूर्ण उघडताच तिच्या डोळ्यासमोर एक कागद दिसतो. हा तोच रात्रीचा जादुई कागद होता जो santa ने दिला होता. तिला विश्वास बसत नव्हता. तिने सगळ्यात आधी जाऊन santa ची तिच्या अश्या वागण्याची माफी मागितली. मग तो कागद तिने कपाटात कोणाला दिसणार नाही अश्या जागी लपवून ठेवला. दिवसभर ती काय गिफ्ट मागावं ह्याचा विचार करत बसली. तिच्या कडे सगळ्या प्रकारची खेळणी होती म्हणून तिला अजूनच चिडचिड होत होती. तसचं ती ह्या बद्दल कोणाला सांगू शकत नव्हती. ह्या गोष्टीला आठवडा होत आला होता पण अजूनही तिला कळत नव्हतं की काय लिहावं. तीच कुठेच लक्ष लागेना. सतत ती त्याच विचारात गुंग असायची.
एकदा सोनाली ती यायच्या वेळेत घरी आलीच नाही. तिच्या घरचे खुप काळजीत होते. इथे तिथे जाऊन विचारपूस करू लागले. थोडावेळ वाट पाहत बसले पण आता खुप उशीर झाल्याने त्यांना टेन्शन आलं. शेजारचे काही लोक आणि तिचा भाऊ तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन विचारपूस करू लागले. पण ती नेहमीच्या वेळेत घरी निघून गेल्याच त्यांनी सांगितलं. तिचे बाबा देखील तिच्या कॉलेज मध्ये जाऊन आले पण तिथेही काही कळलं नाही. घरी आल्यानंतर सगळे पोलिसात तक्रार नोंदवायला गेले. तिची सगळी माहिती घेऊन इथे तिथे शोधाशोध सुरु झाली. सोनालीची आई रडत होती. बाजूच्या बायका त्यांना धीर देत होत्या. एव्हाना तिला देखील सोनाली ताई हरवली आहे आणि त्यामुळे काकु रडत असल्याचं कळलं. अश्या परिस्थितीत ती सुद्धा घाबरली होती. आई ने तिला घरी जायला सांगितलं. ती घरी येऊन santa claus ला सोनाली ताई ला शोधायला मदत कर म्हणून बोलत होती. रात्र खुप झाल्याने सगळे आपापल्या घरी परतले होते. पोलिसांनी तपास सुरूच ठेवला होता त्यामुळे त्यांना थोडा आधार होता. अचानक सकाळ सकाळी जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐ
कुन परीला जाग आली. बाहेर जाऊन पाहिलं तर सोनाली ताईला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळून ठेवलं होत. आणि आजुबाजुला सगळे शांत उभे होते. बाजूच्या बायका आणि आपली आई काकूला सांभाळत होत्या. पण काकु रडणं थांबवायचं नावच घेत नव्हती. तिच्यावर फुल आणि हार टाकले होते. नाकात कापूस आणि ती निपचित पडली होती. तिला उचलून घेऊन जाऊ लागले तश्या काकु खुप जोरजोरात रडू लागल्या. स्वतःला मारू लागल्या. त्यांना सांभाळणं कठीण होऊ लागलं. परी ला सुद्धा रडू आलं. आपल्या प्रिय सोनाली ताई ला घेऊन जाताना पाहून तिला काही कळत नव्हतं पण वाटलं की आता पुन्हा ती भेटणार नाही. शेजारच्या आज्जीने परी ला जवळ घेऊन शांत केलं. मग ती तिथेच झोपी गेली. उठून बघते तर ती तिच्या बिछान्यात होती. नेहमी आनंदी असणारे आई बाबा उदास आणि शांत शांत होते. ती आई ला विचारू लागली, सोनाली ताई कुठे गेली पण आई ने काहीच उत्तर दिलं नाही.
आईने परीला तिथून जायला सांगितलं. अभ्यास करून परी जेवण करून खेळायला बसली. आई बाबा टिव्ही वर बातम्या बघत बसले होते. तितक्यात टिव्ही वर परी ला सोनाली ताई दिसली. तिच्या चेहऱ्यावर भरपूर व्रण दिसत होते. त्या नंतर दोन माणसांना दाखवल. ज्यांचे काळया कापडाने चेहरे झाकले होते. परी ला फक्त "बलात्कार" शब्द सारखा ऐकु येत होता. ती आई ला सारखा ह्याचा अर्थ विचारात होती. पण कधी न रागावणारी आई आज परीला जोरात ओरडली. परी रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने बाबा तिला उठवायला तिच्या खोलीत आले. पण ती झोपली होती. तितक्यात आई येऊन बाबांना बोलवते.
"अहो मी काय म्हणते मी जरा सोनाली च्या आई कडे जाऊन येते."
"हो जा तु. ह्या वेळी त्यांना आपली गरज आहे."
"किती नीच लोक असतील ते. त्यांनी आपल्या सोनाली ची ही अवस्था केलीय. त्या नराधमांना त्यांनी केलेल्या अपराधाची कठोर शिक्षा झाली पाहिजे."
"हो मला देखील हेच वाटतं पण खुप श्रीमंत लोक आहेत ती. कसेही सुटू शकतात. तु पाहिलंस ना त्यांच्या चेहऱ्यावर भिती चा एक लवलेश ही नव्हता. तसचं या आधी देखील त्यांनी भरपूर अपराध केले आहेत. ह्या वेळी देखील ते त्यांच्या ओळखीने सुटतील. आपण आता फक्त तिच्या घरच्यांना त्यांना आधार देऊ शकतो."
आई बाबांचं बोलणं परीने ऐकलं होतं. तिला सोनाली ताई सोबत वाईट झाल होत हे कळलं होत पण ज्यांनी तिच्या सोबत वाईट केलं त्यांना शिक्षा होणार नाही हे ऐकुन तिला खुप राग आला. त्या दिवशी santa claus सोबत ती खुप भांडली. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे म्हणून त्याला हट्ट करू लागली. मग तिला त्या जादू च्या कागदाची आठवण झाली. तिने पटकन जाऊन तो कागद बाहेर काढला त्यावर santa claus ला विनंती करत,
"सोनाली ताई ची अशी वाईट अवस्था करणाऱ्या वाईट लोकांना शिक्षा दे"
अस लिहून यापुढे ती कधीच गिफ्ट मागणार नाही असं त्याला सांगून तो कागद त्या जागी ठेवून दिला. रोज ती उठून पहायची कपाटात तो कागद जसाच्या तसा होता. तिची इच्छा आज पूर्ण होईल, उद्या होईल अस करत करत खुप वर्ष लोटली. कागदावर लिहलेले काही खर होईना. इवलिशी परी खुप मेहनत घेऊन, अभ्यास करून आज वकील झाली होती. सोनाली ताई सोबत झालेली घटने नंतर त्यांना न्याय मिळाला नव्हता. त्यांनी ती आशा सोडून दिली होती. तिच्या घरचे थोडेफार सावरले होते. गेली कित्येक वर्ष परीने अभ्यास करता करता त्या आरोपींचे जे पुरावे गोळा केले होते, ते तिला आज कोर्टात सादर करायचे होते. आपली चपळ बुद्धी वापरून आणि हुशारीने लढवून अर्धी केस ती जिंकली होती. आता वेळ होती त्यांच्या विरोधात असलेले पुरावे कोर्टात सादर करण्याची. पुरव्यांना हातात घेताना तिला ते जादुई कागदा प्रमाणे वाटू लागले. तिने ते कोर्टात न्यायाधिशांना सोपविले. न जाणो आज तिला ते न्यायाधीश तिच्या प्रिय santa सारखे वाटत होते. अखेर तिच्या असलेली प्रबळ इच्छाशक्ती आणि ठोस पुराव्यांमुळे अपराध्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सगळ्यांना याची खबर लागताच त्यांचा आनंद पारावर उरला नव्हता. किती वर्षांनी काकुच्या चेहऱ्यावर आज न्याय मिळाल्याचा आनंद बघून सगळ्यात आनंद आपल्या परीला झाला होता.
आजही तिच्या सोबत तिचा santa आहे, जेव्हाही कधी हतबल असल्यासारखं वाटलं की तो सारखं तिला जादूच्या कागदाची आठवण करून देतो. मग ती पुन्हा नव्या जोमाने पुरावे शोधायला सुरुवात करते. तिने सोनाली ताई सारख्या कितीतरी मुलींची केस लढवून योग्य न्याय मिळवून दिला होता, त्यांचा Santa बनून. आज ती अश्या कितीतरी मुलींसाठी जादूच्या परीपेक्षा कमी नव्हती. तो जादूचा कागद म्हणजेच आपली इच्छाशक्ती. ही गोष्ट तिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य केली. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर प्रत्येक कागदावर लिहिलेल्या आपल्या इच्छा पूर्ण नक्की होतील.