अक्षता कुरडे

Others

4  

अक्षता कुरडे

Others

हेच तर हवं..!!!

हेच तर हवं..!!!

2 mins
351


लॉकडाऊन मध्ये जुई खुप कंटाळली होती. साकेतच वर्क फ्रॉम होम सुरू होत म्हणून त्याला इतकं बोर होत नसे पण जुई च काम सध्या बंद होत. दिवसभर घरात ती काहीना काही करत मन रमवत होती. पण आज तिच्याजवळ काहीच विरंगुळा नव्हता. आता तिला चीड येत होती. साकेत च नुकतंच काम संपल होत. ती त्याला कॉफी देऊन त्याच्या शेजारी बसली. साकेत ने तिचे आभार मानून कॉफी चा एक घोट घेतला.


"आहाहा.. कमाल... बहार...."


"साकेत.. साकेत ऐक ना रे.."


"हमम.." साकेत कॉफी पिण्यात मग्न होता.


"तु ऐकणार आहेस की नाहीस." जुई रागात साकेत ला म्हणते.


"देवाने जसे सगळ्यांना कान दिलेत तसे मलाही आहेत आणि त्यातून मी स्पष्ट ऐकू शकतो."


"हो का..? मग ऐक जा आणि आताच्या आता मला पुस्तक आणून दे." जुई त्याला ऑर्डर देत म्हणाली.


"हे काय असा सरळ गेलो आणि बाजूला वळून स्टडी रूम जातो. थांब हा आता आणतो." असं म्हणत साकेत उठतो तर जुई त्याचा हात धरून पुन्हा खाली बसवते.


"नाही. माझी एकूण एक सगळी पुस्तके वाचून झाली आहेत. काही तर मी दोनदा तीनदा वाचलीत. आता मला नवं कोर पुस्तक हवंय. जा आताच्या आता घेऊन ये."


"वेडी आहेस का.. ह्या लॉकडाऊन मध्ये कुठलं वाचनालय उघड असेल. छे नाहीच. अशक्य."


"साकेत." जुई त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते तसा साकेत उठतो आणि गाडीची चावी घेऊन बाहेर जातो. काही वेळाने साकेत घरी येतो. त्याचे रिकामे हात जुई पाहते.


"हे काय पुस्तक कुठेय..?"


"सॉरी यार जुई. तुला बोललो होतो ना. नाहीये कोणतच वाचनालय उघडं. सगळीकडे शोधलं." 


"काय रे.. शी.." जुई चा हिरमोड होतो. ती तिच्या खोलीत निघून जाते. तिला असं पाहून त्यालाही काय करावं सुचत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही टेबलावर नाश्ता करत असतात. जुई गप्प नाश्ता करत असते. तितक्यात साकेत तिला तिचा फोन कुठेय विचारतो. ती शोधू लागते पण तिला कुठेच दिसत नाही. 


"साकेत खर सांग तुच लपवलास ना."


"अग मी का.." 


"दे ना साकेत मोबाईल. नको ना मस्करी करुस. आधीच माझा मूड ऑफ आहे." तितक्यात साकेत खिशातून तिचा मोबाईल काढतो आणि टेबलावर ठेवतो. जुई पाहते.


"काय रे." जुई चिडत म्हणते. आणि तिचा मोबाईल ऑन करते.


"हे काय तु माझ्या फोन मध्ये कोणतं ॲप डाऊनलोड केलंय..?" ती प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारते.


"स्टोरीमिरर.."


"म्हणजे..?" ती कुतूहलाने पाहत विचारते.


"ओपन करून तर बघ. गोष्टीच गोष्टी आहेत त्यात. हॉरर, रोमँटिक, कॉमेडी, ट्रॅजेडी, अजून अनेक कथांचा खजिना आहे खजिना. आता असे तीन चार लॉकडाऊन जरी वाढवले ना तरी ह्यातल्या गोष्टी काय संपणार नाहीत. बस आता वाचत."


"वाऊ.."


"आणि काय हवं.."


"हेच तर हवं..!!" जुई चा चेहरा प्रसन्न झाला होता अगदी.


"तु बोललीस आणि आपण नाही करणार. असं होणारच नाही कधी." 


"Thank You...." जुई खुश होऊन म्हणाली. 


"अरे mention not.." साकेत स्वतःची पाठ थोपटून गर्वाने बोलत होता.


"I meant to say, Thanks to Storymirror.." जुई भुवई उडवत म्हणाली. 


"Ohh.. ya me too.." साकेत रुसवा आणून म्हणाला. 


"वाह... कमाल.. बहार..." जुई स्टोरी वाचत म्हणाली.


Rate this content
Log in