तर मी तिला ॲसिड नष्ट करायला सांगेन...
तर मी तिला ॲसिड नष्ट करायला सांगेन...
एकतर्फी प्रेमातून माझ्यावर ॲसिड हल्ला झाला. आईबाबांसाठी असलेली सुंदर परी विद्रूप झाली.
लोक मला घाबरु लागले. आणि तो, तो तर काहीच न केल्यासारख मोकाट फिरत होता.
त्याला त्याच्या गुन्हाची कठोर शिक्षा मी देणारच अशी माझी प्रबळ इच्छाशक्ती आणि माझ्या जिवलगांची साथ मला मिळाली.
हल्ल्याने माझा चेहरा गळून पडला असला तरी माझ्यातला आत्मविश्वास तसाच होता.
अथक परिश्रम आणि ठाम विश्वासाच्या जोरावर अखेर मी ही लढाई जिंकले आणि त्याला कठोर शिक्षा सुद्धा झाली.
पण मला जर का, जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर...
माझ्यावर आलेलं हे संकट इतर कोणाही मुलीवर येऊ नये म्हणून मी परीकडे ह्या जगातलं सार ॲसिड नष्ट करायला सांगेन.