STORYMIRROR

अक्षता कुरडे

Horror Thriller Others

3  

अक्षता कुरडे

Horror Thriller Others

हॅप्पी मर्डर एनिवर्सरी

हॅप्पी मर्डर एनिवर्सरी

7 mins
215

कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का

का हे कसे होते असे ही आस लागे जीवा

कसा सावरू मी आवरू ग मी स्वत:

दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा.. आभास हा.. 


शर्वरी गाणं गुणगुणत टेरेस वर च्या झाडांना पाणी घालत होती. उद्या त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होता आणि पहिलं वर्ष सगळ्यांना खास असतं. तसच ती देखील तिच्या आणि शिरीष च्या मागील आठवणींना उजाळा देत खुदकन गालात हसता हसता, लाजत होती. ती आई होणार ही बातमी अजून तिने कोणालाही सांगितली नव्हती. अगदी शिरीष ला देखील नाही. शिरीष नाशिक ला त्याच्या आई बाबांकडे कामानिमित्त एक आठवड्यासाठी गेला होता. त्याची शर्वरी मुंबई ला एकटीच घरात होती. शिरीष ने नाशिक ला जाण्याअगोदर शर्वरी ला तिच्या आई बाबांकडे जाऊन राहायला अथवा त्यांनाच इथे घरी बोलावून घेण्यासाठी सांगितलं होत पण गोष्ट एका आठवड्याची तर आहे असं म्हणून ती एकटी राहील अस ठरलं. उद्या शिरीष मुंबईला यायला निघणार होता. त्याला तो बाबा होणार आहे हे कसं काय सरप्राइज देऊन सांगायच ती ह्याच विचारात होती पण तिला काही सुचत नव्हतं. तिने सगळ्यात आधी घराची छान सजावट करण्याचं ठरवलं पण तेवढ्यात तिला लक्षात आलं तिच्या घराच्या भिंतींची अवस्था. काही ठिकाणी भिंतींचा रंग उडून गेला होता तर काही ठिकाणी पापुद्रे निघाली होती. पावसाळा असल्याने तर त्या ओल्या झाल्या होत्या. शर्वरी चा तर अगदी मुड ऑफ झाला होता. 


"तरी किती वेळा सांगितलं होत मी शिरीष ला, बंगल्याला छान रंगरंगोटी करून घेऊ. सोबत माझ किचन देखील रेनोवेट करू. पण नाही ऐकेल तर ना.. त्याला तर त्याच काम च जास्त महत्वाचं आहे. आता ऐनवेळी कसं आणि काय करू मी समजत नाहीये." शर्वरी काळजीत पडली होती. तितक्यात तिचा फोन वाजतो. स्क्रीन वर मोठ्या बहिणीच नाव बघताच तिला थोड बर वाटत. 


"हा बोल ग ताई."


"काय ग ए. मुंबई ला जाऊन विसरलीस ना आम्हाला सगळ्यांना. काय आहेस कुठे तु." 


"ताई फक्त एक आठवडाभर आपण बोललो नाहीये. तु तर अशी रिऍक्ट करतीयेस ग जस आपण रोज बोलतो. तु बिझी असतेस तेव्हा मी समजून घेते ना मग आता.." 


"अरे हो हो.. इतकं काय झालं हायपर होयला. मी तर फक्त मस्करी करत होते. काय झालं तुला? भांडण झालं का शिरीष सोबत??" 


"नाही ग ताई. काही नाही तु बोल." 


"अग आम्ही उद्या मुंबई ला यायचं म्हणतोय. तुझी मॅरेज अनिवरसरी आहे ना. तर हे म्हणाले की आपण आई बाबांना घेऊन सगळे जाऊन येऊ आणि सोबत 2 3 काही फ्लॅटस् आहेत ते ही पाहायचे आहेत आम्हाला. तुमचा तो फ्लॅट आहे ना हायवे जवळच तिथेच कुठेतरी ह्यांनी ही पाहिलाय." 


ताई च्या बोलण्यावरून वरून शर्वरी चे डोळे चमकले. त्यांचाही एक टू बीएचके फ्लॅट शिरिष ने लग्नाआधी इंवेस्टमेंत म्हणून घेतला होता. पण त्या घरापासून शिरिष च ऑफिस फार लांब पडत म्हणून शिरीष ने दुसरीकडे जवळच छोटासा बंगला त्याने आणि त्याच्या बाबांनी मिळून घेतला होता. प्रश्न शिरीष च्या कामाचा होता नाहीतर तो फ्लॅट तिला इतका आवडला होता की तिने तर हट्ट च धरला होता तिथे राहण्याचा. खिडकी बाहेर च हिरवळ अन् दुरून दिसणारे डोंगर ह्यांचे मनमोहक वातावरण, पंधराव्या मजल्यावर असल्याने तिथला तो घरभर घुमट राहणारा गार वारा, सार काही तिच्या डोळ्यापुढे तरळल पण अखेर तिला त्यावेळी तिचा हट्ट शिरीष मुळे सोडावा लागला होता. त्यानंतर त्याने भाड्याने देण्याचं ठरवलं होत पण अजून कोणी मिळालं नव्हत तर ते घर तसच रिकाम होत. तिथल्या घरी जाऊन छान तिथेच आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर..? शर्वरी ला ही कल्पना सुचली. 


"हॅलो.. हॅलो शरू तुला ऐकू येतोय का माझा आवाज?" पलीकडून ताई बोलत होती. 


"अं.. हो. हो ताई येतोय आवाज.." शर्वरी भानावर येत म्हणाली. 


"काय ग मधीच कुठे गायब झालीस? नको येऊ का आम्ही? तुमचा काही प्लॅन असेल तर सांग आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ अस काही नाही." 


"ए नाही ताई. काही प्लॅन वैगरे नाहीये उद्या तुम्ही येणार ह्याच विचाराने मी खुप उत्साहित झालेय. प्लिज लवकर या सगळे म्हणजे कसं आपल्याला खुप एन्जॉय करता येईल."  


"हो हो.. चला मग भेटू उद्या. ठेवते मी फोन. काळजी घे बाय." 


शर्वरी च्या आनंदाला उधाण आलं होतं. तिचा मोठा गहन प्रश्न तिच्या ताई मुळे आता सुटला होता. तिने लगेचच कपाटातून तिथल्या घरच्या किल्ल्या आणि आपली पर्स घेऊन बाहेर जाण्यासाठी निघाली. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या अनेक दुकानांत जाऊन तिने तिला सजावटीचे साहित्य घेतले तसेच तिथल्याच एका दुकानात केक ची ऑर्डर देऊन ती हायवे च्या दिशेने निघाली. संध्याकाळ झाली होती पावसाळी वातावरणामुळे अंधार दाटून आला होता. खरेदी करताना तिला वेळेचं भान च राहील नाही. पावसाची रिपरिप चालू झाली. आपल्या हातातलं सामान तिने कसबस सावरत रिक्षा चालकाला पैसे देऊन ती बिल्डिंग च्या दिशेने चालू लागली. बिल्डिंग खाली पोहचताच तिला शिरीष चा कॉल आला. जवळच शेड चा आडोसा घेत तिने फोन कानाला लावला. 


"हॅलो माय ब्युटीफूल राणीसरकार.." 


"ह्ममम.. बोला" 


"अरेच्चा कोणीतरी रुसलय वाटत आमच्यावर." 


"रुसणार नाहीतर काय. दिवसभर साधा एक कॉल नाही ना मेसेज." 


"सॉरी ग राणी. आज काम भरपूर होती. आणि तसंही उद्या सगळी कसर भरून काढूच की इतक्या दिवसांची." 


"इश्यय.. शिरीष प्लिज नाटकी पुरे झाली हा आता. ठेवते मी फोन." 


"बाय द वे, आहेस कुठे तु.? बाहेर आलीयेस का? 


"अरे हो मी.. " शर्वरी खर काय ते बोलणारच होती तितक्यात तिला आठवलं की तिला शिरीष सरप्राइज द्यायचं होत. 

"मी ना बाजारात आलेय. थोडीफार भाजी घ्यायची होती आणि किरकोळ सामान.. बस" 


"ओह ठीक आहे मग. मी पण सकाळी लवकर निघेल." 


"हो सांभाळून ये. बाय.." 


बिल्डिंग च्या आत शिरून ती लिफ्ट मधून ती पंधराव्या मजल्यावर पोहचली आणि किल्ली ने दाराच लॅच खोलू लागली. पण काही केल्या लॅच तिच्या ने उघडत नव्हत. अखेर ती तशीच किल्ली लॅच मध्ये अडकवून खाली वॉचमन ला बोलवण्यासाठी वळली तितक्यात तिला लॅच उघडण्याचा आवाज आला. नशीब एकदाच उघडलं म्हणून तिने दार उघडलं. अंधाऱ्या खोलीत शिरताना तिला गार हवा स्पर्शून गेल्याच जाणवलं. तिने चाचपडतच लाईटचे बटण दाबले. दार बंद करताना तिने एकदा बाहेर एकवार पाहिले तर समोरची घर बंद होती. आवरून झाल्या नंतर त्यांना उद्याच्या पार्टीसाठी आमंत्रित करू असा विचार करत तिने दार आतून बंद केले. 


घरात शिरल्यानंतर ती संपूर्ण घराला न्याहळत हळू हळू पुढे जात तिने बालकानी ची खिडकी उघडली. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. पर्स मधली पाण्याची बाटली घेऊन तिने दोन तीन घोट पाणी पिऊन लगेच कामाला लागली. पिशवी मधील सार सामान काढून तिने टेबलावर ठेवले. सगळ्यात आधी भिंतीला छान झिरमिरे कर्टनस् लावायचे ठरवले. पण भिंतीला थोडीशी धूळ असल्याने ती झाडू कुठेय पाहू लागली. हॉल मध्ये कुठेच तिला दिसला नाही म्हणून ती बेडरूम मध्ये गेली. बेडरूम च दार उघडताच तिला मोठ्ठी पाल समोरच्या भिंतीवर दिसली तशी ती दचकली. 


"अरे बापरे ही पाल इथे कशी काय आली. आता हिला कसं इथून घालवू मी." शर्वरी थोडी चिंतेत पडली. 


तिने आधी झाडू शोधून काढला आणि बेडरूम च्या खिडकीबाहेर त्या पालीला हाकलून खिडक्या बंद करून टाकल्या. हुश्श करत तिने मोठा श्वास सोडला. तोच तिच लक्ष समोरच्या ड्रेसिंग टेबल वरील आरश्यावर गेलं. एक काळी पांढरट आकृती तिच्या मागे दात विचकत उभी होती. शर्वरी जोरात किंचाळली. तिने तिचे डोळे घट्ट मिटून तिथे न बघता बेडरूम मधून बाहेर येत दाराच्या दिशेने धाव घेतली. आणि दार उघडू पाहत होती पण काही केल्या ते दार उघडेच ना.. तितक्यात तिला आठवलं तिने ल्याच उघडत नसताना आपण किल्ली जशी लावली ती तशीच अडकून ठेवली होती. शर्वरी फार घाबरून गेली होती.


"देवा परमेश्वरा मला ह्या संकटातून बाहेर काढ. एकतर कोणालाही माहीत नाहीये की मी इथे आलीय. मला शोधणार तरी कसे.. अरे हा मोबाईल.. माझा मोबाईल कुठेय. अरे देवा तो तर पर्स मध्ये आणि माझी पर्स आत बेडरूम मध्ये." असं म्हणत तिला रडू आले. बेडरूम मध्ये जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. ती पुरती कचाट्यात सापडली होती. ती तिथेच दाराजवळ कोपऱ्यात आपला जीव मुठीत घेऊन बसली होती. अंधार बराच वाढला होता. लाल बल्ब च्या प्रकाशात तिला असह्य होत होते. इतक्यात तिला बेडरूम मधून तिच्या फोन ची रिंग ऐकू आली. 


"ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. " आणि फोन वाजून वाजून बंद झाला.. ती हळूच दबक्या पावलांनी उभी राहून बेडरूम च्या दिशेने वाकून पाहायला गेली तशी जोरात वीज चमकली आणि त्या अंधाऱ्या खोलीत विजेच्या प्रकाशात तिला बाल्कनी च्या खिडकीबाहेर कोणीतरी तिला वाकून पाहताना दिसले. ती जागीच थबकली. ती आकृती एकटीच नव्हती अजून काही होत तिच्या हातात. पुन्हा वीज चमकली आणि अचानक त्याच विजेचा तीव्र झटका लागावा तसच काहीसं शर्वरी ने त्या उजेडात जे पहिलं ते अगदी भयावह होत. ती एक जळालेली बाई आपल्या लहानग्या बाळाला घेऊन उभी होती. तिची चेहऱ्यावर असणारी चामडी खाली लोंबकळत होती.  


मला माझं बाळ पाहीजे.. ती करड्या आवाजात बोलू लागली. तिच्या भयावह आवाज ऐकताच शर्वरी चे शरीरावर काटे उभे राहीले. शर्वरी ने आपल्या पोटावर हात ठेवला. तिला तिच्यापेक्षा जास्त तिच्या बाळाची काळजी वाटू लागली. तिने जोरात नाहीSssss असं म्हणून ती भोवळ येऊन जागीच कोसळली. सकाळी तिला लवकरच जाग आली. तिला काहीच कळत नव्हत काल रात्री जे काही घडलं तो एक भास होता की आणखी काही. ती विचारात च बेडरूम मध्ये हळूच पाऊल ठेवते आणि पाहते तर कालची पाल तिथेच त्याच जागी असते. तिला पाहून शर्वरी आणखी दचकते. आणि खाली पडलेली पर्स उचलण्यासाठी वाकते तर तिच्या नजरेस एक डायरी बेडखाली पडलेली दिसते. ती डायरी शर्वरी उघडून पाहते तर तिला त्यात पहिल्याच पानावर एका नवीन जोडप्याचा फोटो दिसतो. तो पाहून तिला खुप मोठा धक्का बसतो. फोटो मधील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन शिरीष असतो. त्याच्या सोबत असणारी बाई ही काल रात्री जी खिडकीत उभी होती ती हीच होती हे आठवताच शर्वरी ला काहीतरी घोळ आहे हे लक्षात येण्यास वेळ लागत नाही. ती लगेचच तिच्या ताई ला कॉल करून तिथली लोकेशन शेअर करून तिथे एकटीला बोलावून घेते. तो पर्यंत काही हाती लागतंय का म्हणून ती कपाटात पाहू लागते. एका खालच्या कप्प्यात तिला त्या दोघांचा लग्नाचा अल्बम आणि काही दवाखान्यातली कागदपत्रे सापडतात. जी की अगदी दडवून ठेवली असतात. त्यात एका नवजात मुलीच अबोर्शन केल्याचे आढळून येतात. तिच्यासमोर शिरीष चा खरा चेहरा समोर आलेला असतो. फक्त बाकी होत ते म्हणजे त्याला पुराव्यासोबत पोलिसांच्या ताब्यात देणं. त्याच आतापर्यंत च सगळं खोटं वागणं बोलणं आणि त्याच्या घरच्यांनी त्याला ह्या सगळ्याला दिलेला पाठिंबा. तिला आपली फसवणूक झाल्यापेक्षा श्रावणी चे किती हाल झाले असतील हे आठवून फार वाईट वाटले. 


तितक्यात तिला शिरीष चा मेसेज येतो. 


हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी माय लव्ह.. 


आणि शर्वरी देखील रिप्लाय करते हॅप्पी मर्डर एनिवर्सरी.. 


समाप्त.. 




Rate this content
Log in

Similar marathi story from Horror