गुप्तहेर आपलं मन
गुप्तहेर आपलं मन
आज सुट्टीचा दिवस मी पूर्ण एन्जॉय करणार आणि जेवण सुद्धा ऑर्डर करेन, मस्त आज आराम करणार ठरवून मी उशिराच उठले. सगळ आवरे पर्यंत दीड वाजून गेला. जेवणाच पार्सल घेवून मी टीव्ही वर मूव्ही लावून जेवणाचा आस्वाद घेत होते. सगळ झाल्यानंतर मी माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे गच्ची वर जाऊन गोष्टी वाचत बसेन ठरवून वरती गेले. गोष्टी वाचता वाचता अचानक डोळा लागला आणि तिथेच झोपून गेले. नंतर मग डास चावल्याने मला जाग आली.
संध्याकाळ झाली होती. मग मी माझा सगळा पसारा आवरला. गच्चीवरून खाली येऊन फ्रेश झाले, मग दिवा लावून शांत देवासमोर हाथ जोडून उभी राहिली. इतक्यात घरातली लाईट निघुन गेली. अचानक लाईट कशी काय गेली हे बघायला मी वळणार इतक्यात माझ्या पायात पाय अडखळला आणि मी पडले तिथे हाथ लागून दिवा सुद्धा विजला. डोळ्यांपुढे मिट्ट काळोख पसरला होता. कशी बशी मी हाथ चाचपडत काडीपेटी शोधण्याचा प्रयत्न करायला लागले. काडीपेटी हाताला लागताच मी डोळ्यांना थोडा तान देऊन अंधारात पाहण्याचा प्रयत्न करत होती. काडी पेटवताच बाजूने एक सावली धावत जाताना मला दिसली. मी इतकी घाबरून गेले की माझ्या श्वासाने पेटवलेली काडी सुद्धा विझून गेली. इतक्या वेळात मी एकटी होती पण सोबत मनात विचारांचं काहूर माजलं होतं त्याने भिती वाटत नव्हती. पण आता मात्र मी आणि माझं मन सगळं शांत झालं होतं. माझ्यात असणारा गुप्तहेर जागा झाला होता. घडळ्याच्या पळणाऱ्या काट्यांचा आवाज सुद्धा माझ्या मनाला भीतीदायक वाटतं होता. पण सी आय डी लोकांसारखे मला ही काय
होत ते जाणून घ्यायचं होतं. पुन्हा मी काडी हातात घेऊन ती पेटवण्याच्या विचारात होते पण तो काडी पेटवताना होणारा आवाज आता मला नको होता. पण धीर एकवटून मी पुन्हा काडी पेटवण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी ती काडी तुटून गेली. पुन्हा तीन प्रयत्नांत मी काडी पेटवून कसातरी दिवा लावला. मिणमिणत्या उजेडात मी माझा मोबाईल शोधू लागले पण तो सुद्धा दिसेना. मग आठवलं की मी मोबाईल गच्चीवर ठेवून आलीय. आता मात्र मी काय करू काय नको अस झालं होतं. मी माझ्या विचारात होते आणि तितक्यात किचन मधुन ताट खाली पडल्याचा जोरात आवाज आला. मी इतकी घाबरून गेली होती की आता जीव जातोय की काय असच वाटतं होतं. इतक्यात लाईट आली तशी मी दचकून गेली. पुन्हा किचन मध्ये भांड्यांचा खुडखुड आवाज आला. आता मी माझा सगळा धीर एकवटून किचन मध्ये जाऊ की नको अस करत करत मी एक एक पाऊल पुढे टाकत होती.
किचन जवळ पोहचले तशी मी हळूच मी माझं डोकं आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर समोर च दुष्य पाहून डोक्यावर हात मारून घेतला. माझा नवरा मला चायनीज आवडत म्हणून घेऊन आला होता. त्यासाठी तो भांडे शोधत होता. मला असं उभी पाहून त्याचा हिरमोड झाला. त्याला सरप्राइज द्यायचं होत म्हणे. ह्या सगळ्या प्रकाराने मला चांगलच सरप्राइज मिळालं होत. माझी अवस्था हसू की रडू अशी झाली होती. मग त्याला झालेला सगळा प्रसंग सांगितला तसा तो खूप हसला. मग आम्ही गच्चीवर जाऊन गप्पा गोष्टी करत माझं आवडतं चायनीज फस्त केलं. आयुष्यभर लक्षात राहील असं जीवघेणं सरप्राइज मला मिळालं...