Jyoti gosavi

Comedy

3.8  

Jyoti gosavi

Comedy

रामगढमध्ये सीआयडी

रामगढमध्ये सीआयडी

2 mins
3.4K


सीआयडी टीम जेव्हा रामगडच्या स्टेशनवर उतरली, तेव्हा स्टेशन वरती शुकशुकाट होता. एवढ्यामध्ये बसंती टांगेवाली पुढे आली. नुकताच गब्बरने हमला केल्यामुळे सर्व गावांमध्ये स्मशान शांतता पसरलेली होती. बसंतीने "कहा जाना है साब" असे विचारले सीआयडीची एकूण चार माणसे आलेली होती. एसीपी प्रद्युम्न, दया, फेडरीक आणि अभिजीत एवढी मंडळी टांग्यामधून नेताना बसंती सर्वांची चौकशी करत होती. 

साब गब्बरने इस गाव पे हमला किया था. इसलिये सब एरीया सुनसान है. लेकिन बसंती किसी को डरती नही है. 


दोघांनी गोड बोलून बसंतीकडून गावाची आणि गब्बरची माहिती काढून घेतली. ठाकूरच्या हवेलीपर्यंत पोहोचता पोहोचता दया आणि बसंती त्यांचे सूत जमले. बसंती दयाच्या बिल्टवरती खुश तर दया बसून तिच्या सौंदर्यावर फिदा. दया तुझ्या कामावर लक्ष दे आपण येथे कशासाठी आलो एसीपी प्रद्युमनने विचारले. 

 सॉरी सर

घरातूनच ठाकूरकडून गब्बर च्या सगळ्या सवयी माहित करून घेतल्या. गब्बरची किती माणसे आहेत त्यांची ताकद किती आहे त्यांच्याकडे मोबाईल आहेत का त्यांचे नंबर कोणाकडून मिळतील का इत्यादी गोष्टींची चौकशी केली. गब्बरच्या माणसांपैकी एखादा माफीचा साक्षीदार होईल का?याबद्दलदेखील चाचपणी केली आणि त्यांना "कालिया" चा नंबर मिळाला त्यांनी त्याला फोन करून बोलावून घेतले. आणि सांगितले की गब्बरवरती खूप गुन्हे आहेत. लाखाचे इनाम आहे तू जर माफीचा साक्षीदार झाला तर तुला शिक्षा होणार नाही शिवाय त्या इनामातील रक्कमदेखील मिळेल. त्या आमिषाला भुलून "कालिया" बळी पडतो. मग सीआयडीची माणसे गब्बरला तंबाखूऐवजी गुटखा देण्यास सांगतात. त्या गुटख्यामध्ये त्यांनी भांग मिसळलेली असते. इकडे ठाकूरची सून आणि अभिजीत यांचे जमते. 


मग सीआयडीची माणसे बसंतीच्या नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवतात आणि त्याबद्दल गब्बरला आमंत्रित करतात. माणसे वाजवणाऱ्या गाणे बजावणे करणाऱ्या लोकांचे ड्रेस घालून बसंतीच्या ताफ्यामध्ये सामील होतात. एसीपी प्रद्युमन गळ्यामध्ये बाजाची पेटी अडकवतात, दया ढोलकी अडकवतो, अभिजीत हातात तुणतुणे घेतो आणि बसंतीबरोबर नाचाचा पोशाख घालतो. बसंती नाच करत करत गब्बरच्या तंबाखूमध्ये भांग मिसळते. तसेच त्याचा सहकारी कालिया त्याला भांगमिश्रित गुटखा देतो. त्याच्या दारूमध्ये झोपेच्या गोळ्या टाकतो. नंतर गब्बरच्या अंगात भांग एवढी चढते की पायात घुंगरू बांधून गब्बर नाचायला लागतो आणि बसंतीऐवजी तो "जब तक है जान" हे गाणे गाऊ लागतो.


परंतु बाकीची मंडळी सावध असतात. सीआयडीमध्ये आणि त्यांच्यामध्ये फायटिंग होते. हे सर्व नाचणारे गाणारे सीआयडी आहेत हे त्यांना नंतर कळते. तसेच बसंती टांगेवाली ही गावात येऊन राहिलेली सीआयडीची बाई असते हे गावकऱ्यांना कळते. कोणताही जास्त रक्तपात न होता गब्बर आणि त्याची माणसे अलगदपणे सीआयडीच्या जाळ्यात सापडतात. त्याबद्दल त्यांना ठाकूरकडून देखील मोठे बक्षीस मिळते. अभिजीत आणि ठाकूरची मोठी सून यांचे लग्न लावून दिले जाते. अभिजीत सीआयडीतली नोकरी सोडतो आणि रामगढमध्ये स्थायिक होतो. बसंती आणि दया यांचादेखील विवाह होतो.

आणि एकंदरीत पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण 😁😂😂😂😂


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy