अक्षय दुधाळ

Comedy Thriller

4.1  

अक्षय दुधाळ

Comedy Thriller

आयडिया केली आणि खड्यात गेली..

आयडिया केली आणि खड्यात गेली..

5 mins
1.8K


शाळेत असल्यापासूनच किडे करण्याची सवय होती. आम्हाला सरळ रस्त्यावरून जाणं कधी जमलंच नाही. अगदी प्रयत्न करूनही नाही. नेहमी जगापेक्षा वेगळं करायची हौस असायची. ह्या प्रकाराची सुरवात वर्गात सगळे एकसाथ नमस्ते सर म्हणून उभे राहिले की आपण उभा राहायचं नाही इथून सुरवात झाली. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणून झालं की एकट्यानेच गुड मॉर्निंग म्हणायचं. वर्गात डबा खाणे हे तर कॉमन होतं फार. आपल्या विविध गुणदर्शन दाखवायची कोणतीच संधी सोडायचो नाही. वर्गात फटाके फोडणे, सरांच्या गाडीची हवा काढणे, वारांड्यात उभाराहुन मास्तरांना नावाने बोलावणे, ते बघायला लागले की मैदानात त्याच नावाच्या मुलाला हात करणे वगैरे सगळे प्रकार झालेले. आता काहीतरी मोठा कांड करणं गरजेचं होतं त्याशिवाय आपली ओळख होत नाही. ओळख बनवायला खूप अभ्यास करावा लागतो किंवा खूप कांड आता पहिला प्रकार माझ्या सोयीचा असला तरी ग्रुप च्या सोयीचा नसल्याने आम्ही दुसराच प्रकार जादा करायचो. वर्गातून बाहेर काढल्यावर एकदा आम्हाला चिमणी उडाली, कावळा उडाला खेळताना तर एकदा गोल दगडांनी कोयबा खेळताना पकडलो गेलो तेव्हापासून आम्हाला वर्गात बाकावर उभा करायला लागले. आमच्या शाळेच्या बाजूलाच कृष्णा नदी होती. बॉल हरवला की आमची मधली सुट्टी कृष्णा नदीच्या धरणावर पाण्याशी खेळत जायची. एकदा सहज इशल्या ला म्हणालो ह्यो रस्ता कुठं जातोय रं ?? इशल्या म्हणाला आमच्या बा हुता रस्ता बनवायला मला माहित असायला.


ह्ये ×××× सरळ ईचारल्या वर सरळ बोलला तर त्यो इशल्या कसला, किरण्या म्हणाला. मला वाटतंय बागेतल्या गणपतीला जात असावा. व्हय, व्हय आसल, आसल किरण्या ने पाठिंबा दिला. जायचं का उद्या थोडं फास्ट चाललू तर दुसऱ्या वॉर्निंग बेलच्या अगुदर पोहचू?? जाऊया की भावा, इशल्या ने पटकन पाठिंबा दिला आणि किरण्या पण तयार झाला. इतका वेळ शांत असलेले विंड्या आणि निखल्या दोघंही आम्ही नाय येणार म्हणाले. मगर आहे पाण्यात. ह्ये ××× बोड्याच्या इथं चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायला पाणी नाय आणि मगर येणार आहे व्हय. झालं उद्या मधली सुट्टी झाली की लगेच निघायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उगवला. शाळेत आल्याआल्या आमची चर्चा झाली. निखल्या आणि विंड्या नको नकोच म्हणत होते पण मी ऐकायच्या मनस्थितीत न्हवतो. भारताचा शोध वास्को द गामा ने लावला की कोलंबस ने ह्यात वाद सुरू असतानाच आम्ही बागेतल्या गणपतीला जायच्या नविन वाटेचा शोध लावणार होतो. मधल्या सुट्टीच्या आधीच डब्बे खाऊन झालेले. जशी बेल पडली तसं मी आणि इशल्या मागच्या दाराने आणि किरण्या, विंड्या, निखल्या पुढल्या दाराने बाहेर पडलो आणि तडक धरणावर जाऊन थांबलो. वाटेचा अंदाज घेतला आणि निघालो. नदीकडेचा भाग असल्याने सकाळी कामे न उरकलेली तुरळक गर्दी तिथे होती.


नाकाला रूमाल लावून आम्ही पुढे निघालो. मी आणि किरण्या पुढे इशल्या मध्ये आणि निखल्या, विंड्या मागे असा ताफा निघालेला. आता उजव्या बाजूला नदी आणि डाव्या बाजूला उसाची शेती असं होतं. नदी पासून थोडं किनारा आणि मग १० फूट उंचीवर शेती होती. तिरकस चढ चढावा लागेल असा शेती आणि नदीला जोडणारा रस्ता होता. आम्ही मधून रमत गमत पाण्यात भाकऱ्या टाकत चाललो होतो. आमच्या रस्त्यातला पहिला अडथळा आला एक साधारण २ फूट लांबीची चर खोदलेली होती. पाणी असल्यामुळे विंड्या घाबरलेला त्याला आम्ही उचलून पलीकडे नेला. आम्हाला नदीच्या पलीकडून लोकं पुढं जाऊ नका म्हणून खुणवत होते. आम्हाला वाटलं आम्ही त्यांचा ऊस चोरू म्हणून ते तसं म्हणतायत मग आम्ही पण नाय नाय करत पुढे गेलो. असंच पुढे जात असताना अचानक आम्ही थांबलो समोरून सुsssळ करत काहीतरी पाण्यात गेलं. आम्हला वाटलं साप पण पलीकडच्या माणसामुळे कळलं ती मगर होती. आणि एवढा वेळ तो आम्हाला तेच सांगत होता. तो अजूनही आम्हाला सांगत होता पळा तिकडून पण आमच्या ××××× चरबी कमी न्हवती तेव्हा. मगरीने जेव्हा थोडं पुढं जाऊन तोंड वर काढलं तेव्हा मी बरोबर तिच्या डोक्यात फेकून दगड मारला आणि ओरडलो तुझ्या बाचं काय आगाव खाल्लय व्हय तू आम्हाला खाणार. मला वाटलं पाण्यातून ती कसली येतेय पण तिला बा वरणं बोललेलं आवडलं नाही बहुतेक आणि ती माघारी फिरली. लक्षात आल्यावर आमची असली फाटलेली गेलो मेलो झालेलं.


नेहमी शिव्या घालणारा किरण्या हनुमान चालीसा म्हणू लागला निखल्या आणि विंड्याने कवाच झाडाची वरची फांदी गाठलेली. आम्ही तिघे पण पटकन वरती चढलो. मगर एव्हाना झाडाखाली आलेली आणि वरती बघू लागलेली बहुतेक तिला म्हणायचं होतं "ओये बाच्या फाटली का आता ये ना समोर दाखवते तुला" बाकीची सगळीजण मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी फोलपटं उचलणार नाही मोड मध्ये होती. पण ॲज नेता मला काहीतरी करणं गरजेचं होतं म्हणून मी झाडाची पान तोडून ती मागरीच्या अंगावर टाकली. ती आणखी चिडली मगरी डाव कसं काय धरत असेल बरं? अश्या प्रसंगी पण किरण्याला काहीतरी सुचत होतं. 'अरे सापाची मावशी ना ती सापाला तिनेच तर शिकवलंय डूख धरायला' अश्या प्रसंगी माझं एवढं डोकं चालतंय बघून सगळेच माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होते. आमच्या उंचीपेक्षा जास्त आकाराच्या मगरी बरोबर दोन हात करणं टाळून झाडाच्या बाजूला असलेल्या शेतात शिरलो. पहिली बेल वाजयला अजून पाच मिनिटं शिल्लक होती. मगरीला चिडवून आम्ही माघारी परतलो.


पोहचेपर्यंत वर्ग सुरू झालेला. पळून पळून सगळेच घामाघूम झालेलो. सरांना आत येऊ का विचारल्यावर सरांनी कुठे होता रे ?? असं विचारलं. सगळे माझ्याकडे बघायला लागले म्हणजे उत्तर मी देणं अपेक्षित होतं. पहिल्या बाकावर बसलेल्या झिपरीच्या वहीवर मिल्खाचा फोटो होता. मी लगेच म्हणालो सर रनिंग प्रॅक्टिस करत होतो. तुमच्या आशीर्वादाने ह्यावेळी आपल्याच वर्गातला पहिला येणार म्हणून पटकन सरांच्या पाया पडलो. ही माझी जुनी सवय मोठ्यांना मान दिला की ते आपल्या किमान ९९ चुका तरी माफ होतात. माझी ट्रिक वर्क झाली सर पाठीवर थोपटत म्हणाले तुझ्यासारख्या विद्यार्थ्याकडून अशीच अपेक्षा आहे. मला उगीचच सरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यासारख्या दिसल्या. झालं आम्ही सुटलो. नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गात खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठीने मारून कसं परत पाठवलं पर्यंत सगळं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला ह्याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy