STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Drama Romance

2  

अक्षय दुधाळ

Drama Romance

प्यारवाली लव्हस्टोरी

प्यारवाली लव्हस्टोरी

13 mins
203

ही गोष्ट आहे इशाची. इशा कशी दिसते किंवा कशी आहे हे तुम्हाला हळूहळू कळेलच थोडक्यात सांगायचं तर ती एक टिपिकल मुंबई गर्ल होती आणि ही तिची प्यार वाली लव्हस्टोरी सिंपल आहे पण हटके आहे.

जय एक अप्पर मिडल क्लास मधील मुलगा. उंचापुरा गोरा रंग आणि कुरळे केस. कोणीही बघताच प्रेमात पडेल असं रूप होतं त्याचं. इशाला तो दोन वर्ष सिनिअर होता. कॉलेजच्या एका इव्हेंट ला त्यांची ओळख झाली आणि मैत्री आणि पुढे जाऊन मैत्री झाली. आज जयचा सेंड ऑफ होता आणि त्या नंतरच ते दोघे भेटणार होते. तो कधीचा आला होता पण नेहमी प्रमाणे इशाला उशीर झालेला, जय चिडला असेल पण इशा मनवेल त्याला.

"हाय आज पुन्हा एकदा लवकर आलात मॅडम",जय

" हा मग इशा अल्वेज इन टाइम ", ईशा

"सो हाउ वाज फंक्शन सेरेमनी"ईशा

"कूल" जय

सो व्हॉट यु डीसाईड अबाऊट फरदर जॉब करतोयस की समथिनग एल्स ",मी

"बिझनेस" जय

"म्हणजे आता आपलं भेटणं बंद बरोबर ना ??"ईशा

" नाही रे भेटू ना आपण, वेळ मिळेल तसं वेळ काढू आणि व्हाट्सअप आहेच की आपलं", जय

"म्हणजे तुझ्या इच्छेनुसार असाच ना" ईशा

" नाही ग राणी तुला वाटेल तेव्हा तूझी इच्छा असेल तेव्हा भेटू बस ",जय

"हा चल बस कर नौटंकी पार्टी दे आता मला इंजिनिअरिंग झाल्याची",ईशा

"ऍट युर सर्व्हिस मॅम आप खिदमत में बंदा हाजिर है",जय

"हो का चल ", ईशा

कॉलेज सुरू होतं तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. रोज भेटणं बोलणं एकत्र प्रेमाचे क्षण घालवणे सगळं कसं सुरळीत चालू होतं. परफेक्ट हॅपी कपल पण म्हणतात ना प्रेमाची किंमत लाँग डिस्टन्स मधेच करते असंच काहीसं झालंय त्यांच्यात. ईशाला डान्स खूप आवडायचा तिला अगदी त्यात करिअर वगैरे करायचं होतं. पण संधी मिळत नव्हती खूप ऑडिशन दिल्या पण पदरी अपयश. असंच एक दिवस टीव्ही बघत असताना ऍड लागली. नवीन रिऍलिटी शो येतोय डान्सचा, तिचे डोळे एकदम टीव्हीकडे फिरले. सगळी कामे बाजूला टाकून तिकडे लक्ष गेले. मन धडधडत होतं. समोर एक संधी दिसत होती. पण तिचा मूड ऑफ व्हायला जास्त वेळ नाही लागला. अँकर बडबडत होता सो फ्रेंड्स रेडी रहा तुमच्या पार्टनर सोबत घेऊन येत आहोत तुमच्यासाठी तुमच्या शहरात नवाकोरा डान्स रिअलिटी शो "डबल धमाल" असेल कमाल तर करा धमाल. ऑडिशन डिटेल्स आर इन युवर टीव्ही स्क्रीन. ईशाला सगळा फ्लॅश बॅक आठवत होता. कानात हेडफोन घालून रूम मध्ये एकटीच नाचायची.आज पुन्हा एकदा तिच्याकडे संधी चालून आलेली. मनात कुठेतरी वाटत होतं काश जय को डान्स आता. पण नाही ते चान्सेस काही नशिबात नव्हते. मनात विचारांचं काहूर माजलं असताना फोनची रिंग वाजली. जय कॉलिंगsss

हाय डियर ऐक उद्या सकाळी नेहमीच्या ठिकाणी भेट खूप महत्त्वाचं बोलायचं आहे दहा वाजता बी ऑन टाईम गडबड आहे लव यू अंड बाय, काही बोलायच्या आतच जयने फोन कट केला


आज खुप दिवसानी ती जयला भेटणार होती. तिला त्याच्या साठी स्पेशल दिसायचं होतं. फिक्कट पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस त्यावर मोरपंखी रंगाची ओढणी, मॅचिंग कानातले उजव्या हातात त्याने गिफ्ट दिलेलं घड्याळ आणि ओठावर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, अशी काहीशी तयार होऊन ती ठरलेल्या ठिकाणी पोचली. हीअर ही गोज जय बाईक शिव येत होता. Pulser 220nस, ब्ल्यू जीन्स डार्क पिंक कलरचा टी-शर्ट, डोळ्यावरती Raybean गॉगल आणि स्पार्क्सचे शूज पण आज तो एकटा आला नव्हता. थोडेसे कुरळे स्पार्कल केस कानात बाली, लूज व्हाईट टीशर्ट ब्ल्यू जीन्स हातात मन्या मन्याचं ब्रेसलेट, डाव्या हातात फास्टट्रॅकचं वॉच पाच फूट आठ इंच उंची कोण होता तो?

हाय, जय

हाय, इशा त्याच्याकडे चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव ठेवत बघत होती

Oopes मी विसरलोच तुमची ओळख करून द्यायची इशा मीट माय बेस्ट फ्रेंड शिव, आणि शिव ही इशा


हाय, शिव 

हाय, इशा

 मला माहिती आहे तुला खूप कन्फ्युजन झाला असेल, पण अजून कन्फ्युजन वाढायच्या आधी सांगतो. हा शिव माझा फ्रेंड आहे आणि ह्याला पण डान्स आवडतो आणि तो कोणता तरी नवीन शो आला आहे ना त्यात जोडी लागणार आहे, सो मला असं वाटतंय, म्हणजे तुला चालणार असेल तर तुम्ही दोघांनी मिळून ह्यात पार्टिसिपेट करावं, जय

 मी सांगते तुला आपण बोलू यावर मला उशीर होतोय बाय बाय शिव नाईस टू मीट यू बाय, इशा 

ओके बाय पण सांग काय ते मला बाय लव यू , जय 

सेम नियर बाय, शिव

 काय चाललं चाललं होतं हे तिचं तिला कळत नव्हतं.शिव, ही इज सो क्युट and हँडसम तिला तेच तेच आठवत होता त्याने केलेला शेक हॅन्ड, त्याची ती चार्मिंग स्माईल लव्ह अट फर्स्ट साईट म्हणतात ते हेच का, जय सोबत लास्ट टू इयर पासून जे होतं ते काय होतं? जर ते अट्रॅक्शन होतं तर कशावरून हे पण atracton नसेल. आणखी एका वर्षाने मला दुसरा कोणीतरी आवडेल सो शेम ऑन मी तिला काहीच कळत नव्हतं. ती टोटली कन्फ्युज झाली होती तेवढ्यात फोन वाजला जय कॉलिंगsss

हॅलो काय ठरवलेस, जय

कशाचं, इशा

डान्स कॉम्पिटिशनचं, कमॉन यार इट्स युवर ड्रीम, जय

 हो पण आर यु शुअर अबाउट शिव, तुला चालेल मी त्याच्यासोबत डान्स केलेला

 तू कर त्याच्या सोबत परफॉर्म चांगला डान्सर आहे माझ्या शेजारीच राहतो लहानपणापासून ओळखतो मी त्याला, जय 

ओके देन आपण उद्यापासून रिहर्सल ला सुरुवात करू, इशा 

आपण नाही तुम्ही मी उद्यापासून 1 मंथ साठी बिजनेस टूरवर जातोय, जय 

व्हाट द हेल तू नसणार आहेस, मी नाही जाणार रिहर्सल अॅड ऑल ला, इशा 

असं काय करते राणी जा आणि दे ऑडिशन माय वेल विशेष ऑल्वेज विथ यु, जय

 जाणं गरजेच आहे का?, इशा 

हो रे जावं लागेल बट ऑल द बेस्ट अॅड लव यू, जय 

लव यु टू बाय, इशा

बाय आय सेंड यू शिव नंबर, जय

काय करू मेसेज करू का त्याला की नको तिच्या विचारात असताना तिच्या मोबाईल ला मेसेज आला

हाय शिव हिअर, शिव

खूप वेळ रिप्लाय न आल्याने शिव ने पुन्हा मेसेज केला

हे आर यु देअर, शिव

हाय, इशा

सो काय ठरवलंय तुम्ही आपण जातोय ना कॉम्पिटिशनला, शिव

Hmmm, इशा

ओके देन आपण उद्यापासून रिहर्सल ला सुरवात करू, शिव

ओके चालेल पण कुठे, इशा  

तुझ्या घरा पासून जवळ माझ्या मित्राची एक डान्स अकादमी आहे तिथेच करू तू 10 वाजता भेट, शिव

ओके डन, इशा

आनंदात मित्र आठवो व न आठवो पण प्रॉब्लेम आला की मित्राची बरोबर आठवण येते. इशाला पण अली, प्रीतीची

प्रीती इशाची लहान पणापासूनची मैत्रीण. कोणत्याही प्रॉब्लेम वर तिच्या कडे सोल्युशन होतं. इशाने तिला कॉल केला

हाय डार्लिंग, प्रीती

घरी ये जान पटकन लोच्या झालाय एक, इशा

फोन कट केल्यानंतर बरोबर 15 मिनिटात प्रीती हातात एक थैली घेऊन ओरडतच आत आली

काय गं डुचके तुला काय फक्त प्रॉब्लेम आल्यावरच मी आठवते का ?, प्रीती

तसं नाही गं बर ते जाऊदे मी काय सांगतेय ते ऐक, इशा

वेट आधी मी खायला आणलंय ते ओव्हन मध्ये गरम करून आण आणि येताना कॉफी पण घेऊन ये, प्रीती


प्रितीने आणलेलं त्यांचं ऑल टाइम फेवरेट macc aloo tikki विथ चीज बर्गर ओव्हन मध्ये गरम करून प्लेट मध्ये काढून सोबत कॉफी चे दोन मग घेऊन इशा आली

बर्गर खात इशाने जय पासून शिव पर्यंतची सगळी स्टोरी डिटेल मध्ये सांगितली.

हम्म, तो ये बात है, प्रीती

हो आणि आता मला कळत नाहीये काय करायचं ते, इशा

ओके तू डान्स प्रॅक्टिस सुरू कर वेळ जाईल तसं हळुहळू एकेक कोडं सुटत जाईल, प्रीती

ओ मिस सायकॉलॉजी स्टुडंन्ट, मी काय बोलतेय आणि तुझं काय चाललंय, इशा

ऐक माझं आता हो बोललीयस तर जा प्रॅक्टिस ला बाकी विचार नको करू होईल सगळं चांगलं, ऑल द बेस्ट, प्रीती

ओके ठिकाय, इशा

आणि कळव मला काय होतंय ते, प्रीती

Hmm, इशा

कधी आहे ऑडिशन, प्रीती

फ्रायडे ला, इशा

म्हणजे तीन दिवसांनी, प्रीती

हो, इशा

ओके जमके प्रॅक्टिस कर इस बार सिलेक्शन होणा चाहीये, ऑल द बेस्ट डार्लिंग, प्रीती

थँक्स डिअर, इशा

चल पळते मी मला अपडेट देत रहा, बाsssय, प्रीती

बरं वाटलं तुझ्याशी बोलून, बाsssय, इशा


प्रीती म्हणतेय ते इशाला पटत होतं. उगाच मनात किंतू आणण्यापेक्षा सध्या डान्स वर लक्ष केंद्रित करू. तिने घरी ऑडिशन बद्दल सांगितलं. नाही नको काय गरज आहे म्हणत त्यांनीही परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी ती ठरल्या प्रमाणे स्टुडिओ ला पोचली. शिव ऑलरेडी तिथे पोचला होता. हाय हॅलो मध्ये वेळ न घालवता त्यानी बेसिक वॉर्म ला सुरवात केली.

1 2 3 4 काउन्ट वरती ते थिरकत होते 5 6 7 8 ला रिटर्न साधारण 10 मिनिट्स बेसिक वॉर्म झाल्यावर त्यांनी ब्रेक घेतला.

शिव ने तिला वॉटर बॉटल दिली

थँक्स, इशा

आपल्याला एक ट्रॅक ठरवून त्यानुसार प्रॅक्टिस केली पाहिजे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, शिव

हम्म, मला ही असंच वाटतंय, इशा

तुमच्याकडे आहेत का ट्रॅक, इशा

प्लिज तुम्ही वगैरे नको आपण डान्स पार्टनर आहोत केमिस्ट्री जुळली पाहिजे, तूच म्हण, शिव

ओके आहेत का ट्रॅक तुझ्याकडे, इशा

साऊंड्स गुड, हो आहेत, शिव

पुढे 15 मिनिट्स वेगवेगळे ट्रॅक ऐकण्यात गेले. त्यातूनच एक ट्रॅक सिलेक्ट करून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली.

आजचा दिवस खूप स्पेशल होता इशासाठी, पहिल्यांदा तिने जय सोडून कोणत्या तरी दुसऱ्या मुला सोबत दिवस घालवलेला. इशाने प्रीतीला फोन करून आज काय घडलं ते सगळं सांगितलं त्यावर प्रितीने फक्त ठिकाय म्हणून फोन ठेऊन दिला. प्रीतीच्या अश्या वागण्याचा राग आलेला पण आज ती भलतीच खूष होती. थोडा वेळ जयशी बोलून ती झोपी गेली.

पुढचे दोन दिवस प्रॅक्टिस मध्ये भुर्रकन उडून गेले. कमी झोप आणि जास्त प्रॅक्टिस करून फक्त दोन दिवसात त्यांनी डान्स बसवला होता. बघता बघता ऑडिशन चा दिवस उगवला. आज सकाळी सकाळीच प्रीती इशाच्या घरी आलेली. मम्मीने हातावर दिलेलं दहीसाखर खात इशा प्रीतीला म्हणाली, चल निघुया पटकन खूप उशीर झालाय.

ओये मिस मी काकुकडे आलीय जेवण बनवायला शिकायला, तू जा ऑल द बेस्ट, प्रीती

यू आर जस्ट इम्पोसीबील, ओके बाय निघते मी, इशा

बाय डार्लिंग ऑल द बेस्ट किल इट, प्रीती

थँक्स डिअर, इशा

इशा ऑडिशन च्या ठिकाणी पोचली. शिव ऑलरेडी गेटवर येऊन उभा होता. ठरल्या प्रमाणे तो costume सोबत घेऊन आला होता. इशा ते घेऊन पटकन चेंजिग रूम मध्ये चेंज करायला गेली. ती येईपर्यंत शिव ने फॉर्म भरून ठेवला

2 वाजेपर्यंत नंबर येईल आपला, शिव

हम्म, इशा

नर्व्हस?, शिव

हो, पहिल्यांदा एवढी मोठी ऑडिशन देतीय, टेन्शन तर येणारच, इशा

ओके रिलॅक्स, काही खाणार, शिव

नको ऑडिशन नंतर खाऊ आता नको प्लिज, इशा

बिस्कीट खायला प्रॉब्लेम नसेल, शिव बॅगेतलं बिस्कीट काढून तिच्या समोर धरत म्हणाला

तिनेही हसत त्यातली दोन तीन बिस्किटे खाल्ली.

ऑडिशन त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगली झाली. जजेसनी दोघांचं खूप कौतुक केलं. केवळ दोन दिवसात हा डान्स बसवलाय ह्यावर त्यांचा विश्वास बसत न्हवता. दोघांची केमिस्ट्री जजेस ना खूप आवडली आणि परिणामी दोघे नेक्स्ट राऊंड साठी सिलेक्ट झाले. त्यांची मेहनत आता फळाला आली होती. हो पण एवढ्याने हुरळून जाऊन त्यांना चालणार नव्हतं. त्यांना लांबचा म्हणजे ग्रँड फिनले पर्यंत चा प्रवास गाठायचा होता. त्यासाठी ते जोरदार मेहनत करत होते. मेहनतीचे फळ म्हणून ते एकेक राऊंड पुढे जात होते. त्या दोघांची मैत्री पण आता खुलत चालली होती. शिव पटकन स्टेप शिकायचा आणि मग तिलाही शिकवायचा. तिला तर जणू जगाचा विसरच पडला होता. सेमिफायनल राउंडला त्यांना एक रोमँटिक गाणं मिळालेलं. खूप इंटन्स कोरिओग्राफी होती ती. एक्सप्रेशन डान्स moves सगळंच स्मूथ होतं त्यात. असाच एक स्टेप करताना ती 1 2 3 4 ला हात पकडून पुढे जाणार आणि 5 6 7 8 ला गिरकी घेत त्याच्या मिठीत येणार. पहिल्यांदाच असं काहीसं ते अनुभवत होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बुडाले होते. ओठ ओठांजवळ सरकत होते पण अचानक विजेचा झटका बसावा तसं दोघांच्या लक्षात आलं आणि ते झटकन वेगळे झाले. दोघाणीही त्यावर न बोलता पुन्हा प्रॅक्टिस सुरू ठेवली.ह्यानंतर शिवच्या मनात ही फिलिंगस जाग्या झाल्या. त्याच्या प्रत्येक स्पर्शात तीला ते जाणवत होतं. फायनली तो दिवस आला. सेमिफायनल बघायला जय आणि प्रीती दोघेही आलेले. त्या एपिसोड मध्ये शिव आणि इशा परफॉर्मर ऑफ द वीक ठरून फायनलमध्ये पोचले. इशा आणि शिव आता सेलिब्रिटी झालेले. इशाचं स्वप्न जवळपास पूर्ण झालेलं. शिव आणि ती आज पहिल्यांदाच घरी आलेले. त्यात त्यांचं जंगी स्वागत झालं. आणि मग दोघेही आपापल्या घरी गेले. आजचा दिवस आराम करून उद्या पासून ते पुन्हा रविवारी होणाऱ्या ग्रँड फिनालेच्या परफॉर्मन्स च्या तयारीला जाणार होते. जय ने फोन करून तिचं मन भरून कौतुक करत होता. पण तीने थकलीय म्हणत फोन ठेवला. तिला राहून राहून शिव ची आठवण येत होती. म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर. असंच झालं होतं तिचं. तिने प्रीतीला फोन केला आणि पुढच्या काही मिनिटात प्रीती वडापाव आणि फंटा घेऊन इशाच्या घरी आली. इथे वेळ काय आणि हे बावळट करतंय काय असं मनातल्या मनात म्हणत इशाने प्रीतीला तिच्या मनाच्या होणाऱ्या घालमेली बद्दल सगळं सांगितलं. सगळं शांतपणे ऐकून घेऊन प्रीती किचन मध्ये गेली आणि दोन ग्लास घेऊन आली त्यात दोघीसाठी फंटा ओतला. इशा वैतागून काही बोलणार इतक्यात तिला थांबवत 

आर यू इन लव विथ शिव, प्रीती

हा काय प्रश्न आहे, इशा

हो की नाही, प्रीती

माहीत नाही म्हणजे जय, इशा पुढे बोलणार तेवढ्यात प्रीती म्हणाली 

हे बघ जिथपर्यंत मला माहिती आहे, जय ने तुला कधीच प्रो केलं नाहीये. त्याने जस्ट फ्रेंडशिप विचारला आणि तुम्ही त्यानंतर एकमेकांना डेट करू लागला. हे प्रेम नाहीये डॅमीट, प्रीती

बावळट काय बदबडतेयस तुझं तुला तरी कळतंय का? इथे मी जय ला फसवतेय असं वाटून मला गिल्ट आलंय आणि तुझं काय मध्येच. त्याच्यामुळे मी आज फायनलला पोचतेय आणि शी काय होतंय हे, इशा

कूल, बघ उद्या जाऊन हा प्रश्न पुन्हा येणारच आहे. उद्या काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा आज आर या पार करून टाक, प्रीती

मला जयला फसवायला नाही जमणार, इशा

बघ तुझ्या हातात तीन आयुष्य आहेत. शिव त्याच्या मित्राला काहीही झालं तरी फसवणार नाही कारण त्याला फसवायचं असतं तर एवढ्या दिवसात सहज शक्य होतं. जय चा काही प्रश्न नाही म्हणजे राहिली तूच आता तूच ठरव काय करायचंय ते, प्रीती

एकदा फायनल झाली की परत शिव ला भेटणारच नाही म्हणजे हा विषय संपेल, इशा

भेट तर होईल आणि शोज साठी एकत्र पण यावं लागेल भविष्यात तुम्हाला, तू आता योग्य वेळी योग्य निर्णय घे, प्रीती.

एवढं बोलून प्रीती निघून गेली. ऑडिशन पासूनचं इशाला सगळं आता फ्लॅशबॅक सारख तिला आठवत होतं. इशा आणि शिव ने एकत्र स्पेण्ड केलेला टाइम, त्याचा फस्ट टच. तो तिला इशू म्हणायचा. तिला ते जाम क्युट वाटू लागलेलं. जय तिला कधीच असं काही म्हणाला न्हवता. नकळत तिचं मन कंम्पेअर करू लागला होतं दोघांना. विचारांच्या तंद्रीत तिला कधी झोप लागली कळलेच नाही

शेवटी इशाने कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं ते झालं. शिव आणि इशा डबल धमाल ची ट्रॉफी जिंकले. अनबिलिवेबल मोमेंट होती ती दोघीसाठीही. इशाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. विजेत्या जोडीचं नाव अनौन्स करताच शिव ने इशा ला मिठी मारली. कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते. त्या फायनल नंतर इशा आणि शिव दोघांनीही एकमेकांशी कॉन्टॅक्ट बंद केला. ठरवून किंवा बोलून नाही न बोलता. दोघांनीही परस्पर ठरवलं. जयचं भेटणं पण कमी झालेलं. क्लाइंट इशू सांगून सतत बिझी असायचा. एक दिवस अचानक जय ने इशाला फोन करून अर्जंट भेटायला बोलवलं. भेटल्यावर बोलू म्हणून त्याने फोन कट केला आणि ऍड्रेस टेक्स्ट केला.

 फायनल नंतर आजच ती बाहेर पडली होती. पत्ता bandstand चा असल्याने तिला फार शोधावा लागला नाही. जय आणि ती नेहमी इथेच भेटायचे. साधारण तासाभराचा प्रवास करून ती तिथे पोहचली. ती ठरल्याप्रमाणे वरती फोर्ट वर जाऊन उभी राहिली. समोर वरळी सी लिंक, त्यावरून धावणाऱ्या गाड्या खाली समुद्र आणि संध्याकाळ असल्याने किंचित गार वारा. सूर्य मावळतीला झुकलेला. रोमँटिक वातावरण होतं. ती तिच्या विचारात गुंग असताना अचानक पाठून आवाज आला,

बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तू जिये हजारो साल ये मेरी है आरजू 

हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू डिअर इशा

इशा आज तिचाच बड्डे विसरली होती. जय ने आणलेला केक तिने कापला. जायला भरवला. जय नेही तिला भरवला.इशा ला सरप्राईज द्यायला शिव आणि प्रीती पण आलेले. हा सगळा प्लॅन शिव नेच केलेला. हीच वेळ होती जयला तिच्या शिव बद्दलच्या फिलिंग्स जय ला सांगायची. ती जयला हे सांगणार एवढ्यात जय म्हणला वेट मला तुला काहीतरी सांगायचंय असं म्हणत त्याने खिशातून रिंग काढली गुडघ्यावर बसला आणि म्हणाला

आपण एवढे वर्ष एकत्र फिरतोय. Now we are good friends. Its time to move forward. Lets get married? विल यू मॅरी विथ मी? , जय

प्रितीने बरोबर नोट केलं होतं जय, इशा

काय नोट केलेलं, काय बडबडतेयस, जय

जय आपण फ्रेंडस होतो आहोत आणि राहू बट माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. बघ आपण 2 वर्ष एकत्र होतो म्हणजे माझे बर्थडे दोन वेळा आले. पण सरप्राईज यावर्षी मिळालं ती पण आयडिया शिव ची होती. माझं ड्रीम पूर्ण झालं मान्य त्याचा वे तू होतास पण पूर्ण झालं शिवमुळे, इशा

काय बदबडतेयस तू जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल, जय

हेच की मी तुझ्यासाठी योग्य मुलगी नाहीये, माझं शिव वर प्रेम आहे आय लव्ह शिव नॉट यू, इशा

आलं लक्षात म्हणजे मी एक महिना टूर वर काय गेलो तुमचे हे चाळे सुरू झाले तर, आणि काय रे ये शिव लाज वाटते का असं करायला, मुतलास लेका तू मैत्रीवर, जय

स्टॉप इट जय इनफ इज इनफ, इशा

का सत्य बोललो म्हणून राग आला, जय

जय तू असा वागशील असं अजिबात वाटलं न्हवतं. आणि तू शिव ला काय बोलतोयस त्या बिचऱ्याने तर बेस्ट फ्रेंड शी दगाबाजी कशी करायची म्हणून कधीच फिलिंगस बाहेर नाही काढल्या. त्याने ठरवलं असतं तर आता कदाचित तू इथं आलाच नसतास आणि आम्ही कधीच एकत्र आलो असतो.

थोडावेळ कोणीच कोणाशी काहीच बोलला नाही. इशा रडत होती आणि प्रीती तिला समजावत होती. तिच्याही डोळ्यातून पाणी येत होतं

जय रागाने जायला निघाला पण 'जय आय एम सॉरी इफ आय हर्ट यू आय डजन्ट मिन that ऍक्युअली', इशाच्या ह्या वाक्याने थांबला. 

जय परत आला, त्याने आणलेली रिंग तिला दिली. दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवत म्हणाला, " ये वेडाबाई मी रडवलं ना तूला खरंच सॉरी मलाही असंच वाटतंय की शिव योग्य मुलगा आहे तुझ्यासाठी."

सॉरी शिव, हो आणि माझ्या फ्रेंड ला नेहमी हॅपी ठेव, जय


सगळे एकदम हसले. इशाच्या तर हसताना पण डोळ्यातून पाणी येत होतं. दोघा मित्रांनी एकमेकांना मिठी मारली. जय जायला निघाला सोबत प्रीतीही निघाली। 

हॅलो न्यू कपल म्हणत प्रीती इशा जवळ जाऊन तिच्या कानात म्हणाली तुझं फिक्स झालंय ना आता मी जय सोबत गेले तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना त्यावर इशा काही बोलणार एवढ्यात प्रीती तिथून पळून गेली.


ते दोघे गेल्यावर वरून इशाच्या समोर आला अलगद तिचा हात हातात घेतला दुसरा हात कंबरे भोवती वेढा घालून तिला जवळ ओढलं. तिच्या कानात आय लव्ह यू म्हणत प्रेमाची कबुली दिली. लाजून तिने त्याच्या छातीवर डोके टेकवले. तिला त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. त्याने तिचं डोकं अलगद वर केले ओठाला ओठ मिळाले आणि प्रेमाच्या नव्या अध्यायला सुरवात झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama