STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Romance

3  

अक्षय दुधाळ

Romance

तो आणि ती(भांडण)

तो आणि ती(भांडण)

4 mins
382



जून चा एक आठवडा उलटून गेलेला होता पण पावसाचा काहीच पत्ता न्हवता. वृत्तपत्र मात्र १०२ % पावसाची खात्री देत होतं. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार ह्यावेळेस १०८% पाऊस पडणार होता. ह्याचविषयावर चर्चा करायला चार कार्टून बसलेले बहुतेक ते वेदशास्त्र तज्ज्ञ होते. मला हे न्युज चॅनेल वाल्यांची भारी माजा वाटते म्हणजे विषय कोणताही असो हे चार लोकांना बोलावतात आणि मग ते चारजण एकमेकांशी भांड भांड भांडतात. बऱ्याचदा विषय सोडून प्रकरण भलतीकडेच जाते कधी कधी तर मला प्रश्न पडतो हे न्यूज चॅनेल आहे की कॉमेडी शो. एव्हाना वातावरणात बदल सुरु झालेला चार महिने आपलं वर्चस्व सिद्ध करणारा सूर्य आज वरमला होता. एव्हाना वातावरणात बदल सुरू झालेला ४ महिने आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या सूर्यावर काळ्या ढगांनी युद्ध सुरू केलेला. म्हणतात ना गर्वाचे घर खाली तसाच काही झालेलं. सूर्याला त्याच्या उष्ण असण्याचा ह्यावेळी थोडा जास्तच गर्व झालेला पण काळ्या ढगांनी एव्हाना त्याच्याबरोबर लढाई करून आपले राज्य आणलेले. स्वागताला वारा आज सुसाट्याने वाहत होता त्याने बाहेर पाहिलं आणि हसत म्हणाला आज वरुणराजा येणार वाटत. वरून राजाच्या स्वागताला वीज जोरदार तोफ देत होता आणि वाऱ्याचा तर झिंग झिंग झिंगतच सुरू झालेला.

पाऊस म्हणाल की त्याला संदीप खरे ची कविता आठवायची आणि तो ती म्हणायचा -

आता पुन्हा पाऊस येणार मग आकाश कलेनिळे होणार

मग मातीला गंध फुटणार मग तिची आठवण येणार काय रे देवा

एवढे म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि हो तीची आठवणही आली. काही वर्षांपूर्वी त्यांचं ह्याचवेळेस भांडण झालेलं, तसही भांडण नसेल होत ते कपल, कपल कसलं?

पण ह्यावेळी त्यांच्यामध्ये एवढं भांडण झालेलं की ती त्याच्याशी बोलायची बंद झालेली . कारणही तसंच होतं तो नेहमीप्रमाणे तिला भेटायचंय हे विसरलेला आणि तिकडे पावसात ती त्याची वाट बघत उभी होती आणि राजे पाऊस पडतोय म्हणून बाहेरच पडले नाहीत. खरंतर त्याच्या लक्षातच नव्हतच पाऊस फक्त एक बहाना. पावसात भिजल्यामुळे ती आजारी पडली आणि दोन दिवस कॉलेजला दांडी. याला कळून चुकलेल, आपणच माती खाल्लीय. तिसऱ्या दिवशी ती आली. सगळं काही रोजच्यासारखाच होतं काही नव्हतं तर तिच्या चेहऱ्यावर तेज. दोन दिवस आजारी असल्यामुळे चेहरा काहीसा सुकलेला होता. तिचा सुकलेला चेहरा पाहून त्यालाही वाईट वाटलं. त्याने ती आत येत असताना नेहमीप्रमाणे हाय केलं पण ती काहीच न बोलता तिथून निघून गेली . वातावरण तापलय आणि आता आपलं काही खरं नाही हे त्याला कळून चुकलेल. लेक्चर चालू झालेलं त्याच लक्ष तिच्याकडेच तिच्याकडेच होतं. दोन तीन लेक्चर्सना त्याला खिडकीतून बाहेर बघतोय म्हणून बाहेरही काढलं पण आता त्यांना कोण समजावणार हा खिडकीतून बाहेर नाहीतर खिडकी जवळ जी बसलीय तिच्याकडे बघत होता. शेवटच्या लेक्चरला दोघांची नजरा नजर झाली त्याने पटकन कानाला हात लावत हळूच सॉरी म्हणाला पण तिने न बघितल्यासारखं करत दुर्लक्ष केलं. कॉलेज सुटल्यावरही त्याने तिच्याशी बोलण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा अपयश. शेवटी आपलं काहीच चालत नाही असं लक्षात आल्यावर त्याने तिच्या एका मैत्रिणीची मदत घेत तिला नोट्स च्या बहाण्याने जवळच असलेल्या बागेत बोलवलं. नुकताच पाऊस झाल्यामुळे पिवळसर दिसणारी झाडांची पानं आता हिरवीगार दिसत होती. आभाळ आल्यामुळे रावीराजाचंही अजून आगमन झालं न्हवतं. पक्षांचा किलबिलाट सुरू होता. ब्लॅक कलर पंजाबी ड्रेस, त्यावर पिंक कलरची ओढणी मोठाले कानातले आणि चेहऱ्यावर गोंधळलेला भाव समोर तो उभा होता जे तिला अजिबात अपेक्षित न्हवतं. तो मात्र हलकेच गालात हसत होता.

तो :- हाय

ती :- का आलायस इथे?? मला नाही बोलायचंय तुझ्याशी.

तो :- अरे बापरे! कोणीतरी खूपच रगवलेलं दिसतंय माझ्यावरती, सॉरी ना डिअर खरंच सॉरी.

ती :- मी का रागावू आणि कोणासाठी जो मला इकडे पावसात बोलवून स्वतः आरामात घरी बसला त्याच्यावर की जो नेहमी भेटायला बोलावतो आणि भेटायचं विसरतो त्याच्यावर इनफ इस इनफ यार नेहमीचं झालंय तुझं विसरतोस आणि येतोस परत सॉरी सॉरी करत ह्यावेळी तूझी कसलीच कारणं चालणार नाही बाय फॉर एव्हर..

तो :- हे एकदम शेवटचं परत कधीच नाही होणार असं 

ती :- ओहह साहेब पुन्हा एकदा लास्ट टाइम म्हणाले, किती लास्ट टाइम रे तुझे? त्या वर्ड ला पण लाज वाटेल आता.

तो :- खरंच सॉरी हा ओरिजनल वाला, आता काय करू म्हणजे पटेल तुला??

ती :- नको नको आता कसलेच उपकार नकोत तुमचे झाले तेव्हढे खूप झाले.

तो :- ये यार सोडना आता मी उठाबश्या काढू का आता इथे चालेल का ?

ती :- बाय, मला नाही ऐकायचंय तुझं, खूप झाली नाटकं बाय (आणि ती जायला निघते)

तो :- अगं एकना (ती पुढे जात होती)

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू

ओठावरील हसू तू

नजरेचा शोध तू

दिवसाची सुरुवात तू शेवटी तूच

शब्द तू, अर्थही तू

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू


कविता त्याने आपले शेवटचं हत्यार बाहेर काढलं आणि तीही मागे वळून पाहू लागली


तो :- सॉरी ना पिल्लू, खरंच सॉरी वन्स लास्ट टाइम, तुझ्या सोन्याला माफ नाही करणार (कान पकडून निरागस चेहऱ्याने तो बोलत होता. ती तर कितीवेळ चिडून राहणार होती त्याच्यावरती आणि राहिलीच तर तो होताच की तिला मनवायला )

तो :- हुश्श, फायनली तुझा राग गेला एकदाचा. पण खरंच लय म्हणजे लय सॉरी, अगदी साखरेचं पोतं भरून सॉरी.

ती :- (लटक्या रागाने मारत) हो का पण मी कधी म्हणाले माझा राग गेलाय ते??

तो :- मग आता हे काय होतं??

ती :- तुझ्यावर कशाला चिडेन मी, पण हो मी चिडलेच नाही तर तुझे हे गुण कधी बघायला मिळणार मला.

तो :- काहीही असतं तुमचं मुलींचं आणि कसले गुण गं??

ती :- काहीही काय, तुला नाही कळणार आमचं मुलींचं... टॉप सीक्रेट

तो :- धन्य धन्य नारी शक्ती!!!

ती :- हे हे हे! तथास्तु वत्सा!

तो :- तथास्तू काय जे ऐकायला हा अट्टहास केलाय ते तरी म्हण.

ती :- काय ते ??

तो :- तेच जे तू नेहमी बोलतेस

ती :- आच्छा ते होय बाय!

तो :- जाऊदे मीच माती खाल्लीय बाय (आणि तो जायला निघतो)

ती :- अरे ऐकना!

तो :- आता काय ??

ती :- तेच आय लव यू वेडु

तो :- लव यू २,3,४,५ til n माय बटरफ्लाय.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance