Ashwini Chaugule

Romance

3.8  

Ashwini Chaugule

Romance

माझी सावली हरवली

माझी सावली हरवली

4 mins
1.8K


   मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते. रात्रीचे बारा वाजून गेले होते. आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होत. अंगाला थंडगार वारा झोंबवत होता. गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता. हातात एक चिठ्ठी, डोळ्यात अनावर झालेला अश्रू, ओठावर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबलेले होते. डोळ्यांना अतांक दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रू ही डोळ्यात थांबले नाही. फक्त एक विचार मनात चालू होता, "का? का?" आज त्यांनी देह सोडला. पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाही ही पुसत होती. पण माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होतं. त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला पण आज 24 तासात काय घडलं माझ्यासोबत. ते सत्य की असत्य, ते वास्तव की स्वप्न काही समजत नव्हतं मी स्तंभ होते. गाड्या माझ्या जवळून जात होत्या तरी मला कशाचाचं भान नव्हता. माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भोवती फिरत होता. आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे. 'का? का? त्याने कशाला मरण घेतलं. मरण घेणे एवढं सोपं असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपतो का? एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असतं ना'

    ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे. डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती. तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला, "ठीक आहेस तू" आणि मी डोळ्यातील अश्रू पुसद तुझ्याकडे बघितलं, तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार. सगळं सगळं आठवतंय मला आणि मी कोमजलेल्या स्वरात बोलले,"मी ठीक आहे", असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते. मी न बोलता ही तू माझ्याकडे बघत मला बोलला, "ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत." मी तुझ्याकडे बघत म्हणाले, "माहिती आहे मला", "हो ना! किती विचित्र गोष्ट आहे ना" तू बोलला. "यात काय विचित्र", मी लगेच प्रतिउत्तर केला. "सांगतो थांब, एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचा असतं. पण सर्व आकाश त्याचा असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो. फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं." तू बोलतच होता. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला. तू "बाय, टेक केअर' असं बोलून तिथून निघून गेला. मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते. आई-वडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बस मध्ये बसले होते आणि परत कधी कधीचं जाणार नाही, असा ठाम निश्चय करून मी रडत होते. पण तू कळत नकळत मला सांगून गेला की 'घरी जा कोणीतरी वाट बघतोय'. आताही तुझा एकेक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे. घरी जाण्याचा एकमेव कारण होता तू. तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता. आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिस जवळ तू माझ्यासोबत काम करत होता. परत परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं. आपलं हे प्रेम पुढे वाढतच केलं. 'ते तासान तास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझे माझ्यासोबत सगळे सुख दुःख वाटून घेणे. दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हते. आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की, 'लग्नानंतर हे करायचं, लग्नानंतर ते करायचं', पण आज सकाळी मी उठले. उठल्यावर माझा फोन घेतला. तुझ्या सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी पण आज तुझा एकही रिप्लाय, मेसेज आला नाही. तुला मी दहा-बारा कॉल पण केले पण तू कॉलही उचलला नाही. मी घाबरले आणि स्कुटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले. तुझ्या घराच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केलेली होती. रडण्याचा आवाज येत होता. 'कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोक अश्रू अंघोळत होते'.त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आली. बघितलं तर तुझा देह पांढरा कपड्यात गुंडाळलेला होता. मला काहीच समजले नाही. माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेला. मी तुझ्या जवळ आले. काही बोलले नाही काही समजत नव्हतं पण डोळ्यांना मात्र सगळं कळलं होतं म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते. गर्दीतल्या लोकांच्या कुसबुजावरून असे समजले की, "तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही म्हणून तु आत्महत्या केली. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला. मात्र माझा, मात्र मी….."

   माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं. त्यात लिहिलं होतं. "माया काळजी घे आणि झालं तर माफ कर मला. शेवटचं बोलणं झालं नाही पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे. मी तुला काही सांगू शकलो नाही मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल. आई वडिलांची काळजी घे," ते पत्र घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे आली मला माहिती नाही. माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावली गेली. मला काहीच कळत नाहीये. काय घडलं? कसं घडलं? एवढं प्रश्न घेऊन मी ओरडले किंचाळले. पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते. तेही माझ्यासोबत रडत आहेत. मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले. "राम……." एकच आवाज कानात घुमत होता तो तुझा आवाज होता. ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले. अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडले. रक्त वाहत होत श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली त्यातील कोणी बोलले की, "मी मेले आहेत". पण त्यांना काय माहित, मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले बघितलं होतं. सकाळीच…..आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance