वचन
वचन


तू जोडीदार म्हणून नसशील तर मी कुणाशीच लग्न करणार नाही. तुझ्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून तुझी वाट पाहीन.. तुझं स्वागत करायला मी आधीच उभी असेन अस वचन देऊन तिने त्याचा निरोप घेतला. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्याने आपल्या शिक्षणासाठी परदेशात प्रयाण केले.
अखेर शिक्षण संपवून तो परत आला. विमानतळावर ती त्याच्या स्वागताला आधीच उभी होती. तिथून त्याच्या घरी येईपर्यंत तिने त्याची सोबत केली. घर जवळ आल्यानंतर मी आलेच असं सांगून ती निघाली आणि हा घरी आला. बरीच चर्चा झाल्यानंतर त्याच्या भावाने ती दुःखद घटना त्याच्या कानावर घातली.
तिच्या आई वडिलांनी याला विसरून दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा त्रासाला कंटाळून तिने एक वर्षापूर्वीच स्वतःचं जीवन संपवलं होतं. तो ऐकून सुन्न आणि निःशब्द होता.