vinit Dhanawade

Romance

3  

vinit Dhanawade

Romance

" धुक्यातलं चांदणं " ( भाग 2)

" धुक्यातलं चांदणं " ( भाग 2)

24 mins
1.6K


       पुढचे २ दिवस , विवेक आणि पाऊस… दोघेही गायब. सुवर्णा त्याला call करत होती त्याला. तर मोबाईल switch off… कुठे गेला हा माणूस… शी बाबा !! काय करायचे याचे आता. सुवर्णा ऑफिसमध्ये बसून विचार करत होती. पूजाला विचारायचे का ? तिला काही contact केला असेल तर त्याने.… अरे हो… २ दिवस ती तरी कुठे दिसली. हे दोघे , पुन्हा फिरायला गेले कि काय ?… नसतील. कसला विचार करते मी. पण हा गेला कुठे नक्की. सुवर्णाचं लक्ष कुठे होतं कामात. 


       संध्याकाळी, सुवर्णा ऑफिस मधून निघाली. पोहोचली स्टेशनला. ट्रेनमध्ये बसणार तेवढयात तिला आठवलं काहीतरी.… पूजू , त्या विवेकची सवय लागली. पूजा आली तर बघते, म्हणत ती थांबली तिथेच. १० मिनिटं झाली तरी पूजा आली नव्हती. कुठे गेली हि बया… नाहीतर गेली असेल ती, स्वतःशीच म्हणत सुवर्णा आलेल्या ट्रेनमध्ये बसली. ट्रेन सुरु झाली आणि पूजा धावतच ट्रेन मध्ये चढली. अरे , हि तर आत्ताच आली… पूजानेही सुवर्णाला पाहिलं. सुवर्णाच्या शेजारी जागा रिकामी होती. तशी ट्रेन सुद्धा रिकामीच होती. पूजा पुढे जाऊन बसली एकटीच. एव्हाना , सुवर्णाने कानात headphones लावेल होते, पूजाला बघताच तिने ते काढून ठेवले. तिला वाटलं पूजा येईल बोलायला. 


      कमाल आहे, हि तर पुढे जाऊन बसली. माझ्यासोबत बोलायचं नसेल तिला. असू दे ना मग, मी का जाऊ बोलायला… विवेक असला कि कशी चिमणी सारखी बोलत असते. आणि आता बघा… जाऊ दे … मी नाही बोलणार. सुवर्णा पुन्हा song's ऐकायला लागली. परंतु विवेकचा विचार तिच्या मनात आला. निदान विवेकसाठी तरी तिच्यासोबत बोलावं लागेल. Headphones काढले आणि तिने Bag मध्ये ठेवले. पूजा एकटीच बसली होती पुढे… सुवर्णा गेली तिच्याजवळ. 


    " Hi… पूजा ", पूजाने दचकून पाहिलं. तिला ते नवल वाटलं. " Hi…" ," मी बसू का इकडे ? ", सुवर्णाने विचारलं. " हो ना… बस कि, विचारायचं की त्यात." सुवर्णा तिच्या समोरच बसली. दोघीही शांत. पूजा खिडकी बाहेर बघत होती आणि सुवर्णा पूजाकडे. खरंच… छान दिसते ही… विवेक छान वर्णन करतो…. काळेभोर केस, चंद्रासारखी नितळ कांती, गुलाबासारखा चेहरा , पाणीदार डोळे आणि वेडं लावणारी गालावरची खळी… सुवर्णा आज पहिल्यांदा तिला निरखून बघत होती. खरंच , विवेक बोलला ते बरोबर…. कोणालाही प्रेम होईल तिला बघूनच…अरे , आपण सुद्धा गुंतून गेलो… जे विचारायचे तेच विसरून गेलो. 

" तुला विवेकचा call आलेला का ? ". 

" नाही गं… आणि Actually… मीच तुला विचारणार होते, कि विवेक दिसलाच नाही त्याबद्दल. आणि मीही उशिरा निघाली २ दिवस. म्हणून तुझी भेट झाली नाही. तो ऑफिसला सुद्धा येत नाही का… ? "   


अरेच्या… !! हिला पण विवेक बद्दल माहिती नाही. कमाल आहे… " नाही गं, ऑफिसलाही नाही आला ना तो… तुही २ दिवस दिसली नाहीस. मला वाटले , दोघे परत… " सुवर्णा बोलता बोलता थांबली. पूजा ऐकत होती सगळं. पण काही reaction नाही दिली तिने. ती पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली.… पुन्हा शांतता. सुवर्णाच बोलली मग. 

" पूजा , हे बघ… मला उगाचच गोष्ट फिरवून फिरवून विचारायची सवय नाही म्हणून direct विचारते तुला. " ," बरं…. काय विचारायचे आहे ? ". 

" विवेक तुला आवडतो का ? " , 

" हो… आवडतो. " ,

" आवडतो म्हणजे नक्की काय ? ", पूजा तिच्याकडे बघत राहिली.

" OK, sorry… जरा personal आहे ते, तरी मला जाणून घ्यायचं होतं…. तुम्ही फक्त Friends आहात कि त्याच्याही पुढे … ? " पूजा हसायला लागली. 


" त्यात हसायचं काय … " ,

" नाही… तू विवेकची किती काळजी करतेस…. त्याने मला सांगितलं होतं तुझ्याबद्दल… आता प्रत्यक्षात दिसते आहे ते म्हणून हसायला आलं. " , 

" नाही गं… तो कसा आहे ते फक्त मलाच माहित आहे म्हणून तुला मी तुमच्या नात्याबद्दल विचारलं. sorry once again " ,

" काही नाही गं… आणि फक्त friends आहोत, घट्ट मैत्री. दुसरी कोणती गोष्ट नाही आमच्यात. " ते ऐकून सुवर्णा जरा शांत झाली. " आणि तुझं नात ? " पूजाने उलट प्रश्न केला. " same here … " ," OK " पूजा बोलली. 

" काय सांगत होता विवेक माझ्याबद्दल ? ",

"हो… बर, सांगत होता Best Friend आहे माझी सुवर्णा. तिच्यावाचून करमत नाही. तिच्या Lunch Box मधला खाल्याशिवाय पोट भरत नाही. मनाने चांगली, असं काय काय सांगत होता. ",

" बस्स !! एव्वढंच सांगितलं त्याने माझ्याबद्दल." ,

" तसं नाही गं, खूप बोलत असतो तो तुझ्याबद्दल. In fact,रिक्ष्यात तेव्हा तू songs ऐकत असतेस ना तेव्हा तो तुझ्याबद्दलच सांगत असतो. ",

" काय सांगतो ? ". 

" खूप चांगली Friendship आहे बोलला तो तुझ्याशी. तुला सकाळी बघितल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. बोलल्याशिवाय, तुला चिडवल्याशिवाय करमत नाही.… मस्करी मुद्दाम करतो म्हणाला, तुला राग आला कि त्याला आवडतो तो. कितीही भूक लागलेली असली तरी, तुझ्यासाठी थांबून राहतो. तुझ्या हातचं जेवण त्याला आवडते.… त्याला नेहमी तू त्याला सोबतच रहावसं वाटते. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर… खरंच… Friendship असावी तर अशी… ".

 सुवर्णाला बरं वाटलं. विवेक किती विचार करतो आपल्याबद्दल. मी त्याला काय काय बोलत असते कधीकधी. त्याला ओळखूच शकले नाही मी. सुवर्णा मनातल्या मनात नाचत होती. विवेक आपल्याबद्दल विचार करतो काहीतरी. …. Thanks विवेक. सुवर्णा एकटीच हसत होती. " Hello … सुवर्णा…" पूजाने हाक मारली. सुवर्णा भानावर आली. 


" काय झालं गं सुवर्णा ? " ,

" काही नाही… बरं वाटलं पण विवेकने कधी मला या गोष्टी सांगितल्या नाहीत… " पूजा हसली. 

"तो थोडीच तुझ्या गोष्टी तुला सांगेल.",

" हो … ते पण आहेच. " सुवर्णा आनंदात होती, सुवर्णाचा मूड चांगला झाला होता. ते पाहून पूजाने विवेकबद्दल विचारायचे ठरवले. 

" सुवर्णा विचारू का तुला ? ".

"काय ? " ,

" विवेक बद्दल…. " ,

" काय विचारायचे आहे विवेकबद्दल ? ".

"तसं नाही गं… त्याचा स्वभाव कसा आहे ते कळत नाही. तू आता खूप वर्ष त्याच्या सोबत आहेस म्हणून तुला विचारावेसे वाटते.",

" OK , ठीक आहे. सांगते. " एक मोठा श्वास घेतला सुवर्णाने. 

" विवेक ना…. जरासा शहाणा आणि खूप सारा वेडा आहे. तो जरी शांत असलाना तरी त्याचं मन चंचल आहे. पण एक आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी भेटणार नाही. काय काय करतो ते माहितच आहे तुला. आणि तुला त्याने ते सांगितलं आहे. आता तर Famous सुद्धा झाला आहे तो.",

" हो… ते तर माहित आहे मला. " ,

" कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. सगळ्यांना मदत करायला पुढे असतो. ओळखीचा वा अनोळखी… कोणालाही मदत करतो, निस्वार्थ मनाने. आणि एक , त्याला कुणाचं मन दुखवता येत नाही, त्याचं कोणी दुखवलं तरी…",

" म्हणजे ? " ,

" म्हणजे काही नाही.",

" OK ". पूजा बोलली. 

" मी सहजच विचारलं… त्याने एक-दोनदा विषय काढला होता. त्यानेच बंद केला मग." ,

" बरं केलं त्याने… " ,

" त्याचं काही प्रेम वगैरे होतं का कुणावर ? " पूजाने सुवर्णाला विचारलं. सुवर्णा काहीही न बोलता खिडकी बाहेर बघत राहिली. ५ मिनिटे गेली असतील. सुवर्णाने उत्तर नाही दिलं. पूजाने पुन्हा विचारलं नाही तिला. 


" OK, ठीक आहे सांगते. पण त्याला बोलू नकोस यातलं काही. " ,

" Promise " ,

" त्याचं होतं प्रेम एका मुलीवर…. ' मानसी ' नावं होतं तिचं. त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये होती ती. तेव्हा पासून ते एकत्र होते.आणि छान जोडी होती दोघांची.",

" मग पुढे ",

" पुढे आता, मी जेव्हा इकडे Join झाले तेव्हासुद्धा ते एकत्र होते. तसा काही प्रोब्लेम नव्हता. परंतु दोघांचे धर्म वेगळे होते, हा मराठी तर ती गुजराती. विवेकच्या घराच माहित नाही, पण तिच्या घरी विरोध होता लग्नाला. विवेकने तरी खूप प्रयत्न केला, काही फायदा झाला नाही पण. तिनेच मग विवेकशी सगळे संबंध तोडून टाकले. ",

" बापरे !! मग विवेक… ",

" विवेकचं काय होणार…. निराश झालेला. Depression मध्ये गेलेला तो. जवळपास ५ वर्ष एकत्र होते ना ते. आणि अचानक ती सोडून गेली… कसं ना, लगेच निघून गेली ती…. एकटा झालेला अगदी, कामात लक्ष नाही… बोलायचं नाही…. हसायचा नाही, धड जेवायचा सुद्धा नाही. कसा झाला होता तो…. वाईट वाटायचं खूप. ",

" मग … ",

" त्याला मानसोपचार डॉक्टरकडे घेऊन गेली होती मी,६ महिने तो treatment घेत होता, तेव्हा कुठे पहिल्यासारखं वागू लागला. खूप काळजी घेतली म्हणून तो आता सारखा आहे. " ,

" बरं झालं , तू होतीस ते… ",

" तसं नाही गं… त्यानेही स्वतःला खूप कंट्रोल केलं मग. त्याला बाकी कसलं व्यसन नाही, एकच आहे ते म्हणजे माणसात गुंतायचं. त्याचा स्वभावाचं तसा आहे. तो लगेच गुंतत जातो कोणातही…. आताही तुझ्यात.....", सुवर्णा थांबली


पूजाने काही response नाही दिला त्यावर. सुवर्णाच बोलली, "Sorry, पण मला वाटलं तसं… ",

" It's OK, माझ्यात आणि विवेकमध्ये फक्त आणि फक्त Friendshipच नात राहील, याची काळजी घेईन मी.",

" ते ठीक आहे. तरी सुद्धा एक सांगते. तो जेव्हा डॉक्टरकडे treatment घेत होता ना , तेव्हा डॉक्टर सांगायचे, याची खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला दुखवू नका … त्याच्या घरच्यांचं माहित नाही मला… त्याने घरचा कधी विषय काढला नाही. पण मी खूप काळजी घ्यायची त्याची, आजही घेते. तो आता बरा झाला आहे पण डॉक्टरने सांगितलं कि त्याला पुन्हा कधी depression मध्ये जाऊ देऊ नका… त्याचं मन खूप कमजोर आहे. त्याला परत धक्का सहन होणार नाही. त्याने तो एकटा पडण्याची खुप मोठी शक्यता आहे. " पूजा सगळं मन लावून ऐकत होती. 


" आता हे सगळं तुला का सांगत आहे , त्याचं कारण पण ऐक. " तो पहिल्यापासूनच मन मोकळा आहे. तरी अजून मी त्याला नीटसं ओळखलं नाही. खूप गोष्टी तो मनातच लपवून ठेवतो. तू येण्याअगोदरचा विवेक आणि नंतरचा विवेक, खूप वेगळा आहे. तो पहिल्यासुद्धा आनंदी असायचा पण आता जास्त खुश असतो, पहिल्यापेक्षा. तुझाच परिणाम आहे तो. आणि आजकाल चांगलं लिहायला पण लागलाय. तू त्याचा मोबाईल बघितला आहेस का कधी ? " ,

"नाही… का गं ",

" तुझा फोटो आहे मोबाईलवर आणि ऑफिसच्या PC वर सुद्धा. कोणी विचारलं तर सांगतो , माझी जवळची Friend आहे. याचा अर्थ माहित आहे.",

" काय ?" ,

" तो पुन्हा गुंतत चालला आहे. मला तीच भीती वाटते आहे.",

" पण मी त्याला तसं कधी बोलले नाही, प्रेमाने वगैरे." ,

" तो भोळा आहे गं. मानसी सोडून गेल्यानंतर त्याने खूप कंट्रोल केलं आहे मनावर. अजूनही आहे म्हणतो कंट्रोल. मला नाही वाटत तसं." ,

" तरीपण मी नाही गुंतणार त्याच्यात, आपोआप कसं गुंतणार ना कोणी.…. ". 

दोघींचंही आता स्टेशन आलं होतं. सुवर्णा उठली. तिने bag मधून मोबाईलचे headphones काढले.

" हे बघ…मी काही त्याच्यासारखी लेखक, कवी नाही. त्याच्यासारखं बोलायला पण जमत नाही मला. तरी सांगते, मघाशी तुझ्याबरोबर बोलायचे होते म्हणून हे headphones नीट ठेवले होते bag मध्ये. कितीही नीट ठेवले तरी ते आपोआप गुंतत जातात स्वतःमध्ये. मग सोडवताना किती तारांबळ उडते आपली.… तसंच मन असते. विवेकचही तसंच आहे. आपोआप गुंतत जातो तो, मग त्यातून बाहेर बाहेर पडताना स्वतःलाच त्रास करून घेतो." स्टेशन आलं तशा दोघी गाडीतून उतरल्या. पूजा गप्पगप्प होती. सुवर्णाला कळलं ते. 

" Hey पूजा, मी काही बोलली असेन तर मनावर घेऊ नकोस. मी straight forward आहे जरा. फक्त विवेकची काळजी वाटली म्हणून बोलली. चल…. Bye. " म्हणत सुवर्णा झपझप निघून गेली. पूजा स्टेशनवरच रेंगाळत राहिली. 


       पुढचा दिवस, सकाळपासून पाऊस धो-धो कोसळत होता. सुवर्णा तर वैतागली होती. काय झालंय याला आज, दोन दिवस तर नव्हता…. आज कुठून उगवला कोण जाणे… ? घरातून स्टेशनला पोहोचेपर्यंत ती अर्धी भिजली होती. स्टेशनपासून ऑफिसला जाईपर्यंत पूर्ण भिजली ती. समोरचं दिसत नव्हतं इतका पाऊस होता. सुवर्णा कशीबशी स्वतःला सावरत चालत होती. ऑफिसच्या बाहेर आली तेव्हा तिला समोरून विवेक येताना दिसला. असाच चालत होता तो. ना छत्री … ना रेनकोट… भिजत येत होता. तशीच धावत ती त्याच्याजवळ गेली. आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरली. 

" अगं,… वेडी आहेस का तू …. भिजशील ना… ",

" हो… आणि तू काय superman आहेस… तू भिजत नाही आहेस का… " ,

" अरे… मला आवडते भिजायला.….",

" मूर्ख… stupid , … सर्दी , ताप होईल ना तुला… अक्कल आहे ना जरा. " ,

" ठीक आहे माझी आई… नाही भिजत." , म्हणत विवेक ऑफिसमध्ये घुसला पटकन, तश्याच ओल्या कपडयात. 

" श्शी !!… कसा माणूस आहेस रे तू… आता असाच बसणार आहेस का ऑफिसमध्ये…. ",

" हो… ",

" ऑफिस काय तुझ्या काकांचं आहे कि माझ्या ? असाच बसणार असशील ना तर आत्ताच घरी जा परत. मला असा घाणेरडेपणा आवडत नाही.", सुवर्णा रागात बोलली. विवेक हसायला लागला. ते पाहून सुवर्णाला अजून राग आला. त्याच्या पाठीत एक धपाटा मारत ती बोलली, 

" हसतोस काय रे… ? ",

" अगं… माझे एक जोडी कपडे असतात ऑफिसमध्ये. आता जाऊन बदलून येतो. आणि तुला राग आला कि मला खूप आवडते म्हणून हसलो.", सुवर्णा रागातच होती, तरी तिला हसू आलं. " जा…. पटकन change करून ये. " म्हणत सुवर्णा ऑफिसच्या आत आली.


       १० मिनिटांनी विवेक आला जागेवर. " सही एकदम…. मस्त ना बाहेरचं वातावरण झालं आहे एकदम अगदी.… अजून जावेसे वाटते बाहेर पावसात.…. आलो हा मी लगेच…." म्हणत विवेक पुन्हा बाहेर जायला निघाला. 

" बस खाली…अजिबात बाहेर जायचे नाही.… " विवेक खाली बसला.

" काय गं… ओरडतेस… ४ महिने तर असतो ना पाऊस… जरा गेलं तर काय झालं… ", 

" अरे… कमाल आहे तुझी. आत्ताच आलास ना भिजून आणि लगेच बाहेर जायचे आहे तुला पावसात…. गप्पपणे बस खाली." विवेक शांतपणे आलेला चहा पिऊ लागला. PC चालू केला त्याने. सुवर्णाचं कामं सुरु होतं.

" तुला आवडत नाही तर बाकीच्यांना पण आवडत नाही का ? ", विवेक हळू आवाजात पुटपुटला. 

" ऐकलं हा मी… काय बोललास ते. " सुवर्णा वळून बोलली. 

" अजून महिना संपला नाही, आताच सुरु झाला आहे. अजून ३ महिने तरी कोसळणार आहे ना तो… मग आताच कशाला जायचे आहे तुला.", विवेकने चुपचाप चहाचा कप रिकामा केला. 

" आणि २ दिवस कूठे होतास रे तू… काही पद्धत वगैरे आहे कि नाही सांगायची.… परत फोन बंद तुझा. नाहीतर out of range… कसं कळणार रे… ",

" असचं गं…. काही special नव्हतं.",

" हा… पण कूठे होतास तू … ? त्या… तुझ्या पुजुला विचारलं काल… तर तिला सुद्धा माहित नाही… ",

" हो… सकाळी आला होता call तिचा, घरातून निघताना… सांगितलं मी… " ,

" बरं… तिलाच सांग हो… तुझ्या गोष्टी, तीच जवळ आहे ना आता तुला… मर तिकडे… " सुवर्णा रागात म्हणाली आणि कामाला लागली. 


       विवेकने त्यावर काही response नाही दिला. सुवर्णाला राग आला होता तरी तिनेच विवेकला हाक मारली. " आता सांगतोस का ? " म्हणत तिने त्याच्या खांद्यावर चापट मारली. " आ…. " , विवेकला दुखलं काहीतरी. सुवर्णाला लगेच कळलं ते. " काय रे … काय झालं " , विवेक तसाच खांदा पकडून बसला होता. 

" Sorry हा…" त्याच्या बाजूला येऊन बसली. " सांग ना… काय लागलं… ? " सुवर्णाने काकूळतीने विचारलं. " काही नाही गं, पडलो ना जरा… त्याची सुज आली आहे खांद्याला..",

" डॉक्टरकडे गेलास कि नाही ?… आणि पावसात कशाला भिजायचे मग.",

" असचं गं… ",

"२ दिवस म्हणून आला नाहीस का… ?", विवेक फक्त हसला. 

" सांगतोस का आता … ",

" हा… हा, थांब जरा… त्या दिवशी सकाळी ऑफिसला येताना , एका आजींना गाडीतच चक्कर आली. लगेच त्यांना उतरवलं, तसाच सोडून येऊ शकत नव्हतो. त्यांना विचारलं तर त्या राहणाऱ्या पुण्याच्या… मुलगा आधीच गेलेला पुण्याला. मग त्यांना मी पुण्याला घेऊन गेलो.",

" अरे, मग मला सांगता नाही आलं का तुला आणि खांद्याला कसं लागलं ? ",

" कसं सांगू तुला… तिकडे पुण्यात range येत नव्हती…. त्यात आजींना सोडून मुंबईला येत होतो तर एका ठिकाणी धडपडलो आणि पडलो… तेव्हा लागलं." सुवर्णाला ते पटलं नाही.

" खरं सांग… काय लागलं ". विवेक थोडावेळ गप्प राहिला, नंतर बोलला. 

" पुण्याला १ दिवस थांबलो त्या आजींकडे. निघताना, एक लहान मुलगा, रस्ता ओलांडत होता… एकटाच. धावतच गेला ट्राफिकमधे…. त्याच्यामागून मी धावलो. त्याला बाजूला केला मी…. आणि माझ्या खांद्याला धडक बसली गाडीची.",

"अगं आई गं…. " सुवर्णाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.


     तशीच ती उठून चेहरा धुवायला गेली. विवेकला माहित होतं तसं होणार ते. सुवर्णा विवेकसाठी खूप हळवी होती. थोडयावेळाने सुवर्णा जागेवर आली. 

" बघ… म्हणून तुला सांगत नव्हतो, तुझं असं असते मग. " ,

" तुला तुझी काळजी नसेल… मला आहे.",

" हो गं, माहित आहे मला… आता बस… रडू नकोस , पागल. " विवेक हसत म्हणाला. सुवर्णा थांबली रडायची. " तुला काय मिळते रे सगळ्यांना मदत करून… " विवेकने smile दिली. 

" बघावं तेव्हा कूणाला तरी मदत करत असतोस.…. कधी त्या रस्त्यावरच्या मुलांना खाऊ वाटत असतोस, कधी कूणाला घरी सोडायला जातोस… पुण्याला गेलास अगदी… आणि त्या मुलाला वाचवताना तुझ्या जीवाला धोका होता ना… तरीसुद्धा " विवेकने सुवर्णाच वाक्य मधेच तोडलं… 

" काय आहे ना… दुसऱ्यांसाठी जगायला मला जास्त आवडते. त्यांना झालेला आनंद बघून मन भरून येते, छान वाटते. " ,

" तू ना… खरंच वेडा आहेस. " सुवर्णाने त्याच्या डोक्यात टपली मारली.


       छान दिवस गेला दोघांचा ऑफिसमधे. दोन दिवसांच्या गप्पा मारत , काम करत दिवस संपला. निघायची वेळ झाली.

" सुवर्णा … ",

" काय रे ? " ,

" पूजाला सांगू नकोस, मला लागलं आहे ते.",

" म्हणजे तू तिला सांगितलं नाहीस.",

" बाकीचं सांगितलं , हे नाही सांगितलं. ",

" OK, ठीक आहे. " . पूजाही आली ५ मिनिटांत. 

" अरे… कूठे होतास तू गोलू… किती काळजी वाटत होती मला. " म्हणत पूजाने त्याला मिठी मारली. तसा विवेक कळवळला. तरी त्याने तोंडातून आवाज काढला नाही. सुवर्णाला मात्र दुखलं ते.

" call का नाही केलास ? पुण्याला गेलेलास ना… मी पण आले असते. " ,

"अगं , तिकडे फिरायला गेला नव्हता तो, त्या आजींना सोडायला गेला होता." पूजा हसली उगाचच. ,

"हसलीस कशाला गं ? ", विवेकने विचारलं. 

" मस्करी केली तुझी आणि सुवर्णाला ते कळलं नाही म्हणून. " सुवर्णाला राग आला तिचा पण तिने दाखवलं नाही.

" चला आता. घरी जायचे का ? ", सुवर्णा बोलली. 

"थांब ना विवेक …दोन दिवस बोललोच नाही आपण. सकाळी सुद्धा फोनवर जास्त बोलला नाहीस तू… थांब ना.". अरे… विवेकला आरामाची गरज आहे. लागलं आहे त्याला. सांगूया का हिला.… सांगतेच. सुवर्णा पूजाला सांगणार, इतक्यात विवेकच बोलला. 

" आज नको हा पूजू… दमलो आहे ना मी. उद्या बोलूया… ",

" ठीक आहे पण उद्या नक्की ना… ",

"नक्की… Promise." विवेक बोलला तशी पूजा खूष झाली आणि एकत्र ते निघाले घरी जाण्यासाठी. 


      अशीच त्यांची मैत्री वाढत जात होती. पावसानेसुद्धा छान जम बसवला होता. जवळपास रोजचं पाऊस यायचा, विवेकच्या भेटीला. विवेकला प्रत्येक वेळेस भिजायचं असायचं, परंतु सुवर्णाने तिची शप्पत घातली असल्याने तो नाही जायचा, निदान थोडेदिवस तरी. त्यांची जखम आता भरत आली होती. सुवर्णा तर रोज त्याच्या मागे लागून औषध घ्यायला लावायची. पावसात भिजायला जाऊ नये म्हणून त्याच्या सोबत रहायची, निदान स्टेशनपर्यंत तरी. पूजाला यातलं काही माहित नव्हतं. पूजा फक्त त्यांच्या friendship च्या विचारात गढून गेलेली असायची.  


      एवढया वर्षांमध्ये, तिला असा कोणी पहिला मित्र भेटला होता जो तिची एवढी काळजी करायचा. शिवाय विवेक होता हि चांगला माणूस. कधी बाहेर फिरायला गेले कि तिला त्याचा सारखा अनुभव यायचा. कोणालाही सदैव मदत करण्यात तो पुढे असायचा. शिवाय तिला एकदा बरं नव्हतं तेव्हा त्याने किती वेळा तिला विचारलं होतं… औषध घेतलीस कि नाही, डॉक्टर कडे जा… पूजाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण होत होती. कधी पाऊस सुरु झाला कि तिला विवेकचीच आठवण यायची. मग त्याचं ते पावसात लहान मुलासारखं भिजणं आठवलं कि एकटीच हसत रहायची. त्याने लिहिलेल्या कविता पुन्हा पुन्हा वाचत रहायची. हळू हळू पाऊस आणि विवेक , दोन्ही तिला आवडू लागलेले. 


      तिकडे सुवर्णा , तिच्या मनाची सारखी घालमेल होत होती. विवेक तिला विसरला नव्हता तरी पूजा आणि विवेकचं वाढत नातं, त्याचं तिला tension होतं. त्या दोघांमध्ये नक्की मैत्रीच आहे ना, यात तिला आता संशय वाटू लागला होता. दर रविवारी , एकटाच फिरणारा विवेक … आता पूजाला घेऊन जायचा त्याच्या फोटोग्राफी साठी. अर्थात सुवर्णाला जंगलात , त्या झाडा-झुडुपात काही इंटरेस्ट नव्हता. पण पूजा त्याच्याबरोबर जाते म्हणून तिला आवडायचं नाही ते. विवेक बोलताना नेहमी पूजाचाच विषय असायचा, शिवाय तिचे call असायचे एक-दोनदा दिवसातून. फोनवर बोलायचे , chatting बंद झालेली असली तरी घरी जाताना ते दोघेच बोलत असायचे रिक्ष्यामध्ये. आणि आता विवेक तिला जाताना "Bye" करायचंही विसरला होता. तिची जागा आता पूजाने घेतली, असा समज सुवर्णाला झाला होता. त्याचं कधी कधी वाईट वाटायचं तिला.


     पुढच्या दोन आठवडयात विवेक एकदम ठीक झाला. पुण्यावरून आला त्यादिवशी तो पावसात भिजला तेवढाच, त्यानंतर सुवर्णाने त्याला भिजायला दिलं नव्हतं. आज सुट्टीचा दिवस, त्यात बाहेर मस्तपैकी पाऊस धरलेला. त्याने सकाळीच पूजाला call लावला, 

" पुजुडी…. " ,

" काय रे… काय झालं… लाडात आला आहेस वाटते आज. " ,

" असंच पुजुडी.",

" बरं.… ठीक आहे मग. ",

" पुजुडी… बाहेर बघ. काय मस्त वातावरण झालं आहे ना. " ,

" मग… plan काय आहे गोलूचा ? ",

" चल ना, येतेस का फिरायला … ",

" नको , बघ किती पाऊस आहे बाहेर.",

" अगं … हाच तर मौसम असतो भिजायचा. ",

"हो का…. नको, मला नाही भिजायचं. सर्दी होईल, ताप येईल." विवेक हसायला लागला. 

" हसतोस काय माकडा ? " ,

" किती… किती माणसाने घाबरायचे पावसाला… " ,

" हो… का, बंर…. कूठे जायचे आहे फिरायला ? ",

" तू दादर स्टेशनला ये… तिथून तुला घेऊन जातो मी.",

" OK, पण कूठे लांब नको हा… मला नाही भिजायचे पावसात. ",

" OK बाबा …. तू ये तरी. " 


पूजा आली स्टेशनला. विवेक तिची वाट बघत होता. 

" चल जाऊया.",

" कूठे सांग पहिलं, तरच जाऊ. ",

"इकडेच… ",

"इकडेच कूठे ?",

" पुन्हा कर्नाळाला जाऊया. " ,

" नको बाबा… आज नको तिथे… पाऊस आहे आज. " विवेक थोडासा नाराज झाला. 

" मूड ऑफ केलास माझा. काय मस्त मूडमध्ये होतो मी.… ",

" अरे पाऊस आहे म्हणून बोलले मी, मला नाही भिजायचं.", विवेक तरी गप्पच. 

" Sorry" विवेक गप्प. 

" Sorry बोलले ना आता. ठीक आहे, आज मी तुला माझ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जाते.",

"कूठे ?",

" चल जाऊया. " , म्हणत पूजाने त्याचा हात पकडला आणि ओढतच घेऊन गेली त्याला. लवकरच पोहोचले ते, पूजाच्या आवडीच्या जागी. 


" अरे … हे तर हॉटेल आहे. हे तुझं आवडीचं ठिकाण आहे का ? काहीपण हा पुजू… " विवेक हसला. 

" तेच तर… तुझी आवड वेगळी, माझी वेगळी.",

" अरे पण यात काय आवडण्यासारखं… हॉटेल तर आहे.इथे फक्त नास्ता करायला यायचं नाहीतर जेवायला.… बस्स. फोटोग्राफीसाठी नाही. " ,

"कसं असते ना… प्रत्येक ठिकाणी निसर्ग नसतो आपल्यासोबत, तेव्हा हा पर्याय असतो." बोलत बोलत ते हॉटेलमध्ये शिरले. तेव्हा हॉटेल मालकाने पूजाला हाक मारली. 

" कैसी हो पूजा बेटी… बहुत दिनो बाद आयी हो. ",

" हा चाचा… काम से फुरसत नाही मिलती ना…. ",

" हा … हा , ठीक हैं, तूम बैठो… मै कॉफी भेज देता हुं.",

" चाचा , दो कप और मस्का पाव भी भेज देना. " विवेक आश्चर्याने दोघांकडे बघत होता. 

" चल बसुया. " पूजा जाऊन बसलीही जागेवर. 


" ते कसे ओळखतात तुला ?",

" मी इथे येते कधीतरी.",

" एकटीच कि कोणी असतो… " विवेक बोलता बोलता मधेच थांबला. पूजा गालातच हसली. 

" माकडा… मी फक्त तुझ्या सोबतच फिरते हा , कोणी नसतो माझ्याबरोबर. कळलं का गोलू. " विवेक सुद्धा हसला. 

" हे ना, माझ्या आवडीच ठिकाण आहे आणि हा टेबल सुद्धा माझाच आहे." ,

" तुझ्या नावावर आहे का ?".

"असंच समज काहीसं… मी जेव्हा येते ना इथे, तेव्हा इकडेच बसते मी. ",

"आणि काय एवढं special आहे या टेबलावर. ",

" थांब हा जरा." पूजाने मागे बघितलं. आणि तिथे टेबल पुसणाऱ्या एकाला बोलावलं.

" काका… हि खिडकी open करा ना , प्लीज. ",

"अरे , पूजा ताई… खूप दिवसांनी आलात. उघडतो हा खिडकी." म्हणत त्यांनी खिडकी उघडली. 

" तुला बघायचे आहे ना special काय आहे ते, हे बघ." विवेकने खिडकी बाहेर पाहिलं. 


      WOW !! समोर अथांग समुद्र पसरलेला होता, marine lines चा.( marine lines म्हणजे मुंबईमधले एक ओळखीचे ठिकाण.) superb एकदम. विवेक तसा जायचा marine lines ला. पण पावसाळ्यात कधी तो गेला नव्हता तिथे आणि आताचा देखावा तर तो पहिल्यांदा पाहत होता. वेडाच झाला तो. पटापट त्याने ५-६ फोटो काढले. काय सीन आहे यार !! विवेक तर अजूनही तसाच उभा होता. 

" Excuse me sir, कॉफी आली तुमची. " पूजा त्याला चिडवत म्हणाली.

" हं… हो… हो, घेतो. " म्हणत विवेक बसला खुर्चीवर. बसूनसुद्धा तो बाहेरच पाहत होता. 

" काय मग, विवेक साहेब… आहे कि नाही हि जागा special." ,

" special ? awesome आहे एकदम यार… thanks पूजू. " ,

" अरे, thanks काय त्यात… ",

" मग मला हि जागा माहित नव्हती पहिली. मस्त वाटते गं इथे. " ,

" हो ना , म्हणून मी इथे येऊन बसते. मस्त कॉफी पीत बसायचं, त्या समुद्राकडे पाहत. छान वाटते एकदम. " त्यात बाहेरचं वातावरण पावसाळी. छान थंड हवा येत होती खिडकीतून. वर आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली होती. पूजाची कॉफी संपली तरी विवेकची कॉफी अजून संपतच होती. पूजा त्याच्याकडे पाहत होती आणि विवेक खिडकीबाहेर. 

" काय साहेब… आज काय इथेच बसायचे आहे का… ",

" थांब गं… जरा. " आणि हॉटेल मालकाने रेडीओ चालू केला. 


       बाहेर पावसाने " सॉलिड " वातावरण बनवलं होतं. " १० मिनिटात सुरुवात होईल बहुतेक. ",विवेक स्वतःशीच पुटपुटला. 

" ह्या… जसं काही कळतेच तुला पावसाचं… ",

"बर… बघ , १० मिनिटाचा time लाव. " , पूजा घाबरली. 

" चल मग निघू… पाऊस येण्याअगोदर. " ,

" थांब गं… " विवेकने तिला बळजबरीने खाली बसवलं. १० मिनिटांनी बरोबर पावसाने सुरुवात केली. तेव्हाच रेडीओवर song सुरु झालं. " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…. ". विवेक तर आता खिडकीपाशी जाऊन उभा राहिला, पाऊस बघत. त्याचे केस येणाऱ्या वाऱ्यासोबत उडत होते. गोड हसत होता तो. बाहेर रिमझिम पाऊस. कुंद वातावरण आणि रेडीओवर लागलेलं गाणं. romantic वातावरण झालं होतं. हवेचा थंड झोत खिडकीतून आत शिरला. पूजाच्या अंगावर शहारा आला.विवेककडेच पाहत होती ती, जणूकाही तिच्या मनातच पाऊस पडत होता आता. 


" चल बाहेर जाऊ… ", विवेकच्या बोलण्याने पूजा जागी झाली.

" नाही. आता नको… भिजणार सगळे आपण. " ,

" चल न्या… किती मस्का लावावा लागतो तुला.",

" हो का…. लाव अजून मस्का." पूजा हसत म्हणाली. 

" ठीक आहे, आपण जाऊ घरी. taxi करून जाऊ, पण त्यासाठी तरी खालीच जावं लागणार ना… taxi काय वर येऊ शकत नाही , हॉटेलमध्ये. " पूजा जरा नाखूष होऊन जागेवरून उठली. 


       दोघेही खाली आले. सुट्टीचा दिवस, त्यात सकाळचे १०.३० वाजले होते. आणि सोबतीला पाऊस. रस्त्यावर एकही taxi नव्हती. पाऊस तर मस्तच पडत होता. " चल विवेक, आपण पुन्हा वर जाऊया. " पूजा बोलली. विवेकने काही reply नाही दिला. तो तर पावसाकडे पाहत होता. " विवेक …. विवेक… " पूजा त्याला हाक मारत होती. विवेक तर कधीच पुढे गेलेला पावसात, चालत चालत. डोळे बंद करून तो पावसात उभा राहिला होता. पूजा तशीच हॉटेलच्या दारापाशी उभी होती. विवेक पावसात भिजत होता, आनंद घेत होता. थोड्याच वेळात पावसाने जोरदार सुरुवात केली. विवेक आता उगाचच पावसात उड्या मारत होता, आजूबाजूला साचलेलं पाणी उडवत होता. त्याला पाहून आजूबाजूला भिजणारी लहान मुलं त्याच्या बरोबर येऊन नाचू लागली. पूजाला तर हसू आलं. कसा लहान मुलासारखा खेळत आहे पावसात. छान… पुजाकडे हातवारे करून विवेक तिला बाहेर बोलावत होता, भिजायला. पूजा कसली बाहेर जातेय. ती तिथेच उभी राहून विवेकला पाहत होती. 


       आता तर पावसाने अजूनच काळोख केला होता. सोबतीला वारा होताच. फेसाळलेल्या लाटा काठावर धडकत होत्या. वर आकाशात ढगांचा गडगडाट होतं होता, विजांचा कडकडाट होतं होता. जणू काही विजांनी ढगांभोवती फेर धरून नृत्याला सुरुवात केली होती. सगळ्या रस्त्यांचे छोटया नदीत रुपांतर झाले होते. झाडं येणाऱ्या वाऱ्याबरोबर झुलत होती.पूजा सगळं पाहत होती. कोणी पावसापासून वाचण्यासाठी धावत होतं, धावताना धडपडत होतं. कोणी उगाचच मुद्दाम धडपडत होतं, जोडीदाराने सावरण्यासाठी. हातात हात देताना कोणी लाजत होतं, कोणी विजेच्या आवाजाचा बहाणा करून दुसऱ्याच्या मिठीत जात होतं. कोणी जोडप्याने पावसाचा आस्वाद घेत, मक्याच्या कणीसांवर, कांद्या भज्यावर ताव मारत होतं. तर कोणी एकटाच छत्रीत उभा राहून त्या पावसात हरवलेले क्षण शोधत होतं. आणि या सर्वामध्ये विवेक, त्या मुलांसोबत नाचत होता. एक जोरदार सर आली, त्याच्यासोबत वारा… पूजा आत उभी असली तरी तिच्या गोबऱ्या गालांवर पावसाचे थेंब उडाले. 


      थंड… एकदम थंड. पूजाच्या अंगावर रोमांच उठले. वेगळचं मनात आलं तिच्या काही. खरंच, पावसाला आपण किती लांब ठेवलं ना… नको आता. मलाही भिजायचे आहे. विवेकसारखं… मनसोक्त, विवेक तर पावसात बिझी होता. पूजाने त्याच्याकडे पाहिलं. त्याचं लक्ष नव्हतंच. पूजाने तिचं सामान तिथेच ठेवलं. हात पुढे केला तिने… थंडगार… पावसाचा स्पर्श. तसं काही पावसाला ती पहिल्यांदा अनुभवत नव्हती,आज काहीतरी वेगळं होतं.पाऊस तर नेहमीचाच होता, परंतु आज प्रेम बरसत होतं, पावसाच्या रुपात. पूजा हळूच बाहेर आली दरवाजातून. विवेक सारखे तिनेही डोळे मिटून घेतले आणि पावसात तल्लीन झाली ती. 


     व्वा !! किती सुरेख वाटतं पावसात. पूजाने डोळे उघडले. मन अगदी धुवून गेल्यासारखं वाटते. मनातला राग, द्वेष, दुःख, अडचणी, tension…. वाहून जातात पावसात.इतकी वर्ष आपण हा आनंद, आपल्यापासून लांब ठेवला होता. Thanks विवेक… तुझ्यामुळे मला हा आनंद मिळत आहे. Thanks.… पूजा हात पसरून, स्वतः भोवतीच गिरक्या घेत होती. विवेकचं लक्ष तिच्याकडे गेलं. अरे… हि कधी आली बाहेर… चक्क भिजायला… विवेकला हसायला आलं. 


    पूजा तशीच गिरक्या घेत होती. विवेक हळूच तिच्यासमोर येऊन उभा राहिला. किती वेळ तो तिच्याकडे पाहत होता, " पूजू… " विवेक हळूच आवाजात बोलला. पूजा थांबली जागेवर. विवेकला बघून छान हसली ती,

" काय madam, पाऊस नको …पाऊस नको …म्हणणारी पूजा कूठे गेली.",

" ती पूजा ना… तिच्या घरी गेली. " पूजा हसत म्हणाली. 

" असं का… मग मीही जातो घरी.",

"का रे ? ",

" मी त्या पुजूला ओळखतो… तुम्हाला नाही madam.",

" हो का… " पूजाने चापटी मारली विवेकला. 

" चल… खेळूया पावसात. " ,

" माकडा… मी काय लहान आहे, पावसात खेळायला.",

" पावसात खेळायला वय लागत नाही, वेळ असावा लागतो. चल पकड मला." म्हणत विवेक पळाला सुद्धा. पुजालाही मज्जा वाटली. ती त्याला पकडायला धावली. 


       आणि पूजा-विवेकचा खेळ सुरु झाला भर पावसात. वेड्यासारखे दोघे धावत होते. समोर येणाऱ्या जोडप्यांना धडकत होते, मधेच येणाऱ्या छत्र्याना आपटत होते. धावताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. छान एकदम. कितीतरी जोडपी, त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. हसत होते. पण त्यांचं फक्त आणि फक्त पावसाकडेच लक्ष होतं. एव्हाना ते धावत धावत खूप पुढे आले होते. विवेकने मागे वळून पाहिलं. पूजा लांब राहिली होती. विवेक थांबला. तशी पूजाही थांबली. आणि जागेवरच पुन्हा गिरक्या घेऊ लागली. विवेक तसाच तिला बघत उभा राहिला. 


      जिथे पूजा-विवेकचा खेळ सुरु होता, तिथे समोरच एका हॉटेलमध्ये सुवर्णा तिच्या मैत्रिणी बरोबर नास्ता करायला आली होती. तिला हॉटेलमध्ये येऊन १ तास झाला होता. पाऊस कधी थांबतोय याकडे तिचं लक्ष होतं.

" शी… यार, काय हा पाऊसपण. एवढा सुट्टीचा दिवस, बाहेर पडले तर सुरुवात केली याने." , सुवर्णा तिच्या मैत्रिणीला सांगत होती. 

" होतो गं कधी कधी जास्त पाऊस. आणि आता तर त्याचे दिवस आहेत पडण्याचे… मग तो पडणारच ना… ",

"हो. पडू दे ना मग. मी कूठे थांबवलं आहे त्याला. पण मी घरी गेल्यावर पड म्हणावं." सुवर्णा आता वैतागली होती. 

" चल यार… हा काय थांबणार नाही. निघूया आपण." ," नको… मी थांबते जरा वेळ… छान वातावरण झालं आहे. तू पण थांब. "," नको… मी जाते, Bye… " म्हणत सुवर्णा निघाली. 


       हॉटेलच्या बाहेर आली ती. taxi साठी इकडे-तिकडे बघत होती ती. शट्ट !! एकही taxi नाही. आज भिजणार बहुदा मी… सुवर्णा स्वतःशीच गप्पा मारत होती. तेव्हा तिला समोर कोणीतरी भिजताना दिसलं… काय मंद आहे तो मुलगा.… भिजतोय पावसात, मग सर्दी, ताप… डॉक्टरकडे पळापळ…. कोणी सांगितलं आहे एवढं करायला.…. स्वतःशीच हसली ती. taxi काही येत नव्हती. तिचं लक्ष राहून राहून त्या मुलाकडे जात होत. ओळखीचा आहे का… मग मला का असं वाटतंय… तिने निरखून पाहिलं. 


      विवेक !! अरे … हो, विवेकच आहे तो. हा काय करतोय इथे… भिजायला इथे आला, एवढया लांब… कमाल आहे याची हा… सुवर्णाला विवेकला पाहून आनंद झाला. विवेकला तिला भेटायचं होतं, मध्ये पाऊस होता ना. " विवेक…. ये विवेक…" सुवर्णा त्याला मोठयाने हाक मारत होती.विवेकच लक्ष नव्हतं. कूठे लक्ष आहे याचं…. ये विवेक… नाहीच बघत इकडे… आणि हा सारखा समोर कूठे बघतो आहे… सुवर्णाने विवेक बघत असलेल्या दिशेने पाहिलं… एक मुलगी पावसात गिरक्या घेत होती. तिलाही निरखून पाहिलं सुवर्णाने… " पूजा !! " , म्हणजे पूजासुद्धा आहे इकडे… दोघे एकत्र भिजत आहेत पावसात. थोडयावेळाने विवेक पूजाजवळ गेला आणि पुन्हा ते एकमेकांवर पाणी उडवू लागले. सुवर्णाला ते दृश्य पाहून वाईट वाटलं. आपली जागा पूजाने घेतली बहुदा… सुवर्णाच्या डोळ्यात पाणी जमा झालं. तितक्यात समोर taxi येऊन थांबली. सुवर्णा त्यात बसली. जाता जाता त्या दोघांकडे एक नजर टाकली. नंतर तिला त्यांच्याकडे बघताच आलं नाही… पाणी साचलेलं ना डोळ्यात. 


     खूप वेळ झाला होता, पूजा आणि विवेक दोघेही दमलेले होते आता. पाऊस मात्र तसाच पडत होता अजून. 

" बस… झालं आता पूजा… " विवेक बोलला. 

" थांब रे… इतक्या वर्षात पहिल्यांदा मी भिजली पावसात. भिजू तर दे मला.",

"घरी नाही जायचे का तुम्हाला… " घरंच नाव काढलं तेव्हा तिला घरची आठवण झाली. 

" हो रे …. विसरली मी, आणि आता कसं जाणार घरी. स्टेशन तर लांब आहे.",

" taxi ने जा घरी… ",

"माकडा … भिजली आहे मी… taxi वाला घेणार का गाडीत.… ",

" घेणार ना… " विवेकने हात करून एक taxi थांबवली. नशीब पटकन भेटली. 

" ओ… taxi वाले… हिची छत्री हरवली म्हणून हि भिजली आहे. जरा घरी सोडता का तिला…. " ते ऐकून taxi निघून गेली. पूजा कसली हसायला लागली. 

" म्हणे… नेईल घरी. आणि माझं सामान त्या हॉटेलमध्ये आहे, ते कोण घेऊन येणार… ",

" अरे… हो, विसरलो मी. चल जाऊया. " म्हणत पूजा आणि विवेक चालत चालत निघाले. विजा अजूनही चमकत होत्या. पूजाने हळूच विवेकचा हात पकडला. विवेकला छान वाटलं ते… 


      हॉटेलमध्ये आले ते. एक taxi बाहेरच उभी होती. तो तयार झाला, पूजाला घरी सोडण्यासाठी. तिने तिचं सामान ठेवलं taxi मध्ये. 

" चल विवेक… आणि thanks ",

" thanks कशाला ?.",

"या क्षणासाठी… जो आतापर्यंत मी कधी अनुभवला नव्हता. thank you very much." पूजाने विवेकला मिठी मारली. अनपेक्षित होतं ते, विवेकसाठी. त्यानेही तिला मिठीत घेतलं. " चल Bye गोलू… thanks again… I love rain, love you गोलू…. " म्हणत पूजा taxi मध्ये बसली आणि निघाली. 


     विवेकला हे नवीन होतं… पूजा आपल्या प्रेमात आहे कि आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहे, विवेकला गोड प्रश्न पडला. तेव्हाचं… " कडकडाट्ट…. " विजेचा जोरदार आवाज झाला. विवेकने वर आकाशात पाहिलं. बापरे !!! नक्कीच कुठेतरी पडली असेल… पावसाचा जोर अजून वाढत जात होता. सकाळचे ११.३० झाले तरी अजून काळोखच होता. निघायला पाहिजे आता, म्हणत विवेक निघाला आणि पुन्हा वीज चमकली.… लख्ख प्रकाश, विवेकच्या मनात कससं झालं. डोळे दिपून गेले अगदी. पूजाची taxi अजूनही विवेकला दिसत होती. तिकडे नजर टाकून विवेक वळला, पुन्हा विजेचा कडकडाट…आणि त्याच्यासमोर बघतो तर…. 


     " मानसी !! " , विवेक तसाच स्तब्ध होऊन तिला पाहत राहिला. विवेकचं पहिलं प्रेम, जिच्यासाठी तो वेडा झाला होता ती मानसी…. एका वर्षापूर्वी ज्या मुलीने विवेक पासून सगळे संबंध अचानक तोडले होते ती मानसी…. आज त्याच्या समोर उभी होती. मानासीही त्याला बघत होती. दोघांमध्ये फरक एवढाच कि ती छत्री मध्ये तर विवेक पावसात भिजत होता. 


     वर आकाशात , विजांचा तांडव सुरु झाला होता…आवाजासोबत कितीतरी प्रकाश दिसत होता, लख्ख प्रकाश…. त्या प्रकाशात मानसीचा गोरा चेहरा अजूनही उजळून दिसत होता. विवेकच्या मनावर जणू त्या विजा, जुन्या आठवणींचे प्रहार करत होत्या. खरंच…. आभाळ आता अधिक गडद होतं होतं.…विवेकच्या मनातलंही.   


--------------------------------------------to be continued------------------------------------


Rate this content
Log in