vinit Dhanawade

Romance

5.0  

vinit Dhanawade

Romance

" रातराणी.... (भाग २ ) "

" रातराणी.... (भाग २ ) "

50 mins
2K


" कुछ लोग पास होते है जिंदगी में ,

पर कुछ कुछ खास है जिंदगी में, 

अक्सर मांगा था खुदा से वो मिला तो नही,

लेकिन आपकी दोस्ती प्यार से कम भी तो नही,

आपकी एक मुस्कुराहट सुकून है इस दिलका,

वैसे तो कभी बताते नही आपको हाल इस दिल का,

अब तो तनहाई मे भी आपके के खयाल रेहता है,

क्या करें,आप इस दिल में जो रहेते हैं ...... "


अनुजाने तिची कविता संपवली. " टाळ्या !! टाळ्या बजाओ बच्या लोग... " विनय टाळ्या वाजवत उभा राहिला. बागेत असलेले बाकीचे लोकं या दोघांकडे पाहू लागले. अनुजाने पट्कन त्याचा हात पकडला आणि खाली बसवलं. " सॉरी !! " अनुजा सर्वांकडे पाहत म्हणाली. 


" किती आगाऊ आहेस तू... काय हा वेडेपणा... अजूनही सगळे आपल्याकडे पाहत आहेत. निघूया चल ... " अनुजा निघाली सुद्धा. 


" अरे !! थांब तर .... " अनुजा पार गेट पर्यंत पोहोचली होती. नाईलाजाने, विनय सुद्धा बाहेर आला मग.  अनुजा त्याच्या बुलेट जवळ उभी. " एवढी छान कविता केलीस. ती सुद्धा हिंदीमध्ये ... wow .. too good .... " ,

" पुरे झाली स्तुती... सुरु कर तुझी बुलेट... " ,

" आणखी थोडा वेळ बसलो असतो तर ... ".... विनय... 

" नको , राहू दे... तुझा वेडेपणा वाढला असता आणखी. " अनुजा त्याच्या मागे बसत म्हणाली . 

" आता कुठे जायचे.. ? " ,

" मला घरी जायचे आहे. तू मला पुढच्या सिग्नलला ड्रॉप कर ... " ,

" ड्रॉप करू तुला.... लागेल ना तुला मग... " विनय मस्करीत बोलला. तशी अनुजाने त्याच्या पाठीवर चापट मारली. 

" खरच... खूप आगाऊ झाला आहेस आजकाल.... By the way, एक विचारू का " ,

" नको " विनय हसत म्हणाला. 

" विचारणार मी... तुझा पहिला जॉब ना .. मग हि बुलेट कशी तुझ्याकडे... तुझ्या पप्पांची आहे का.." ,

" नाही ग.. मी स्पर्धामध्ये जायचो ना.. कॉलेज मध्ये असताना... तेव्हा एकतरी बक्षीस हमखास ठरलेलं असायचे. पहिलं नाही पण बाकीच्या नंबर मध्ये असायचो... कधी काळी पहिला यायचो. तेव्हा पैसे मिळायचे ना, ते साठवलेले पैसे आणि बँकमधून थोडे Loan... झालं काम. मला घेयाची होतीच.... बरं पडते कुठे फिरायला गेलो कि... " अनुजाचे ठिकाण आले. 

" चलो bye ... then... " ,

" Bye नाही बोलायचे पोरी.. see you बोलायचे... ", 

" ok ... बाबा...see you " अनुजा हसतच गेली.   


विनयने त्याची गाडी वळवली ती हॉस्पिटलच्या दिशेने. काही "काम" होते त्याचे. काही रिपोर्ट्स घेऊन निघाला तसे त्याला एक ओळखीचे डॉक्टर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिला. अचानक, भांडणाचा आवाज येऊ लागला. " आलोच " विनयने त्या डॉक्टरांचा निरोप घेतला आणि आवाजाच्या दिशेने गेला. बघतो तर हेमंत भांडत होता. 


" अक्कल आहे का जरा तरी ... तिथे माझ्या भावाला धड उभं राहता येत नाही. आणि तुम्ही बोलता , रांगेत उभे रहा. " हेमंत चढ्या आवाजात बोलत होता. 

" हो सर.... तरी सुद्धा तुमच्या पेशंट साठी बेड availble नाही करू शकत इतक्या जलद.... " , 

" इतके मोठे हॉस्पिटल आहे... आणि एकही बेड नाही... मी सारखा येतं असतो माहित आहे ना... तरी असं करणार तुम्ही... ,मला काही माहित नाही... माझ्या भावाला ऍडमिट करा लवकर... " हेमंत अजूनही भांडत होता.  


विनयने दुरूनच पाहिलं. एक १०-१२ वर्षाचा मुलगा खुर्चीवर बसला झोपला होता. तोंडातून फेस येतं होता. विनयने लगेच त्याच्या ओळखीच्या डॉक्टरकडे विनंती केली. " तात्पुरते बघा ना डॉक्टर.. माझा मित्रच आहे तो.. " विनय तसा ओळखीचा होता म्हणून त्याच्या बोलण्यावर लगेच ऍडमिट करून घेतलं. हेमंतला ते माहीतच नाही. अजूनही तो भांडत होता. विनय त्याच्या जवळ गेला तसा त्याच्यावरही खेकसला. 


" तू काय करतोस इथे.. आणि जर यात तोंड घातलेस ना.. तुझंही तोंड लाल करून ठेवीन... " विनय तर काहीच बोलला नाही. तरी डॉक्टर बोलले. 


" अरे ...कशाला भांडतो आहेस.. तुझ्या भावाला केले ऍडमिट... " हेमंत ने मागे वळून पाहिलं . नव्हता त्याचा भाऊ तिथे... 

" कोणत्या रूम मध्ये ठेवले आहे ? " डॉक्टर घेऊन गेले हेमंतला. 


" आणि त्याच्यामुळेच तुझ्या भावाला ऍडमिट केले... त्याला थँक्स बोलावे तर त्याच्यावर ओरडतो आहेस... " हेमंतला जाणीव झाली आपले चुकले याची. त्यावर काहीच न बोलता भावाजवळ गेला. 

" पण काय झालं नक्की त्याला " विनयने डॉक्टरांना विचारलं. 

" याच्या भावाला फिट्स येतं असतात. त्यामुळे हा येतंच असतो इथे... अचानक येतो नेहमी... तुला कस माहित नाही... मित्र आहे ना तुझा.. " डॉक्टर गेले त्याला तपासून. 


हेमंत त्याच्या भावाशेजारीच बसून होता. विनय त्याच्या जवळ आला. " सॉरी... " हेमंत विनयकडे पाहत म्हणाला. " Its ok ... होते असं कधीतरी ... मी जातो... तू बस्स... " विनय निघाला. पुढच्या दिवशी, विनयने सकाळ-सकाळीच अव्याला गाठलं. 

" चल... जरा बोलायचे आहे ... " विनय खेचतच घेऊन आला त्याला. 

" काय एवढं काम तुझं... " अव्या वैतागला. 

" महत्त्वाचं बोलायचे आहे. ", 

" बोल " ,

" हेमंत बद्दल विचारायचे होते." विनयच्या या वाक्यावर अव्याच्या चेहऱ्यावरचे expression बदलले. 

" चंदन.... चंदनला विचार... त्याला सगळी माहिती असते. " असं बोलून अव्या निघाला होता तरी थांबवलं विनयने 

" तू त्याचा खूप जवळचा मित्र होतास... म्हणून विचारतो आहे तुला.. " अविला राग आला. 

" पण मला सांग... आज अचानक त्याचा पुळका का आला तुला.. तो तुला पाण्यात पण पाहत नाही. ", 

" काल ... हॉस्पिटल मध्ये होता. त्याच्या भावाला घेऊन आलेला... पण काही वेगळाच वाटला मला तो.. ऑफिस मध्ये कसा असतो... गर्विष्ठ , attitude मध्ये... तसा अजिबात नव्हता. पण काल वेगळा हेमंत दिसला. "  

" होय... त्याचा लहान भाऊ ... आजारी असतो सारखा. मध्ये मध्ये त्याला फिट्स येतात म्हणून घेऊन जात असतो हॉस्पटिल मध्ये... ऑफिस मध्ये कधी सुट्टी नसते त्याची. कधीच नाही. कधी नसला कि समजून जायचे त्याच्या भावाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे असं. ",

" हेच... यासाठीच विचारतो आहे ... आई किंवा वडील... असतेच ना कोणीतरी सोबत ... हेमंत , भावासाठी आलेला ते कळलं. पण आपला एक मुलगा आजारी आहे तर दोघांपैकी कोणीच नाही. हे पटलं नाही. म्हणून तुला विचारलं. " विनय भरभर बोलून गेला. 


अवि थोडा शांत झाला. मग बोलला. " कोणाला सांगणार नसशील तर तुला सांगतो. तो आणि त्याचा भाऊच असतो. बाकी कोणी नाही. आई-वडिलांचा डिवोर्स झाला आहे. " ,

" बापरे !! ... तरीही आई-वडील पैकी कोणीतरी मुलांची काळजी घेते ना... म्हणजे मुलांवर हक्क सांगतात ते.. तसं काही नाही का ... " ,

" कसं होणार ते ... रोजची भांडणे... त्यात आई-वडील .. दोघेही खूप मोठ्या जॉब वर... हेमंतचे वडील लहान भावाला खूप मारायचे... सारखा आजारी म्हणून..आणि आई... या हेमंतच्या राग करायची. शेवटी, डिवोर्सचा निर्णय झाला. डिवोर्स झाला तेव्हा हाच बोलला मी एकटा सांभाळू शकतो लहान भावाला. त्या दोघांना काहीच फरक पडला नाही. ते दोघे गेले आपापल्या वाटेने... हेमंत आपल्या वाटेने. तो चांगलाच आहे. फक्त इथे काही गैरसमज झाले आणि वाट लागली... " अवि बोलून गेला पट्कन. 

" काय झालेलं नक्की... सांग... तुमची भांडणे कश्यामुळे झाली. " विनयच्या या प्रश्नावर उत्तरं नाही दिलं अविने. निघून गेला तिथून.


संध्याकाळी , विनयच्या मनात काय आलं काय माहीत. पुन्हा हॉस्पिटल मध्ये आला. हेमंतचा भाऊ झोपला होता. पण हेमंत नव्हता तिथे. त्याला बघत असतानाच मागून हेमंत आला. 

" विनय !! ... तू काय करतोस इथे... " ,

" यालाच बघायला आलो होतो. तू ऑफिस मध्ये आला नाहीस ना... म्हणून आलो. " इतक्यात डॉक्टर आले . 

" हेमंत .. हि काही औषध आहेत... घेऊन ये जरा.. " हेमंत निघाला आणि थांबला... 

" विनय .. थोडावेळ थांबशील का इथे... येतोच लगेच मी... .," ,

" तू पण ना ... सांगायला पाहिजेच का.. जा ... जाऊन ये... " हेमंत पहिल्यांदा हसला विनय सोबत. तरी अवि सांगत होताच. चांगला आहे हेमंत. परिस्तिथी बदलते माणसाला. विनय बसून होताच. हेमंत आला १०-१५ मिनिटांनी. विनय तरी गेला नाही. बराच वेळ दोघे गप्पा मारत बसले. जणू काही जुने मित्रच. त्यादिवशी विनय उशिराने गेला घरी, तरी पुढचे ५-६ दिवस, संध्याकाळी ऑफिस सुटले कि विनय जात असे हेमंतला भेटायला आणि गप्पा मारायला.. छानच गट्टी जमली दोघांची. 


=========================================================


विनयची तब्येत जरा जास्तच खराब झालेली. त्याला लगेच I.C.U. मध्ये हलवलं. हेमंत होताच सोबत. त्याने लगेच या चौघांना बोलवून घेतलं. चंदन, अवि, दिक्षा, अनुजा ... धावतच पोहोचले. विनय अजूनही बेशुद्ध होता. डॉक्टरने चेक केले. सारेच काळजीत . 

" काय झालं डॉक्टर ... " ,

" काही काळजीचे कारण नाही.. BP low झाला म्हणून बेशुद्ध आहे तो.. मी injection दिले आहे. इतक्यात येईल शुद्धीवर. आणि हो.... I.C.U. आहे ना... कोणीतरी एकानेच थांबा इथे... " डॉक्टर निघून गेले. 


" एकानेच थांबा इथे..." असं स्पष्ठ सांगितलं तरी तो शुद्धीवर येई पर्यंत सारेच थांबले होते. विनय शुद्धीवर आला तस त्याने हलकेच डोळे उघडून पाहिलं. सर्वच उभे होते. अविने बघितलं विनय जागा झाला ते... 


" काय रे... तुला औषध घेता येतं नाय का वेळेवर.... लय मार खाणार आहेस तू... " अविचा आवाज ऐकून विनयला हसायला आलं. तरी आता सगळयांना बाहेर जावे लागणार होते. फक्त हेमंत काय तो थांबला तिथे. त्यात विनयला काही सांगून हेमंत सुद्धा निघून गेला. " शेवटी आलेच ना सर्व एकत्र... आज सुद्धा आणि तेव्हा सुद्धा... " विनयला "तो" दिवस आठवला. 


==========================================================


आदल्या दिवशीच , विनयने काही ठरवलं होते. तशीच तयारी करून तो निघाला ऑफिसच्या दिशेने. वाटेत दिक्षा दिसली चालताना. बुलेट तिच्या समोरच थांबवली. 

" काय मॅडम ... कधी पासून हाक मारतो आहे.. एवढं काय लक्ष नाही तुझं... " दिक्षाने पाहिलं त्याच्याकडे आणि कानातले इअरफोन काढले. 

" हे होते ना कानात .... बोल... काय बोलत होतास ... " ,

" मी बोललो .... ऑफिस मध्ये चालली आहेस ना.. बस मागे... जाऊ एकत्र... " तिने एकदा विनयकडे पाहिलं आणि नंतर बुलेटकडे. 

" नको ... राहू दे... चालत जाऊ शकते मी... " दीक्षाने पुन्हा इअरफोन लावले कानात आणि चालू लागली. विनयने पुन्हा गाडी सुरु केली , तिच्या पुढयात थांबवली... 

" अरे !! ... आपण एकत्र ... एकाच ऑफिस मध्ये काम करतो ... आहे ना लक्षात... " ,

" हो... आहे लक्षात.. पण मला चालत जायचे आहे.. " 


काय बोलू हिला.. विनयने गाडी सुरु केली आणि आला ऑफिस मध्ये. त्याच्या डोकयात काही सुरु होते काल पासून.. पटापट कामाला लागला. " चंदन.. चल.. मिटिंग आहे.... " विनयने चंदनला कामातून जागे केले. " कुठे मिटिंग आहे... " , " मेल नाही आला का तुला... नीट बघ... " चंदनने मेल बघितला. " एक काम कर... तू पुढे हो... मी येतोच मागून... " चंदन ठरवलेल्या रूममध्ये जाऊन बसला. थोड्यावेळाने हेमंत आला , त्याच्या ५ मिनिटांनी अनुजा आणि काही वेळाने दिक्षा.. सर्वात शेवटी ... विनय अव्याला घेऊन आला. विनयने दरवाजा आतून लावून घेतला. 


हे सगळे एकमेकांकडे बघू लागले. विनय एका खुर्चीवर जाऊन बसला आणि मोबाईल वर गेम खेळू लागला. कोणालाच काही कळेना. मिटिंग कुठे आहे. आणि हे बाकीचे कुठून आले. हाचं प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर. त्यात विनय एकटाच एका कोपऱ्यात. अवि गेला तणतणत त्याच्याकडे. 

" काय रे शान्या...  मिटिंग होती असा मेल केला होतास ना ... कुठे आहे मिटिंग... ", 

" थांब जरा... " विनय गेम मधेच गुंतलेला. अर्थात याचा राग आला सर्वाना. 

" काय फालतुगिरी लावली आहेस विनय. " हेमंतचा आवाज सुद्धा वाढला. 

" High score !! " विनय आनंदाने ओरडला. चंदनने डोक्याला हात लावला. 

" म्हणजे तूच सगळ्यांना मेल केलेस ??? ... काय गरज होती अशी खोटेपणा करायची... " दिक्षा बोलली. 


" एक मिनिट थांबा जरा ... आणि खाली बसा... " विनय शांतपणे बोलला. 

" मला नाही थांबायचे ... दुसरी important कामं आहेत मला. " अनुजा निघाली. दरवाजा बंद . तिच्या मागोमाग हेमंत आला. त्याने try केले दरवाजा उघडायला. नाहीच उघडला. 

" नाही उघडणार... मी लॉक करून चावी माझ्याकडे ठेवली आहे. बसा... आणि हीच मिटिंग आहे.... बसून घ्या... " नाईलाजाने सर्व बसले पण एकमेकांपासून दूर. चंदन विनयजवळच बसला होता. 

" का करतो आहेस हे ... " चंदन बोलला. तस विनयने त्याला गप्प केले.  


" चला ... मिटिंग मीच arrange केली आहे. मीच सुरु करणार आहे. तर चला, सुरु करूया. मिटींग आहे ती काही वर्षांपूर्वी झालेल्या misunderstanding ची. " यावर अवि तापला. 

" विन्या ... काय बोलतो आहेस तू.. कळते ना.. " विनयने ऐकून घेतलं. 

" अविनाश ... बस खाली. please, बोलू दे मला... " विनय बोलला तरी अविनाश हेमंतकडे रागाने बघत खाली बसला. 


" आठवतो का तो दिवस.. २६ जानेवारी.. हा.. त्याच दिवशी झालेली भांडणे. " विनय सर्वाकडे पाहत म्हणाला. 

" सगळयांना पटलेले दिसते.... तर त्याच दिवसापासून थोडं मागे जाऊ... त्यात मी सर्वाना आता छान ओळखतो. चांगली मैत्री झाली आहे माझ्याशी. तुम्हीही सारे मित्र होता एकमेकांचे... so , प्रत्येकाला काही विचारीन , त्याचे उत्तर स्पष्ठ द्यावे हीच अपेक्षा... " त्याने सर्वाकडे नजर फिरवली.  


" पहिला प्रश्न... चंदनला ... आणि खरं सांगायचे हा.. " चंदन आधीच डोक्याला हात लावून बसला होता. 

" हो सर... विचारा प्रश्न.. " ,

" exact काय झालं होते त्यादिवशी... " ,

" विनय ... का पुन्हा तेच ते... सोडून दे ना ... " चंदन म्हणाला. 

" मला प्रश्नाचे उत्तर पाहिजे आहे... काय झालं होते... " चंदनने सर्वाकडे नजर फिरवली. 

" मलाही माहित नाही. मी त्यादिवशी नेमका उशिरा आलेलो. आलो तेव्हाच भांडण सुरु होते या सर्वामध्ये... " ,

" कारण काय होते त्यामागे... " विनयने पुन्हा विचारलं. 

" हेमंत अनुजाला लग्नाची मागणी घालणार होता, हीच बातमी आलेली कानावर माझ्या. " हेमंतकडे पाहत बोलला तो. हेमंत काहीच बोलला नाही.  

"आता अनुजा ... तुला प्रश्न... तुला का राग आला या गोष्टीचा... कि थेट त्याला कानाखाली मारलीस... " ,

" मग काय करणार ... इतका चांगला मित्र होता तो.. त्याच्या मनात कस येऊ शकते असं माझ्याबद्दल..... एव्हडी close friendship ... म्हणजे मुलं काय मुलींशी मैत्री फक्त लग्नासाठीच करतात का... " अनुजा रागातच बोलत होती. 

" cool down ... ".... विनय... 

" हेमंतला काही बोलायचे नाही का यावर... " दिक्षा बोलली. 

" कशाला लावलीस रे मिटिंग... सगळ्यांत पुन्हा भांडण करायला का साल्या ... " तिथून अवि ओरडला. 


" शांत व्हा साऱ्यांनी.. वातावरण तापत चालले आहे.. प्लिज शांत व्हा ".... विनय.. 

" पण हेमंत आताही काही बोलत नाही आहे... त्यादिवशी सुद्धा गप्प होता. म्हणजे हे सर्व तो एकप्रकारे कबूलच करतो आहे. " ....दिक्षा... 

" दिक्षा मॅडम.. नका रागावू... मी सांगतो...त्या दिवसापासून थोडे मागे जाऊया म्हणजे ४-५ दिवस मागे... सांगायचे झाले तर २० जानेवारी... तेव्हा काय झाले होते अनुजा... " विनय तिच्याकडे पाहत बोलला. 

" काय ? " ,

" त्या दिवशी बोलली ना ... तुला बघायला आलेले ... घरी... लग्नासाठी... " , 

" विनय !! ... मित्र आहेस म्हणून सांगितलं होते... या personal गोष्टी का आणतोस लोकांसमोर... तुला सांगितलं हेच चुकलं... " अनुजा रागावली पुन्हा. 

" लोकं ... ?? मित्रच आहोत सगळे ... बरोबर ना... आणि सांगायचे झाले तर त्याच गोष्टीमुळे तुझा मूड ऑफ होता... "  


" हो... मला हे नाही आवडत... कोणीतरी life मध्ये येते अचानक... त्याला न समजता त्याच्याशी लग्न करावे.. मी तयार सुद्धा नव्हते त्या गोष्टीसाठी... दोनदा झालं तसं.. मीच रिजेक्ट केले दोन्ही वेळेला... इतकी घाई झालेली घरी, जशी मी नकोच आहे त्यांना घरात... डोकं सटकलं होते, त्यात हेमंतचे कळलं... मला propose करणार ते. एवढा चांगला मित्र... मनातल्या सगळ्या गोष्टी share करायचे. कधी कधी त्याला माझ्या scooty वरून घरी सोडायचे. मला bore झालं कि त्याला हक्काने कॉफी साठी घेऊन जायचे.. याच्याशी free वागले तर याला वाटलं प्रेमात पडले. राग आला मला. मारली कानाखाली... " पट्पट बोलून टाकलं अनुजाने. 

" तुला हेमंत बोलला होता का आधी तसं... तुला मागणी घालणार आहे ते.. " विनयने उलट प्रश्न केला. 

" नाही ..but एक मुलगी होती.. परी नावाची... तिने अवि आणि हेमंतचे बोलणं ऐकलं होते. हेमंत अविला सांगत होता. मला २६ जानेवारीला propose करणार ते.. " ,

" मग अविला तरी विचारलं होते का तू... ",

" नाही... का विचारावे झालं ना तेव्हाच... हेमंत सुद्धा काही बोलला नाही त्यादिवसापासून... निदान सॉरी बोलेल असं वाटलं होते.. तेही नाही. मग ते खरच होते. हेच prove झालं. " 

" ok ... आता हेमंतची गोष्ट सांगतो. तो काही बोलणार नाही .. मीच सांगतो. " विनय हेमंतकडे पाहत म्हणाला. 

" नको विनय ... प्लिज ... " ,

" आताच वेळ आहे , नाहीतर आयुष्यभर असेच गैरसमज राहतील. .. हेमंत त्या काळात ऑफिस मध्ये नव्हता ... बरोबर... ",.... विनय.. 

" हो.. म्हणजे तो... मला वाटते, १९ जानेवारीला आलेला. त्यानंतर २० जानेवारीला सकाळी आलेला. अवी सोबत काही बोलून निघून गेला. तो थेट, २५ तारखेला आलेला, ते सुद्धा मीटिंग होती म्हणून ... मिटिंग संपली तसा निघून गेला. " चंदनने माहिती पुरवली. 


" हो ... आदल्या दिवशीच तर परीने या दोघांना बोलताना ऐकलं. "..... अनुजा 

" थांब अनुजा ... मी सांगतो पुढे... हेमंतला एक लहान भाऊ आहे हे इथे फक्त चंदन , अवि आणि आता मला माहित आहे. पूर्ण ऑफिस मध्ये कोणालाच माहिती नाही याची. तो लहान आहे आणि सारखा आजारी असतो. हेमंत सुट्टीवर असतो कधीतरी त्याचे कारण तेच... त्यादिवशी सुद्धा , त्याकाळात हेमंत हॉस्पिटल मधेच होता. आधीच tension मध्ये, त्यात इकडचे celebration ची तयारी... तरी आलेला मीटिंगला. आता त्याचे आणखी एक surprise होते. ते अवि सांगेल. आणि हेमंत मिटिंग मध्ये काय बोलला ते सुद्धा सांगेल. " विनयने अविला बोलायला सांगितले. 


" हेमंतला एक मुलगी आवडायची, त्याच्याच बिल्डिंग मध्ये राहणारी. आधी फक्त friendship होती. हि गोष्ट फक्त मला माहित होती. या विनयला कस कळलं माहीत नाही. तीच नाव " अनिता ", तिला तो ऑफिस मध्ये बोलावून सर्वा समोर propose करणार होता. " ,

" मग परी अशी का खोटं बोलली मला... ? " ....अनुजा. 

" अवि... तो नेमका काय बोलला होता तेव्हा ते सांग... ".... विनय... 

" हेमंत बोलला कि उद्या अनु ला लग्नाची मागणी घालणार... हेमंत अनिताला "अनु " बोलतो.. " ,

" कळलं असेल ... काय झालं नक्की ते... ".... विनय ... 

" आणि मी सुद्धा बोललो कि बाहेरची व्यक्ती ऑफिस मध्ये येणार असेल तर HR ची permission घे... अनुजाला विचार.. " अवि मधेच बोलला. 

" परीने एवढंच ऐकलं... कि हेमंत अनुला propose करणार आणि अनुजा मॅडम चे डोकं आधीच तापलेलं होते. त्यात हेमंतचे बोलणे कानावर पडले. आणखी खळवळल्या मॅडम.. असच झालं .. " विनय अनुजाकडे पाहत होता.  

" हेमंत ला फक्त त्याच्या मित्रांसमोर तिला आणायचे होते... " ...विनय ... 

" हेमंत.. नक्की काय बोललास अनुजाला... " चंदनने विचारलं. 

" इतकंच ... मला काही महत्वाचे बोलायचे आहे तुझ्याशी... आणि तिने कानाखाली मारली सर्वासमोर... पुढे काय बोलणार.. आणि बोलूच शकलो नसतो.. ती किती मोठयाने बडबडत होती. लाज वाटली. तशीच बॅग घेतली माझी आणि हॉस्पिटल मध्ये गेलो भावाजवळ... " हेमंत शांतपणे सांगत होता.


" पुढेच मी सांगतो.. हेमंत आलेला परवानगी साठी. अनुजाला वाटले , propose साठी. ते झालं काहीतरी. हेमंत निघून गेला. अनुजा जागेवर येऊन बसली. हे झालं तेव्हा अवि नव्हता ऑफिस मध्ये. दिक्षा अनुजाचे सांत्वन करायला गेली , तर पुन्हा एक गैरसमज झाला दोघींमध्ये... दिक्षा हेमंतच्या बाजूने बोलते आहे असं वाटलं अनुजाला.. तर तिथे दोघींचे भांडण झाले. अवि आला. काय झालं ते कळलं, तापलं याचे डोके. अनुजाला जाब विचारायला निघाला तर दिक्षा समोर आली. दोघेही सुरु झाले.... स्वतःच्या Best Friend ची बाजू घेऊन... वाढता वाढता आवाजही वाढला आणि या दोघातला वाद सुद्धा... आता राहिले... अवि आणि हेमंत... हेमंतला वाटलं , अविने काहीतरी वेगळंच सांगितलं ऑफिसमध्ये... त्यामुळे जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा परत भांडणं झाली. .. संपलं... गैरसमज वर गैरसमज... कोणीही समजून घेतलं नाही, काय झालं नक्की... एकदा बसून बोलूया , असं अजिबात वाटलं नाही कोणाला... सगळ्यांचे इगो आले ना समोर " विनयने सारे explain केले. 


" पण त्याने तरी सांगायचे ना आधी.. नाहीतर नंतर बोलला असता तर... " अनुजा हेमंत कडे पाहत म्हणाली. 

" कस सांगणार... सर्व ऑफिस समोर अपमान झालेला.. आणि ब्रेकअप झाल्यावर... " विनय बोलून गेला... 

" ब्रेकअप ?? " दिक्षा खूप वेळाने बोलली. 

" हो... ब्रेकअप ... माझी फॅमिली नाही , ती बोलते कशी... आपली फॅमिली कशी होईल मग. शुक्कल कारण दिलं तिने. " हेमंत इतकंच बोलला. 

" म्हणून तो असाच राहतो ऑफिस मध्ये.. स्वतःच्या दुनियेत... इथे जे मित्र होते, ते दुरावले. घरी , लहान भाऊ सारखा आजारी.. बोलणार तरी कोणाशी हेमंत...".... विनय.. 

" मग ती परी .... " दिक्षा.. 

" परीचे मी सांगतो.. " आता चंदन बोलला. 

" ती काही वेगळीच होती... लोकांमध्ये भांडण लावण्यात तिला खूप मज्जा यायची. कामात तर आळशीच होती. gossip करायला खूप आवडायचे तिला. मग सरांनीच काढून टाकलं तिला .. " चंदनला माहिती असायची सर्व. 


" तर मला वाटते , आता सर्व गैरसमज दूर झाले असतील. " सर्वच एकमेकांकडे पाहू लागले. " काय झालं माहित आहे.. चुकीच्या वेळी चुकीची वाक्य ऐकून चुकीच्या माणसाबद्दल गैरसमज झाले. तुमची मैत्री हि पांढऱ्या शुभ्र नदी सारखी वाहत होती. त्यात काही गैरसमजांचे मोठे दगड टाकून त्यावर बांध घातला. वाहते पाणी नेहमीच निर्मळ असते. ते दगड काढलेत कि सर्व कसं सुंदर होईल. बघा... कसं ते.. बरं , सगळं एकदम बंद झालं नव्हतं. गेल्या वर्षभरात बोलत नाही तुम्ही एकमेकांशी. चंदन एकटा बोलतो सर्वांशी... तेही कामानिमित्त... बाकी सर्व लपून- छपून... " ,

" काय म्हणायचे आहे तुला... " दिक्षा बोलली. 

" हेमंतचा भाऊ आजारी असला कि अवि गुपचुप त्याला बघून येतो. हेमंतचे ठरलेलं हॉस्पिटल आहे. तो ऑफिस मध्ये आला नाही कि अविला कळते. जाऊन येतो हेमंत तिथे नसला कि. हा हेमंत , याच्याकडे पूर्ण ऑफिसचे काम असते. तरी तुमच्या तिघांपैकी कोणाचे काम आले ना, बाकी काम ठेवून तुमचे पहिले पूर्ण करतो. दिक्षा सोबत बोलत नसली तरी काही नवीन वस्तू दिसली कि अनुजा खरेदी करून ठेवते दिक्षा साठी. दिक्षा, तुला खोटं वाटतं असेल ना तर आताही , अनुजाच्या PC खाली जे छोटे कपाट आहे ना त्यात बघू शकतेस... तू सुद्धा रोज तिची चौकशी करत असते... तिच्या शेजारी बसणाऱ्या मुलीकडे. म्हणजे सगळयांना अजूनही काळजी आहे एकमेकांची.. दाखवत नाही इतकंच, सोडून द्या सर्व... एकत्र या.. पुन्हा ते जुने दिवस येऊ दे, celebration होऊ दे.. infact , सण सुरु झाले आहेत.. त्यासाठी तरी एकत्र या.. मी काय नवीन आहे.. मला नवीन मित्र बनवायला आवडतात.. तुम्ही तर खूप आधी पासून जवळचे आहात. आणि अनुजा.... तुला सांगतो.. मला एकदा बोलली होतीस.. माणसं आवडत नाहीत... म्हणून दूर पळते सर्वापासून. माणसं वाईट नसतात, त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण वाईट असतो. सगळेच वाईट असते तर हेमंत , अवि , चंदन , दिक्षा .. या सारखी चांगली माणसं तुझ्या life मध्ये आली असती का... तर, थोडा ... अगदी थोडा दृष्टीकोण बदल तुझा... आयुष्य खरंच किती छान आहे, हे तुम्हा सगळ्याकडे बघून वाटते.... चला, माझं बोलणं झालं... मी निघतो.. तुम्ही आणखी थोडावेळ बसा... एकमेकांशी बोलतात तर अजून छान... " विनय बाहेर आला. 



विनय कामाला लागला तरी त्याचे लक्ष त्या मिटिंग रूमकडेच होते. तो बाहेर आल्या नंतर, जवळपास एक तासाने सगळे बाहेर आले. चंदन त्याच्या शेजारी येऊन बसला. चुपचाप काम सुरु केले त्याने. विनयने काही विचारलं नाही त्याला. तरी विनयला जाणून घेयाचे होते, पुढे काय झालं ते. लंच टाईम पर्यंत चंदन गप्पच. शेवटी न राहवून विनयने विचारलं. 

" अरे तू काहीच बोलला नाहीस.. काय बोलणे झाले तुमच्यात... " यावर चंदनने त्याच्याकडे रागात पाहिलं. 

" चल... काय गोंधळ घातला आहेस ना ते बघ... " चंदनचा चढलेला आवाज ऐकून विनय घाबरला. 

" काय झालं नक्की ... " विनय विचारत होता... 

" तुझा जेवणाचा डब्बा घे.. आणि चल... स्वतःच बघ.. " चंदन अजूनही रागात. विनयचा हात पकडला आणि त्याला ओढतच लंच टेबल जवळ घेऊन आला. 

" बघ... बघ काय करून ठेवलं आहेस ते... " बघतो तर हे चौघे , एकमेकांशी गप्पा मारत बसलेले. 

" बघितलंस... ऑफिस मधले चार महत्वाची माणस... सकाळपासून काही काम न करता ... नुसते गप्पा मारत बसले आहेत... काम कोणी करायची... त्यात बघ... एक टेबल सुद्धा अडवून बसले आहेत कधीचे... जेवायचे कुठे... " विनयला काही कळेना... नक्की काय चुकते आहे यात... मात्र थोड्यावेळाने समजलं, चंदन हसत होता मागे... 

" यार !! ..... करून दाखवलंस तू... पुन्हा एकत्र आणलं त्यांना... खूप खूप छान वाटते आहे... " चंदनने मिठी मारली विनयला. 


विनयला सुद्धा छान वाटले. संद्याकाळ पर्यंत ऑफिस मधले वातावरण सुद्धा बदलले. हे सगळे पुन्हा एकमेकांशी बोलायला लागले, हि बातमी एव्हाना सर्व ऑफिस भर पसरली. विनय निघतच होता घरी, आणि दिक्षाचा मॅसेज आला PC वर... " भेटूया का ऑफिस खाली.. " विनयला हसायला आलं. त्याने रिप्लाय केला. " मी घरी निघतो आहे.... तू सुद्धा निघत असशील तर तुला सोडतो घरी... वाटेत बोलू.. " तिचा लगेच रिप्लाय... " ठीक आहे... मीही निघते आहे.. पार्किंग मध्ये उभा राहा.. येते मी... " विनय १० मिनिटांनी खाली आला. 


" हा बोल.. काही बोलायचे होते तुला... " विनय दिक्षा समोर उभा राहिला. 

" इथेच बोलूया का... ".... दिक्षा... 

" मग कुठे ... ? " ,

" कॉफी घेऊया का.. ",

" चालेल ना.. ते बघ ... पलीकडेच कॉफी शॉप आहे.. " दोघे गेले तिथे. विनयने त्याची नेहमीची जागा पकडली. " मी येतं असतो इथे... ते जाऊ दे... बोला मॅडम... आज एकदम कॉफी साठी विचारलं... क्या बात है.. " ,

" तुला थँक्स बोलायचे होते.... " दिक्षाच्या चेहऱ्यावर आनंद होता. विनयला कळलं ते... 

" त्यात थँक्स काय.. मला वाटलं , तुम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र यावे... त्यात तुम्ही सर्वच छान आहात... म्हणून.. त्यात ... तू.... एखाद्या कवितेसारखी वाटतेस... " ,

" हेच... हेच आवडत नाही मला.. मी तुझी कविता नाही... मित्र आहेस ना... नॉर्मल बोललास तरी चालेल... आणि ते प्रेम ,विरह .. या गोष्टीवर तर अजिबात विश्वास नाही माझा .... आवडतं नाही तेच बोलतोस... " दिक्षा बोलून गेली पट्कन. नंतर तिलाच वाईट वाटलं.. 

" सॉरी.. पट्कन राग येतो मला.. पण या गोष्टी नाही आवडत मला.. मग असं कोणी वागलं कि राग येतो... " ,

" its ok ..." विनयने कॉफी संपवली. 

" By the way , एक सांगायचे राहिले... तुला जेव्हा पहिल्यांदा निरखून पाहिलं ना... तेव्हाच एक कविता लिहिली होती तुझ्यावर... if you don't mind... ऐकवू का.. " ,

" चालेल ना ... " दिक्षा सावरून बसली. 


" अलीकडे ना एकटच छान वाटत

चंद्राकडे पण एकटक बघावस वाटत

नसलं कुणी आसपास तरी हि छान वाटत

तुझ्याच आठवणीत रमावस वाटत

बोलताना तुझ्याकडेच बघावस वाटत

माझ्या प्रत्येक कवितेत तुझंच अस्तित्व असावं असं वाटत,

झोपेतही तुझच स्वप्न पडावं असं वाटतं

एकट्यामध्ये उगीचच हसावस वाटतं

मनं नको नको म्हणतानाही तुझ्याशी बोलावसं वाटत

फक्त तुझ्यासाठी आता सजावस वाटतं

फुलपाखरासारखं खुप खूप उडवसं वाटत

तुझ्या मिठीत येऊन आता कायमच निजावस वाटत !!!!! " 


दिक्षा भारावून ऐकत होती. 


"चल निघूया... सोडतोस का मला घरी.. " ,

" घरी ... तुला ?? " विनय चाट पडला. 

" त्यात काय... आमच्या एरिया मध्ये तर सोडू शकतोस ना.. थेट घरात नाही बोलली... " ,

" नाही... सकाळी कोणीतरी बसत नव्हते माझ्या गाडीवर... " ,

" हो का ... बरा शहाणा आहेस तू... चल लवकर ... उशीर होईल नाहीतर... " विनयने हसतच त्याची बुलेट सुरु केली. निघाले दोघेही. 


=================================================


आज विनयची आणखी एक टेस्ट होणार होती, त्यासाठी चंदन थांबला होता हॉस्पिटल मध्ये. अवि आणि हेमंत नवीन प्रोजेक्ट साठी मुंबईबाहेर होते आणि दिक्षा , अनुजा येऊ शकत नव्हत्या. म्हणून फक्त चंदन विनयजवळ होता. बसून बसून त्यालाही कंटाळा आलेला. तिथेच येरझाऱ्या घालू लागला. तिथे एक खिडकी होती. त्याजवळ आला आणि खाली बघू लागला. आज सकाळ पासूनच लगबग होती खाली. काही अंतरावरची बाजारपेठ दिसत होती. गर्दीच होती तिथे. वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे आकाशकंदील नजरेस पडत होते. रांगोळीचे रंग घेऊन काही लोकं बसली होती. अरे हो..... परवा दिवाळी ना..चंदनच्या लक्षात आलं. हल्ली काहीच लक्षात राहत नाही. विनयकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले असते. गेल्यावर्षी किती धमाल केली होती ऑफिसमध्ये.... ते फक्त विनयमुळेच शक्य झालं होते. चंदनला आठवली ती दिवाळी. 


=====================================================


हे सर्व एकत्र आल्यानंतरचा पहिला सण.... " दिवाळी ". आधीच तयारी सुरु झालेली. त्यामुळे ऑफिस मध्ये गडबड होतीच. नव्या जोमाने तयारी करत होते सर्व. ५ जणांची टीम पुन्हा ऍक्टिव्ह झालेली. साऱ्यांनी आनंदाने कामे वाटून घेतली होती. विनय सुद्धा मदत करत होता. त्यात अजूनही दिक्षाचा पत्ता नव्हता. अनुजाला विचारलं त्याने. 

" उशीर होणार बोललेली.. किती उशीर हे नाही बोलली. पण तुला कशाला पाहिजे आहे ती... " अजुनाने उलट विचारलं. 

" नाही.... काल तिला पणत्या आणायला सांगतील होते. " ,

" पण २ दिवस आहेत ना अजून दिवाळीला... उद्याही आणता येतील.. " ,

"तसं नाही... ऐनवेळी गडबड नको म्हणून बोललो होतो ... आजच घेऊन ये... जर ती आणणार नसेल तर दुसऱ्या कोणाला सांगता येईल... " विनयने explain केले. 


विनयला एक कॉल आला तसा तो खाली आला. १० मिनिट झाली असतील. समोरून गेटमधून दिक्षा येताना दिसली. पांढरा शुभ्र ड्रेस , त्यात केशरी रंगाचा पायजमा... दोन्ही कानात मोरपंखी असं काहीतरी... केस , एका वेगळ्या प्रकारे वर बांधलेले. त्यात तिला तो पांढरा रंग इतका उठून दिसतं होता कि क्या बात है... बघतच राहिला विनय, तरी स्वतःला सावरलं त्याने. दिक्षाने पाहिलं त्याला. तशी त्याच्या दिशेने आली. 

" नमस्कार दिक्षा मॅडम... कुठे होता आपण ... " ,

" का... काय झालं... " ,

" तुला पणत्या सांगितल्या होत्या.. विसरलीस ना ... " ,

" त्याच आणायला गेले होते... हे घे ... " दिक्षाने पणतीची पिशवी त्याच्या हातात ठेवली. 


"... थँक्स .... and By the way ... दिवाळी दोन दिवसानंतर आहे... पण तुला बघून वाटते ... आजच सुरु झाली दिवाळी.... निदान माझी तरी... " दिक्षाने त्याच्या पाठीवर चापट मारली. 

" तुला काय .. सारखी मीच भेटते वाटते स्तुती करायला. आणि तू खाली काय करतो आहेस... आपले ऑफिस चौथ्या मजल्यावर आहे... कि कोणाला बघायला येतोस खाली सारखा... अनुजाला खूप लोकं येतात बघायला ते माहित आहे मला... तसाच तू येतोस का खाली कोणासाठी... " दिक्षा हसत होती. 

" हो ... आहे कि ... फोटो पण आहे माझ्याकडे .... बघायचा आहे का .. " ,

" दाखव ... दाखव ... " विनयने मोबाईलचा front camera सुरु केला आणि दिक्षा समोर धरला. 

" ह्या मुलीला बघायला येतो खाली... " दिक्षा स्वतःचा चेहरा बघून लाजली.

" चल ... मी जाते वरती.... तू फिरत राहा ... भुंग्या सारखा ... मिळेल कोणतेतरी फुलं ... " दिक्षा हसत निघाली , मागोमाग विनय. एकत्रच शिरले लिफ्ट मध्ये...... दोघेच. .... विनय दिक्षाकडेच बघत होता. दिक्षा लाजत होती. अचानक काही सुचलं त्याला.. 

" अक्षरांना सुद्धा आता तुझी सवय झालीये,

काही लिहावं म्हटलं तरी तुझंच नाव येत,

सुचतच नाही आता तुझ्याशिवाय काही,

फिरून माझं मन पुन्हा तुझ्याजवळच का येत ?? "


कसली भारी smile आली दिक्षाच्या चेहऱ्यावर ती कविता ऐकून. लिफ्टचा दरवाजा उघडला , दिक्षाने विनयच्या गालांचा गालगुच्चा घेतला आणि पळतच निघून गेली.  चंदन लिफ्टच्या बाहेरच उभा. विनय लिफ्ट मधून बाहेर आला तसा त्यानेही विनयचा गालगुच्च्या घेतला. 

" आता माझा घे गालगुच्च्या... " म्हणत चंदनने स्वतःचा गाल पुढे केला. तशी विनयने हलकेसे चापट मारली त्याच्या गालावर .... 

" मला कळते रे सगळे ... माहित आहे ना ... माझी माणसं आहेत ऑफिस मध्ये... सगळे update असतात माझ्याकडे ... " चंदन विनयकडे पाहत म्हणाला. 


तसा विनय हसू लागला. " काही नाही तसं ... छान वाटते तिच्याशी बोलताना... थंड हवेची झुळूक वाटते ती.. आणि तिची smile बघितली नाही... काय फील होते .. ते नाही explain करू शकत. " विनय वेगळ्याच जगात गेलेला बोलताना. 

" तसं काही नाही माहित आहे. पण दिक्षा आणि तुझ्यात .. नक्की काही सुरु आहे... तसा तू आता पूर्ण ऑफिसचा हिरो झाला आहेस.. सर्व मुली तुझ्यावर फिदा असतात.. तुझ्यामुळेच , हे सर्व सुरु झालं हे सुद्धा मान्य... तरी .... दिक्षा तुला like करते आणि तुलाही ती आवडते .. हे मला कळते... छान सुरु आहे ... असच राहू दे... " म्हणत चंदन निघून गेला. विनय सुद्धा खुश होता. 


finally , तो दिवस उगवला. सकाळपासूनच खूप लोकं आलेली ऑफिसमध्ये... तयारी सुरु होती. कोणी रांगोळी काढत होते, फुलांची तोरणं बांधत होते. रंगीबेरंगी कंदील लावले होते. अनुजा , दिक्षा सकाळीच आलेल्या. सोबत अवि , हेमंत होतेच. सर्व कसोशीने लक्ष घालत होते. कुठे काही राहायला नको म्हणून. इतक्या दिवसांनी काही होतं होते. मग, तसंच झालं पाहिजे ना काहीतरी.. सेलेब्रेशन... विनय जरा उशिराने येणार होता. त्यामुळे ज्यांनी तयारी केलेली होती, त्या मुली... त्याच्याच येण्याची वाट बघत होत्या.. फोटो काढायचे होते ना सोबत.. 


दिक्षा आज छान दिसतं होती. इतक्या दिवसांनी... नाही, इतक्या महिन्यांनी आज ऑफिसमध्ये काहीतरी function होतं होते. ठेवणीतली साडी नेसली होती तिने. फिक्कट पिवळा रंग... जरासा फिक्कट पांढरा रंग बोललात तरी चालेल. त्याला सोनेरी रंगाची किनार होती. पिवळ्या रंगाच्या रेघांनी आणि त्यावर मध्ये मध्ये असलेल्या मोरपंखानी सजली होती साडी ती. त्यात ती साडी " दिक्षा " ने नेसली होती ना... अधिक उठावदार दिसतं होती. कदाचित तिच्यामुळेच त्या साडीला उठाव आला असावा. मेकअप चा भडकपणा तिला आधी पासूनच आवडायचा नाही. त्यामुळे साधेपणात किती सौंदर्य असते ते तिला बघूनच कळत होते. सारेच तिची स्तुती करत होते... करणारच ना... दिसतं होती तशी... 


पण तिचे लक्ष कुठे होते..... शोधत होती कोणाला तरी... बोलता बोलता ऑफिस भर फेरी झाली तिची. कोण कोण आले आहे ते बघत. जवळपास सर्वच आलेले. बाकीचे काय बोलतात हे तिला नको होते.... तिला फक्त " त्याला " कशी वाटते मी आज, हे ऐकायचे होते.... " त्याची " comment पाहिजे होती तिला. काही ५ -६ जण सोडले तर... बाकी सर्वच नटून आलेले. मुलांनी सदरा, कुर्ता ... जे शोभेल ते परिधान केलेलं. मुलींनी तर साडीलाच पसंती दिली होती. व्वा !! सगळेच छान दिसतं आहेत.. दिक्षाची अजून एक प्रदक्षिणा झाली... पण "तो " कुठे दिसला नाही तिला. ज्यासाठी एवढं सकाळपासून तयारी केली... तो तर दिसतच नाही. आलाच नाही का... ?? येणार होता ना.... काल विचारलं असते तर त्याला... समोरून चंदन येताना दिसला.... 

" चंदन ... ऐक ना... आला नाही का तो ... " , दिक्षाच्या बोलण्यात चिंता होती. चंदनला जरासा हसायला आले. 

" तो म्हणजे कोण... " हसला चंदन. दिक्षाने त्याच्या पाठीवर चापटी मारली... 

" विनय ... विनय नाही आला का... असं विचारते आहे मी... माहित असून सुद्धा... " , 

" काही बोलला नाही... नसेल येणारं... " चंदनच्या या वाक्यावर तिची घालमेल वाढली. चुळबुळ करू लागली. चंदनाला पुन्हा हसू आलं .. 

" किती वाट बघत आहेत माणसं .. कोणाची तरी... " ,

" गप्प रे... सगळा मूड ऑफ झाला.." ,

" अगं ... मग कॉल कर ना त्याला... नंबर तर असेल ना... त्याचा... " , 

" त्याने दिला होता .... मीच save करून घेतला नाही... काय करू... तू करतोस का कॉल.... बोलावं ना त्याला.. " दिक्षाचे डोळे भरत आले होते... 

" रडू नकोस ग... नाहीतर मेकअप खराब होईल.... येतो आहे विनय ... मस्करी केली तुझी... " चंदन जोरात हसला. दिक्षाने पुन्हा त्याच्या पाठीवर चापटी मारली. आणि हसू लागली. 

" तुझ्या डोळ्यात दिसते हा सगळं .. " चंदन बोलून गेला. 


विनय आलंच शेवटी ... आल्या आल्या कामाला सुरुवात केली. तरी आधीच बरीचशी तयारी झालेली, त्यामुळे त्याला जास्त काही करावं लागलं नाही. बाकी सर्व आलेत का ते पाहू लागला. पण मुली सोडतात का त्याला. फोटो... सेल्फी सुरु झालं त्याच्यासोबत. 


किती आखडतो आहे आज.... १०-१५ मिनिटे झाली याला येऊन.... एकदाही बघितलं नाही माझ्याकडे याने.... दिक्षा एका कोपऱ्यात उभी राहून विनयकडे कधीची बघत होती. विनय सोबत बाकीच्या मुली फोटो काढत होत्या ना.... त्याला कोणी सोडतच नव्हते.... लाडका झाला होता ना सर्वांचा आता... त्याने सुद्धा छान कुर्ता घातला होता आज. " हिरो , handsome ... " हि विशेषणे जरी त्याला लागू होतं नसेल तरी तो होता तसाच... सगळ्यांची मने जिंकली होती त्याने. 


दिक्षा तशीच उभी अजून. " जळण्याचा वास येतो आहे का तुला.... " चंदन दिक्षा जवळ येतं म्हणाला. 

" नाही... " तिने अगदी सहज उत्तर दिलं... 

" नक्की ना वास येतं नाही.. " चंदनने पुन्हा विचारलं. तेव्हा तिला कळलं... 

" नालायका... गप्प ना... मी का जळू... " ,

" नाही... कोणाचा हक्क फोटो काढायचा.... आणि कोण काढते आहे... " चंदन हसला परत. 

" जातोस का आता ... कि मारू ... " दिक्षाने हात उगारला मारायला त्याला. तसा तो पुढे पळून गेला. जाताना मात्र त्याने विनयच्या कानात काही सांगितलं. 


विनय इथे- तिथे बघू लागला. एका कोपऱ्यात त्याला दिक्षा उभी दिसली. आणि.... आणि बघतच राहिला तिच्याकडे.... किती सुंदर !! डोळ्याचे पारणे फिटले. त्या फोटोत त्याला रस नव्हता आता. तिथे उभा असला तरी त्याचे लक्ष फक्त दीक्षाकडे होते. दिक्षाला सुद्धा कळलं ते. तशी ती तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून गेली. विनय सुद्धा तिच्या मागोमाग... गाठलं त्याने दिक्षाला. 

" Hi .... " विनयने थांबवल तिला. " येणार नव्हतीस ना आज ... काल तर बोलली होतीस तस.. " .

" जाऊ का परत मग... घर तसं जवळच आहे माझं... " ,

" तस नाही ... but thanks ... आलीस म्हणून... " ,

" हम्म... झाले का फोटो काढून.. आज काय तुला खूप demand आहे... " , विनय हसला त्यावर. 

" नको काढू का फोटो... त्याच बोलतात फोटो काढू... तू बोलतेस तर नाही काढत... " विनयच्या या वाक्यावर दिक्षा बघू लागली त्याकडे. 


" कधी पासून ऐकतोस माझं... " ,

" हेच तर... तुला कधी समजत नाही हे.. किती गोष्टीत बदल केला आहे मी तुझ्यासाठी... कधी कळणार तुला.. " ,

" का बदलतो आहेस स्वतःला... आणि आधी का नाही सांगितलं... " ,

" या गोष्टी सांगायच्या नसतात मॅडम....समजून घेयाच्या असतात मनातून.. " हे दोघे बोलत होते तर दिक्षाला घेऊन गेल्या तिच्या मैत्रिणी फोटो साठी. विनयने दुरुनच बघत होता. खरच आज किती छान दिसते आहे ना दिक्षा... काही आले होते त्याच्या मनात.. बोलणार तर कसं तिला.... सगळ्या मुली एकत्र उभ्या होत्या... काही सोडले तर सगळेच होते तिथे.. किती उठून दिसते ना या सगळ्यात दिक्षा... उन्हात सुद्धा चांदणे दिसावे असे... सोनेरी झळाळी आली आहे तिच्या चेहऱ्यावर... गालावरती गुलाबी लाली दिसते आहे... किती खुश आहे ना... काय comment देऊ हिला.. 


काही वेळाने सगळे पांगले. छान झाला कार्यक्रम. विनय अजूनही दिक्षाला बघत होता. जास्त बोलणे झालेच नाही.. काही विचार करून विनय तिच्या जवळ आला. 

" थोडे चालूया का एकत्र ... " ,

" कुठे ? " ,

" असच ... खाली.... पार्किंग मध्ये.. ये खाली ... मी वाट बघतो " विनय आला सुद्धा खाली. दिक्षाला गंमत वाटली. खाली आली तेव्हा विनय होता वाट बघत तिची. ती आली तस त्याने त्याचे कपडे ठीकठाक केले. दिक्षा हसली... 

" तू हसू नकोस ग.... कसली भारी smile आहे तुझी... " विनय पट्कन बोलून गेला. 

" हो का... मग बाकीच्या मुलीची तारीफ करून झाली.... मला काहीच बोलला नाहीस... " ,

" काय बोलू सांग... काहीच सुचत नाही तू समोर आलीस कि... आणि तुला माहित आहे मी काय बोलणार ते... " ,

" तरी बोल ... मला ऐकायचे आहे... " , 

" ठीक आहे... ऐक... रातराणी सारखी दिसते आहेस आज... सगळ्यात वेगळी... रातराणी कशी नाजूक असते.. तरी स्वतःचे अस्तित्व दाखवून देते ती... तशी वाटते आहेस... किंवा एखादी गजल... सुंदर अशी... सारखी सारखी मनात गुणगुणावी अशी... खरं सांगू का... जमलं असतं ना... तर मिठीच मारली असती तुला... आणि सोडलं नसतं... " , 

"बापरे !! " दिक्षाला हसू आलं... 

" फोटो काढूया ना.. " विनयने विचारलं... 

" चालेल.. " ... तिच्या मनातलं पूर्ण झालेलं... 

" चल निघूया.. वर वाट बघत असतील ना... " दिक्षा बोलली... 

" थांब जरा... " विनयने थांबवलं.. " एक मनात होते... तुझ्या गालाला स्पर्श करायचा आहे मला... " ,

" का रे ... " ,

" स्वप्न !! ... किती मऊ असतील ना ते... please ... एकदाच... " , " हम्म .. " दिक्षा समोर उभी राहिली पुन्हा त्याच्या... हळूच त्याने तिच्या गालाला स्पर्श केला.तेव्हा एक थंड हवेचा झोत या दोघांकडे झेपावला . दिक्षाचं शहारून गेली. विनय सुद्धा तसाच तिच्याकडे पाहत... लाजली दिक्षा... तशीच पळत पळत ती वर ऑफिसमध्ये आली. हसत हसत.... 


विनय वरती येतंच होता. तेव्हढयात अनुजाचा फोन आला. " कुठे आहेस ? " ," मी खाली आहे.. येतोच आहे वर.. ", " wait !! मी येते खाली.. थांब... " तिने फोन कट्ट केला. अरेच्या !! तिच्याकडे लक्षच नाही आज. सारखा दिक्षाकडेच बघतो आहे. हिला राग तर आला नसेल ना... विचार सुरु होते आणि अनुजा आली. डोळे दिपून गेले पुन्हा... तिनेही साडीच नेसली होती. जराशी हिरवी छटा.. त्यात गुलाबी रंग मिसळलेला... कडेला सोनेरी रंगाचे आवरण... पाठीवर एक मण्यांची माळ रेंगाळत होती. त्यात दिसायला आधीच सुंदर .. मग काय ... भान हरपून जावे असे ते रूप.. तरीच सगळे वेडे होतात , हिच्यासाठी. विनय ती जवळ येईपर्यंत तिच्याकडे पाहत होता. 


अनुजा जवळ आली आणि टिचकी वाजवली त्याच्या डोळ्यासमोर. " हं .. हा ..... सॉरी सॉरी... " विनय गडबडला. 

" काही काम होते का तुझे ... थांबायला सांगितलंस खालीच ... " ,

" असंच .. वर कंटाळा आला म्हणून आले खाली... कॉफी घेऊया का... जरा थकल्या सारखं वाटते.. सकाळपासून धावपळ सुरु आहे ना .. ",

" चालेल ना ... मी नेहमीच तयार असतो .. तिथे जाऊया... पलीकडे ... मी तिथेच जातो कधी वाटलं तर.. " नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये घेऊन आला तिला. 


" हा .... हा टेबल ... तू इथे बस ... मी इथे.. " विनयने त्याची नेहमीची जागा पकडली. 

" इथे का .. आतमध्ये बसू ना.. बाहेर का ... " अनुजा खुर्चीवर बसत म्हणाली. 

" इथून ना .... माझी रातराणी दिसते... ती बघ .... " विनयने अनुजाला बसल्याजागी रातराणी दाखवली. 

" आता हिवाळा आहे ना .. फुलते ती याच काळात .. रात्रीचे सौंदर्य बघावे तिचे.. तू जशी आहेस ना.. तशीच फुलते ती... " विनय पटकन बोलून गेला. अनुजा हसली त्यावर. 

" कवी शोभतोस हा... तुला कस जमते रे ... असं काही काव्यात्मक बोलायला. कधीपासून करतोस कविता ... छानच असतात.. " अनुजाने कॉफीचा कप हातात घेतला. " आणि हो .... thanks !! " अनुजा बोलली. 

" का ... " ,

" तुझ्यामुळे .. माझी जुनी मैत्रीण पुन्हा भेटली मला.... दिक्षा.... तिच्याशिवाय , इतके दिवस कशी राहिली .. नाही कळणार तुला... तिला खूप मिस केलं मी. पुन्हा कधीच बोलणे होणार नाही असच वाटायचे मला ... पण तुझ्यामुळे पुन्हा जवळ आलो आम्ही... " ,

" आणि मित्र .... ? " ,

" ते तर आहेतच.. चंदन , हेमंत , अवि ... सारेच नव्याने भेटले...हे सण, सेलेब्रेशन ... येतंच राहतील. पण life मध्ये असे मित्र पुन्हा भेटत नाहीत... so , खूप खूप थँक्स... आणि तू सुद्धा भेटलास मला ... देवाचे खूप खूप आभार ... " अनुजा बोलत होती. आणि विनयने हात जोडून वर आभाळाकडे पाहत नमस्कार केला. 


" किती आगाऊ... हे काय, नमस्कार वगैरे... " इतक्यात तिचा फोन वाजला. " हो .. हो .... आलेच.. " कॉल कट्ट केला तिने.. " चल .... अविने बोलावलं आहे आपल्याला.. ग्रुप फोटो साठी... " ,

" किती फोटो काढतात ना पोरी ... " , 

" हो का ... चल गुपचूप.. " अनुजा त्याला ओढतच घेऊन आली. फोटोग्राफी सुरू झालेली आधीच. सर्व ग्रुपचे फोटो झाले. शेवटी, या ५ जणांच्या टीम चा फोटो काढायचा क्षण आला. अचानक हेमंत ला काही आठवलं. 

" विनय ... ये रे तुहि.... " ,

" मी कुठे ... तुमची टीम आहे ना.. " तरी हेमंत विनयला घेऊनच आला. 

" चल रे ... तुझ्याशिवाय का हे सगळं " विनय तयार झाला फोटो साठी. पण कोणाशेजारी उभे राहायचे हा प्रश्न... " एक काम करूया ... " विनय या सर्वांच्या समोरच गुडघ्यावर बसला. " मी पण येईन फोटोत आता... आणि तुमची friendship सुद्धा ... " सगळेच हसले ... छान फोटो आला. 


=======================================================



चंदन तोच फोटो बघत होता. गेल्यावर्षीचा movie ... डोळ्यासमोरून गेला. रिपोर्ट तर मिळालेले होतेच. विनय शांत झोपला होता. कदाचित , औषधांमुळे झोप आली असावी. निघूया आपणही.. अरे हो ... त्याने रातराणीच्या फोटो मागितला होता... कशी दिसते आता त्यासाठी... आता तर किती बहर येतो रातराणीला... पण बघायला तिचा मालकच नाही .. " बरा हो रे लवकर ... विन्या... सगळे तुझीच वाट बघत आहेत... " चंदन मनात बोलला आणि निघाला. 


=========================================================


दिवस पुढे जात होते. ऑफिसमधले वातावरण आनंदी , खेळकर .. त्याचा परिणाम कामावर सुद्धा झाला. सगळ्यांचे परफॉर्मन्स सुधारले. त्यामुळे मोठे सर सुद्धा खुश. दर शुक्रवारी .. काही कार्यक्रम ठरलेला. त्यात विनयचा सहभाग महत्वाचा. सगळयांच्या गळ्यातील ताईत झालेला तो. पण specially , दिक्षाला आवडू लागला होता तो. अनुजा सुद्धा त्याला जवळचा मित्र मानू लागली होती. परंतु , दिक्षा-विनय मध्ये काही सुरु आहे, हे अवि, चंदन , हेमंत.. या तिघांनाही समजलं होते. एकदा अविनेच त्याला कोपऱ्यात घेतलं. 


" काय सायबा.. वहिनी कश्या आहेत... " अविच्या या प्रश्नावर विनय चपापला. 

" कोण वाहिनी ? " ,

" होय तर ... जसं काय मी कालच गावावरून आलो.... कोण वहिनी म्हणे.. दिक्षा बद्दल बोलतो आहे. " अवि म्हणाला. 

" चल रे ... काही काय... फक्त मित्र आहोत... " ,

" दिसते ते ..... 'फक्त मित्र ' आहात ते.... " ,

" तस तर अनुजा सोबत जात असतो वरचेवर... कॉफी साठी... कधी कधी घरी सोडतो तिला... त्याचे काय... " ,


" अनुजा मैत्रीण वाटते.. पण दिक्षा सोबत असली कि तुझा चेहरा खुलतो. ते एकदा आरश्यामध्ये बघ... असो, छान आहे दिक्षा... शोभून दिसते तुला.... विचारून टाक.. " विनयचा चेहरा गुलाबी झाला त्यावर. 


हेमंत सुद्धा आलेला , तोही सामील झाला. " खरंच विचार तिला.. .... छान वाटता तुम्ही दोघे... आणि थँक्स.. हे सर्व बदललं तू... खूप छान वाटतात हे बदल. बघ , मीच किती बदललो आहे ते. मूडपण किती छान असतो आता. स्वतःकडे लक्ष देतो सध्या. प्रत्येकाशी हसून बोलतो. त्यामुळे पूर्ण दिवस छान जातो माझा. सगळं तुझ्यामुळे... किती केलंस तू आमच्यासाठी, जीवनच बदलून टाकलं तू... " हेमंत आणि अविने त्याला मिठी मारली. 


असा कौतुक सोहळा सुरु होता. विनय हसतच जागेवर येऊन बसला. " काय साहेब ..... काय मग ... आजकाल जास्तच खुश असता ... दिक्षा ' हो ' बोलली वाटते.. " ,

" गप रे .... तू पण झालास सुरु... मित्र आहोत आम्ही फक्त... " विनयने चिमटा काढला चंदनला. दोघेही जोरात हसू लागले. पण हसता हसता जोराचा ठसका लागला विनयला. 

" पाणी .... पाणी घे ... " चंदनने विनयला पाणी दिले... " Are you fine ... ? " ....चंदन.. 

" हो ... हो ... बरा आहे.. " विनय सावरला जरा. 

" नक्की बरा आहेस ना ... " चंदनने पुन्हा विचारलं. 

" हो ... " ,

" तुला वाटतं असेल ... लोकांना काही कळत नाही. बाकीच्यांना समजत नसेल ... पण माझं लक्ष आहे तुझ्याकडे.. " चंदन बोलला तसा विनय बघू लागला त्याच्याकडे.. 

" काय .... बोलतो ..... आहेस .... नक्की ...." ,

" हेच ... आजकाल , जरा लवकर दमतोस तू... पहिला कसा, एकदम फिट वाटायचा तू ... आता नाही. " चंदन ... 

"असं काही नाही उगाचच वाटते तुला... कदाचित , पूर्ण झोप येत नाही म्हणून असेल तसं... तुला बोललो होतो ना ... ते स्वप्न.... समुद्र.... शुभ्र वाळू .... रातराणीचे झाड... ते स्वप्न पडलं कि झोपच येत नाही बघ ... त्यामुळे असेल हे ... ", 

" उगाचच कस.. आणि अपूर्ण झोप.... नी.... दम लागणे , यात काय संबंध.. सकाळी bike ने येतोस. आपल्या ऑफिस मध्ये लिफ्ट ने येतोस... तरी इथे बसल्या बसल्या जोराने श्वास घेत असतोस ... रोज कसल्या medicine खात असतोस.. जसा दम लागलेला असतो कि किती चालून आलास. आता मला खोटे पाडू नकोस ... मला रोज दिसते ते... " ,

" खरच काही नाही भावा ... trust me ... बरं , तू माझी रातराणी बघितली का... कसली फुललेली असते ... solid feeling येते बघताना... " विनयने विषय बदलला. तरी चंदनला काळजी होती. 


तिथे , दिक्षाला विनय खरंच आवडू लागला होता. त्याच्याच विचारात असायची सध्या. अशीच एक दिवस ऑफिसमधून घरी निघालेली. तर तीच लक्ष रातराणीकडे गेलं. विनयची रातराणी ना .... कशी बहरली आहे.. दिक्षा तिच्याजवळ आली. गोंजारू लागली तिला. 


" कसा आहे ग विनय.... माझ्यापेक्षा जास्त ओळखतेस ना त्याला. ये ..... तो जादूगार आहे का ... जादूच करतो साऱ्यांवर ... मला बघ किती बदलून टाकलं त्याने.. आधी खुश असायचे ... आता जास्त आनंदी असते... किती हसत असते सध्या. सगळं कसं छान वाटते , तो सोबत असला कि. तो नेहमीच सोबत असावा असं वाटतं राहते मला. आधी, पांढरा .. निळा .. हेच रंग माहित होते. आता सगळेच रंग माझेच वाटतात.. एक-दोन फुले सोडली तर बाकी नाही आवडायची... आता सारीच फुले मला रोज जवळ असावी असे वाटते. आधी , प्रेमावर विश्वास नव्हता...पण आता विनयने प्रेम करायाला शिकवले मला.. थँक्स .... तुझ्यामुळे विनयला भेटू शकले. .. " दिक्षा इतका वेळ रातराणीशी गप्पा मारत होती. 


" ओ मॅडम ... " मागून अनुजाने आवाज दिला तशी दिक्षा भानावर आली. " कोणाशी बोलते आहेस ... वेडबिड लागलं आहे का ... " अनुजा scooty सुरु करत म्हणाली. दिक्षा हसली फक्त त्यावर. अनुजाच्या मागे बसली दिक्षा. तरी अजूनही विनयच्या विचारात. अनुजाचे सुद्धा काही वेगळे नव्हते. तिलाही विनय खूप जवळचा वाटू लागला होता. तिने पुन्हा कविता करायला सुरुवात केली होती. कधी कधी तिचा गाण्यांचा कार्यक्रम, विनय सोबत ठरलेला असायचा ऑफिसमध्ये. त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती. दिक्षा , अनुजाची मैत्री तर होतीच पण त्यात आता विनय सुद्धा आलेला होता. हे सारेच आता एकत्र जेवायला बसायचे. कधी कधी फिरायला जायचे. ते चार , चंदन आणि सोबतीला विनय. त्यातल्या त्यात , दिक्षा - विनयचे छान सुरु जुळले होते. शिवाय पावसाळा जवळ आलेला. दिक्षाला खूप आवडायचा पाऊस. 


=====================================================


पावसाचा पहिला दिवस आणि त्यात दिवस भर मिटिंग. बाहेर पावसाळी वातावरण होते तरी पाऊस पडला नव्हता. दिक्षाचा मूड सकाळ पासूनच रोमँटिक होता. त्यात पहिला पाऊस...पहिलं प्रेम ... आणि मिटिंग मध्ये विनय सुद्धा होताच कि... 


" propose तरी करणार आहेस का कधी " , दिक्षा विनयकडे पाहत मनातल्या मनात बोलली. त्याच क्षणाला विनयने चमकून दिक्षाकडे पाहिलं. बापरे !! याला ऐकायला गेले कि काय ... सहज तिच्या मनात विचार आला. हट्ट !! असं असते का कुठे, त्याला कस जाईल ऐकायला ..... येडू कुठली... दिक्षा स्वतःशीच हसली. एका मोठ्या मीटिंग रूम मध्ये, या दोघांसोबत आणखी खूप जण होते. कसलेसे presentation होते. दिक्षा एका कोपऱ्यात तर विनय दुसऱ्या. कधीपासून एकमेकांना चोरून बघणे सुरु होते. फोनवर तर कसा चटपट बोलतो, चॅटिंग वर मेसेज किती पटापट type करतो... मग समोर आली कि काय होते हल्ली याला कळत नाही. एक -दोन शब्द सोडले कि "ततपप " सुरु होते साहेबांचे. 


विनय सुद्धा मधेच एक चोरटा कटाक्ष टाकत होता. " काय सुरु आहे नक्की मनात माझ्या, काहीच उमगत नाही. बघूया का तिच्याकडे पुन्हा... नको ... आताच तर बघितले ना... पण ... माझ्या कडे बघत असेल का ती.. " त्याने पुन्हा तिरक्या नजरेने पाहिलं. शेवटी झालीच नजरानजर. मग काय, उगाचच इथे-तिथे पाहू लागला विनय. दिक्षाच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच " सुंदर smile " आली. मिटिंग मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक झाला. सगळे बाहेर आले आणि हातात चहाचे कप घेऊन गप्पा मारत उभे राहिले. विनयने एक कोपरा पकडला, हातात चहाचा कप... दिक्षा बरोबर समोर तरी दुसऱ्या टोकाला तिच्या मैत्रिणी सोबत. आता इतक्या दुरून कसे बोलणार, तरी एक साधन होते ना... डोळे... मग काय, नजरेची भाषा सुरु झाली. 


" चहा घेणार का माझ्यासोबत ? " विनयने नजरेने विचारलं आणि हातातला कप जरा वर करून दाखवला. 

" हो ... चालेल ना " दिक्षाने सुद्धा तसेच केले. 

" काही बोलायचे आहे का तुला.. " विनयने पहिला प्रश्न केला.

" तुला वाटते का काही असं .. " दिक्षाचा डोळ्यांनीच रिप्लाय. 

" हो... म्हणून तर विचारलं ",

" काही नाही... सहजच " ,

" पण मी काही ऐकलं मघाशी .. " विनयच्या त्या नजरेच्या वाक्यावर दिक्षा चहाचा घोट घेत घेत थांबली. 

" खरंच ऐकलं तू ? " ,

" हो तर .. " हसला विनय.  

" चल झूठा ... काहीच ऐकल नाही तू.. " दिक्षाही हसू लागली. 

" बोल आणखी काही.. मनातलं " विनय पुढे "बोलला ". 

" तुझ्यावर कोणाचा हक्क आहे का... नाहीतर मीच हक्क मागितला असता तुझा. तू आल्यापासून खूप आनंदी राहायला लागली आहे, अशी नव्हती कधी पहिली मी. तो आनंद हवाहवासा वाटतो. म्हणून तुला माझ्याकडेच ठेवलं असत कायमचं. आता तुझेच विचार असतात डोळ्यात, नजरेत.. आधी प्रेमावर विश्वास नव्हता... आता वाटते प्रेमात पडावं कोणाच्या तरी.. " दिक्षाच्या नजरेतून खूप काही कळलं. 

" मग ... कोणाच्या प्रेमात पडणार आहेस " विनय चहाचा घोट घेत म्हणाला. 

" तू कधी propose करणार आहेस.. " दिक्षाच्या या वाक्यावर विनय हातातली चहा सोडून तिच्याकडेच पाहू लागला.  


============================================================


मिटिंगमध्ये अनुजा नव्हती. ती घरी होती. तिची तब्येत ठीक नव्हती. तरी तिला मिटिंगमधली सगळी माहिती मिळत होती. मिटिंग संपली. सगळे निघाले घरी. विनय - दिक्षा शेवटी निघाले. गप्पा मारत मारत खाली आले. आणि अचानक पाऊस सुरु झाला. पहिला पाऊस... जणू काही यांचीच वाट बघत असावा तो.. विनयला तसा आवडायचा नाही पाऊस... कवी असून सुद्धा. पण दिक्षा .. ती तर कधी पासून वाट बघत होती पावसाची. मातीचा सुंगंध आला... सोबत विनय... जवळचे सामान तिने एका कोपऱ्यात ठेवले आणि गेली भिजायला. नाचत होती ती पावसात. प्रेम सुद्धा नवीनच होते ना तिचे. आनंद झालेला. विनय तिला तसं काही करताना पहिल्यांदा बघत होता. त्यालाही छान वाटलं, अशातच त्यालाही वाटलं ... जाऊया पावसात .. तिच्या सोबतीला.... तो पुढे जाणार , आणि त्याचा मोबाईल वाजला. अनुजाचा कॉल होता. 


" हॅलो विनय... " ,

" हो... गं .... मीच आहे .... मला कॉल केला तर मीच असणार ना ... " ,

" आगाऊ ..... ते सोड.. बघ किती छान पाऊस पडतो आहे... मला पण एका कविता सुचली... म्हणून लगेच तुला कॉल केला... बोलू का पट्कन , विसरून जाईन नाहीतर... " ,

" बोल बोल .... मी ऐकतो.. " विनय शांतपणे ऐकू लागला. 


" बघ ना आज परत अवेळी पाऊस पडतोय

मी खिडकीजवळ उभं राहून बघतेय

ते पावसाचे थेंब,तो पावसाचा आवाज

आणि पुन्हा तुझ्या आठवणी;न संपणाऱ्या


पाऊस मला आवडतच नव्हता कधी 

पण पहिल्यांदा झालेली आपली ती भेट

तो कोसळणारा पाऊस पाहून वाटत होत

किती आतुर होता तो धरतीला भेटायला


सगळं अजून तसंच आहे डोळ्यासमोर

तुझ्यामुळेच तर पाऊस आवडायला लागला 

तुझं आयुष्यात येणं पण पावसासारखंच होत

आयुष्याच्या वाळवंटाच हिरवं रान केलंस


खूप साऱ्या आठवणींची शिदोरी दिलीस 

प्रेमाची नवी परिभाषा शिकवलीस मला

आता आयुष्यात काहीच नसलं तरी पुरेल

इतकं प्रेम भरलय मनात;तुझ्या येण्यानं


हा पाऊस ना आपल्यातला दुवा झालाय आता

तुझं माझ्या सोबत असण्याचा पुरावा आहे तो

अतृप्त धरणीला स्वतःच्या प्रत्येक थेंबाने

तृप्त करणारा ,बेभान असा पाऊस....."


संध्याकाळ होतं होती. त्यात थोडी कुंद हवा.... थोडीशी थंड हवा... त्या हवेत पावसाचा ओलसर पणा भरलेला. विनयच्या कानात अनुजाची कविता आणि समोर स्वतःला विसरून भिजणारी दिक्षा... विनयच्या मनात कससं झालं. शहारून गेला तो. 


=====================================================


चंदनचे observation बरोबर होते. विनय हल्ली जरा उशिरानेच यायचा. आजारी वाटायचा. तो फरक अविला सुद्धा जाणवला. एक दिवस, विनयच्या बॅग मधून एक कागदाचे पाकीट खाली पडलं. चंदनने खूप वेळाने ते बघितलं. तोपर्यंत विनय निघून गेलेला घरी. चंदनने ते स्वतः जवळच ठेवलं. तरी कुतूहलाने त्याने ते पुन्हा बघितलं. हॉस्पिटलचे रिपोर्ट !!! विनय कशाला जातो हॉस्पिटल मध्ये... हेमंतला सुद्धा तो हॉस्पिटल मधेच भेटतो वरचेवर.... काय भानगड आहे नक्की.... त्याने ते पाकीट उघडलं आणि त्यातले रिपोर्ट वाचले. जरा confused झाला. कारण एक नावं त्याने पहिल्यांदा वाचले होते. काहीच कळलं नाही त्याला. म्हणून ते त्याने गूगल वर search केलं. घाम फुटला त्याला. tension मध्ये आला. पुढच्या दिवशी, त्याला विचारू... काय आहे हे.. असं ठरवून चंदन घरी निघाला. 


पुढच्या दिवशी , विनय आला तसा चंदन त्याला मिटिंग रूम मध्ये घेऊन आला. 

" काय झालं चंदन .... आणि असा का वागतोस.... " विनय घाबरला. 

" तू आधी आत चल.. बाहेर तमाशा नाही करायचा. " चंदनने दरवाजा लावून घेतला. 

" हे काय आहे विनय .... " चंदनने तेच रिपोर्ट विनयसमोर धरले. विनयला काय बोलावे ते कळेना. 

" तू आजारी आहेस आणि तो रोग एव्हडा भयानक आहे... सांगावे वाटलं नाही कधी... काय नावं त्याचे... हा... cystic fibrosis... बोल ... का सांगितलं नाहीस .. आहे ना खरं... बोल बोल... " विनयने शांतपणे ऐकून घेतलं. बसला खाली खुर्चीवर. 


" होय ... मला आहे... श्वास घेताना त्रास होतो त्याने.... आणि आणखी काही प्रॉब्लेम होतात शारीरिक... त्याचीच treatment घेण्यासाठी मुंबईत आलो. " विनय सांगत होता. 

" का सांगितल नाही कोणाला... तुला त्रास होतो ते ... " चंदनचा गळा दाटून आलेला. 

" हो ... त्रास होतो, पण सगळ्यांना सांगून तरी काय फायदा होणार होता.... फक्त सहानुभूती तेवढी मिळाली असती.. ते नको होते मला... जाऊ दे.... तुला कळलं ना ... बाकी कोणाला सांगू नकोस.. सगळे कसे छान हसत आहात ना.. नको दुःखी करू कोणाला... तसही मी आता सोडतो आहे ऑफिस ... जमत नाही प्रवास आता... " ,

" आणि दिक्षा ... अनुजाला काय सांगू.... " ,

" काहीही सांग ... " विनय उठला , ते रिपोर्ट्स घेतले आणि निघून गेला. चंदन तसाच राहिला बसून. 


विनय दुपार पर्यंत गप्पच होता. कामातच लक्ष. चंदनशी एका शब्दाने काही बोलला नाही. दुपार झाली तसा निघून गेला घरी. फक्त विनयला निघताना तेवढं सांगून गेला. बाकी कोणाला नाही. चंदनला सुद्धा करमत नव्हतं. मनात घाबरलेला सुद्धा. त्यात बाहेर पावसाने सुरुवात केलेली. ढगाळलेले वातावरण. जोराचा वारा. चंदन चहाचा कप घेऊन ऑफिसमधल्या एका खिडकी पाशी उभा राहून बाहेरचा पाऊस बघत होता. मनात विचारांचे काहूर माजलेले.  


" Hi ... " मागून आवाज आला. अनुजा होती मागे. 

" Hi ... " चंदनने उसनी smile आणली चेहऱ्यावर. 

" मस्त पाऊस आहे ना.. त्यात हा गरमा गरम चहा... मस्त वाटते ना... " ,

" हम्म " चंदन त्याच्याच विचारात. 

" कसा अचानक येतो ना हा पाऊस... मन कस प्रसन्न करतो. विनय सुद्धा असाच आला ना आपल्या life मध्ये. बघ ना.. बघता बघता सगळं बदलून टाकलं त्याने.... " अनुजा मनापासून बोलत होती. चंदन फक्त ऐकत होता ते. 

" किती आगाऊ वागतो ना कधी कधी.... मस्ती करतो.... चिडवतो... रागावली कि लगेच हसवतो. कसली तरी विचित्र स्वप्न पडतात त्याला समुद्र , रातराणीचे झाडं... पांढरी वाळू .. सगळं कस विचित्र.... तोही जरा विचित्र आहे तरी आवडतो... मस्त वाटते त्याच्या सोबत.... नेहमीच त्याची सोबत आवडते, पण आता वाटते कि... त्यालाही मी आवडू लागले आहे... मला सुद्धा आवडू लागला आहे तो... कदाचित.... सांगू का त्याला... " चंदनने ते ऐकलं आणि मोठ्याने वीज चमकली. 

" सांग ना... चंदन... सांगू का त्याला... तो मला आवडतो ते ... " अनुजाच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. चंदनला काय बोलावे तेच कळत नव्हतं. काहीतरी बोलावं ... म्हणून बोलणार इतक्यात अनुजाला कॉल आला. तशी ती निघून गेली. बाहेर तुफान पाऊस..... काय बोलावं. आधी दिक्षा आणि आता हि अनुजा... विनयला काय झालं आहे नक्की ... ते सुद्धा माहित नाही. कोणाला काय बोलू... चंदन तसाच उभा विचार करत.


आणखी २ आठवडे गेले. विनयच्या सुट्ट्या वाढल्या होत्या. आला कि नेहमी सारखा वागत असे... दिक्षा , अनुजा सोबत तिचं मस्करी.... अवि सोबत भंकस... हेमंत सोबत गप्पा. नॉर्मल सगळं. फक्त चंदनला माहित होते, त्याच्यात काय सुरु आहे ते... पावसाने सुद्धा चांगला जोर पकडला होता या आठवड्यात. दिक्षा ,अनुजा आणखी प्रेमात विनयच्या... पण चंदन आणखी tension मध्ये असायचा.  


असाच एक दिवस... जोराचा पाऊस होता. ऑफिसमध्ये त्यावेळी फक्त चंदन आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं... अश्या पावसात विनय आलेला ऑफिस मध्ये. पण चंदनला नेहमी पेक्षा वेगळा वाटला. आला तोच खुर्चीवर बसला पट्कन. केवढा दम लागलेला त्याला. १०-१५ मिनिटे झाली तरी श्वासावर नियंत्रण आले नव्हते. काम सुरु केले विनयने त्याचे. आणखी काही मिनिटे गेली. " चंदन ... चंदन !! " विनयने चंदनला जोरात हाक मारली. जोरा -जोराने श्वास घेत होता विनय. " काय..... काय झालं विनय.... विनय... " चंदन घाबरला. काही बोलायच्या आतच विनय बसल्या जागी बेशुद्ध झाला.  


धावपळ करत चंदन आणि काही सहकाऱ्यांनी विनयला त्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. सगळे घाबरलेले.... चंदनने मोठ्या सरांना फोन लावला. बाकीच्या जमलेल्या पैकी कोणी अवि ,अनुजाला कॉल केले. पुढच्या अर्ध्या तासात बरीच गर्दी झाली. विनयला लगेच I.C.U. मध्ये घेऊन गेले. एवढी गर्दी... विनय होताच तसा लाडका सर्वांचा. तरी गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या सरांनी बाकीच्या लोकांना जायला सांगितले. 


" काय झालंय नक्की विनयला .... " अनुजा डॉक्टरला विचारत होती. 

" बेशुद्ध कसा काय झाला... काय झालं त्याला... आणि एवढ्याश्या कारणासाठी...I.C.U. मध्ये .... चंदन.... सांग... काय चाललंय ते... " दिक्षा चंदनला विचारत होती. अवि, हेमंत विनयला बाहेरूनच बघत होते. चंदनला काही सुचत नव्हतं. तोही थरथरत होता. शेवटी, तो मोठया सरांजवळ आला. 


" सर...प्लिज.. सांगा आता खरं काय ते ... मला माहित झालं होते,, तेही थोडेच.. पण आता वेळ आली आहे सांगायची... खूप जवळचा मित्र आहे ना तो... सांगा सर... " त्यांनी या सर्वाकडे पाहिलं. 

" ठीक आहे... चला त्या रूम मध्ये... तिथे विनयचे डॉक्टर सुद्धा आहेत... तेच सांगतील. "   


हे पाच जणं , सर आणि डॉक्टर असे जमले. " विनयला मी लहानपणापासून ओळखतो. त्यांचे घर माझ्या गावच्या घराशेजारी. त्याचे वडील माझे मित्र. छान , चुणचुणीत मुलगा... अभ्यासात हुशार... गाणी म्हणायची सवय तेव्हापासून. वडिलांपेक्षा आईवर जास्त जीव त्याचा..... तिच्या सोबतच सारखा... वासरू कस असते गाईला बिलगून ... अगदी तसाच. पण त्याची आई... त्याच्या लहानपणीच गेली. त्याची आई दिसायला खूप सुंदर होती. ' राणी ' नावं तिचं. आणि विनयचे वडील ... लाडाने तिला ' रातराणी ' म्हणायचे. दोघांमध्ये प्रेम सुद्धा खूप होते. लहानग्या विनयला रातराणी म्हणजे आपली आईच... हेच माहीत. तेव्हापासून आवडते त्याला रातराणी. त्याची आई गेली तेव्हा सुद्धा त्याच्या घराशेजारी रातराणीचे झाड होते.. त्यालाच बिलगून बसला होता. असा विनय... कमाल बघा ... आईवर इतकं प्रेम करणारा ..... त्याला हा आजार , त्याच्या आई कडूनच मिळला...... डॉक्टर , तुम्ही सांगता का पुढे.... " डॉक्टर तयार होते सांगायला. 


" cystic fibrosis.... हा आजार ... जो विनयला झाला आहे, भारतात जास्त आढळत नाही. आई-वडील ... दोघांनाही असला तरच मुलाला होऊ शकतो. विनयची आई त्यामुळेच गेली. आणि वडील सुद्धा. हा आजार ठीक होत नाही. परंतु, योग्य आहार, औषध घेतली तर पेशंट ५० वर्ष तरी जगतो, विनय मुंबईत आला तेव्हा already खूप उशीर झालेला. गेल्या वर्षभरात खूप try केले आम्ही. तरी.... " डॉक्टर बोलताना थांबले. 

" कसा त्रास होतो याचा... या आजाराचा... " चंदनने धीर करून विचारलं. 

" श्वसनाचा आजार आहे हा... जस वय वाढते तस शरीरभर पसरतो. धाप लागते, श्वास घेताना त्रास होतो... हे तर आहेच, पण रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. जेलीसारखं पदार्थ तयार होतात रक्तात. मग त्याचा परिणाम किडनीवर होतो, आतडयांवर होतो, शेवटी heart वर तणाव येतो... " 


" विनयचे वडील वारले तेव्हा त्यांच्या सोबत विनयचा सुद्धा उपचार सुरु होता गावात. आई-वडील शिवाय कोणी नव्हतं याचं. मलाच बघवलं नाही. त्याला जॉबची गरज होतीच... औषधांसाठी... म्हणून आपल्या ऑफिस मध्ये ठेवलं. वडील गेले , त्याच्या ३ दिवसांनी तो आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झालेला, वाटले शहरात तरी चांगले उपचार मिळतील पण मलाच उशीर झाला त्याला घेऊन यायला. " सरांच्या डोळ्यात पाणी आलं. साऱ्यांना एकप्रकारचा मानसिक धक्का बसला होता. काय झालं हे... इतके सारे आनंदाचे क्षण आणि अचानक मोठ्ठा धक्का ... कसं सावरावे यातून... 


======================================================== 


एक तो दिवस होता , आणि एक आजचा दिवस... तेव्हाही रिपोर्ट्स वाईटच होते आणि आताही. चंदनच्या डोळ्यासमोर होते सर्व. विनयच्या शेजारीच बसला होता तो. विनयला जाग आली. चंदनला पाहिलं. 

" Good morning मित्रा... " चंदनला हाक मारली त्याने. 

" दुपार झाली आहे .... morning नाही... आज खूप झोपलास असं वाटते... " चंदनने हसत विचारलं. 

" नाही रे .. रात्री ते स्वप्न पडलं तेव्हा ४ वाजले होते ... पण पहाटे ६ पर्यंत तरी जागा होतो... आताच झोप लागली पुन्हा... तेच स्वप्न का पडते कळत नाही... काय संबंध तेही कळत नाही. " त्याला चंदनच्या हातात रिपोर्ट्स दिसले. 

" अरे व्वा !! काय आहे रिपोर्ट्स मध्ये ... सांग .... " चंदनने त्याला गप्प केलं. 

" कशाला रे.... काय करायचे आहेत रिपोर्ट्स तुला... बरा आहेस तू... लवकरच घरी सोडणार आहेत तुला.. हे आहे लिहिलेलं .. झालं समाधान... " चंदन एवढं बोलून निघून गेला रागातच. 


======================================================


खरं तर हल्ली विनयची तब्येत पार ढासळली होती. त्यालाही कळत होते ते. तरी सगळेच प्रयत्न करत होते विनय चांगला , ठीकठाक व्हावा म्हणून. रोज कोण ना कोणी असायचे त्याच्या सोबत. ऑफिसमधलं काम सांभाळून जायचे त्याच्याशी गप्पा मारायला. पावसाळा संपून हिवाळा सुरु झालेला. रातराणीचे छोटे रोपटे आता मोठे झाले होते. पण विनयचं नव्हता तिला बघायला तिथे. 


अश्याच एका दिवशी, विनयची तब्येत एकदम ढासळली. डॉक्टर सुद्धा प्रयत्न करत होते तरी त्यांना कळलेलं बहुदा. हिवाळ्यातली संध्याकाळ... कातरवेळ.... बोचरी थंड हवा... तेव्हा हेमंत होता सोबतीला.... हेमंतला सुद्धा जाणीव झाली. त्याने बाकीच्यांना बोलावून घेतलं. सर्व येई पर्यंत रात्रीचे ८ वाजले. विनय या ५ जणांचीच वाट बघत होता जणू. दिक्षा , अनुजा , हेमंत , चंदन , अविनाश.. सर्व त्याला घेरून बसले होते. दिक्षा त्याचा हात हातात घेऊन बसली होती. 


" विनय ... आलो आहोत आम्ही सर्व.. अनुजा .... अवि ... चंदन ... हेमंत ... सगळे आहेत... " विनय घाबरा-घुबरा झालेला. त्याला दिक्षा धीर देत होती. 

" दिक्षा ... सोबत रहा माझ्या... बोलत रहा माझ्याशी... मला भीती वाटते आहे.... सर्व सोडून गेलात तर मला ... नाही जाणार ना... " ,

" नाही नाही ... कोणी नाही जात.... " अनुजा बोलली. 

" अव्या .... अव्या ... कुठे गेला ... " विनय त्याला शोधत होता. 

" आहे ... मी आहे इथेच .... नाही जात आहे कोणी कुठे ... मी दरवाजाच लावून घेतो .... " अविच्या डोळ्यात पाणी. 

" बोल ना माझ्याशी दिक्षा ... का बोलत नाहीस .... रागावली आहेस का .... तुझी smile खूप दिवस बघितली नाही .... हस ना एकदा ... ".... विनय 


यात कस हसणार... दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यात हसणार तरी कसं .... इतका वेळ अश्रू थांबवून ठेवले होते दिक्षाने , विनयचं बोलणं ऐकलं आणि रडू लागली ती. 


" रडू नकोस गं .... मी नाही जात आहे कुठे .. आणि तू हसताना किती छान दिसतेस .... रडू नकोस .... माहित आहे ना ..... मला किती आवडते तुझी smile ... " दिक्षा रडतच होती. 


डॉक्टरने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. दर अर्ध्या तासाने कसलेसे injection देतं होते. विनयचा त्रास कमी करण्यासाठी. पण किती प्रयत्न करणार आणखी. " आजची रात्र काढली तरी.. " डॉक्टर बोलून निघून गेले. हेमंत सुद्धा एका कोपऱ्यात उभा... विन्यासारखा मित्र कुठे भेटणार... .... काय करू मी तरी... 


" हेमंत ... !! " विनयने बोलवलं त्याला. हेमंत आला त्याच्याजवळ .... 

" गिटार वाजवतोस का ... " विनयने हळू आवाजात म्हंटल. विनय हॉस्पिटल मध्ये आल्यापासून त्याची गिटार त्याच्या बेडशेजारीच असायची. हेमंतने हातात घेतली गिटार. विनयकडूनच शिकलेला तो.. हेमंतला भरून आलं , तरी विनय साठी त्याने गिटार वाजवायला सुरु केली. विनयच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. मध्यरात्र झालेली. विनयची तब्येत आणखी खालावली. हेमंत गिटार वाजवतच होता. मधेच विनयशी गप्पा सुरू होत्या. तणावाचे वातावरण ... कोणालाच झोप नाही. 


बघता बघता पहाटेचे ५ वाजले. विनयला श्वास घेताना प्रचंड कष्ट पडत होते. " अनु.. .. जा .... अनुजा ..... !! " त्याने कसबसं तिला हाक मारली. 

" आहे मी इथेच ... बोल .... काय ... " अनुजा भरलेल्या डोळ्यांनी विनयला पाहत होती. 

" एक ....... एक ...... कवी ....... ता .... " पुढे बोलूच शकला नाही तो. अनुजाला नाही बघवल विनयला तस. हुंदके देऊन रडू लागली. तरी विनय बोलला म्हणून तिने डोळे पुसले. आणि एक कविता सुरु केली. 


" तु आहे अशी देवाची सुंदर निर्मिती...

सोबत हवीशी वाटणारी आकृती...

परिसस्पर्श आहे तुझ्या हातांचा...

साद जणू त्या निळ्या सागरी लाटांचा... 

गहरे आहेत बंध, घट्ट आहेत गाठी... 

स्वर्गातून बनलोय आपण एकमेकांसाठी... 

माझ्यासाठी आहे तु सावली... 

दिग्मुढ अनुभव प्रेमाचे आहेत पावलोपावली... 

हास्य आणि अश्रूंचा होतो कायम संगम...

जेव्हा होते तुझ्या आठवणींचे आगमन... 

शितल अशी तुझी फुंकर... 

काळोख्या वाटेचा मार्ग करतोय सुकर... 

मनाचे कारंजे होतेय माझे...

हासू पाहतो माझ्यासाठी जे तुझे... 

सीमेपलीकडचे प्रेम शिकवलेस तु मला... 

हास्याच्या सुखद अश्रूंनी... 

पाहते तुला... 

जगते तुला..."


विनय हसला त्यावर . डोळ्यातून पाणी वाहत होते त्याच्या. दिक्षाचा हात घट्ट पकडून ठेवला त्याने. वेळ जात होती तसा अधिक तळमळत होता विनय. एका क्षणाला त्याने अविला हाताने खूण करून बोलावलं. 


" बोल ... विन्या... काय पाहिजे... बोल ... काहीही माग ... आणून देतो .. " विनयच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते , फक्त ओठांची हालचाल. अविने त्याचे कान विनयच्या ओठांजवळ नेले. 


" रा ......... त ........ रा ...... णी .... " इतकंच ऐकू आलं अविला. तरी अविला कळलं ... " आलोच !!!! "


अविनाश निघाला धावतच... खाली bike होतीच त्याची. सुरु केली आणि निघाला सुसाट... रातराणीची फुले कुठे भेटणार आता, एक फुल मार्केट होते. त्याला माहीत होते. तरी एवढ्या पहाटे फुले मिळतील का तिथे... ते माहित नव्हतं त्याला. पुढच्याच १० मिनिटात तो पोहोचला. पहाटेचे ६ वाजत होते.अजूनही ते फुल मार्केट सुरु होयाचे होते. काही फुल विक्रेते होते. अविनाश शिरला आतमध्ये. जे होते त्याकडे रातराणीच्या फुलांची मागणी करू लागला. " साहेब ... तुम्हाला दिसते का इथे कुठे... शिवाय ती फुलं नसतात इथे. एवढीशी तर फुलं... वास चांगला असला तरी नाही विचारत कोणी जास्त तिला. तरी एक काम करा.. तुमचा नंबर देऊन ठेवा. नंतर कोणी आणली कि तर तुम्हाला कळवतो. " एक जण बोलला.   


" आता गरज आहे... " अविनाश रागात बोलला. आणि त्याच्या bike वर येऊन बसला. कुठे जाऊ आता.. अचानक त्याला आठवलं. ऑफिसच्या बागेत तर आहे. कसं विसरलो मी... मूर्ख.. तशीच वळवली गाडी आणि पुन्हा सुसाट निघाला. आजूबाजूच्या गाड्याची पर्वा न करता. पुढच्या १५ मिनिटांत ऑफिस बाहेर पोहोचला. गेट बंद आणि वेगळ्याच watchman ची ड्युटी. गेट उघडायला तयारच नाही. त्यात अविकडे ऑफिसचे I-card नव्हते. ते बॅगेत आणि बॅग हॉस्पिटल मध्ये. 


" उघड ना गेट साल्या... " अवि कधी पासून ओरडत होता. 

" साहेब ... शिवी देऊ नका हा... तुम्हाला आत जायचे असेल तर आधी कार्ड दाखवा. नसेल तर नाही जाऊ देणार... " अविनाशला घाई झालेली.  पण रागावून चालणार नाही... तिथे विनय वाट बघतो आहे. 


" प्लिज ... प्लिज ... यार ... तुझ्या पाया पडतो.. सोड ना आतमध्ये... १० मिनिट फक्त... " अविनाशला पुढे बोलवेना. कंठ दाटून आलेला ना. खरोखरच तो त्याच्या पाया पडत होता. 


" अहो .. साहेब.. काय हे.. पाया काय पडता.. तुमच्याकडे कार्ड नाही... मी तुम्हाला ओळखत नाही... कसा सोडू आत... माझी नोकरी जाईल ना... " त्याचे बोलणे बरोबर होते. अविनाश गुडग्यावर बसून रडू लागला. इतक्यात मागून नेहमीचा watchman आला. 


" अहो अवि साहेब... रडता का.. " ,

" तुम्ही ओळखता यांना... .." त्या नवीन watchman ने विचारलं. 

" हो.. काय झालं.. " ,

" सॉरी सॉरी ... यांना आता जायचे होते. मी ओळखत नाही ना, शिवाय यांकडे कार्ड नाही ऑफिसचे.. थांबवलं तर रडायला लागले. " त्याने लगेच गेट उघडला.  


अविनाश उभा राहिला आणि धावतच बागेत गेला. छान थंड हवा वाहत होती. त्या वाऱ्यासोबत रातराणी डोलत होती. सळसळत होती. विनयची रातराणी नुसती फुलून आलेली. कितीतरी फुले... आणि काय तो सुगंध दरवळत होता. सडा पडला होता रातराणीचा. अविने डोळे पुसले. एक एक फुल उचलून घेऊ लागला. किती घेऊ.. अविला सुचेना. ओजंळ भरली तरी. त्यात अविला विनयचे वाक्य आठवलं. " जीव आहे त्यात माझा ... " जास्त घेऊन जाऊ.. असा विचार केला आणि आजूबाजूला काही मिळते का ते बघू लागला. काहीच नाही तर अंगातले शर्ट काढला त्याने. एक प्रकारची गाठ मारली आणि पिशवी सारखं बनवलं. भरभर त्यात रातराणीची फुलं जमवू लागला. जेवढी होती तेवढी जमवली. धावतच bike जवळ आला, सुरु केली आणि भरधाव निघाला हॉस्पिटलच्या दिशेने.  


पोहोचला देखील. bike उभी न करताच , तशीच खाली टाकून धावत निघाला विनयच्या रूमकडे. हातात शर्टची पिशवी आणि त्यात रातराणीची फुलं. धावता धावता सगळीकडे सांडत जात होता. आणि रातराणीचा सुगंध दरवळत होता. विनयच्या रुमजवळ पोहोचला, एव्हाना बरीचशी फूल मागे पडली होती. जी होती ती हातात घेतली अविने आणि विनय जवळ आला. बाकीचे चेहरे पाहिले त्याने. हेमंत ,चंदन, अनुजा ... सारेच रडत होते. दिक्षा विनयच्या बेड शेजारी बसलेली आणि आता त्याशेजारी असलेल्या खिडकीतून बाहेर पाहत होती. शांत बसून होती. आणि विनय ......   


विनय शांत झोपला होता. अविनाश आला त्याच्याजवळ. डॉक्टरने थांबवलं त्याला. " नाही राहिला तुमचा मित्र ... गेला सोडून ... उशीर केलास .. " अवि थांबला तिथेच... डोळे आधीच लाल झालेले रडून ... पुन्हा पाणी आलं. डॉक्टरचा हात झटकला त्याने. 


" असा कसा जाईल... उठ रे भावा.. हे बघ ... तुझी रातराणी आणली आहे.. हे बघ... " अविनाश त्याच्या शेजारी जाऊन बसला. हातातली सगळी फुले ... रुमभर पसरली होती. 


" उठ ना रे साल्या .... किती नाटक करणार अजून.... उठ ना रे... वाजव ती गिटार ... तुझं गाणं ऐकायचे आहे मला.. उठ ना विन्या .... प्लिज ..... उठ ना रे साल्या.... प्लिज ... उठ ना ..... एकदा तरी .... " अविनाश त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागला. दिक्षा अजूनही खिडकी बाहेरच बघत होती. तिच्या त्या गोबऱ्या गालावरून अश्रू ओघळत होते आता. पूर्ण रुमभर रातराणीचा सुगंध दरवळत होता. रातराणीचा सडाच पडला होता जणू तिथे.  


==========================================================


समुद्रच्या लाटांचा धीर-गंभीर आवाज.. विनयने हळूच डोळे उघडले. समोर अथांग पसरलेला समुद्र... विनय उठून बसला. अंगावर पांढरा शुभ्र सदरा. शेजारी आणि आजूबाजूला मऊशार वाळू. विनय उभा राहिला. छान थंडगार वारा वाहत होता. चालू लागला. थोडासा चालला असेल तो... काही अंतरावर त्याला त्याचे सवंगडी दिसले.... चंदन , हेमंत , अविनाश , अनुजा आणि हो... दिक्षा... त्यांनीही पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केली होती. विनयला बघून तेही जवळ आले. निरोप घेतला सर्वानी. दिक्षा आणखी पुढे चालत आली त्याच्या सोबत. 


" निघालास ?? " दिक्षाने विचारलं. 

" हो... पण जरा उशीरच झाला निघायला.. " विनयचे लक्ष समुद्राकडे गेले. " माझा आठवणी बघ,.... कश्या तरंगत आहेत समुद्राच्या लाटांवर.. या हवेत सुद्धा माझ्या आठवणींचा गंध आहेच... विसरणार नाही ना कधी मला ... " विनयने दिक्षाला विचारलं. तिने त्याचा हात हातात घेतला. 


" कधीच नाही आणि तुला कधीही विसरू देणार नाही आठवणी तुझ्या... " विनयने दिक्षाचा निरोप घेतला.  


चालता चालता पुन्हा त्याला रातराणीचा सुगंध आला. पुन्हा तेच मोठ्ठ रातराणीचे झाडं त्याला दिसू लागले. आज ती अदृश्य भिंत नव्हती त्याला अडवायला. विनयने मागे वळून पाहिलं. हे सर्व जणं, त्याला दुरूनच पाहत होते.त्यांना बघून छान हसू आले त्याच्या चेहऱ्यावर. पुढे आला. त्या झाडाजवळ आला तो. झाडाखाली त्याला व्यक्ती दिसायची ना कोणी. जवळ जाऊन पाहिलं. त्याची आईच होती ती. खूप आनंद झाला विनयला. 

" आलास बाळा ... बस .. " आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला विनय. 

" खूप उशीर झाला ना मला आई... ते सोडतच नव्हते मला. किती प्रेम दिले सर्वांनी.. " ,

" जास्त त्रास झाला का येताना ... " ,

" हो ग आई ... त्यांना सोडून येताना जास्त वाईट वाटलं. खूप दमलो आहे आता... तुझी आठवण रोज यायची. आता नाही जाणार ना सोडून मला... " आईने मायेने हात फिरवला त्याच्या केसातून... 

" नाही जाणार कुठे आता मी... झोप शांत ... आराम कर... " विनय हसतच आईच्या मांडीवर शांत झोपी गेला.   


विनय तर कधीच गेलेला सोडून तरी त्याने लावलेली रातराणी ... आज कमालीची बहरून आलेली. कदाचित विनयचं तिच्या रूपाने तिथे आलेला होता. कितीतरी कळ्या ... पुन्हा रात्रीची वाट पाहत होत्या.... फुलायचं होते ना त्यांना.. सर्वांना मोहवून जवळ करायचे होते... पुन्हा एकदा... कदाचित सदैव.. शेवटी रातराणीच ती... फुलणार आणि प्रेमात पडणार पुन्हा ... ...  


========================= The End ======================


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance