The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

vinit Dhanawade

Inspirational

2.0  

vinit Dhanawade

Inspirational

मित्र !! my friend " (2)

मित्र !! my friend " (2)

18 mins
1.7K"हालो... सँडी बोलून राहिलो !! " पलीकडच्या फोनवरून आवाज आला. विवेक बावचळला. तसाच फोन ठेवून दिला खाली. टेलिफोन बुथ मधून बाहेर आला.प्रिया बाहेर वाट बघत होती. 

" लागला का रे फोन ?? " ,

"नक्की कोणाचा नंबर दिलास ? " विवेकने उलटा प्रश्न केला ... साताऱ्याला पोहोचल्यावर S.T. डेपो मधून केलेला फोन... नावं संदीप.. पलीकडून बोलतो कोणी सँडी... प्रियानेच नंबर दिला होता.. 

" अरे... संदीपचा नंबर आहे.. त्याच्या दुकानात आहे हा फोन... " प्रिया बोलली.

" चुकीचा नंबर लागला वाटते. ",

" नाही रे... बरोबर आहे.. तोंडपाठ आहे मला... " ,

" कोण आहे नक्की तो... इथे उतरल्या उतरल्या त्याला फोन करायला सांगितलं ते.. ",

"अरे.. संदीप... संदीप मोहिते.. " त्याचं नाव ऐकताच विवेकने कपाळावर हात मारला. हाच भेटला होता फोन करायला.. 


संदीप मोहिते... केशव , प्रिया आणि विवेक... या त्रिकोणातला मध्यबिंदू... मध्यबिंदू अश्याप्रकारे कि तिघांनाही ओळखणारा... , तिघांचा मित्र.. actually. केशव आणि संदीप हेच दोघे मित्र... त्यात प्रिया नी विवेक याची ओळख .. त्यामुळे या दोघांशी मैत्री... विवेक आणि संदीपचं एवढं "पटत " नसलं तरी तेही मित्रच.. संदीप हे एक वेगळंच रसायनं होतं. घरी श्रीमंती.. पैशाला तोटा नाही... गावात शेत-जमीन खूप... त्यातून उत्पन्न होते.. शिवाय वडिलांचा सुती कपड्यांचा "import export " चा व्यवसाय... तिथून पैसे... त्यामुळे घरी झालं तर कसलंच tension नव्हतं. या सगळ्यामुळे, संदीपचा स्वभाव देखील तसाच, tension free.. सतत भंकस... मस्करी.. वेगवेगळ्या भाषेत बोलायचा उगाच काहीतरी... तुटक-मुटक इंग्लिश बोलायचा. समोरच्याला सतत हसवत ठेवणारा .. आणि सर्वात महत्त्वाचं... बडबड्या .. हीच वायफळ बडबड विवेकला खटकायची. साधं अभ्यासात सुद्धा याला काहीच करावंसं वाटत नाही, यामुळे विवेक जरा त्याच्यापासून दूर राहायचा. पण काही ना काही होयाचे आणि संदीपची भेट रोज व्हायची... तसं सुद्धा संदीप केशवच्या सोबतच असायचा, प्रिया सोबत विवेक... मग काय ते दोघे भेटले कि सर्वांची भेट ठरलेली. 


" संदीपला फोन कशाला आता... " विवेकने त्रासिक आवाजात प्रियाला विचारलं. 

" अरे त्याला विचार ना... केशव आहे का तिथे.. ",

"अगं... पण आता आलो आहे ना ... केशवच्याच घरी जाऊया... " ,

" तुझ्या घरी जाणार नाही का तू ? एक काम करू... तू तुझ्या घरी जा... मी केशवच्या घरी जाते.. " प्रियाने युक्ती लढवली. विवेकच्या कपाळावर आट्या... " माझ्या घरचं नंतर बघू.. केशवला भेटायला जाऊ पहिलं... " प्रिया आनंदात होती. केशवचं घर तर माहितंच होतं प्रियाला. दोघे चालतच निघाले.तसं ते काही नवीन नव्हतं विवेकला.. प्रॉब्लेम होता तिथल्या लोकांचा.. विवेकला ओळखणाऱ्या लोकांची संख्या कमी नव्हती. यापैकी एकाने जरी घरी कळवले कि मी आलो आहे तर मग झालंच. म्हणून झपझप पावलं टाकत केशवच्या घरी पोहोचले.  


पोहोचले तर घराला कुलूप... दोघे चक्रावले. केशव नक्की गावातच आला ना. मग घराला टाळे कसे... शेजारी विचारले असता दोन महिण्यापुर्वीच गेले सर्व कुठेतरी.. त्यात केशव सुद्धा होता, म्हणजे केशव त्याच्या पूर्ण कुटुंबासहित गेला... आता काय करावे.. विवेक विचारात , प्रिया गांगरलेली. त्यात विवेकला ओळखणारे दोघे-तिघे भेटले... कधी आलास मुंबईहून... किती दिवस आहेस... लग्नासाठी आलास वाटते .. असे आणि अशाप्रकारचे कितीतरी प्रश्न -उत्तर त्या तेवढ्या वेळात झाली. आणखी ५ मिनिटं तरी थांबलो ना तर काही खरं नाही. 

" प्रिया बोल लवकर..... काय करूया...", 

" केशव कुठे गेला पण... " प्रिया रडवेल्या आवाजात म्हणाली.

"आता मला काय माहित... तुझ्या बरोबरच आलो ना मी पण.. " प्रिया गप्प झाली. थोड्यावेळाने बोलली.. 

" संदीपकडे जाऊया... " ,

" अरे !! तो कशाला हवा आता.. ",

" केशव आणि संदीप ... लहानपणापासून मित्र आहेत.. केशव इथे आलेला ,पण मला काही कळू न देताच निघून गेला... पण संदीपला नक्की सांगून गेला असणार काही तरी.. इकडे जवळच राहतो तो... चल ना.. प्लिज... " विवेक नाईलाजाने निघाला. 


संदीपचं घर आणि कपड्यांचे दुकान शेजारी -शेजारी होते. 

" तू मघाशी फोन लावला तर कोणी उचलला ? " प्रियाने विचारलं. 

" कोणीतरी सँडी बोलत होता.. मी लगेच ठेवून दिला फोन.. ",

"अरे.. बाळा... सँडी म्हणजे संदीप... तुला माहीत नाही का.. " 

प्रिया जोरात हसली. आता यात काय हसायचं एवढं... विवेकने दुरूनच बघितलं.. दुकान मोठ्ठ होतं ,शिवाय आजूबाजूला खूप सुधारणा झाली होती. ४ वर्षात खूप काही बदललं इथे.. विवेक आजूबाजूला बघत चालला होता.. इतक्यात त्याला " Wow !!! " अशी मोठयाने किंकाळी ऐकू आली. दचकला विवेक. समोर संदीप उभा... त्याच्या बाजूला प्रिया... नक्की कोणाला बघून ओरडला हा... असा विचार करत त्याच्या समोर आला विवेक.. 

" look at this... that is that what is about you !! " असं 'इंग्रजी' म्हणता येईल ,अश्या भाषेत संदीप ,विवेक कडे पाहत म्हणाला. 

" काय ?????? काय बोललास परत बोल.. ",

" हा.. ते नको बोलूस... मी एकदाच इंग्लिश मध्ये बोलतो.. समाजलाव काय ? " ,संदीप मिस्कील आवाजात म्हणाला. 

" तुला तरी कळते का... काय बोलतोस ते..." विवेक रागात बोलला. 

" हे... काय भांडत आहात.. एवढ्या वर्षांनी भेटत आहेत... धड नीट स्वागत तरी करा एकमेकांचे... " प्रियाला वेड लागलं आहे बहुदा... मी आलो कि संदीप आला... तो स्वागत करणार माझं.. पागल आहेत दोघे पण ...  


" माझं स्वागत वगैरे राहू दे. मला काही नको... ते जाऊ दे.. तू कशी आहेस ... गेल्या वर्षभरात आलीच नाहीस इथे... आणि हे साहेब कधी आले मुंबईहुन.... " विवेककडे पाहत संदीप प्रियाशी संवाद करत होता. 

" सगळं सांगते... पहिलं जरा पाणी दे... खूप तहान लागली आहे... ",

" तहान लागली.... आता कसली तहान लागते... तहान आमच्यावेळेला लागायची. " 

संदिप बोलला ,तसे प्रिया आणि संदीप दोघेही हसू लागले. आणि दुकानात शिरले. झालं याचं सुरु... आमच्यावेळेला... आमच्यावेळेला... जसा काय म्हातारा झाला हा... म्हणून येत नव्हतो... किती बडबड करतो, मनात बोलत विवेक दुकानात शिरला. प्रिया आधीच दुकानात फतकल मारून बसली होती. दुकान बऱ्यापैकी मोठ्ठ होतं. विवेक त्या आधी कधीच संदीपच्या दुकानात आला नव्हता. 

"या साहेब.. बसा... " दुकान न्याहाळत असताना, विवेकला बसायला सांगितले. विवेक बसला. 

" चहा घेणार ना... लगेच सांगतो... ये पोऱ्या... दोन चाय घेऊन ये पटकन... " संदीपने ऑर्डर दिली. 

" पाणी दे फक्त... चहा नको... " विवेक बोलला. 

" अरे विकत आणणार नाही... बाजूलाच घर आहे माझं.. तिथून आणायला सांगितलं... बाकी, काय काम काढलं इकडे... " प्रियाकडे मोर्चा वळवला. 

" हो.. हो, केशव आलेला का इथे... ",

" केशव ? ... का गं .. ",

"आलेला का ते सांग... " विवेक मधेच बोलला.

" हो ... आलेला... बहुदा २ महिन्यापूर्वी... घाईत होता जरा... का पण.. त्यानंतर तो आलेलाच नाही... " प्रिया घाबरून गेली. संदीपने ओळखलं. " त्याच्या घरी जाऊन येना मग... ",

" जाऊन आलो तिथून... घराला टाळे... शेजारी कोणाला माहित नाही... " विवेकने एका दमात बोलून टाकलं. 


" तो तुला शेवटचं भेटला तेव्हा काही बोलला का... " विवेकचा पुढचा प्रश्न... संदीप काही बोलणार इतक्यात, एक मुलगा पाणी घेऊन आला. पाण्याचा एक घोट घेतोच... तर माघून चहा आला... चहा घेऊन येणारी मुलगी बघून विवेकला जोराचा ठसका लागला. ती दुसरी -तिसरी कोणी नसून , विवेकची लहान बहीण होती. विवेकला बघून तीही चाट पडली. " दादा !! " ,"अनघा !! " दोघे एकमेकांना बघून चकित झाले. 

" पहिला तो चहा घ्या... नंतर काय ते dialogue बोला... समाजलाव काय !! " संदीपचे ते बोलणे ऐकून दोघे रागाने त्याच्याकडे बघू लागले. 

" दादा ... तू कधी आलास इथे.. सांगितलं पण नाहीस येतो आहेस ते... " अनघा आनंदात बोलली. 

" ते मरु दे... तू काय करतेस इथे... " विवेक.. 

" जॉबला आहे मी इथे... तुला फोनवर तर बोलली होती ना... ",

" काय !! ...चहा वाटायचा जॉब आहे का... " विवेक रागामध्ये बोलला. 

" excuse me... she have.. accountant...... in the shop is the " संदीप "इंग्लिश "मध्ये बोलला. विवेकच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.. 

" मग याच्या घरी चहा पण करतेस का.. ? ",

" थांब दादा... बस खाली... मी पाणी पियाला गेले होते.. यांच्या घरी... तर चहा घेऊन यायला सांगितलं होता या मुलाला... पाहुणे, ओळखीचा असेल म्हणून संदीपच्या आई येत होत्या, मीच बोलले ... मी घेऊन जाते चहा... म्हणून .. "


विवेक कधीपासून संदीपकडे संशयाने बघत होता. काय चाललंय नक्की... अनघा तर बोलली नाही कधी...कि संदीप कडे जॉबला आहे ते... कशासाठी आलो गावात... आणि काय भलतंच दिसते आहे... अचानक त्याला केशवची आठवण झाली... केशव बद्दल काही विचारणार , तर बहिणीची माया पुन्हा जागृत झाली. 

" चल... ना दादा.. घरी जाऊया... आईला किती आनंद होईल... ",

" नको... मी एका वेगळ्या कामासाठी आलो... ते झालं कि लगेच निघणार... ",

" अरे.. असा काय करतोस... ४ वर्षांनी आलास... आणि न भेटताच परत चाललास... ते काही नाही... तुला यावंच लागेल... " अनघा लाडात म्हणाली. 

" अगं... कामं आहेत मुंबईला... थांबून चालणार नाही.. " विवेक... 

" आता कसली कामं... कामं आमच्यावेळेला असायची... " संदीप मधेच बोलला.

" जा ना.. जाऊन ये विवेक... आपल्याला खूप काम आहेत इथे पण.. " प्रियाने विवेकला डोळा मारला. विवेकने एकदा प्रियाकडे पाहिलं. अनघाकडे बघितलं. मग संदीपकडे... 

" प्रिया जरा बाहेर ये... बोलायचं आहे.. " विवेक दुकानातून बाहेर आला... मागोमाग प्रिया.. 


" काय रे .... ",

" हे बघ प्रिया... आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत हे तुला माहीतच आहे.... संदीपला काय विचारायचे आहे ते विचारून घे... केशव इथे नाही हे स्पष्ट झाले आहे... आणि मी जर आता घरी गेलो तर तिथून लवकर सुटका होणार नाही माझी.. ",

" मग पुढे काय ? " ,

" पुढे ? ... पुढे काय म्हणजे... मी तुला आधीच सांगितलं होतं.. साताऱ्याला सोडलं कि मी परत मुंबईला येणार म्हणून... आज रात्रीचं निघणार मी... जमलं तर संध्याकाळी सुद्धा निघीन.. ",

" ये ... हॅलो.. केशव जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत तुला माझ्या सोबत राहावं लागेल.. ",

" काय जबरदस्ती आहे हि.. ",

" हो... आहेच जबरदस्ती... तू तुझा घरी जाऊन ये... मी थांबते इथे... " विवेक काय बोलणारं यावर.. चुपचाप त्याच्या बहिणीसोबत घरी निघाला. 


४ वर्षांनी येत होता तो. किती बदल झाला .त्यात गेल्या वर्षीच घराची डागडुजी केली होती, विवेकनेच तर पैसे पाठवले होते. ते घर आता कसं दिसते ते बघायला विवेक उत्सुक होता.. घराजवळ पोहोचला तेव्हा वेगळाच नजारा. जरासं तुटक घर... आता एक मजली झालं होतं. व्वा !!! कमाल केली यांनी... घराचा आकार सुद्धा वाढवला.. आजूबाजूला झाडे देखील लावली होती. एकदम कायापालट... अनघा तर त्याच्या आधीच धावत घरी पोहोचली होती.. अनघा, आई एकत्र दारात उभ्या होत्या. विवेकलाही आईला बघून बरं वाटलं. डोळ्यात पाणी आलं दोघांच्या.. गळाभेट झाली. पाया पडून झालं. अनघा तितक्यात जाऊन आली कुठेतरी. विवेक घर न्याहाळत होता. किती सुधारणा केली... सुरेख अगदी.. आणि आई... विवेक कडे डोळे भरून पाहत होती. 


" वाळलास रे बाळा... जेवतोस कि नाही... " विवेक हसायला लागला. टिपिकल प्रश्न ना.. ... या आईंना , त्यांचा मुलगा ... नेहमी बारीक झालेलाच दिसतो. 

" जेवतो पण काम जास्त असते ना.... मग झोप वगैरे... कमी.... काय करणार... आराम नाही मिळतं... " आई विवेकच्या बाजूला येऊन बसली. 

" बस्स झालं आता काम... एव्हडं पण काम करू नये... ",

" पैसे.... त्यामुळेच तर आता चांगले दिवस आलेत ना... अरे हो... बाबा... ते कुठे दिसत नाही ते... ",

" तुझ्या ताईकडे गेले आहेत..४-५ दिवसांसाठी... ",

" ताईलाच फोन करून आले आता... बाबांना घेऊन येईल ती दुपारपर्यंत... " व्वा !! सगळी तयारीच केली यांनी.


" कशाला बोलवायचे... आराम करायला गेले ना ते... आणि मी सुद्धा निघणार आहे संध्याकाळ पर्यंत.... " यावर अनघा आणि आई, दोघींचे चेहरे बघण्यासारखे झाले...

" आता नाही आलास आणि लगेच निघालास.. " अनघाने रागात विचारलं. 

" मला वाटलं कि कायमचा आलास... " आई...  

अरेच्या !!! हे काय... मी कधी बोललो यांना, मी जॉब सोडून आलो ते. 

" तुमचा काही गैरसमज झाला आहे... माझं काही काम होतं म्हणून आलो होतो... आजच निघायचं आहे मला... ",

" मग हे कशासाठी केलं आहे...तुझ्या लग्नासाठी हे घर नव्याने बांधलं ना... बस्स झालं काम ते... इथेच बघ नोकरी जवळपास... " विवेकला काय बोलवं सुचत नव्हतं. माझ्याकडे पैसे मागून यांनी माझ्यासाठीच घर बांधलं... माझ्या लग्नासाठी.. मला न कळवता... wow !!! ... 

" अनघा, त्याची बॅग ठेव जा.. वरच्या रूममध्ये... मी जेवणाच्या तयारीला लागते... विवेक.. जरा अंघोळ वगैरे करून ये... " आई किती आनंदात... चेहऱ्यावर दिसत होता नुसता. 


विवेक अंघोळ करून तयार झाला. अनघा आणि आई जेवणात मग्न... काय करणार आता... प्रियाची आठवण झाली अचानक त्याला.. 

" आई !! .. मी येतो जाऊन पटकन.. ",

" वेळेवर ये रे... गरमा गरम जेवण करून देते तुला... " विवेक तडक संदीपच्या दुकानाकडे निघाला. दुकानात पोहोचला तर संदीप,प्रिया... दोघेही गायब.. " जेवायला गेलेत साहेब... " तिथल्या एका नोकराने सांगितलं. शेजारीच घर.. विवेकने आत डोकावून पाहिलं. प्रिया मॅडम जेवत होत्या. संदीप सोबत होताच. विवेकला बघून आत बोलावलं त्याने. 

" जेवणार का साहेब... ",

" नको, थँक्स...जेवलो असतो पण आज आईच्या हातचं जेवायचं आहे... या मॅडम ला वाढ.. भूक लागली असेल.. गेले काही दिवस माझं डोकंच खाते आहे ना... " , 

" ये दाखवते तुला... " प्रिया तोंडातल्या घासासहित बोलली. त्यावर हसले दोघेही... 


" तू जेव सावकाश.. आणि पोटभर जेव.. " विवेक प्रियाला म्हणाला. आणि संदीपला घेऊन घराबाहेर आला.. 

" संदीप... केशव बद्दल काही माहित आहे का तुला... ",

" तो आलेला भेटायला.. ",

" मग काही बोलला का ? " यावर संदीप विवेककडे पाहू लागला. 

" तुला का एवढया चौकश्या... तो तर प्रियाचा बॉयफ्रेंड आहे ना.. तू पण प्रेमात पडलास कि काय त्याच्या... देवा !!! " संदीपने मस्करीत डोक्यावर हात मारला. काही सुधारणार हि बाल-बुद्धी... 

" ओ काका... ती सध्या तुमच्या घरात जेवत बसली आहे ना.. तिच्यासाठी चालू आहे हे सगळं..... समजलं " विवेक रागात बोलला. 

" अरे !! मस्करी केली यार... केशव बद्दल जास्त माहिती नाही... फक्त तो त्या दिवशी खूप घाईत होता... बघ ना.. प्रियाला पण माहिती नाही तो इथे आलेला ते... " ,

" मग आता काय करायचं.. ",

" आधी सांग... प्रियासोबत कसा तू... तू तर मुंबईला असतोस ना.. "


" ती मोठी गोष्ट आहे... ती सांगीन नंतर... प्रिया मुंबईत भेटली, केशवसाठी आलेली... तिथे कळलं केशव इथे, घरी आला. ... म्हणून इथे आलो.... इथेही केशव नाही.. " विवेक पटापट बोलला. 

" हम्म ... किती दिवस आहेस तू.... ",

"आजच निघणार होतो.. आईने थांबवून ठेवले... बघू, जमलं तर उद्या सकाळी निघीन... ",

" चालेल.. तोपर्यत मी केशवबद्दल सांगीन तुला... त्याचे ओळखीचे आहेत चार-पाच जणं.. त्यांना विचारून बघतो.. आणि प्रियाचं काय... ",

" काय म्हणजे ? " ,

" आल्यापासून इथेच आहे.. तिच्या घरी जाणार कि नाही ... काही कळत नाही.. ", संदीपच्या या प्रश्नावर विवेक विचारात... 

" तुला बोलली का ती... घर सोडून आली आहे ... " ,

" very good... आता काय हिला माझ्याच घरी ठेवू का.. " विवेक डोक्याला हात लावून उभा.. 

" थांब रे जरा ...विचार करू दे..... " विवेकला काय करावं कळेना... " मी आता जेवून येतो.. तोपर्यत राहू दे इथे.. " म्हणत विवेक स्वतःच्या घरी आला. 


घरी आला स्तोवर बाबा आणि मोठी बहीण आले होते. सगळयांना आनंद. एकत्र जेवले सगळे... एवढ्या वर्षांनी विवेकला घरचे जेवण मिळालं. पोटभर जेवण.. खूप गप्पा-गोष्टी बहिणी -वडिलांसोबत... बोलता बोलता कधी झोप लागली ते कळलंच नाही. अचानक एका आवाजाने जाग आली. घड्याळात बघितलं तर दुपारचे ३:३० वाजत होते. बाहेर कोणीतरी मोठयाने बोलत होतं... आवाज ओळखीचा.... प्रिया !!... बापरे... इकडे कधी आली हि... विवेक डोळे चोळत पटकन बाहेर आला. प्रिया आलेली , विवेकच्या बहिणीसोबत गप्पा सुरु होत्या. लहानपणीच्या मैत्रिणी सगळ्या, विवेक सगळ्यांकडे पाहत होता. हसण्या-खेळण्यात सगळे दंग झालेले.... काय ना.... दोन दिवसापूर्वी हि मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयन्त करत होती, यावर कोणी विश्वास ठेवेल का...केशवचा सुद्धा लवकर पत्ता लागायला हवा ना... विवेक मग गावात फेर-फटका मारायला निघाला... गावात फिरून गावाचे "गावपण" समजून घेत होता.


बघता -बघता संध्याकाळ झाली. रात्रीचे ८ वाजले होते, तेव्हा विवेक घरी आला.बऱ्याच वर्षांनी एवढा निवांत वेळ मिळाला होता त्याला. बघतो तर प्रिया अजूनही त्याच्या घरीच... रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झालेली. त्यात प्रियादेखील मदत करत होती. हिला काय बोलू आता... स्वतःच घर सोडून आली आहे....त्याचं काहीच नाही, ठेवणार कुठे हिला.. विवेक आत आला आणि काहीतरी खूण करून त्याने प्रियाला बाजूला बोलावलं.


" काय चालू आहे तुझं ? ",

" मस्त बेत आहे तुझ्यासाठी... सॉलिड जेवण बनवलं आहे तुझ्यासाठी ..... ",

" जेवणाचे नाही विचारलं... तुझ्या राहण्याची सोय काय...... आता तर रात्र पण झाली.. " तेव्हा प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडला, घाबरली. 

"खरंच रे... दिवसभर लक्षातच आलं नाही.. काय करूया.... " .

" एकचं पर्याय आहे... तुझ्या घरी जा.... " ,

" नाही... अजिबात नाही.. गेले तरी काका उभे करणार नाहीत.. एवढी काय काय बोलली त्यांना.. " प्रिया नाराजीच्या स्वरात बोलली. 

" तरीसुद्धा तिथेच जावं लागेल... मी येतो सोबत... चल.. " विवेक निघाला पण प्रिया जागच्या जागी उभी... 

" आता आलास ना... परत कुठे निघालास . " आईने आवाज दिला. 

" प्रियाला घरी सोडून येतो... " 

"जेवून जाईल ना ती " आई बाहेर येत म्हणाली. " पहिली कशी एक दिवस आड घरी जेवायला यायची... आता तू नसतोस तर हि फिरकत सुद्धा नाही इथे... आज जेवूनच पाठवणार तुला.. " झाली परत पंचाईत... आईला खरं सांगू का प्रियाबद्दल... नको राहूदे.. परत काही वाईट वाटायला नको प्रियाला... 


रात्री जेवून वगैरे पुन्हा गप्पा रंगल्या , विवेकच्या मुंबईच्या गोष्टी... प्रियाच्या वायफळ गप्पा... लहानपणीच्या आठवणी.. रात्रीचे १२ वाजले तरी सुरूच गप्पा... 

" आता गप्पा पुरे... झोपा सगळ्यांनी... " विवेकचे वडील घडाळ्यात बघून बोलले. 

" प्रिया.. तू थांब आज इथेच.. एवढ्या रात्रीची नको जाऊस घरी... " विवेकची मोठी बहीण म्हणाली. 

" कशाला राहू दे.. मी सोडतो घरी तिला... जागा कुठे आहे आपल्याकडे तिला ठेवायला.. " विवेक मधेच बोलला. 

" तुला काय अडचण रे... एवढ्या वर्षांनी भेटली मैत्रीण... राहू दे ना तिला.. आणि पहिली जागा नव्हती घरात... आता नाही.. तू जा तुझ्या खोलीत... प्रिया आमच्या सोबत झोपेल... " प्रियाला बरंच झालं. विवेककडे वेडावून दाखवत , त्याच्या बहिणीसोबत दुसऱ्या खोलीत गेली. 


विवेक तिच्याबद्दल विचार करत झोपी गेला. रात्री कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली. बाकी सर्व गाढ झोपेत.. कसला तरी आपटण्याचा आवाज येत होता... विवेक वरच्या खोलीतून खाली आला. दरवाजा उघडा... हवा सुटली होती ना, दरवाजा आपटत होता, त्याचा आवाज होता तो...दरवाजा उघडा ठेवून झोपले कि काय... काय माणसं आहेत.. म्हणत दरवाजा बंद करायला विवेक पुढे आला. घरासमोरचं , काही अंतरावर एक विहीर होती. रात्रीचं स्पष्ट दिसत नसलं तरी विहिरीच्या कठडयावर कोणीतरी उभं आहे असा भास त्याला झाला. कुतूहलाने विवेक बाहेर आला. विहिरीकडे निघाला. जसा विहिरीजवळ आला, तसं त्याला दिसलं. प्रिया होती ती... बापरे !!!...... " थांब प्रिया !! " विवेक जोराने ओरडला. प्रियाने मागे वळून पाहिलं, हसली... हाताने " ta - ta " केलं आणि सरळ विहिरीत उडी मारली. विवेक धावतच विहिरीजवळ पोहोचला... प्रियाला बघू लागला.. खालचे काहीच दिसत नव्हतं. विवेक आणखी वाकून बघू लागला. अचानक आपल्या मागे कुणीतरी आहे, असं विवेकला वाटलं. मागे पाहिलं त्याने. केशव !!... केशवचं होता तो.. अजून एक आवाज आला... " समाजलाव काय ? " संदीप सोबतीला... दोघांनी मिळून विवेकला पकडलं आणि तसंच विहिरीत ढकलून दिलं. 


विवेक खडबडून जागा झाला. आजूबाजूला बघू लागला. घामाघूम झालेला. आपण आपल्या खोलीत आहोत, जिवंत आहोत, हे समजायला जरा वेळ लागला. काय भयंकर स्वप्न होते , विवेकने स्वतःला आरशात पाहिलं. सगळे अवयव नीट आहेत ना, ते तपासलं. जरा नॉर्मल झाला आणि अंघोळीसाठी खाली आला. अंघोळ वगैरे करून आईला बघत बघत किचन मध्ये आला. 

" उठलास बाळा.. पोहे केले आहेत.. ",

" छान ... आणि बाकीचे कुठे गेले... आवाज नाही कुणाचा.. " विवेक कानोसा घेत म्हणाला. 

" देवळात गेल्या पोरी.. अनघा कामाला गेली.. तुला पण घेऊन जाणार होत्या.. मीच बोलले.... झोपू दे... ",

"अनघा एवढ्या लवकर जाते कामावर... " विवेक पोहे खात म्हणाला. 

" लवकर ? ... घड्याळात बघ... म्हणे लवकर... " आई हसत हसत दुसऱ्या कामाला लागली. 

च्यायला !! ११ वाजले... एवढा वेळ झोपलो... मुंबईत तर ११ ला अर्धा दिवस संपलेला असतो ऑफिसमध्ये.. विवेक मनोमन हसला त्यावर.. तेव्हाच सकाळचं स्वप्न , प्रिया , केशव आणि प्रामुख्याने संदीपची आठवण झाली. उरलेले पोहे पटापट खाऊन , आईला सांगून तो संदीपकडे निघाला. जाता -जाता विहिरीत डोकावून पाहिलं. आणि पुढे गेला. 


वाटेतच प्रिया आणि मोठी बहीण भेटल्या. प्रियाला घेऊन तो संदीपकडे पोहोचला. अनघा होती दुकानात. 

" तू काय करतेस इथे ? " विवेकचा प्रश्न.. 

" दादा !! विसरलास... मी जॉबला आहे इथे.. ",

" सॉरी.. लक्षात नाही राहीलं.. एखादी चांगली नोकरी बघ ना ... इथे काही होणार नाही.. " विवेक अनघाला समजावत म्हणाला. 

" चांगली नोकरी ??.. आमच्यावेळेला असायची चांगली नोकरी ... समाजलाव काय... " ,मागून संदीपचा आवाज आला. याचे परत सुरु होण्याआधी याला बाहेर घेऊन जाऊ. मनात म्हणत संदीपला घेऊन बाहेर आला.  


"बोल... काही माहिती आहे मिळाली का केशव बद्दल... " विवेक... 

" हो ... माझ्याकडे माहिती आहे.. बाकीच्यांनी अजून माहिती पुरवली. केशव कूठे आहे हे कळलं. " संदीप हळू आवाजात बोलला. त्यावर प्रिया टाळ्या वाजवू लागली. 

"गप ग जरा.. त्याचं बोलणं पूर्ण होऊ दे.. केशव कूठे आहे संदीप ",

" keshav is going Delhi that is.... " संदीप इंग्लिश मध्ये बोलला. काय बोलतो हा माणूस... 

" सरळ बोल रे... " ,

" you have to... ", संदीप बोलला. 

"काय ? " विवेक विचारात... प्रिया हसू लागली. 

" काय जोक करतात रे तुम्ही... " प्रिया किती हसत होती. ... you have to...म्हणजे काय... काय चाललंय यांचे... 

" केशव दिल्लीला गेला आहे.. " संदीप प्रियाकडे बघत म्हणाला. तसं तिचं तोंड एवढंसं झालं. 

" तुला रे नीट बोलताच येत नाही का... " संदीपला विवेक ओरडला. 

"तुला इंग्लिश समजत नाही ,त्यात माझी काय चूक... शिकून घे ना.. सोपी असते... समाजलाव काय.. " काय बोलू याला.... 

" केशव दिल्लीला का गेला... ",प्रियाचा प्रश्न.. 

" ते त्यालाच माहित... ",

"आता रे ... काय करायचं... ",

" काय म्हणजे... मी जाणार मुंबईला.. तू तुझ्या घरी... संपला विषय.. आजच संध्याकाळी निघतो मुंबईला... " विवेक खुशीने म्हणाला. 

" अजिबात नाही हा.. तू बोलला होतास... केशवची भेट घडवून आणीन.. तू असा मला एकटीला सोडून जाऊ शकत नाही.. " प्रियाने विवेकचा हात पकडून ठेवला. 

" हि काय जबरदस्ती आहे... केशव दिल्लीला गेला, तुला तुझ्या घरी आणून सोडलं... मी कशाला थांबू आता.. ",

" जबरदस्ती आमच्यावेळेला होयाची... आता कसला काय... " संदीप मधेच बोलला. 

" तू गप्प रे... काय बोलतोस ते तुला तरी कळते का.. " विवेक... 

"you have to..." संदीपचा त्यावर रिप्लाय... पागल आहेत दोघेही.. 

" हात सोड प्रिया... लोकं बघत आहेत... ",

" बघू दे... तुला यावंच लागेल माझ्याबरोबर.. ",

" कुठे ? " प्रिया विवेकचा हात ओढत होती, विवेक तिच्यापासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता.. आणि संदीप शेजारीच उभा राहून , त्यांची "रस्सीखेच" बघून मज्जा घेत होता. 

" दिल्लीला... केशवला शोधायला... " प्रिया म्हणाली. 

"दिल्ली " हे नावं ऐकताच क्षणभर विवेकची ओढाओढ थांबली. दोघे एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिले. 

" हट् !! " पहिला विवेक जागा झाला. 


पुन्हा रस्सीखेच.. " तुमच्या लफड्यात मला कशाला मध्ये ओढता... जा ना तू एकटी... ",अजूनही विवेक त्याचा हात सोडवू शकला नव्हता. 

" तुला यावंच लागेल... समजलं ना.. " प्रिया मोठयाने ओरडली. तिचा आवाज ऐकून अनघा दुकानातून बाहेर आली. 

" कुठे चालली आहेस ? ",

" दिल्लीला.. ",

" कशाला एवढ्या लांब.. " अनघाचा लगेच दुसरा प्रश्न.. 

" त्याचा एक काम असा... दिल्लीक... तुका जाऊचा असा काय दिल्लीक... " संदीप " वेगळ्या " भाषेत बोलला. 

"मग दादाला काय झालं... ", 

"याला बोलते कि चल ना माझ्यासोबत... मी एकटी कशी जाऊ... तर नाटक करतो आहे.. " प्रिया रडक्या आवाजात बोलली. 

" जाईल तो... थांब.... आईलाच सांगते.. म्हणजे तो नक्की तुझ्यासोबत जाईल... " अनघा धावत घराकडे निघाली. 

" और ये लगा ... six " संदीप ओरडला.. झालं... आता आईला कळलं तर जावंच लागेल. काहीतरी कारण शोधावं लागेल.. 

" प्रिया हात सोड.. मी नाही पळत कुठे... ",

" प्रॉमिस ??? " , 

" हो माझी आई.... प्रॉमिस... " प्रियाने हात सोडला. 

" हे बघ.. दिल्ली काही जवळ नाही... शिवाय ट्रेनने खूप वेळ लागेल तिथे पोहोचायला. " ,

" there is that aeroplane... " संदीपचं इंग्लिश.. त्याकडे दुर्लक्ष करत विवेक प्रियाकडे पाहत होता. 

" विमानाने जाऊ ना... " विवेक आता संदीपकडे रागाने पाहू लागला. संदीप उगाचच इकडे -तिकडे बघत , आपण काहीच बोललो नाही असं रिऍक्ट करत होता . 

" तुम्ही दोघे ठार वेडे आहात.. विमानाने जाणे काय सोप्प वाटते का.. केवढा महाग प्रवास आहे तो... ",

" तुझ्या friend साठी एवढं सुद्धा करू शकत नाही का.. " emotional blackmail... 

" तरीसुद्धा... तिकडंच काही माहित पाहिजे ना.... " आता प्रिया खरंच गप्प झाली..विवेकचं बोलणं बरोबर होतं. तिथे जाऊन कुठे शोधणार केशवला... 

" हालो... हा सँडी कशाला हाय मग.. आपुन तो जाता रहता हे दिल्ली... " संदीप बोललाच.. तसे दोघे त्याकडे बघू लागले. " हो... आमच्या ऑर्डर असतात दिल्लीवरून ... महिन्यातून एकदा तरी जातो मी... " प्रियाचा चेहरा खुलला. 


"बरं झालं.. संदीप घेऊन जाईल तुला... ",

" तो का घेऊन जाईल... त्याला आपण घेऊ सोबत... " प्रियाने परत विवेकचा हात धरला.  

" मी कशाला आता.. " ,

"तू पाहिजेच मला.... " ,

" you have to.. " संदीप हसत म्हणाला. " मी सुद्धा कधी विमानाने प्रवास केला नाही.. विवेक मुळे मला विमानाचा प्रवास होणार... देवा !!! " संदीप हात जोडत म्हणाला. 

" ओ मिस्टर ... कोणी जात नाही आहे विमानाने... ट्रेननेच जायचे आहे... आणि आता मला सुट्टी पण नाही मिळणार.. समजलं ना... २-३ महिन्यानंतर बघू.. दिल्लीच... " प्रियाला आला राग.. 

" आजच जायचे आहे ... आत्ताच जायचे... नाहीतर मी पुन्हा आत्महत्या करायला जाईन... " यावर मात्र संदीप आश्चर्यचकित झाला. 

" पुन्हा म्हणजे... या आधी कधी केलास प्रयत्न ... " याला आताच गप्प केलं पाहिजे.. 

" काही नाही... मस्करीत बोलली ती... " संदीपचं वाक्य मधेच तोडत विवेक बोलला. " जाऊया बाबा... जाऊया.. त्यासाठी मुंबईला जावेच लागेल.. ऑफिस मध्ये सुट्टीच लेटर टाकावं लागेल... आणि मुंबईवरूनच विमान पकडावं लागेल.. ",

" कित्ती छान आहेस रे तू... " प्रियाने जोराचा गालगुच्चा घेतला विवेकचा... 


" अजून एक... सगळ्यांचे पासपोर्ट लागतील... आहेत का ... ? " विवेकने संदीपकडे पाहिलं... 

" पासपोर्ट... आता कसले पासपोर्ट... आमच्यावेळेला असायचे पासपोर्ट..... ",

"आहे का सांग... ",

" पासपोर्ट लहानपणीच काढून ठेवला आहे... समाजलाव काय " कधी सुधारणार हा... त्याकडे दुर्लक्ष करत प्रियाला विचारलं... 

"तुझं काय ? ",

"आहे माझा पासपोर्ट... केशवनेच सांगितलं होता.. २ वर्षांपूर्वीच काढला.. " ,

" पण तुझं तर सगळं सामान चोरीला गेलं ना.. आता नसेलच तुझाकडे ना.. ", प्रियाच्या चेहऱ्यावर तर तसं काही नव्हतं... 

" हीच तर खरी गंमत आहे... १० दिवसापूर्वीच... आमच्या ऑफिस मध्ये सगळ्यांचे ओळखपत्र बनवण्यासाठी काही कागदपत्र घेतली होती... मी माझं पासपोर्ट दिलं आहे... अजूनही ते ऑफिस मधेच असेल... मज्जा ना.. " प्रिया आनंदाने उड्या मारू लागली. आता काहीच पर्याय नाही.. जावेच लागेल.. 

" चला ... मग... तयारी करू.. " ,

" you have to.." संदीप सवयी प्रमाणे मधे बोलला. " माझी ऑर्डर पण आहे,.... घेतो सामान सोबत... ",

"अरे पण ... पहिलं मुंबईला जायचे आहे... ",

" हा चालेल ना.. मला काहीच प्रॉब्लेम नाही ... मित्रांसाठी काही पण " विवेकने एकदा त्रासिक नजरेने दोघांकडे बघितलं. 

" ठीक आहे.. काय ती लवकर तयारी करा... आजचं रात्री निघू मुंबईला... " प्रिया आनंदात, संदीप विमानाने जायला मिळणार म्हणून खुशीत... आणि विवेक... एक सोडून दोघे-दोघे त्याच्या सोबत म्हणून tension मधे... पण मैत्री खातर तरी केशवला शोधावं लागेल.. याच विचारात... संध्याकाळी तयारी करून... सामान बांधून संदीप ,प्रिया सोबत मुंबईकडे रवाना झाला विवेक.  Rate this content
Log in

More marathi story from vinit Dhanawade

Similar marathi story from Inspirational