प्राणवायू
प्राणवायू
दहा बारा वर्षाचा एक मुलगा बागेतील माळीकाकांशी काहीतरी बोलत होता. त्याच्या पाठीला कुबड असावे, नाकालाही रूमाल बांधलेला होता. जणू ओठही सुजलेले आहेत. मी दुरूनच कुतूहलाने बघत होते. जरा वेळाने त्याचे बाबाही तिथे आले. त्यांच्या हातात रोपटे होते. माळीकाकांनी खोदलेल्या खड्डयात त्या मुलाने ते रोप लावले, पाणी दिले आणि परत जायला निघाला. जिज्ञासेपोटी मी त्याच्याजवळ गेले आणि कारण विचारले.
तो गोड मुलगा तितकाच गोड हसला. त्याने बाबांकडे पाहिले आणि कुबडावरील जॉकेट व नाकाचा रुमाल काढला. समोरील दृश्य पाहून मला धक्काच बसला. कारण मी ज्याला कुबड समजले ते प्राणवायूचे नळकांडे होते आणि नाकावर मास्क.