STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

4  

Shila Ambhure

Tragedy

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह

1 min
522

        मोठ्या जावेचा कोरोना रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला. डॉक्टर असलेल्या तिच्या मुलीनेही येणे बंद केले. पण हिने अगदी हसतमुखाने जावेची सेवा केली. जावेचा घरगुती पापड व्यवसायदेखील सुरु ठेवला. 

         मागील वर्षी याच मोठ्या जावेने तिला विनाकारण घराबाहेर काढले होते. ही काहीच बोलली नाही. डोळ्यांत पाणी आणि मनात 'पॉझिटिव्ह' विचार घेऊन ती पती व मुलांसह दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली होती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy