चूक कोणाची?
चूक कोणाची?
दहा वर्षाचा कुणाल आपल्या आईला म्हणाला, "आई बाबा कसा होता ग? तो कुठे आहे आता?" आई म्हणाली," तुझा बाबा खूप निष्ठूर, क्रूर, नालायक, भावनाहीन, निर्दयी असा माणूस होता. तू पोटात असतानाच तो मला मला सोडून गेला! तुला मला दोघांना कायमचे एकटे ठेवून चालला गेला!"
नंतर मुलगा म्हणाला,"पण नाही मी त्यांचे स्टोरीमिररवरचे साहित्य वाचले. त्याच्या कविता त्याच्या कथा वाचून तर मला एक कोमल, दयावान, प्रेमळ, भावनिक माणूस तो असावा असेच वाटते! तू खरंच बोलतेस ना की चूक तुझीच काहीतरी होती?"