The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

3.8  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

आपल्यातील परके

आपल्यातील परके

7 mins
1.8K


    रविवारचा दिवस होता. मनोहरआजोबा आपल्या मुलांची भेटायला येतीलवाट बघत होते. त्यांना आठ दिवस झालबर नव्हत. त्यांना एका आश्रमात ठेवल होत.त्यांचा नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्याघेऊन झाल्या होत्या, एरव्ही ते टीव्ही पाहायचेया वेळेला पण तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते. त्यांना बीपी सोडून कुठलाहीआजार वगैरे नव्हता परंतु वय झाला नाकाही ना काही शरीराच्या तक्रारी सूरूचअसतात. ते ही त्याकडे दुर्लक्ष करून आलेलादिवस छान जगत होते.           


एक नव्वदी पार केलेले आजोबा, ते एका आश्रमात राहत होते. त्यांनी आयुष्यभरखुप कष्ट केले. त्यांनी गव्हमेंट सर्व्हीस केली.त्या काळात पगार फार नव्हता पण आजोबांनीत्यांच्या तिन्ही मुलांना खुप शिकवल आणित्यांना त्यांच्या पायावर उभ केल. त्यांचीदोन्ही मुले प्रकाश आणि आनंद दोघेही इंजिनीअर होते. मुलगीही चांगल्या पोस्टवरकंपनीत मॅनेजर होती. तिघेही सेटल होते.शहरांत राहत होते. पण आजोबांना आताघरी एकट ठेवण योग्य नव्हत. कारण दोन्ही मुले आणि सुनाही जाॅबमुळे बिझी राहत.मुले शाळेत जात होती. आजोबांना घरी एकटच राहाव लागे. त्यांचे मेडीसीन आणिइतर काही गोष्टी हव्या असतील तर त्यांनावेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांनाआश्रमात ठेवायचा निर्णय घेतला. त्यांच मनसुरूवातीला तयार नव्हतच. पण त्यांच्यामिसेस गेल्यानंतर ते खुप एकटे पडले होते.त्यांना आश्रमात जायच्या आधी मुलगीकल्पना त्यांना भेटली आणि दोन दिवससोबत राहिली. त्यांना काय हव नको तेसगळ घेऊन दिल. बाकी आजोबांना तरपेन्शन मिळत होती. ते कधीही मुलांनाएक रूपयाही मागत नव्हते. पण बिझीलाईफ मुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालावेळ नव्हता. कारण प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण करायची असतात, संसार असतो.यात गुरफटले जातात सगळेच मग आजोबांच्याघरची स्थितीही अशीच होती. मग त्यांनीहीमनाची तयारी केली की आपण आश्रमातजायच आणि तिथेच समवयस्क लोकांसोबतछान राहिलेल आयुष्य आनंदाने जगायच.आता आपल काही होवो आपण परत याघरी नाही यायच अस ते ठरवतात.   


आजोबांनी काही मागितल तर सुनबाईम्हणायच्या, काय ओ बाबा, तुम्हाला देईपर्यंतही धीर नाही निघत. काम असतातमहत्वाची चालू अस उठता येत नाही.आजोबा समजून घ्यायचे. काही बोलत नव्हते. त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागीतलीतर असच ऐकवल जाई. सुन आणि मुलगादिवस नोकरी करायचे. नातवांशी त्यांना बोलावम्हटल तर त्यांना अभ्यास असायचा, क्लासेसअसायचे. कधी कुणी समवयस्क मित्र भेटलातर गप्पा मारायचे. पण त्यांना करमत नसत.कुणीही त्यांच्याशी बोलायला नव्हत. येणारादिवस ते ढकलत होते. पण त्यांना आश्रममध्ये ठेवण्यात आल. त्यांनी आश्रमालाच आपल घर समजल, त्यांना खुप आनंद झाला,त्यांच्यासारखी अनेक लोक त्यांना भेटतगेले. समवयस्क भेटले. गप्पागोष्टी करू लागले.ते तिथे रमुन गेले होते, छान मजेत दिवसचालले होते. तिथला स्टाफ खुप छान काळजीघेत होता. त्यामुळे त्या आजोबांचे दिवसछान जात होते. तेही मजेत होते. अधुन मधुन मुले त्यांना भेटायला येत. कधीकधीते आजोबा आजारी पडायचे वयोमानाप्रमाणेपण लगेच बरे व्हायचे. त्यांचा सगळा खर्चत्यांच्या पेन्शनमधुन करण्यात येई. पण त्यांनाकधी काही झाल तर त्रास तर स्टाफ कींवाडाॅक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे.तर त्या मुलाला राग यायचा. त्याला वेळ नसायचा. घरातही सगळ बघाव लागायच.मुलगीही तिच्या संसारात आणि जाॅबमध्येबिझी होती. आजोबा खुप समजदार होते.ते कुणी भेटायला नाही आले तरी समजुनघ्यायचे. त्याची सर्वांशी मैत्री झाली होती.स्टाफला ते खुप हसवायचे. म्हणून प्रत्येकालालळा लागला होता. ते सर्वांना आवडायचे.असेच दिवस चालले होते. ते थोडे आजारीहोते, अशक्तपणा जाणवत होता. म्हणूनआपल्या मुलाची वाट बघत होते. तो महीनाझाला आला नव्हता. त्या दिवशी आजारीअसताना ते झोपले होते. त्यांना आपल्यामुलाचा आवाज कानी पडला. त्यांना मनालाधीर आला. छान वाटल आपला माणुससोबत असला ना कुठलाही आजार असुदेत एक आधार मिळतो, लढण्याची ताकदमिळते.         


 त्याच दिवशी थोड्या वेळाने त्यांच्याखोलीशेजारीच त्यांना बडबड ऐकू येत होती.ते गाढ झोपून गेले होते परंतु पुसटचा आवाजयेत होता. हे दुसरे तिसरे कूणी नसुन त्याआजोबांचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या.डाॅक्टर आणि नर्सला बोलत होते. " अहो, त्यांना बर नाही आहे, तुम्ही त्यांचीट्रिटमेंट करता, काळजी घेता हे सगळ ठीकआहे. पण त्यांचही आता नव्वदीच्या पुढेवय गेल आहे. कश्याला तुम्ही जास्त ट्रिटमेंटकरता, त्यांच आयुष्य वाढवता. यात आमचाहीवेळ जातो, मुंबईवरुन पुण्याला येण आणित्यात आम्ही सगळेच नोकरी करतो. आम्हालाही फारसा वेळ नसतो ओ डाॅक्टर. " डाॅक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते.पण त लोक त्यांचच म्हणण मांडत होते.त्यांच मत होत की थांबवा आता हे सगळयात पैसाही जातो, आणि आम्हांलाही वेळनसतो. ते आजोबा इतक्या दिवस छान जगले, आता पुन्हा त्यांच आयुष्य कश्यालावाढवता. एवढी ट्रिटमेंट का करायची, त्यांचवय झाल ना आता... पण डाॅक्टरांनी त्यांनासांगीतल. " तुम्हांला बाबांची ट्रीटमेंट नसेलकरायची तर राहू द्या, कारण कुणाही व्यक्तीलाकाही त्रास होत असेल तर आम्हांलाट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता नाही येत."आम्ही आमच कर्तव्य पार पाडू , तुम्हांला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचास्टाफ काळजी घेऊ शकतो. जरा तुम्हीहीसमजुन घ्या ना, त्यांचही वय झाल आहेम्हणजे त्यांनी यापुढे जगुच नये आणि आपणत्यांना अस मरणाच्या दारात सोडण कितपतयोग्य वाटत तुम्हांला, आणि ट्रिटमेंटसाठीफार थोडीच पैसे लागत होते, फक्त आयव्ही इंजेक्शन आणि काही मेडीसीन एवढच त्यांनाआता गरजेच आहे. त्यावरून तुम्ही एवढबोलत आहात. " तस नही ओ डाॅक्टर, फक्त एवढच वाटतउगाच त्यांच आयुष्य वाढवून त्यांना त्रासदेण बर नाही. " त्यांचा मुलगा म्हणाला.पण डाॅक्टरांना जे समजायच ते समजल.


यांचा आवाज वाढला, हे नवरा बायकोडाॅक्टर आणी नर्सशी जे काही बोलत होतेआणी त्यावर डाॅक्टरांच त्यांना समजावणसगळच त्यांनी ऐकल होत. पण ते झोपले आहेत अस दाखवत होते. डाॅक्टर आणिनर्स निघून गेले. त्यांचा मुलगा आणि सुनत्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीचीचौकशी करायची सोडुन त्यांनाच बोलत होते." काय ओ बाबा, या वयात अस काही ना काहीहोतच असत की , तुम्ही लगेच डाॅक्टरांनासांगता, तुमच नेहमीच आहे. मग ते आम्हांलाकळवतात, आम्हांलाही आमची काम सोडूनयावी लागतात. आणि त्या डाॅक्टरांनाबोलायला काय जातय, पैसेही लागतात ना.आजोबा शांतपणे ऐकून घेत होते. त्यांनाविकनेस जाणवत होता. त्यासाठीच डाॅक्टरांनीसलाईन वगेरे सुरू केलेल होत. पण याघरच्यांना यांच काहीच नाही कराव वाटायच.थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले. आजोबाविचार करत बसले होते. दुसरा मुलगा डाॅक्टरांना भेटला तोही त्याच विचारांचा होता.आता वय झालय जोवल राहतील तोवर ठीकपण नव्वदीच्या पुढे वय गेलय तुम्ही फार काहीकरू नका, जेवढ जमेल तेवढच करा.डाॅक्टरांनी त्यालाही समजुन सांगितल की" त्यांना फार मोठा आजार झालेला नाहीकी ज्यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील आणि ही ट्रीटमेंट दिली की ते बरे होतील.त्यामुळे तुम्ही प्लीज समजुन घ्या. " डाॅक्टरने अस बोलताच तो निघून गेला.मुलांचे असे विचार, बोलण ऐकून ते खचुनगेले असावेत. रोज व्यायाम करणारे,सर्वांशी गप्पा मारणारे, मस्करी करणारेहसत - खेळत असणारे आजोबा नेहमीकधीतरी आजारी पडायचे पण दोन दिवसातबरे व्हायचे. यावेळेस का कोण जाणे, त्यांचीजगण्याची उमेदच संपून गेली अस वाटतहोत त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खुपविचार करत होते. डाॅक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले. ते मनोहर आजोबांनातपासण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना ते काहीतरीविचारात असल्यासारखे, शांत शांत वाटतहोते. डाॅक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नकेला.


डाॅक्टर निघाले, तेवढ्यात त्यांनी थांबवल. म्हटले की " डाॅक्टर तुम्ही खुप करता ओ माझ्यासाठी, नकळत डोळ्यांत पाणीजमा झालेल, नेहमी मला बर करता पण या वेळेस या घरच्या लोकांनाच वाटत मी नाही जास्त दिवस जगाव, ऐकलय मी कालचबोलण."  डाॅक्टर म्हटले , "बाबा, तुम्ही काही काळजी करू नका , आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. तुमची काळजी आम्ही घेऊ " तुम्ही फक्त काळजी घ्या. आजोबांनीनुसती मान हलवली. आजोबा मनातच विचार करत होते की आपली माणसेही असा विचार कसा करू शकतात ? आणि यांना माझ काय कराव लागतय , पैसे तर माझी सोय मी केलेली आहे. मी थोडीच कुणावर अवलंबुन आहे. पण तरी यांना अस का वाटाव. ते आज शांतच होते.ते केअर टेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो. त्यांना शांत झोप लागली होती. चार पाचदिवस डाॅक्टर त्यांच्यावर ट्रिटमेंट करत होते.घरचे त्या दिवशी नका काही करू म्हणून सांगुन गेले होते. पण डाॅक्टर, नर्स आणिइतक लोक त्यांची सेवा करत होते. व्यवस्थित जेवण वगैरे करत. त्यांचे मित्र मनोहररावांना धीर देत. " तू लवकर बराहो सांगत, तर त्यांनाही करमत नसत. आठ दिवस होतात. कुणाशी बोलले नव्हते आणि फिरले नव्हते त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायच होत. आनंदात जगायच होत. वय इतक होत पण खुप ॲक्टिव्ह आणि पाॅझीटिव्ह विचारांचे, सर्वांना मदत करायचे.त्यांना आता ट्रिटमेंटमुळे एका बेडवर झोपूनकंटाळा आला होता. त्यांच्यात आत्मविश्वास होता. खुप सहनशील होते. डाॅक्टरांनीही त्यांना धीर दिला. ते बरे झाले. सगळ्यांनाभेटले त्यांना खुप आनंद झाला. पण मुलेवेळ नाही म्हणुन अजुनही भेटायला आली नव्हती. त्यांनी त्या दिवशी मुलाला अस बोलताना ऐकल होत. ते बोलण त्यांच्या मनाला लागल होत. त्यांच्याकडे पैसा खुप होता, पण अस माझ्यासारखे इतरही लोक असतील माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल ? त्यांना या गोष्टीच खुप वाईट वाटत. आपण कुणावर अवलंबुन नसाव. तेव्हा ते आजोबा डाॅक्टरांना सांगुन, त्यांच्या घरच्यांना बोलवतात. त्यांच्या वकीलांना बोलवतात आणि विल बनवून घेतात. त्यांची सर्व मुले आणि त्यांची काळजी घेणारे डाॅक्टर असे सर्व तिथे असतात. ते सर्वांना बोलवून घेतात आणि सांगतात की "माझ्या मृत्युनंतर माझी सगळी प्राॅपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करतात. तिथे त्यांच्या सारखे कुणी पेशंट आले वयस्कर तर त्यांची ट्रिटमेंट वगैरे मोफत मिळावे म्हणून आणि त्यांच्या मृत्युनंतर स्वतःच शरिर मेडीकल शिकणार्‍या मुलांसाठी दान कराव, ( देहदान ) अस विल करतात.


मुलांना त्यांची चूक कळते. ते आजोबांची माफी मागतात. त्यांना घरी चला आता, अस म्हणतात परंतु आजोबा आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहण पसंत करतात. ते घरी जात नाहीत. हेच माझ घर आहे आता अस म्हणतात, आणि ते आजोबा तिथेच आनंदाने राहू लागतात. जन्म आणि मृत्यु कुणाच्याही हातात नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यु पण आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आपण ठरवणारे हे सगळ कोण? कधी कधी आपल्यातले परक्यासारखे वागतात ना तेव्हा खूप त्रास होतो, आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जातात.                        

**********************************


Rate this content
Log in

More marathi story from शब्दसखी सुनिता

Similar marathi story from Tragedy