शब्दसखी सुनिता

Children Stories

4.0  

शब्दसखी सुनिता

Children Stories

आजी मला काश्मीरवरुन बर्फ आण !

आजी मला काश्मीरवरुन बर्फ आण !

3 mins
199


इरा एक छोटी मुलगी घरात आजी आजोबा, आणि आईबाबांची खुप लाडकी होती.

उदय आणि मनाली तिचे आईबाबा तर ती एकटी असल्याने तिचे खुप लाड करायचे. इराचे आजी

आजोबा बर्‍याच दिवसांपासून घरीच होते,

कुठेही बाहेर गेले नव्हते. मग मुलाने विचार केला की यावर्षी आईबाबांना कुठेतरी फिरायला ट्रिपला कींवा कुठेतरी देवदर्शनाला पाठवाव असा विचार करत होता. पण त्याच्या वडीलांनी सांगितल की त्यांचीच जेष्ठ नागरिक त्यांचा ग्रुप होता, ते सगळे

यावर्षी काश्मिरला फिरायला जाणार होते.

त्यांची जाण्याची तयारी सुरू झाली होती, उदय आणि मनालीने ही त्यांना काय पाहीजे ते

सगळ आणुन देत होते. इरा लहान असल्याने

तिला फारस कळत नव्हत. ती पण खुप खुश

झाली बाहेर ट्रीपला जायच म्हणून ती पण

आजीआजोबांच्या मागे लागते, हट्ट करते आणि

रडायला लागते. मला सोबत नेत नाही म्हणून

तेव्हा तिचे बाबा तिला समजावतात की,

आजीआजोबा फिरायला जाणार आहेत ना

त्यांच्यासोबत सगळे त्यांच्याच वयाचे आहेत.

लहान मुलांना परमिशन नाही आहे तिला त्यांनी

प्रेमाने समजावल आणि तिला सुट्टीच्या दिवशी

जवळच बाहेर फिरायला नेतो अस समजावून

सांगितल्याने ती शांत झाली होती. तिची आई

पण म्हणते हवतर आपण पुढच्या वर्षी सगळे

जाऊया. तेव्हा ती हो म्हणते आणि आता कुठे

तिच्या चेहर्‍यावर स्माईल येते.

     आजी तिचे खुप लाड करत असते. आजी

ही जवळ कुठे जायच असेल तर आपल्या नातीला घेऊन जात असे. पण तिला एवढ्या

दुर नेता येण शक्य नव्हत. इरा आजी म्हणते,

" आजी तु माझ्यासाठी काश्मिरवरून बर्फ

आण ... " बालमनाला काय कळत आजीही

ती नाराज होऊ नये म्हणून हो आणेल म्हणते.

    काहि दिवसांनी इराचे आजी आजोबा

ट्रिपवरुन परत येतात. इतक्या दिवसांनी आपल्या आजी आजोबांना पाहून ती त्यांना मिठी मारते,

त्या दोघांनाही तिला इतक्या दिवसांनी पाहून

खुप आनंद होतो. मनाली हे सगळ बघत असते.

आल्या आल्या विचारते, " तु माझ्यासाठी काय

आणल आहे. मला दे आताच. दाखव.

मग आजीही इरासाठी आणलेली खुप सारी

खेळणी, खाऊ तिच्यासमोर ठेवते. ती सगळ

पाहून खुप खुश होते. आनंदाने उड्या मारायला

लागते. आजी ही आराम करायला तिच्या

खोलित जाते. इराला थोड्या वेळाने काय होत

काय माहीती आजीजवळ येऊन रडायला

लागते. आजी तिला विचारते. ती रूसून बसते.

" काय झाल इरा बाळ का रडत आहेस ? "

तेव्हा ती म्हणते की, " आजी तुला मी बर्फ

आणायला सांगितला होता. तु हो म्हणाली

होती आणि मला बर्फ आणलाच नाही " म्हणून

ती खुप रडायला लागते. तेव्हा खरच आजीला

या लहान मुलीला कस समजाव कळत नाही

आजी तिला समजावते तरी देखील ती रडायच

थांबेना... मला आताच बर्फ पाहिजे. तेव्हा

मनाली आत किचनमध्ये जाते, चुपचाप फ्रिज

मधुन बर्फ आणते आणि सासुबाईंना आवाज

देऊन बोलावते आणि लपवून त्यांना बर्फ देते.


इराच रडण सुरूच होत. लहान मुल एखाद्या

गोष्टीसाठी हट्ट धरून बसले की कुणाचही काही

ऐकत नाही. तसच इराच होत. आजी तिच्याजवळ जातात आणि म्हणतात,

" हे बघ... आणलय की नाही तुझ्यासाठी बर्फ "

इरा खुप खुश होते. तिच रडण एका क्षणात

थांबत. तिच हसु... तिच्या चेहर्‍यावरचा आनंद

बघुन सगळेच खुप खुश होता. आजीला ही

तिला अस आनंदी पाहुन बर वाटल.


" तेव्हा सासुबाई तिला म्हणाल्या, पोर रडायला

लागली की कुणाच ऐकत नाही बघ. मला

तर प्रश्न पडला होता तिला कस समजाव,

पण तिला खोट कस बोलणार, काय बोलू तेच

सुचत नव्हत बर झाल तु वेळेवर आली "


तेव्हा मनाली सासुबाईंना म्हणाली,


" अहो आई, कधी कधी एखाद्याला आनंद 

देण्यासाठी थोडस खोट बोललेल चालत.


Rate this content
Log in