शब्दसखी सुनिता

Inspirational Others

3.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

हरवलेल स्पप्न

हरवलेल स्पप्न

4 mins
248


    आयुष्यात आपणही अनेक स्वप्न बघतो... आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो... कधी कधी खूप प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण होत नाही... पूर्ण न होण्याची अनेक कारण असतात...

स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून आपण स्वप्नच बघायची नाहीत अस नाही... आयुष्यात सगळच काही मनासारख होत असही नाही ना....

म्हणून जे काही मिळाल आहे त्यात समाधानी असण हेच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे... नाहीतर उगाचच एखाद स्वप्न पूर्ण झाल नाही तर आयुष्यात निराश होणही योग्य नाही... आपण आपले प्रयत्न चालू ठेवल्यास तेास्वप्न पूर्ण होऊ शकत... समजा नाही झाल तरी आपण दुसर काहीतरी करायच... कधी कधी मोठ यश मिळवण्यासाठी छोट्या छोट्या प्रयत्नांनी

सुरूवात करावी लागते... आपण बालपणी अनेक स्वप्न बघतो... पण ती लहान असताना बघितलेली स्वप्न असतात... तेव्हा आईवडीलही आपल्या त्या स्वप्नांच कौतुक करतात... तु नक्की हे बनशील किंवा होशील अस सांगतात...

पण लहानपणी बघितलेल स्वप्न मोठेपणी

सत्यात उतरवणारीही लोक असतात... पण काहींच स्वप्न मात्र सत्यात उतरत नाही....

तरी ते निराश होत नाही खुश असतात... असच एक हरवलेल स्पप्न....


  आदिती लहानपणापासून अभ्यासात हुशार

असणारी मुलगी. प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर

मिळवणारी. आईबाबा कमी शिकलेले होते,

परिस्थितीही गरिबीची, तिचे बाबा घरात एकटेच

काम करत होते. आदितीला बाबांच्या कष्टांची जाणीव होती. म्हणून ती कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती आणि मन लावून अभ्यास करायची ती लहान असताना खुप आजारी पडली होती. तिच्यासाठी हाॅस्पिटल ट्रिटमेंट साठी वडीलांनी त्यांच्याजवळ असणारे सर्व पैसे खर्च केले, तिच एक स्वप्न होत डाॅक्टर बनण्याच... पण तिच्या वडीलांना तिच्या स्वप्नांपेक्षा आदीतीला वाचवणे महत्वाचे होते. तिच्या बाबांच आदीतीवर खुप प्रेम होत

आणि ती त्यांचा जीव की प्राण होती. आदीती

नेहमीच अस आजारी पडायची, पैसे तर

नेहमीच लागायचे. आदीती नववीत गेली.

ती आता पूर्णपणे बरी झाली होती. अभ्यास तर ती चांगलाच करायची. शिक्षकांची तर ती खुप लाडकी होती. पण नंतर परिस्थिती खुपच बदलली. आदितीची आई आजारी पडली, वडील जास्त व्यसनाच्या आहारी गेले. परिस्थितीपुढे कधी कधी कुणाच चालत नाही... इतकी वाईट परिस्थिती होती. आदितीच डाॅक्टर होण्याच

स्पप्न तिथेच संपल होत. पुढे शिक्षण घेऊ

शकेल असही तिला वाटल नव्हत... तरी ती निराश झाली नाही. डाॅक्टर होऊन तिला

रूग्णांची सेवा करायची होती. पण तिच डाॅक्टर

होण्याच स्वप्न फक्त स्वप्नच राहिल. कारण मेडीकलला ॲडमिशन घेण एवढ सोप नव्हत, तिचे वडील एकटे कमावणारे होते. पुढे ति शिकु शकेल अशीही परिस्थिती नव्हती. त्यात मुलगी असल्याने दहावीपर्यंतच शिक्षण हे खुप झाल म्हणून तिच शिक्षण बंद करण्याचा निर्णय

घरच्यांनी घेतला. छोटस खेडेगाव होत ते तिथे आदीती राहायची. तिथे त्यावेळेस मुली जास्त शिकत नसत. त्यामुळे आदितीला तिच्या नातेवाईकांनी हेच तिच्या आईला सांगितल की,


" बस झाल एवढ शिक्षण मुलीच्या जातीला, आता तिच लग्नाच वय झाल लग्नाच बघ

म्हणुन " , आदितिच्या आईला कळत नव्हत


नक्की कुणाच ऐकायच तस तिचही शिक्षण फार झालेल नव्हत पण आदिती हुशार होती. तिने

आईला म्हटल की, " मी काम करून शिकेण

पण पुढच शिक्षण घेईलच मला एवढ्यात लग्न नाही करायच मला पुढे अकरावी बारावीच काॅलेज तरी करू दे " आईने ही बारावीपर्यंत

शिकायला तिला सपोर्ट केला. आईसोबत

शेतात कामाला जाऊन ती अकरावी बारावी

पूर्णच नाही केली तर चांगले मार्क मिळवून

तिने ते दोन वर्ष पूर्ण केली. पुढे तिचा आत्मविश्वास वाढला की आपण काम करून

पुढेही शिक्षण घेऊ शकतो...आता थांबणे नाही हे ती स्वतःलाच सांगत होती. बारावी नंतर तिने नर्सिंगच शिक्षण घेऊन ती परिचारीका बनून रूग्णांची सेवा करण्याच ठरवते... तिने नर्सिंग काॅलेजला ॲडमीशन घेऊन वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपला नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला... तेव्हा त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होता . सर्व मुलींच्या पालकांना बोलवण्यात

आल होत. आदीतीचे आईबाबाही आले होते.

तो क्षण तिला अजुनही आठवतो....


सर्व मुलींचे पालक समोर बसले होते. खुप गर्दी

होती. मोठे मान्यवर आणि टिचरर्स असे सगळे

जमले होते. आदीतीचे आई बाबा समोर बसले

होते जेव्हा तिने फ्लाॅरेन्स नाइंटिंगेल यांच्यावीषयी

भाषण केल... त्यांच्या कार्यांची माहीती अस

सगळ इतक्या लोकांसमोर, तिचा आत्मविश्वास

आणि तिच बोलण ऐकून वडीलांना खुप छान

वाटल.... तेव्हा आदीती ही बिनधास्तपणे

बोलत होती.... आज तिचे बाबा समोर होते.

शपथविधीला आपल्या मुलीला अस यूनिफाॅर्म

मध्ये बघून त्यांना खुप आनंद झाला...


तिच सगळेच कौतुक करत होते... हे सगळ

बघुन तिच्या बाबांच्या डोळ्यांत नकळत पाणी

आल.... की त्यांना ते आठवल की आदीतीला

डाॅक्टर व्हायच होत... तिच स्वप्न होत... पण

नाही झाल तिच स्पप्न पूर्ण.... तेवढ्यात समोर

स्टेजवर पुन्हा आदितीला बोलवण्यात आल.

तिचा सत्कार करण्यात आला. तिला गौरवण्यात

आल.... सर्वजण टाळ्या वाजवत होते...



तो क्षण तिच्या बाबांना तिचा खुप अभिमान

वाटला.... आदीतीने हा क्षण आपल्या मनात

जपुन ठेवला.... बाबांना खरच हा क्षण

अनुभवण्यासाठी तिनेही खुप मेहनत घेतलेली.

 आदिती बोलू लागली... तिने तिच मनोगत

व्यक्त करताना सांगितल की...  मि आदिती

 " खरतर मला लहानपणापासुन वाटायच की

आपण डाॅक्टर व्हायच आणि रूग्णांची सेवा

करायची होती. पण मला त्याच वाईट नाही

वाटत, आज मी निदान माझ्या बाबांमुळे त्या

क्षैत्रात येऊ शकले आणि रूग्णांची सेवा करू

शकेल याचाही मला आनंदच आहे. त्यांची

इच्छा होती की मी असच काहीतरी कराव

ते मी करू शकले याचा मला खुप छान वाटत.

तेव्हा तिच्या बाबांनाही तिथे बोलावून आदीतीला

गौरवण्यात आल. तिला प्राईज मिळाल,

त्यावेळेस स्टेजवर बाबांसोबत हा क्षण तिला

मिळाला.... तेव्हा त्यांना तिच कौतुक वाटल.

नि त्यांच्या डोळ्यांतुन आनंदाश्रु वाहत होते.

हा क्षण ती कधीच विसरू शकत नाही. 

ती खुप खुश आहे डाॅक्टर नाही होऊ

शकले म्हणून काय झाल... माझ रूग्णांची सेवा

करण्याच स्वप्न तर मी पूर्ण करू शकले यातच

तिला खुप समाधान वाटत. घरची परिस्थितीही

तिच्यामुळे बदलली... सगळे आनंदात आहेत...

आणि तिच्या वडीलांना तिचा खूप अभिमान आहे.


आज ती रूग्णसेवा करते तिच कर्तव्य

बजावत आहे. ती रूग्णांसाठी रात्रंदिवस

झटत असते. मनापासुन ती सेवा करत असते.

रूग्णांनाही तिचा आधार वाटतो. निम्मा आजार

तिच्या बोलण्यामुळे बरा होतो.... लोक जेव्हा

तिला सिस्टर म्हणतात... तेव्हा तिला खुप

छान वाटत, पण तिचे बाबा तिला ' डाॅक्टरच '

म्हणतात... तेव्हा तिला खुप भारी वाटत...  

ते नेहमी तिच कौतुक करतात...

आज तिचा सन्मान होतो, सत्कार होतात

पण बाबांनी दिलेली कौतुकाची थाप तिला

लाखमोलाची वाटते....  


आयुष्यात सगळच मनासारख होत अस नाही पण जे काही मिळालय त्यात समाधान मानायच. स्वप्न नुसती बघायची नसतात तर ती पूर्णही करायची असतात.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational