शब्दसखी सुनिता

Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

लहानपणीची दिवाळी आठवणींचा ठेवा

लहानपणीची दिवाळी आठवणींचा ठेवा

3 mins
327



    दिवाळी हा सण आपल्या प्रत्येकासाठी

आठवणींचा ठेवा असलेला सण आहे. दरवर्षी

आपण दिवाळी साजरी करतो प्रत्येक वर्षीच्या

नवनवीन आठवणी आपल्या जवळ असतात.

पण या सगळ्यात लहानपणीची दिवाळी मात्र

सर्वांच्याच आठवणीत राहते. दरवर्षी दिवाळी

आली की लहानपणीच्या आठवणीं ताज्या

होतात. खरी दिवाळीची मज्जा लहानपणी

होती. तेव्हाची दिवाळी खरच खुप भारी,

मस्त होती.


   

    दसरा झाला की दिवाळीची खरी चाहूल

लागायची. थंडीचे दिवस सुरू व्हायचे. टीव्ही

वर जाहीरात यायला लागायची उठा उठा...

दिवाळी आली... ही मोती साबणाची ॲड

सारखी लागायची त्यामुळे कधी एकदा

सहामाही पेपर संपतात नि सुट्टी लागते अस

होऊन जायच. दिवाळीची शाळेत असताना

खुप उत्सुकता असायची. दिवाळीच्या आधीच

बाजारात गेल्यावर बाजारात फटाके, कपडे,

आकाशकंदील, पणत्या या सगळ्यांनी बाजारपेठा फुलुन जायच्या. ते बघितल्यावर

वाटायच कधी रे देवा हे पेपर संपतात. शेवटचा

पेपर संपायची सगळे वाट बघायचे. ति खरी

दिवाळी होती लहानपणीची. आता दिवाळी

कधी येते आणि निघून जाते कळतही नाही.

पण लहानपणीची दिवाळी विसरण अशक्य

आहे.


    दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई सुरू व्हायची. सगळे कपडे वगैरे


धुवुन टाकले जायचे मग आईला मदत करायची.

घराला रंग द्यायच असेल तर सगळा पसारा

बाहेर काढायचो. ते झाल की मग सगळी

साफसफाई करायची. आम्ही तिघेही आईला

होईल तेवढी मदत करायचो. एक उत्साह

असायचा काम करताना. घरातील न वापरातले

भांडेही, डबे सगळ धुतले जायचे. सगळी

साफसफाई व्हायची. दिवाळीच्या आधीच

माझी आजी, आई आम्हांला ड्रेस घेण्यासाठी

सोबत न्यायचे आम्ही आमच्या पसंदीने ड्रेस

घ्यायचो. मी तर फार हट्टी होते जो ड्रेस पाहिला.

मला जर आवडला तर तोच घ्यायचे. मग

आजीही तो घेऊन द्यायची. आमचे आईबाबा

आम्ही लहान असताना तेच त्यांच्या पसंदीने

आम्हांला तिघाहु भावडांना ड्रेस आणायचे.

त्यांनी आणलेले ड्रेस आम्हांला आवडायचे

आणि ते परफेक्ट यायचे. आजी आणि बाबा

दोघेही दिवाळीला ड्रेस आधीच घ्यायचे.



    दिवाळीची शाॅपिंग व्हायची. सगळी खरेदी

व्हायची. मग आई फराळाचे पदार्थ बनवायची.

मी मोठी असल्याने आईला मदत करायचे.

आई, आजी फराळ करायचे, त्या पदार्थांचा

वास सगळीकडे दरवळायचा. आजीच्या

हातचा फराळ खुप टेस्टी होत असे. मला तर

तिच्या हातची शंकरपाळी आणि अनारसे खुप

आवडायचे. आजी नाही आज पण ती चव

अजुनही विसरू शकत नाही. आमच्या घरापुढे

खुप मोठ पटांगण होत. ति सारवून आम्ही

मोठ्या रांगोळीसाठी जागा तयार करायचो

आणि रोज तिथे कोणती रांगोळी काढायची

ते आधीच ठरवायचो. रांगोळीचे रंग आणि

सजावटीचे साहित्यही आणायचो. तिथे रोज

एक रांगोळी काढायचो. आम्ही तिघेपण मिळून

सगळ करायचो. दिवाळीच्या आधीच बाबा

आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळा लावायचे.

ते लावले की तेव्हा खर्‍या अर्थाने दिवाळीची

रोषणाई जाणवायची. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा

आणि झगमग कराणारा आकाशकंदील

आमच अंगण सगळा परिसर प्रकाशाने उजळून

निघायचा. रांगोळीवरही प्रकाश पडला की

रांगोळी रात्री अजुनच सुंदर दिसायची.


     दिवाळीच्या आदल्या दिवशी हातावर

मेहंदी काढायची. आईबाबा रात्री सांगायचे,


" उद्या नरकचतुदर्शी आहे , ऊद्या सकाळी

लवकर उठा... "  थंडीचे दिवस असल्याने

पण दिवाळी म्हटल ना आईने सकाळी आवाज

दिला की आम्ही सगळे उठायचो. लहान

असल्यामुळे आई उटण लावायची. बाबा

बाहेर चुलीवर आधीच पाणी तापवुन ठेवायचे.

उटण लावून झाल की मग मोती साबणाने

अंघोळ करून नवीन कपडे घालून तयारी

करायचो. घरी देवाची पूजा करायची. ते झाल

की फराळाचे पदार्थ चकली, चिवडा, शेव,

करंजी, लाडु, शंकरपाळी, अनारसे या पदार्थांचा

आस्वाद घ्यायचा. मग बाहेर खेळायला जायच.

बाबांनी फटाके आणलेले असायचे तर एखादा

सकाळिच उडवुन बघायचा. सर्वांना दिवाळीच्या

शुभेच्छा द्यायच्या. जवळ घर असल्याने सगळे

मुल नवीन कपडे घालुन यायचे. खुप छान

सगळे एकत्र मज्जा करायचो. तो दिवस कधी

निघून जायचा कळायचही नाही. मग संध्याकाळी

सगळीकडे दिवे लावायचे. आकाशकंदील आणि

दिव्यांनी परिसर उजळून निघायचा.


    लक्ष्मीपुजेच्या दिवशी घरात संध्याकाळी

आईबाबा लक्ष्मीची पूजा करायचे. त्यादिवशी

ही संध्याकाळी आजीने आणलेले नवीन ड्रेस

घालायचे. नटुन थटुन आम्ही पूजेसाठी तयार

व्हायचो. ते झाल की मग सगळे फटाचे उडवायचो

सगळे जण त्याचा आनंद घ्यायचो.

मग फटाके उडवून झाले की खुप भुक लागलेली

असायची. रात्रीच्या जेवणाचा छानसा बेत

आईने केलेला असायचा, त्यावर मनसोक्त

ताव मारायचा. गोडधोड पदार्थ आणि मिठाई

त्यादिवशी मनसोक्त खायचो. दिवाळीचा शेवट

दिवस म्हणजे भाउबीज. या दिवशी आम्ही

भावाला ओवाळायचो आणि तो आम्हांला

ओवाळणी द्यायचा. दिवाळीचे पाच दिवस खूप

मजेत, आनंदात निघून जायचे कळायचही नाही.


    दिवाळी संपली की आम्हांला राहिलेल्या

गृहपाठाची आठवण यायची. मग दिवाळीच्या

सुट्टीच्या शेवटी गृहपाठ करण्यासाठी शर्थीचे

प्रयत्न असायचे. ते आम्ही पूर्ण करायचो.


    लहानपणीची दिवाळी खरच खुप छान होती

सोनेरी दिवस होते ते दिवाळीची आधीपासुन

वाट पाहण्याची मज्जा आणि एक

उत्साह होता. हि लहानपणीची दिवाळी कधीही


विसरू शकत नाही. माझ्यासाठी ती दिवाळी

म्हणजे सुंदर आठवणींचा ठेवा आहे तो मी

माझ्या हृदयात कायम जपून ठेवेल.


 

            समाप्त

    



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational