शब्दसखी सुनिता

Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Others

शेवटची भेट

शेवटची भेट

3 mins
450


      माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आणि माझ्यावर जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आजी होती. आजी म्हटल की सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आजीच नाव जरी काढल तरी प्रत्येकाला आपल बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. माझही तसच आहे. माझ्या लहान पणापासुन माझी आजी म्हणजे वडीलांची आई मी घरात मोठी असल्याने माझे लहानपणापासुन खुप लाड करायची. मला कधीही काही लागु देत आजी ला सांगितल ना मला ते मिळायचच.


    माझ्या बालपणात मी खुपच हट्टी होते. मला एखादी वस्तु पाहिजे म्हणजे पाहिजेच असायच.

वडीलांजवळ फार हट्ट नाही करायचे पण आजीला जे काही मागितल की ते ती मला घेउन द्यायची.

माझे आजोबा एअरफोर्समध्ये सर्व्हीसला होते. 

आजी मला लहानपणी शुरवीरांच्या आणि थोरनेते यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले त्या कथा, इतिसाहातील गोष्टी अस बरच तिच्याजवळ असलेल ज्ञानभांडार ती मला सांगायची मलाही ते ऐकताना खुप छान वाटायच. 


     लहानपणीची दिवाळी अजुनही आठवते. दिवाळी महीना असतानाच आजी मला नि माझ्या भावडांना ड्रेस घेऊन द्यायची मी तर सगळीच शाॅपिंग तिच्याकडूनच करवून घ्यायची. अजुनही आठवते मी शाळेत जाणार म्हणुन तिला खुप आनंद झाला तिने मला सगळच शालेपयोगी साहीत्य आणुन दिल. मलाही नवीन ड्रेस सगळ नवीन घेतलेल बघुन मनाला खुप छान वाटल.नंतर शाळेत जाऊ लागले तेव्हा मी हुशार होते वर्गात पहीला नंबर , एखाद्या स्पर्धेत भाग घेतला नंबर आला तिला मी सांगायचे तिला खुप कौतुक वाटायच ती दुसर्‍यांना सांगायची आणि मला काहीतरी बक्षिस द्यायची मला तिच्यामुळे प्रोत्साहन मिळायच. नेहमी सांगायची मला मुलीने कधीही शिकुन स्वतःच्या पायावर उभ राहील पाहीजे लग्नतर प्रत्येकाला चुकत नाही पण कधी काय होईल पुढे माहीती नसत म्हणून मुलीने खंबीर असायला हव आणि स्वतः च्या पायावर उभ राहिल पाहीजे. 


   आजीच्या खुप आठवणी आहेत. तिच्या हाताला छान चव होती. दिवाळीचा फराळ तर विचारायलाच नको खुप छान टेस्टी बनवायची. कुठलाही पदार्थ व भाजी असु देत तिच्या हाताने छान, चविष्ट व्हायच. मी मोठी झाले. जाॅबला लागले तेव्हा ति नाशिकला असायची. तिला भेटायाला जायचे सुट्टी असली की तीन चार दिवस आजी आजोबांना भेटायला जायचे. असेच दिवस जात होते.


     कोरोना आला. नंतर भेटण ही कमी झाल.

कुणी कुठेही जाऊ शकत नव्हते फक्त फोनवरच बोलण होत असे. त्या पिरेडमध्ये वडील तर खुपच आजारी पडले. देवाच्या कृपेने ते बरे झाले. आजी आजारी नव्हती सगळ ठीक होत ती थकली होती पण स्वतःच काम स्वतः करायची. कोरोना कमी झाला तेव्हा आजीला भेटायला जाव असा विचार करत होते. 


   तो दिवस मला अजुनही आठवतो. पंचवीस जानेवारी साधारण दोन वर्षांपूर्वी. रात्री आत्याचा

फोन आला मला ती आजीला भेटायाला नाशिकला गेली होती. आजीला थोड विकनेस वाटत म्हणून आत्याने तिला हाॅस्पिटलला नेल तशी ती बरी होती. 

मी आत्याला म्हटल तु आजीला भेटायला गेली आहे तर मी ही आजीला भेटायला ऊद्या येते म्हटल... तिने म्हटल ठीक आहे मी आहे तर ये तु ही तिलाही तुला भेटायच आहे मी हो म्हटल आणि दुसर्‍या दिवशी भेटायला मला जायच होत पण त्याच पहाटे आत्याचा फोन आला की आजी गेली आहे तर मला खुप वाईट वाटल. कोरोनानंतर तिला भेटायच होत बोलायच होत पण सगळ राहुनच गेल आमची भेट होण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती... याला नियतीच म्हणाव लागेल आपल्या हातात काही नसत. जन्म झाला म्हणजे मृत्यु एक ना दिवस एक दिवस येणारच पण कधी नि केव्हा हे आपल्याला माहीती नसत इतकच !

या सव्वीस जानेवारीला आजीला जाउन दोन वर्ष झालीत खरतर तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही कायम आठवणीत राहील.


     या वर्षी असा संकल्प केलाय की पहिल आपल्या जवळच्या माणसांना भेटायच, बोलायच आणि त्यांना वेळ द्यायचा. आयुष्याचा आपला प्रवास कधी संपेल हे कुणालाही माहीती नसत सगळ नियतीच्या हातात असत. 



Rate this content
Log in