STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Romance Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Others

गुलाबाच फुल

गुलाबाच फुल

4 mins
374


     निलेश भारतात आला होता. आज सकाळीच पहिल गणपतीच्या मंदीरात जाउन याव म्हणुन तो सकाळी बाहेर पडला. तिकडून दर्शन करून आल्यावर त्याला सुंदर, स्वच्छ आणि टवटवीत गुलाबाच फुल दिसल. त्याला खुप छान वाटल, एक फुल द्या म्हणुन त्याने ते घेतल नि आपल्या खिशात ठेवल व पुढे निघाला....


आज त्याला ती दिसली पुन्हा निशिगंधा...त्याला गुलाबाच्या फुलाची आठवण झाली. पुन्हा ते सोनेरी दिवस आठवले. आजही तशीच दिसत होती जशी पहील्यांदा काॅलेजमध्ये बघितली होती तशीच अगदी, दिसायला खुपच सुंदर कुणीही बघताक्षणी तिच्या प्रेमात पडेल अशी, पाच फुट ऊंची, गौर वर्ण, सांबसडक काळेभोर केस आणि तिचे बोलके डोळे... खुप काॅलेजची मुल तिच्यावर फिदा होती. माझी मात्र तिला रोज बोलायच ठरवत होतो. 

अशीच वर्ष निघुन जात होती. मैत्री झाली होती आमच्यात पण त्याच्यापुढे बोलण कधी होत नव्हत. ती आजारी होती. पाच सहा दिवस काॅलेज बुडाल आणि तिने मग तिला माझ्याकडून नोट्स हव्या होत्या. निशिगंधा आणि माया दोघीही मैत्रीणी माझ्याकडे आल्या. मायाला जरा दुरवर थांबवून निशा पुढे नोट्स मागायला आली मी दिले. त्यादिवशीपासुन थोड थोड ती बोलायची मला मैत्रीच्या नात्याने पण मला ती आवडत होती मी तिच्या प्रेमात पडलो होतो. रोजच तिला पाहायचो. तिला पाहिल ना मनाला छान वाटायच दिवस खुप मस्त जायचा. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्या व्यक्तीला पाहण्यात एक वेगळीच सुख असत...


   शेवटच वर्ष होत. चांगला अभ्यास करायच ध्येय तर होतच पण आता तरी आपल्या भावना निशिगंधाला सांगुन टाकाव वाटल. त्यादिवशी मी गूलाबाच एक सुंदर फुल घेतल खिशात ठेवल नी काॅलेजला निघालो. मी त्यादीवशी खुप खुश होतो कारण मी पहील्यांदाच तिच्याजवळ माझ प्रेम व्यक्त करणार होतो. तस ती हि मला बघते, हसते आणि लाजत असते त्यावरुन थोडीशी कल्पना आली होती की मी ही निशीगंधाला आवडत असेल खुश होऊन एक एक पाउल पुढे टाकत होतो. ती आली असेल... आता काय बोलायय कस बौलायच तिच्यासमोर याची रंगीत तालिम तर मघापासून सुरु होती. ति ही मला होकार देईल यामुळे मनात फुलपाखरे उडायला लागली होती. पुढे गेल्यावर माया एकटीच दिसली मला. निशीगंधा ला खुप शोधल ती काही दिसली नाही. सगळ काॅलेज पालथ घालून झाल तरीही नाही दिसली. 


   मुलींच्या घोळक्यातुन मायाला आवाज दिला मायाला विचारल, " निशिगंधा आली नाही आज ? "


" अरे हो तुला सांगायला विसरले मी, निशिगंधाला आज पाहायला पाहुणे येणार आहेत ना म्हणुन ती आज येऊ शकली नाही ? "


" अरे व्वा छानच, काय करतो ग मुलगा ?"


" अरे तो अमेरिकेत आहे जाॅबला, चांगला सेटल आहे आणि तिच्या आत्याचाच मुलगा आहे पेपर झाले की बहुतेक ती लग्न करून तिकडेच जाईल "

, माया अस मला सांगुन निघून गेली.


" त्या क्षणी माहीती नाही

निशिगंधाला चांगला नोकरीवाला मुलगा आणि ते ही परदेशात मला खर तर खु आनंदही झाला आणि दुःखही झाल की तिला मी माझ्या मनातल सांगू शकलो नाही. खुप कसतरी वाटल त्याक्षणी घेतलेल गुलाबाच फुल तसच खिशात ठेवल आणि काॅलेज संपल्यावर घरी निघालो. वाटेतच नदी लागते. तिथे जाऊन थोडा वेळ शांत बसलो... थोड्यावेळाने घरी गेलो. माझी डायरी होती ते घेतल आणि त्यात ते फुल ठेवून दिल. म्हटल ती नाही भेटली म्हणून काय झाल पण अव्यक्त पहिल्या प्रेमाची आठवण म्हणुन कायम माझ्याजवळ असेल.


    त्यानंतर निशिगंधाला एकदा बघितल. तिच लग्न झालेल होत. ती खुप खुश दिसत होती. त्या दिवशी मलाही तीला इतक खूश बघुन आनंद झाला. माझी काळजी मिटली. पण ते फुल बघितल की मला अजुनही तिची आठवण येते. नंतर माझही लग्न झाल. मलाही नोकरी मिळाली. मलाही चांगली, मला समजुन घेणारी बायको मिळाली. छान संसार सुरू होता. आमच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. सगळ छान मस्त आनंदात सुरू होत. मुल लहान असतानाच मधुराणी मला सोडून गेली. नंतर मुलांच शिक्षण, सगळ करता करता माझा वेळ यातच गेला. मी कधीही दुसर्‍या लग्नाचा विचार केला नाही. मुल मोठी झाली, लग्न झाली दोघेही परदेशात सेटल झाली. तिकडेच त्यांच वास्तव्य असत. कधीतरी येतात भेटायला मी ही जात असतो. 


" अरे ये निलेश तुझ लक्ष कुठे आहे. मी कधीची तुला मागुन आवाज देते... ", निशिगंधा.


" निशा तु आणि इकडे कशी ? " , निलेश तिला विचारतो. तिला बघुन खुप खुश झालेला असतो.


" निल्या, काय बाबा तु तर ओळख द्यायलाही तयार नाही. मी आवाज देत आहे आणि तु पुढे जात आहे. एक म्हणू निल्या, तु काही बदलला नाहिस बघ... जसा काॅलेजमध्ये होतास ना अगदी आजही तसाच आहे बघ " , निशा अस बोलुन हसत होती. निलेशलाही छान वाटल अरे व्वा म्हणजे मी हिला तेव्हाही आवडत होतो तो मनातच विचार करत होता....


" निशा, तु ही जशी आहेस अगदी तशीच आहेस की फक्त थोडस वय वाढलय पण ते तुझ्याबाबतीत कुठेही दिसुन येत नाही " , निलेशने अस म्हटल्यावर ती हि मोकळेपणाने हसायला लागली.


    दोघेही खुप गप्पा मारतात. एकमेकांच्या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल सांगतात. पुढे निलेशला वाटत होत, आता तरी माझ्या मनातल तिला सांगाव का ? पण तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि ती बोलू लागली. मी खिशातल आज घेतलेल गुलाबाच फुल तिला देऊन बोलू का माझ्या मनातल अस विचार करत असतानाच निशा म्हणाली.


" निल्या, अरे आता मी इकडे आली आहे भारतात तर भेटु पुन्हा कधीतरी... " 


" हो चालेल काही हरकत नाही अग ये निशा चल मी तुला रिक्षात बसवून देतो आणि जपून जा " 

निशाला सोडून निलेश परत घरी जायच्या वाटेकड निघतो आणि म्हणतो...


" आजही तेच झाल... मी बोलूही शकलो नाही आणि गुलाबाच फुल माझ्या खिशातच राहील... "


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance