शब्दसखी सुनिता

Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

जन्म

जन्म

3 mins
231


केशव आणि सारीका दोघेही बहीणभाऊ लहानपणापासुन खुप हूशार असतात. आईवडील ही दोघांचे खुप लाड करायचे. बहीण - भावाच नात लहानपणापासून खुप घट्ट होत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नसे. सारिका मामाच्या गावी कींवा ट्रीपला गेली की केशवला खुप एकट वाटे. दोघेही लहानअसताना खुप भांडायचे, एकमेकांच्याखोड्या काढणे, चिडवणे सूरू असायच.जसे मोठे झाले तसे दोघांच नात आणखीनच घट्ट झाल. काही दिवसांनी शिक्षण वगैरै झाल्यावर सारीकाच लग्न झाल. तिला छान जीवनसाथी आणि घरदार चांगल,चांगली माणस मिळाली. सारीका सासरी खुप आनंदात होती. केशवही शिक्षण घेऊन नोकरीला लागला होता.त्यांच्या आईवडीलांना आता मूलांच कसलही टेन्शन नव्हत राहील. दोन्ही मुलांची लग्न होउन दोघांचा छान संसार सुरू होता. सारीकाचा संसार छान सुरू होता. माहेरी कधीतरी भेटायला यायची.तिलाही दोन मूले होती. सगळ छान आणि मस्त आनंदात दिवस चालले होते.सारीकाची तब्येत अचानक खराब झाली. ती तब्येतीमुळे आजारी असायची. हाॅस्पिटलला जायची. बरी व्हायची पुन्हात्रास सुरू व्हायचा. मग डाॅक्टरांना किडनी ठिक असेल की नाही शंका यायला लागली तर त्यांनी सर्व तपासण्या केल्या. तेव्हा वैद्यकिय तपासणीमध्ये असे आढळून आले की, सारिकाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. लवकरच किडनी प्रत्यारोपण करणे गरजेच असल्याच डाॅक्टरांनी सांगितल तस सारिकाच्या दोन्ही परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. 


     सारीका तर हे सगळ ऐकून खचुन गेली. कारण तिला दोन शाळेत जाणारी लहान मुले होती, परिवार होता. कस होणार माझ काही झाल तर हा विचार तिच्या मनामध्ये यायला लागला, तेव्हा केशवने मन घट्ट केले आणि आपल्या बहीणीशी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. तिचे मिस्टरही किडनी साठी खुप प्रयत्न करत होते. 

पण वेळेला काही होत नव्हत. मॅच होत नव्हती. सारिकाची तब्येतही ठीक नव्हती आणि पुढचा विचार करता लवकर काहीतरी निर्णय घेण आणि किडनी प्रत्यारोपण करण गरजेच होत त्यामुळे डाॅक्टरांनी डाॅक्टरांनी सांगितले की रक्ताच्या नात्यातील व्यक्तीही किडनीदान करू शकतात. आपल्या मुलीला या अवस्थेत आईवडील जिवंतपणी बघुच शकत नव्हते त्यांनी मुलीला कीडनीदान करण्याच ठरवल परंतु दोघांना मधुमेह असल्यानेआणि इतर काही गोष्टींमुळे डाॅक्टरांनी त्यांना तुम्ही कीडनी देऊ शकत नसल्याच सांगितल. आपल्यासमोर आपल्या बहीणीची ही हालात केशवला बघवत नव्हती त्याने बहीणीला कीडनी दान करण्याचा निर्णय घेतला सुदैवाने दोघांची कीडनी मॅच झाली. डाॅक्टरांनी लवकरच सारिकावर शस्रक्रीया करून किडनीचे प्रत्यारोपण केले. दोघांची ही प्रकृती सुधारत होती. एक आठवड्याने केशव ऑफीस जाॅईन करू शकतो अस डाॅक्टरांनी सांगीतल आणि सारिकाला काही दिवस त्यांनी रेस्ट करण्याचा सल्ला दिला व काळजी घ्यायला लावली. केशवने सारिकाला सांगितल की," तु यापुढे फक्त तुझी काळजी घे आणि हा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी असेल "

तेव्हा तिचेही डोळे भरून आले. भावाने बहीणीला स्वतःची एक कीडनी देऊन नवीन जीवन दिले. तिलाही हळूहळू बर वाटु लागल. काही महीन्यांनी सारिकाची प्रकृती सुधारली. तिला नवा जन्मच मिळाला होता. ती परत आपल्या मुलांसोबत नव्याने जगायला शिकली.


  या जन्मावर... या जगण्यावर शतदा प्रेम करावे... या कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील ओळी किती छान आहेत ! आपल आयुष्य खुप सुंदर आहे.आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत. आयुष्य ही देवाने आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे. त्यामुळे आयुष्य मस्त... आनंदात रोजचा दिवस जगल पाहीजे. माणुस जन्माला येतो, तेव्हा त्याला नाव नसत. फक्त श्वास असतो... आणि मरतो तेव्हा फक्त नाव असत. श्वास नसतो. यांच्यामधील अंतरम्हणजे ... " आयुष्य ".माणसाला मनुष्य जन्म एकदाच मिळतो. जन्माला आलो म्हणुन आयुष्य रेटायच की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य छान, मजेत, आलेला दिवस आनंदाने जगायचा हे ज्याच त्याच त्यानेच ठरवायच असत.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational