Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Pranjali Lele

Inspirational


3.5  

Pranjali Lele

Inspirational


आत्मशक्ती

आत्मशक्ती

4 mins 951 4 mins 951

स्वराचा आज कॉलेजचा पहिला दिवस होता. इतके वर्ष अनुभवलेल्या शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणातून आणि त्या स्कूल युनिफॉर्म मधून बाहेर पडून तिला आज अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होत. कॉलेजच्या खास पहिल्या दिवशी घालायला घेतलेल्या त्या ड्रेस मध्ये स्वरा छानच दिसत होती. तिच्या शाळेतील जवळच्या दोघीही मैत्रिणींनी त्याच कॉलेजला एडमिशन घेतल्याने तिला एकटे पणाची भिती अशी फार वाटत नव्हती. तिघीही आज एकत्रच कॉलेजला गेल्या आणि मस्त धमाल करून आल्या.


घरी आल्यावर आईला कॉलेज बद्दल किती सांगू नी किती नाही असे तिला झाले होते. हळूहळू ती कॉलेज मध्ये छान रुळली. रोज कॉलेज चे नवनवीन किस्से ती आईला घरी आल्या आल्या सांगत असे. पण स्वरा आज मात्र कॉलेज मधून घरी आली तेव्हा नेहमीच्या गोड आवाजात तिने आईला हाक मारली नाही उलट काही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली. स्वाती ने तिचे पान वाढले आणि तिला जेवायला बोलावले तर बाईसाहेब आज भूक नाही म्हणत चक्क झोपल्या होत्या. मग आईने पण ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोपू दिले.


खरतर आज स्वराचा मूड पार गेलेला होता. गादीवर पडता क्षणीच तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकले. नेहमी प्रमाणे कॉलेज आटोपून बाहेर पडताच गेटच्या बाहेर चार पाच धटिंगण मुलांचं टोळकं उभ होत आणि या मुलींना बघून त्यांनी अश्लील हावभाव करत मोठ्याने गाणी गात चिडवू लागले. स्वरा आणि तिच्या मैत्रिणी घाबरतच तिथून भरभर निघाल्या. 


आज वर शाळेच्या शिस्तप्रिय वाटणाऱ्या पण सुरक्षित अश्या वातावरणात त्यांनी असले काही अनुभवले नव्हते. असले प्रकार कॉलेज मध्ये सर्रास चालतात हे त्यांनी ऐकले होते पण एकूणच त्यांचे कॉलेज चे वातावरण छान असल्याने त्यांना आतापर्यंत असले काही अनुभव आले नव्हते. कॉलेज बाहेर मात्र कुठून कुठून बाहेरची मुले येऊन उभी रहात असे. आणि असलच एक टोळकं हल्ली रोज दिसायला लागलं होत. आणि मुलींना त्रास देण्याचे या मुलांचे चाळे रोजच चालू झाले होते.. आणि कुणी ना कुणी मुली यांच्या आचरटपणाला बळी पडत होत्या.


आज स्वराच्या ग्रुप वर ती पाळी आल्याने त्यांना फारच राग आला होता पण ती मुले कुणालाच जुमानत नव्हती..त्यांचे कॉलेज बाहेर प्रस्थ फार वाढले होते त्यामुळे त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या नाही साहजिकच या सर्व गोष्टींमुळे स्वरा फार भांबावली होती.

 

कुठल्याही अन्यायाविरुध्द सक्षमपणे उभे राहिले पाहिजे हीच शिकवण आज वर तिला घरून आणि शाळेतून मिळाली होती. पण प्रत्यक्षात मात्र असा प्रसंग आला असता ती काहीच करू शकली नाही उलट तिच्या मैत्रिणी सारखीच ती पण फार घाबरली होती.


डोळे मिटता मिटता तिच्या मनात विचार आला खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असती ना तर आज त्यांना चांगला धडा शिकवला असता असा विचार करतच ती झोपी गेली आणि काय आश्चर्य तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे आणि आज कॉलेज मधून निघताना तिने त्या टोळक्याला मुलींना चिडवताना बघताच अदृश्य होऊन त्यांना चांगला चोप दिला आणि परत कधीही असे न करण्यास बजावले. ते टोळकं घाबरून तिथून पळूनच गेलं. सगळ्या मुलींना पण खूप हायसं वाटलं.


ते बघून ती खूपच आनंदली आणि तेव्हाच तिला जाग आली. आपले स्वप्न आठवून तिलाच तिचे हसू आले आणि आपण स्वप्नात त्यांना कशी चांगली अद्दल घडविली हे आठवून ती एकदम सुखावली. तेवढ्यात आईने तिला जेवायला बोलाविले. आता मात्र स्वरा चा फ्रेश मूड बघून आईने हळूच तिला आजच्या दिवसाबद्दल विचारले तेव्हा स्वरा ने आईला आजचे कॉलेज बाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न आईला सांगितले.


तिचे बोलणे ऐकून आई तिला म्हणाली, स्वरा तुला असं का वाटतं की आपल्याकडे मुळात काही शक्ती नसते आणि मुलगी म्हंटले की ती दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुध्द लढायला मुली सक्षम नसतात. असे जर खरे असते तर झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या सारख्या स्त्रियांचे कर्तुत्व आपणास ऐकायला मिळाले नसते. या सर्व थोर विरांगणानी आपल्या आचरणाने हेच सिद्ध केले की ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना दुबळे, असहाय्य समजले त्या सर्वांना स्त्रीशक्ती समोर आपले हात टेकवावे लागले. एवढ्या कर्तृत्ववान स्त्रियांचे उदाहरण आपल्या समोर असताना तुला भिती कसली वाटते?


मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलांना तू एकटीने सामोरे जाऊ शकत नाहीस पण एकजुटीने मात्र निश्चितच अश्या अन्यायाविरुध्द सामना करण्याचे बळ आपल्यात नक्कीच येत. गरज असते ती आत्मविश्वासाने लढण्याची.. इतर मुलीनं सारखे आपण देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकीने विचार केल्यामुळेच असल्या वाईट प्रवृत्त्ती उफाळतात. 


तुला स्वप्नात अदृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खुश झालीस आणि अन्यायाविरुध्द दटके सामना केलास. अग पण प्रत्यक्षात तुझ्यात असलेल्या आत्मशक्ती ला तू विसरते आहेस..त्याचे बळ खूप मोठे आहे. स्वतः ला जोपर्यंत दुबळी, असहाय्य समजशील तोवर तुला तुझ्यात दडलेली आत्मशक्ती गवसणार नाही. म्हणून तिला ओळख आणि निर्भयपणे अन्यायाविरुध्द लढ. 


सर्वांनी मुग गिळून बसल्यास काहीच साध्य होणार नाही उलट त्या मुलांची त्रास देण्याची वृत्ती बळावेल. उद्या सर्व मैत्रिणी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर कल्पना द्या. ते नक्कीच यातून मार्ग काढतील. असं घाबरून कुठवर सहन करणार... आईशी बोलल्यावर स्वरा ला खूप धीर मिळाला आणि तिच्या मनातली भिती जाऊन तिचा आत्मविश्वास वाढला. तिच्या विचारांना आईने नवी दिशा दिली होती. यापुढे आपल्या आत्मशक्तीच्या बळावर कुठल्याही अन्यायाविरुध्द सक्षमपणे लढण्यास ती सज्ज होती.


Rate this content
Log in

More marathi story from Pranjali Lele

Similar marathi story from Inspirational