शब्दसखी सुनिता

Romance

3.8  

शब्दसखी सुनिता

Romance

अबोल प्रेम

अबोल प्रेम

5 mins
166


     आयुष्यात पहिल प्रेम कधी कुणावर होईल सांगता येत नाही. आपल्याला जी व्यक्ती मनाला आवडते ना तिच्यावर प्रेम होत. अशीच एका संध्याकाळी मि ऑफिसमधुन येताना ति मला दिसली. माझी गाडी आज नेमकी सर्व्हिंगला दिली होती. मला रिक्षाने जायच होत आणि मी रिक्षाची वाट बघत होतो. ति ही तिथेच उभी होती. माझ लक्ष राहुन राहुन तिच्याकडे जात होत का या प्रश्नाच उत्तर तेव्हा माझ्याकडेही नव्हत. ती होतीच तशी साधी, पाठीवर लोंबणारे मोकळे केस,

तिला पहील्यांदा पाहील आणि मी तिच्यातच हरवून गेलो. तिही मला जायच होत मी थांबवलेल्या रिक्षावाल्याला विचारत होती आणि मी तिच्याकडे पाहत... रिक्षावाल्याने मला विचारल तेव्हा मी भानावर आलो.

" साहेब आपल्याला कुठे जायचय ? "

" मला साईरत्न रेडिडेन्सी " जवळ सोडाल का "

" हो बसा ना साहेब ", रिक्षावाला.

" अहो काका मलाही तिथेच जायचय मला पण

सोडाल का ? " , ती रिक्षावाल्या काकांना विचारत

होती.

" मॅडम या साहेबांना विचारा तुमच्याआधी त्यांनी रिक्षा बोलवली होती " , रिक्षावाला.

" हो हो मला काही प्राॅब्लेम नाही " , मी म्हणालो.

तेव्हा थँक यु म्हणत ति माझ्या बाजुला बसली. मी ही वेलकम म्हटलो आणि मोबाइलमध्ये बघत होतो. उगाच तिला माझ्यामुळे ऑकवर्ड वाटायला नको म्हणून तशी ती स्वभावाने छान वाटत होती. जरावेळ गेला असेल तिनेच विचारल.

" तुम्ही नवीन आहात का ? " , ती

" हो मी नवीन आहे माझी बदली झाली तसे आईवडील आधीपासुन राहतात या सोसायटीत आमच स्वतःचा फ्लॅट आहे.आणि तुम्ही ?? मी तिला विचारल.

" मी खुप वर्षांपासून राहते " , ती.

    इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये त्यांची सोसायटी आली कधी त्यांना कळल नाही. तिला घाई असावी ती थँक यु पुन्हा म्हणून पटकन चालत निघून गेली मी मात्र तिच्याकडेच पाहत राहिलो.


      आज घरी आल्यावर आईला सार्थक आनंदी

दिसत होता. खुप वर्षांनंतर त्याच्या चेहर्‍यावरच

हे तेज त्या बघत होत्या. त्याचे बाबा गेल्यानंत

सगळ घरदार, सगळी जबाबदारी त्याने उचलली.

सगळ छान सुरू होत. एकच त्याच्या आईला

कुळत नव्हत त्या सार्थकच लग्नाच वय झाल

म्हणून मुली शोधायच्या, नातेवाईकांकडे चौकशी

करायच्या. पण काही ऊपयोग नव्हता त्यांचे

कष्ट वायाला जायचे कारण सार्थक म्हणायचा,

" ये आई ग मला नाही लग्न करायच " पण

अस म्हटल तरी त्या काही थकत नव्हत्या.

सार्थकला आनंदी पाहुन आज त्याचा मुड छान

होता, म्हणून आईने सहज आपल विचारल,

" सार्थक काय झाल आज खुप खुश आहेस ?

कुणी मिळाली की काय ? "

" ये तुला ग कस माहीती कुणी भेटली म्हणुन "

सार्थक.

" अरे मी तुझी आई आहे बाळा मला सगळ कळत

तुझ काय चालल नि काही नाही ते समजल

का ? " , आई.

" हो ग आई मला आज माझ्या स्टाॅपच्या पुढे मी

आज रिक्षासाठी थांबलो होतो तिथे एक मूलगी

दिसली. दिसायला साधी होती पण त्या साधेपणात

ही ती खुप सुंदर दिसत होती " , सार्थक आनंदाने

तिच्याविषयी आपल्या आईला सांगतो.

" अरे सार्थक बर झाल बघ माझी काळजीच

मिटली आता... तुला जी कुणी भेटली ना ती तुला

आवडली आहे ना... " , आई देवाचे आभार

मानते.

" आई अग ये आई कुठुन कुठे पोहचलीस लगेच

अग मी फक्त तिला एकदा बोललो आम्हांला

अजुन एकमेकांविषयी काही माहीती नाही परत

भेटु की नाही हेही नाही माहीती आणि तु लागली

लगेच लग्नाची स्वप्न बघायला "

" हो का नको बघायला... तु काय म्हातारा

झाल्यावर लग्न करणार आहेस का ? तुझ्या

बरोबरीची मित्रांची लग्न झालीत... " आईने

अस म्हटल्यावर सार्थक गप्पच बसला. एवढ

बोललो आम्ही एकमेकांशी पण नाव नाही

विचारल अरे यार माझ्याकडुन नावच विचारायच

राहील की असो... परत कधी भेटेल ती माहीती

नाही.

            त्यादिवशी मानसीला पाहिल्यापासून

सार्थक तिच्या प्रेमात पडला होता. कधीतरी

त्यांच बोलण व्हायच. मानसीला ही सार्थक आवडत होता. तो फार बोलत नसे. त्याचा स्वभावच तसा होता. आपल्यामुळे बोलण्यामुळे

मानसीला कुणी बघितल तर तिला प्राॅब्लेम नको

या विचाराने कित्येकदा ती सोसायटीत समोर

येऊन ही हा तिला टाळत असे. नंतर त्याच

त्यालाच वाईट वाटायच. आई मात्र रोज विचारायची तिच्याविषयी... तो त्याला सांगायच

तेवढच सांगायचा, आणि ती याच सोसायटीत

राहते हे मात्र सार्थकने आईला सांगितल नव्हत

कारण आई लगेच त्यांना लग्नाच विचारायला

जाईल. त्यात मानसीला मी आवडतो की नाही

माहीती नाही पण तिला दुसरी व्यक्ती आवडत

असेल तर आपण विचारल्यामुळे तिने लग्नाला

हो म्हणेल हे अस सार्थकला नको होत.

    असेच सहा महिने निघून जातात. सार्थकला

मानसी कधी कधी अशीच स्टाॅपवर कींवा कुठेतरी

भेटायची, स्माईल करायची आणि बोलायची

असेच दिवस जात होते. सार्थक मानसीवर प्रेम

करू लागला होता, त्याला ती आवडत होती.

आता त्याच लग्नाच ठरल होत. आपल्याला

लाईफ पार्टनर म्हणून मानसीसारखीच हवी हे

त्याच मनात पक्क झाल होत. तो त्याच्या मित्राला

ही गोष्ट सांगतो. तेव्हा त्याचा मित्र त्याला

म्हणतो, " वेळ न घालवता तिला प्रपोझ कर

आणि लग्नासाठी विचार... " , तेव्हा तिच

काय आहे ते तुला कळेल. सार्थकला हे बोलायची

हिम्मतही नव्हती. कारण तो कधीच मुलींना

बोलत नव्हता. पण मानसीवर मनापासुन प्रेम

असल्याने तो तिला प्रपोझ करायच ठरवतो आणि

त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करायच ठरवतो.

     अशीच एका संध्याकाळी तो ऑफिसमधुन

सुटल्यावर मानसी त्याला भेटली. ती खुप बिझी

दिसत होती. तिनेच त्याला थांबवल... त्याला

खुप आनंद झाला. तो ही उत्सुक होता तिला

मनातल सागळ सांगायला. त्यादिवशी तिनेच

पुढाकार घेत म्हटल, " आज तुला माझ्याकडून

काॅफी, चल ना आपण जाउया जवळच आहे

काॅफी शाॅप " सार्थकनेही लगेच होकार दिला.

त्यालाही उत्सुकता होती आज मानसी आपल्याला

काय सांगते.

    दोघे काॅफी शाॅप मध्ये पोहचतात. तिथे आधी

गप्पा होतात, सोबत काॅफी घेतात. दोघांनाही

एकमेकांची सोबत हवी होती. छान वेळ चालला

होता. ती त्यांची पहीली भेट. काॅफी घेऊन

झाल्यावर सार्थक म्हणतो,

" मानसी तुला काही सांगायच होत ना, पण

मलाही तुला काही सांगायच आहे " , सार्थक

" ये सार्थक आधी मी सांगणार आणि मग तु

सांग... लेडीज फर्स्ट हा... " , मानसी हसत

म्हणते.

" बर तु बोल आधी " , सार्थक शांतपणे म्हणतो.

" अरे मला तुला सांगायच होत बघ माझ

लग्न ठरलय... पुढच्या महीन्यात लग्न आहे.

तु नक्की यायच... " , मानसी एका दमात बोलून

गेली. क्षणभर तर सार्थकला काय बोलाव काही

सुचेना. हा पण तिच्या चेहर्‍यावर आनंद दिसत

होता. ति खुश दिसत होती. यातच सगळ आल.

मला माझ प्रेम नाही मिळाल पण मानसी

आनंदी आहे तिच्या आनंदातच माझा आनंद

आहे.

स्वतःला थोडस सावरत मोठ्या मुश्किलीने

सार्थकने हो म्हटल नक्की येईल. तिला उशीर

होत होता म्हणुन मानसी निघून गेली आणि

सार्थक ती नजरेआड होईपर्यंत तिलाच पाहत

होता. आज नंतर तो अस पाहू शकणार नव्हता.

कारण आता ती दुसर्‍या कुणाची तरी होणार

हे सार्थकला पचवण कठीण झाल होत पण

मानसीला आनंदी पाहून तो रडायचा थांबतो.

त्याच प्रेम अबोलच राहिल.

आज सोसायटीत आल्यावर परत पहील्यापासुन

सगळ आठवत होत सार्थकला... त्याला आज

एक गोष्ट समजली होती. आपल कुणावर प्रेम

असेल ना... आपल्या मनातल्या भावना त्या

व्यक्तीजवळ व्यक्त करायला इतकाही उशिर

करू नये की ती व्यक्ती दुसर्‍याची होईल.

 (समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance