End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Abasaheb Mhaske

Romance


2.3  

Abasaheb Mhaske

Romance


अस्तित्व माझ्यासाठी श्वासाइतक

अस्तित्व माझ्यासाठी श्वासाइतक

2 mins 23.2K 2 mins 23.2K

    हल्ली तुझं अस्तित्व माझ्यासाठी श्वासाइतकंच अनिवार्य झालंय. तू काहीही समज पण... माझं आख्ख आयुष्यच व्यापून टाकलंय तू... तुझं असणं - नसणं माझ्यालेखी दखलपात्र कसं ? काही - काही कळेनासं झालंय. माझ्या नीरस, सपक आयुष्यात तू आलीस अन माझ्या समग्र जीवनच बदलून गेलं... रखरखीत उन्हात श्रावणसरी बरसून जाव्या आणि चोहीकडे हिरवळ दातांची अगदी तसंच काहीस झालं... तुझं लाघवी बोलणं. खळाळून हसणं. रुसणं.. मनवता पुन्हा बाहूपशात विलीन होणं सार - सारं विलक्षणच.. तू आलीस माझी झालीस नकळत माझ्याही... स्नेहबंध जुळले. एक घट्ट नातं बनलं ते कायमचंच... या निनावी नात्याला कशाचीही गरज भासत नाही कि स्वार्थाचा लवलेश ही नाही.. सर्वकाही पवित्र, प्रेमळ, उत्तरोत्तर वाढत जाणार... आश्वासक सुख-दुःखात देखील  सोबत करणार.  जशी माझी लेखणी माझी सोबत करते तशी तू हि प्रेरणादायी माझ्यासाठी .. लेखणी आणि तू माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी तर आहातच पण मार्गदर्शकही होता कधी कधी .. मी कोलमडून जातो तेव्हा दोघीही धावून येता आणि माझ्या नकळत मला नवसंजीवनी देऊन जाता. मी सदैव आनंदित राहावं असाच वाटत असावं कदाचित दोघीनाही ... ती आस्थेने चौकशी करते तर लेखणी सावलीसारखी सोबत करते .. खरंच कसं फेडावं मी ऋण तुमचं दोघीच ... तुम्हीच दाखवता मला आशेचा किरण .. आणि अंकुरता माझ्या मनात अंकुराणारा कोंब बनून .. जगण्यास उभारी देता ... लेखणी होते माझी पाठराखी तशी तुही जपतेस माझ्या भावना तळहातावरच्या फोडासारख्या ....

 

   आठवण तुझी आल्यावर मी होतो वेडापिसा , निष्प्रभ तेव्हा लेखणी येते मदतीस धावून ...तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा , हव्याहव्यशा आठवणींची शिदोरी आनंद देऊन जातात मला.. तर कधी लेखणीतून ताज्या होतात त्या तू दिलेल्या जखमा नव्याने भळभळतात , रक्ताळतात ... तेव्हा लेखणीच त्यावर हळुवार फुंकर घालून मला सावरते . हे कसलं नातं तुमच्या दोघीमधलं अनाकलनीय .. घट्ट ? जखमाही देता आणि त्यातून सावरण्याचा बळी तुझीच देता ? लेखणी होईतो गुलाम कधी कधी तिची आणि तिचीच भाषा बोलू लागते तर कधी विरह . मनाची सल, मनाची घालमेल बिनदिक्कत .. बिनधास्त व्यक्त करते . एवढं मात्र नक्की कि तुमचे दोघीचेही काही लागेबांधे नक्कीच आहेत कारण दोघीही माझ्याशी नाते टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता तसे माझ्या सुख - दुःखात सदैव सोबत करता ...माझा नि तुमचं हे नातं अतूट . चिरकाल टिकणार ... माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार , जीवघेणं तर कधी हवंहवंसं ...प्रेरणादायी , नवसंजीवनी देणारं ....


Rate this content
Log in

More marathi story from Abasaheb Mhaske

Similar marathi story from Romance