खूप काही लिहायचे ...
खूप काही लिहायचे ...


खूप काही लिहायचे बाकी
शब्दांच्या पलिकलंडले
अनावधानाने राहून गेलेले
तर कधी भावनेतून वाहून गेलेले
खूप काही लिहायचे बाकी
तू न बोलताही सांगितलेले
मी कधीच नाही देऊ शंकत
अजाणतेपणे असे जे मागितलेले
खूप काही लिहायचे बाकी
गाव ते भावविभोर स्वप्नाचे
क्षणार्धात होत्याचे नव्हते झालेले
जे कधीच नव्हते आपुले ओघळलेले
खूप काही लिहायचे बाकी
तुला तसच मलाही कधीच न आवडलेलं
नकळत ,नाईलाजास्तव का होईना पण घडलेलं
उघड गुपित ते प्रेम विरह वेदनांनी बिघडलेलं
खूप काही लिहायचे बाकी
जणू प्रेम अवखळ निरागस मुलं अंगणी
दुडू - द
ुडू धावत यावं विलीन व्हावं मातेशी
तीच ओढ जुनीच खोड भूल ही न उमगलेली
खूप काही लिहायचे बाकी
रीतीभाती जागरहाटीच सिमोलंघन
न करताही मलाच सांगायचं हितगुज
दोघांमध्यला नात्यांचं असून नसल्याचं
खूप काही लिहायचे बाकी
वेळेअभावी राहून गेलेलं
जाणून बुजून दुर्लीक्षित केलेलं
दुरावा निर्माण होऊन न देता
खूप काही लिहायचे बाकी
आचारसंहीता डावलून नसत सांगायचं म्हणून
खूप काही घडून गेलेलं ,भावलेलं तरीही
आयुष्याचं पुस्तक अर्धवट लिहलेलं
खूप काही लिहायचे बाकी
तू माझ्यासाठी असून अडचण
नसून खोळंबाच कशी काय होतेस
न सुटलेलं कोडं अनाकलनीय