पारावरच्या गप्पा
पारावरच्या गप्पा
दिवस कामधंद्याचे असले तरी पारावार गर्दी होतीच
मुका सदा, आफाट बाबूराव , फेकुचन्द अच्छे दिनवाले
बेरकी नाना पहेलवान, रिकाम टेकडे हा-या - ना-या
त्याच्या नुसत्या उपचापती चालू होत्या रोजच्याप्रमाणे
पाटलाचा किसना लगबगीन जाताना पाहून
नानाने आवाज दिलाच अरे ये किसना कुठ निघाला ?
चाल्लो म्हसनात यतु का। च्यायला नस्त्या चांभार चौकशा
काम ना धंदा हरी गोविंदा किसने बड़बड़ला ,सगळीकडे हशा पिकला
ह्यांचा रोजचाच खेळ कुणी दुर्लक्ष करत कुणी रागावत
एवढ्यात आफत बाबूराव बोलता झाला