प्रीत तुझी माझी जगावेगळी...
प्रीत तुझी माझी जगावेगळी...


प्रीत तुझी माझी जगावेगळी...
तू शर्मिलीसी थोडीसी हळवी हळवी
मी ही तसाच अबोल थोडा थोडासा
दिवस कसे सरत गेले कळलेच नाही
प्रीत तुझी माझी जगावेगळी...
तू होतीस निष्पाप निरागस कळी
मी ही होतोच थोडा घमंडी
शेवटी भीती ज्याची तेच झाले
प्रीत तुझी माझी जगावेगळी...
तुला वाटले मी अगोदर का म्हणून ?
मला वाटले चांगल्या मैत्रिणीला मुकेल
प्रेम बीम असेल नसेल कुणी सांगावं ?
प
्रीत तुझी माझी जगावेगळी..
होतीस तू थोडीसी अल्लड ,मनमिळावू
मी मात्र सरळमार्गी नाकासमोर चालणार
दुसरे तरी होणार काय ? वेळ अशीच निघून गेली
प्रीत तुझी माझी जगावेगळी..
ते वयच असं होत ग अजाणतेपणाचं
केवळ आकर्षण , मैत्री की खरं प्रेम ?
काही - काही कळलंच नाही शेवटापर्यंत
प्रीत तुझी माझी जगावेगळी..
होकार नकार काहीही असो पण
तू माझं पहिलं -वहिलं प्रेम होतीस
तू भलेही समज वेडेपणा की आणखी काही