Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Abasaheb Mhaske

Tragedy


3  

Abasaheb Mhaske

Tragedy


प्रेमळ , दिलदार माणूस शेखर अवचार दाजी

प्रेमळ , दिलदार माणूस शेखर अवचार दाजी

2 mins 181 2 mins 181

खरं सांगतो मित्रहो... मी इतका भावुक सहसा होत नाही

कानावर विश्वास बसत नाही वास्तव असे जीवघेणे भयानक

काय लिहावं काय नाही ,काही काही सुचत नाही यावेळी

हात थरथराताहेत त्वचेलाही फुटेल वाटत शब्दांची धुमारे ...


नावाप्रमाणेच तुम्ही शिखर होतात दोस्तीच्या दुनियेत

संसाराचा सुवर्णमध्य साधताना कधीच धुसफुसत नव्हता

मी टाकलेला कोणताही शब्द अलगद झेलायचात तुम्ही

किती माफक होत्या तुमच्या इच्छा - आकांक्षा जीवनाविषयी


आता मनाची घालमेल ,घुसमट कोण ऐकेल आमुची

स्थळकाळाचे कसलेच बंधन आड़ येत नव्हते कधी

आता कुठे शोधून तुम्हाला ? कसा फोन करू ?

नाहीच विसरू शकनार दाजी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत   


कालरातींन इतक निष्ठुर व्हाव ? क्षणात होत्याच नव्हत झाल

श्वास थांबला संपला प्रवास ,जीवभावाचा मित्र हिरावून नेला

असं अचानक निघून जायला नको होतं गड्या मित्रा ... 

मनातलं सारं काही सांगायचास नेहमी घाईत आसायचास

 

नेहमी हसतमुख, कार्यमग्न थोरला भाऊच मला वाटायचास

घड़ीभराची उसंत मिळाली नाही तरीही कधी कुरबरला नाहीस

दोन निरागस निषाप मूलांना प्रेमळ माझ्या ताईला असाच गेलास

आमच्यासारख्या प्रेमाच्या जिवाभावाच्या मित्रांना वाऱ्यावर सोडून


म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला

मनाला चटका लावून गेलात दाजी तुम्ही अख्या गावाचे

मी चिडता, रागावता अनेकदा नेहमीच समजून घेतलंत

तुम्ही आमच्यासाठी नेहमीच दुःहखनिवारक तारणहार 


असं अचानक निघून जायला नको होतं दाजीबा, मित्रा ...

भेटायचं होत बोलायचं होत भरभरून अगदी मनातलं

पाहावं डोळे भरून नियतीला तेही मान्य नसावं कदाचीत

कुठल्या तोंडानं मित्रा ,दाजीबा तुम्हाला श्रद्धांजली वाहू ?


खर सांगू दाजी तुम्ही असं अचानक जायला नको होत

श्रीमंतीचा गर्व नव्हता की कसला मी पणा, दिलदार माणूस

आता पुन्हा दिसणार नाही तुम्ही, नाहीच उमटणार पावलाचे ठसे

पण आमच्या कायम सोबत असणार आठवणींच्या रूपात


-हृदयाच्या खोल कप्यात घर केलय तुम्ही दाजी

दोस्तीच्या दुनियेतील प्रेमळ , दिलदार माणूस

एक सच्चा दोस्त गेला अनंताच्या प्रवासास

आनंदयात्री बनून तो कायमचाच ... शामल चरणी ही श्रद्धासुमने


Rate this content
Log in

More marathi story from Abasaheb Mhaske

Similar marathi story from Tragedy