Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

बापाची किंमत तेव्हाच कळते

बापाची किंमत तेव्हाच कळते

3 mins
669


बाप म्हटले की का कुणास ठाऊक एक चित्र डोळ्यासमोर उभं राहत. नेहमीची धीरगंभीर, चिंताग्रस्त पण उसने अवसान आणून धीर देणारे अबोल परंतु डोळ्यांनीच , इशाऱ्यानी आणि हावभावातून सारं काही सांगणारा एक अभेद्य हिमालय . साहित्यातून चित्रपटातून पाहिलेला बाप प्रत्यक्ष मात्र वेगळाच असतो त्याचे चित्र रेखाटताना आईच्या महिमामंडन करतेवेळी तुलनात्मक विश्लेषण करताना बाप समजून घेताना पूर्वग्रह दिसून येतात. त्यात काही अपवाद असेलही म्हणा. पण माझ्या दुर्दैवाने म्हणा कि माझा गैरसमजही असू शकेल पण जी प्रतिमा तयार झालीय त्याव्रुन असा निष्कर्ष निघतो कि आपण सर्वानी बाप साकारताना अनावधानाने का होईना पण अन्याय केला हे नक्की खात्रीने सांगता येईल . कुणी माझा बाप हिटलर ?. कुणी बाप रे बाप डोक्याला ताप , कुणी आईचे गोडवे गाताना बापाचा सोयीस्कर अर्थ लावला आणि त्याचे त्याग समर्पण कर्तव्य कठोर होतानाची घालमेल वाचली नाही अनुभवली नाही आणि यशस्वी मुलांचे कोड कौतुक करणारी आई तर सर्वाना भावते पण .. बापाच हृदय किती आनंदाने नाचले हे चेहर्यावर वाचता येते पण ते समजण्याचे स्किल अंगी येण्यासाठी स्वतः बाप होण्यापर्यंत वाट पाहावी लागते हे आपले समज गैरसमज तेंव्हाच दूर होतात जेंव्हा आपण स्वतः बाप होतो . मुले तशी वागणूक देतात तेव्हा आपल्याला बापाचे महत्व कळायला लागते. त्याचे मोठेपण समजून त्याची धीरगंभीरता मी तितकीच हळव्या मनाची घालमेलही अनुभवास मिळते . जेव्हा मूल सहज बोलून जातात 'पपा तुम्हाला काहीच काळत नाही , तुम्ही काय केल आमच्यासाठी ? तेंव्हा तो मेल्याहून मेल्यासारखं होतो . वेदनांनी तळमळतो . तेंव्हाच त्याला आपला बाप आठवतो आणि त्याचे कर्तृत्व महत्व आणि हळवे मनही . पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.


बाप कसलीही अपेक्षा न ठेवता हाडाचे काड करून शिकवतो मोठे करतो , पोटापाण्याचा लावतो . हौस मौज पुरविण्यासाठी ऐपत नसताना देखील हट्ट पुरवतो . आईकडून माहिती घेऊन हवे नको ते बघत असतो . शिस्त लागावी म्हणून प्रसंगी ओरडतो , मारतो त्यामुळे म्हणा की प्रेम शब्दात व्यक्त करण्यात आईच्या तुलनेत कमी पडतो म्हणा पण तो आई इतकाच मुलावर प्रेम करत असतो हेही आपल्याला त्या का वयात कळत नाही इतकच .


    हल्लीची पिढी आपल्या पिढी इतकी बापाचाच धाक पाळत नसली तरी बापापासून सुरक्षित अंतर ठेवूनच असतात. तुसडेपनाणे वागत नसले तरी आईचे लाड , त्याच्या चूकही पांघरून घालण्याच्या सवयीमुळे त्यांना आईच जवळची वाटते पण मोठेपणी बाप असं का वागत होता या प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळते . आई संगोपन करते बाप त्यांच्या मनात संस्कारही पेरतो आणि शिस्तप्रिय बनवतो व्यवहार ज्ञान देतो आणि जगण्याच्या लढाईत ती मुले कुठे कमी पडू नये याचीही काळजी घेतो तशी व्यव्यस्थाही करतो . दुःखाच्या प्रसंगी एकांतात रडतो आणि आनंदात थाटलंय मनात नाचतो हि . त्याला पुरुषत्व शाप ठरतो कधी कधी त्याला रडणायची मुभा नसते कि कोसळण्याची कारण कौटुंबाला धीर देण्याचे कामही त्याला करायचे असते. आई अंगाई गाते बाळासाठी पण बाप त्यासाठी स्वतःचे काळीजही गहाण ठेवण्यास तयार असतो . आई प्रेमाचा निर्मळ झरा असते तर बाप करुणेचा, कर्तव्याचा विशाल हृदयाचा सागर होतो.

 

आई मुलांच्या चुकांना पांघरून घालून प्रसंगी त्याचे अंध समर्थन करून वाईट मार्गाला लागला तरीही त्याला मोट मोठ्या मानाने माफ करते पण बाप चुका सुधारण्यासाठी त्याला शिक्षाही करतो कठोरही होतो आणि विधायक मार्गही दाखवतो त्यात काही आई अपवाद हि असतील म्हणा . आपण बहुतांश आई भांडणं झाल्यास लहानपानपासून स्वतःच्या मुलाचं समर्थन करतं दिसते . बाप सत्य काय आहे शोधून काढतो . न्य्याय बाजूने ठाम उभा राहतो . म्हणून तो मुलांना जीवनशाळेत रडायला नाही तर खंबीरपणे लढ्याला शिकवतो संस्कार पेरतो, म्हणून तर तो बाप माणूस असतो . बापाची किंमत तेंव्हाच कळते त्यासाठी आपण बापाच्या जागेवर उभं राहून विचार करतो. आई असते विठाई बाप होतो पंढरी , आई असते वेडी माया बाप होतो मुलासाठी मूर्तिकार अन करतोही त्यावरती संस्काराची , व्यवहारचातुर्याची प्राणप्रतिष्ठां . म्हणून तर बाप असतो तो कधीही डोक्याला ताप नसतो . आपले हित जोपासण्यात तो अवघी हयात घालवतो . आपल्या मुलासाठी वरदानच ठरतो. तो असतो पानगळ अन मुलाच्या जीवनात वसंताचा बहर यावा म्हणून तर झिजतो शेवटच्या श्वासापर्यंत.. निःस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता...    


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy