जगणं हरवून बसलेली माणसं
जगणं हरवून बसलेली माणसं
काळ मोठा कठीण आहे तितकेच लोक गाफीलपने वावरताना दिसताहेत . कोरोनाने हाहाकार माजलाय नुसता आणखी भर म्हणजे शासनाचे तुघलकी फर्मान एकामागून एक . त्यांच्या सोयीनुसार चाललय सार . अगोदर नोटबंदी , नंतर जी एस टी , कृषिविरोधी , कामगार विरोधी कायदे , नोकरी भरती बंद . आणखी भर म्हणून कि काय खाजगीकरण लादले जाते आहे . लोकशाहीचे चौथे स्तंभ , स्वायत्त संस्था दबावाखाली काम करीत आहेत . केंद्र- राज्य संघर्ष आहे तो वेगळाच . कोरोना काळात लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. नेत्यांचे भ्रष्टाचार , प्रशासकीय अधिकाऱ्यांची अरेरावी , लोकसंख्यावाढ , बेरोजगारी त्यातल्या त्यात महागाई आकाशाला भिडलीय . भयग्रस्त चेहरे , अनिश्चित जीवन बनले आहे . केंव्हा काय होईल सांगता येत नाही .
काल परवा भेटलेली व्यक्ती अचानक गेल्याची बातमी येते तेंव्हा मनात धडकी भरते . कुटुंब प्रमुख गेल्याने त्या कुंटुंबाचे हाल होत आहेत . कोरोना केंव्हा जाईल ? लसीकरण केंव्हा पूर्ण होईल . हे आर्थिक चक्र केंव्हा सुरळीत होईल काही काही सांगता येत नाही . माणसं जणू जगाचं हरवून बसले आहेत . पुन्हा एकदा सिद्ध झालय की माणसाने कितीही प्रगती केली विज्ञानाच्या वारू वर स्वार होऊन गंज मारल्या तरी अशी एक शक्ती आहे जिच्यापुढे तो खुजा ठरतो . पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने मानवाला त्याच्या गंभीर परिणाम
ां सामोरे जावे लागत आहे . बेसुमार वृक्षतोड , खनिज संपत्ती , जनावरे पशु पक्षी यांची हत्या करणे तसेच . समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही कारण आहे म्हटल्यास वावगे ठरू नये . तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे पण माणूस माणसापासून मनाने दूर गेलाय त्याचे काय ?
माणूस कुटुंबात वावरताना रुक्ष बनला आहे . प्रेमाचा आपुलकीचा लावलेशहीच्या उरलेला दिसत नाही . कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एकत्र येणाऱ्या राहणाऱ्या सामान हितसंबंधी गटासारखे माणसे कुटुंबात भावनाशून्य वावरताना दिसत आहेत. पूर्वी संयोग कुटुंब पद्धतीत चार पिढ्या सुखाने नांदायाच्या . भांडण तंटे , हेवेदावे रुसवे फुगवे असायचे पण नात्यांची घट्ट वीण तसूभरही कमी होत नव्हती . गावात शेजारच्या सुख दुःखात हिरीरीने .भाग घायवयाचे .. पण आता उदार्निर्वहसाठी पोटा पाण्यासाठी नोकरी निमित्त बाहेरगावी शहराकडे लोक जाऊ लागली आणि विभक्त झाले .विभक्त कुटुंब झाल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत . गावही बदल आहेत . सोशियल मीडियाचा अतिरेक झाला आहे . पारावरच्या गप्पा , कुटुंबाचे सोबत जेवण बंद झाले आहे आणि . नात्याच्या परस्पर संबधावरही दूरगामी परीनाम झाला आहे हेही नाकारत येणार नाही . काळ मोठा परीक्षेचा असला तरी जातील हेही दिवस पुन्हा उगवेल सोनेरी पहाट पण आपण सावध होणे , कोरोनाचे नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे .