मला जाणवलेले वा ना आंधळे सर
मला जाणवलेले वा ना आंधळे सर


शब्दांच्या कुंचल्यात ना मावणारे ... प्रेमळ, मनमिळावू असे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे वा ना आंधळे सर कुठल्याही मोठेपणाचा बडेजाव नाही की वयाचे बंधन आड न येता त्यांच्याशी संवाद साधताना जाणवत नाही. भरभरून बोलणारे आमच्यासारख्या नवोदितांना कसलाही न्यूनगंड किंवा दडपण त्यांच्याशी बोलताना येत नाही. आम्हाला कधी कधी भावनाच्या भरात जास्त बोलताना ते आडवत नाहीत नोकरी मोठा मित्र परिवार आणि
आमच्यासारखे उत्साही नवोदित सांभाळताना त्यांना किती तारेवरची कसरत करावी लागत असावी याची जाणीव आम्हाला होत आहे. पण सर कधीच रागावले नाही की चिडले नाहीत.
आमच्यासारखे लाखो लोकांची मने जिंकने तितकेसे सोपे नाही. त्यांच्याशी बोलताना कुटुंबातील माणसाशी जसा संकोच, किंतु परंतु उरत नाही तशीच भावना असते. छोट्या छोट्या गोष्टीतही भावूक होऊन बोलताना पाहून थक्क व्हायला होतं. त्यांनी नवीन फ्लॅट घेतलेला असला तरी कित्येक दिवस वडिलोपार्जित जुन्या घरी राहण्याची इच्छा जुन्या आठवणीत रमणारे वा ना आणि मुले नवीन घरी शिफ्ट होण्यासाठी सल्ला म्हणा हट्ट करताना होणारी त्यांची मनाची घालमेल मी अनुभवली आहे. जुने घर सोडवेनासे झाले असताना अरुंद गल्ली अनेक समस्यांना तोंड देताना नाईलाजास्तव नवीन घरी जातानाचे सर्व ते माझ्याशी निसंकोचपणे बोलताना व्यक्त होतात कधी बगिच्यात काम करताना तर कधी चिखलात रुतलेली गाडी ढकलतानादेखील त्यांनी फोन उचलला आणि मी विचारले सर आवाज थकलेला जाणवतो तर तितकेच निसंकोचपणे अहो गाडी फसलीय ती ढकलतोय म्हणून... असे आमचे वा ना भावनांचा जिता जागता झरा. मी त्यांना अनेकवेळा म्हटले सर सोशल मीडियावर आपण दिसत नाही तर म्हणतात नाही निवृत्तीनंतर बघू आणि ती वेळ आलीय आता याप्रसंगी माझ्या संमिश्र भावना आहेत.
त्या यासाठी की अनेक विद्यार्थी लाडक्या शिक्षकापासून दुरावणार आणि आनंद यासाठी की त्यांचा त्यांचे लेखन छंद आणि कुटुंबासाठी आणि अर्थात आमच्यासारख्या नवोदितांना लिहते करण्यासाठीचा शाबासकीच थाप दडण्यासाठी वेळ मिळेल. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की प्रेम आपुलकी मायेने ठासून भरलेले अमृतकुंभच. आमचे वा ना आंधळे सर सर्वांसाठी वेळ देऊ शकणार समाजासाठी खूप काही करू शकतील त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!!!