STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Action

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Action

तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

1 min
262

तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

कुणी लोळतो , कुणी लोळवतो

कुणी रडतो तर कुणी रडवतो

सैराट होऊन विराट मोर्चा म्हणतो


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

मूर्खांचा बाजार भरला नुसता

दिलखुलास कुणी खैरात वाटतो

स्वार्थासाठी कुणी पाय चाटतो


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

कुणी आवरावा कुणाला ?

जो तो जगतोय आपुलच्याच मस्तीत

कुंपणानेच खाल्ले शेत दाद मागावी कुठे ?


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

दिशा ठरलीय ना प्रयोजन कसलं

बेधुंद होऊन झिंगलेत सगळे

आपण तरी का वागावं वेगळं ?


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

निघाला अराजकतेकडे केंव्हाच

तू - तू मी - मी , हमरी तुमरी

मुद्यावरून गुद्य्यावर आले


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

कालचे चोर आज थोर झाले

नाचू लागले आमच्या छाताडावर

भाबडी मुकी जनावरे हाका कुणीही


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

झेंन्डे तितके दांडे झळकते

कुणाच पाप कुणाच्या माथी

लबाड लांडगे गळ्यात गळे घालुनि


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

आला तर थाट अन सम्राट

नाही तर कफल्लक बिनबोभाट

पकडला तर चोर नाही तर आहेच शिरजोर


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

थाटामाटात स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी

ओलांडली जरी रोटी कपडा ना मकान

आश्वासनांचा पाऊस ओसरतो दरवेळी


तराट लोकांचा बुंगाट मोर्चा

जिंदाबाद - मुर्दाबाद गर्जती

जय हो नेता की ,जय हो जनता की

लोकशाहीचा राजा सदैव भिकारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy