माणूस
माणूस


"साहेब तुमची कुत्री आवरा ती माझ्यावर खूप जोरात भुंकत आहेत." रस्त्यावरचा भिकारी साहेबांना उद्देशून म्हणाला
"अरे ती कुत्री चावणार नाहीत ती कुत्री परदेशातून आणलेली आहेत तुम्हा लोकांना जे मिळत नाही खायला ते त्यांना खायला मिळतं, ती गावात दारोदार भटकणारी कुत्री नाहीत ते जाऊ दे पण तू कोण आहेस?"
"मी माणूस आहे! माणूस!!"