Jyoti gosavi

Tragedy

4.7  

Jyoti gosavi

Tragedy

पतंग

पतंग

2 mins
1.5K


राजू पतंग उडवत होता. एकाएकी त्याच्या मनात आले की हा पतंग उंच आकाशात उडतोय. त्याला काय काय छान छान गोष्टी दिसत असतील

राजू - अरे पतंगा तू किती नशीबवान इतक्या उंच आकाशात उडतो पक्षांपेक्षाही वरती जातोस. सांग तरी तुला काय काय दिसतंय


पतंग - राजू मी नशीबवान खरा पण तुझ्यामुळेच मी एवढ्या उंचीवर गेलो. अखेर माझी दोरी तुझ्या हातात आहे. तू जर व्यवस्थित उडवलं तरच मला सगळं जग दिसतं. वर निळंनिळं आकाश दिसतं, खाली समुद्र दिसतो, झाडे-वेली हिरवा निसर्ग दिसतो.


राजू - आणि काय दिसतं?


पतंग - गगनचुंबी इमारती दिसतात. झोपडपट्टीपण दिसते. मुंबईतली वाहने दिसतात. अरे अरे राजू जरा जपून. आता माझ्या शेजारून एक गिधाड गेलं. एक कबूतर गेलं त्यांचा पंख कापला गेला असता... त्यांना दुखापत झाली असती असं नको करू ना.


राजू - तुझ्या मांजाला काचेचा चुरा लावला नाहीस ना


राजू - नाही नाही बाबांनी मला बजावलं होतं


पतंग - राजू मला उडव पण सांभाळून कारण कधीकधी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना माझ्यामुळे जीव गमावण्याची पाळी येते.


राजू - हो रे बाबा


पतंग - राजू आणखी एक तू स्वतः पण माझ्याकडे बघतबघत रस्त्याने धावू नको. पायाखाली लक्ष ठेव गच्चीत असशील तर कठड्यावर लक्ष ठेव.


राजू - हो रे बाबा अरे किती शिकवशील.


पतंग - अरे काळजी वाटते ना तुझी! आज एक पतंग तुटला तर नवा आणता येतो पण जर राजूचा पाय फ्रॅक्चर झाला तर राजूला हॉस्पिटलला जायला लागेल. त्यापेक्षा आपली काळजी घेऊनच खेळ.


राजू - पतंगा आता एक शेवटचा विचारतो तेवढं मला सांगशील ना?


पतंग - विचार बाबा विचार


राजू - पतंगा रे पतंगा

 जाऊ नको लांब ना

 आई माझी देवाघरी

 निरोप माझा सांग ना

दिसते का तुज माझी आई

तेथे काय करते ती

सांग तिला मी शहाणा बाळ

आता करत नाही मस्ती

निमूट जेवतो शाळेत जातो

 अभ्यासदेखील करतो

रात्री झोपताना मात्र आई 

 तुझीच आठवण करतो


पतंग बोलता बोलता निःशब्द...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy