Jyoti gosavi

Inspirational Others

2  

Jyoti gosavi

Inspirational Others

पर्यावरण आणि आपण

पर्यावरण आणि आपण

4 mins
24


प्रत्येक जण पर्यावरण वाचवलं पाहिजे, पर्यावरणासाठी अमूक झालं पाहिजे. या विषयावर बोलत असतो पण आपण स्वतः पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्या परीने काय करतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.


अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट पाणी वाचवा ,पाणी हे जीवन आहे आणि ते पर्यावरणाचा भाग आहे.


 दुसरी गोष्ट आहे वन्य जीवन वाचवा


प्लास्टिकचा वापर टाळा 


*पाणी वाचवा*

अशा अनेक गोष्टी सांगता येतील पाणी खात अगदी ओरडून सांगत की, नळाखाली तोंड धुतलं तर एवढे पाणी वाया जातं ,अमुक करताना एवढे पाणी वाया जातं .मग आपण ब्रश करत अर्धा तास नळ चालू ठेवायचं बंद करू शकतो.

आंघोळीला शाॅवर न वापरता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करू शकतो.

अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये पाण्याचे ग्लास भरलेले अर्धे अर्धे वाया जातात, तिथे आपण घेतानाच अर्धे पाणी घेऊ शकतो. 

देणाऱ्या मुलाला देखील ग्लास अर्धा भरून दे हे सांगता येईल.

 

स्वतःचा स्टील ग्लास कॅरी करणे आणि बाहेर वापरणे ही एक उत्तम गोष्ट होईल.

 कारण आजकाल छोट्या छोट्या अगदी 50 एम एल च्या बॉटल किंवा ग्लास दिला जातात लग्नात तर हे जास्त दिसतं की, लोक नवीन ग्लास घेतात आणि जुना अर्धा तसाच कुठेतरी टाकून देतात, त्यापेक्षा स्वतःचा स्टील ग्लास कॅरी केला तर पर्यावरणातील प्लास्टिक कचरा कमी होईल आणि पाण्याचा अपव्यय देखील टळेल.

शिवाय हे देखील खरं आहे उच्चभ्रू सोसायटी पेक्षा झोपडपट्टी आणि चाळी इथे पाण्याचा अपव्य जास्त होतो एकदा दोन तासासाठीच पाणी येणार आहे मग ते बंदच करायचं नाही घरातलं पाणी भरलं तरी तसाच पाईप वाहत ठेवायचा, का तर आपलं पाणी जाईल. मी नोटीस केलेला आहे. 


*प्लास्टिकचा वापर टाळा आणि रिसायकलिंग करा*


बाजारात जाताना कापडी थैल्या द्याव्यात, भाजीवाल्यांकडून छोट्या मायक्रोग्राम मधल्या पिशव्या मागू नये. 

सर्व प्लास्टिकचे रिसायकलिंग करावे 


अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना ही सवय असते रोज कचऱ्याची एक पिशवी बांधून बाहेर ठेवून द्यायची. म्हणजे वर्षाचे 365 दिवस आपण 365 प्लास्टिक पिशव्या कचऱ्यात देतो. 

मी माझ्या स्वतःच्या घरात फुल पुडीला आलेली पळसाची पाने कचऱ्याच्या बादलीत खाली टाकते आणि त्यावर कचरा टाकते.

ओला सुका कचरा प्रत्येकाने आठवणीने वेगळा करावा .


त्यासाठी एखादी मोठी प्लास्टिक थैली घेऊन तिच्या सुका कचरा साठवावा माझ्या घरात मी आठवणीने ओला सुका कचरा वेगळा करते.

*झाडे वाचवा झाडे लावा झाडे जगवा*

झाडाच्या होणाऱ्या कत्तली आपण थांबवू शकतच नाही, कारण बिल्डर राजकारणी सगळ्यांची मिली भगत असते .पण आपण नवीन झाडे तर लावू शकतो.

दरवर्षी पावसाळ्यात नुसती नवीन झाडे लावायची नाही तर ती जगवायची देखील हा एक पण सगळ्यांनी घेतला पाहिजे .

दरवर्षी एक झाड जरी आपण जगवले तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील 


*वन्य जीवन किंवा प्राणी जीवन वाचवणे*

या पृथ्वीतलावर जगण्याचा सर्वांना अधिकार आहे फक्त माणसानेच मक्ता घेतलेला नाही. आणि किडा मुंगी पासून ते वाघ सिंह हत्तीपर्यंत सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. माणूस आपल्या स्वार्थासाठी त्यांचा गैरवापर करतो, त्यांच्याशी क्रूरपणे वागतो, त्यांची हत्या करतो आपल्याला दिसेल तिथे आपण थांबवण्याचा प्रयत्न करावा. 

गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारून किंवा काठी मारून हाकलण्यापेक्षा अर्धी चतकोर  चपाती टाका ते किती प्रेमाने तुमच्या मागे फिरतात ते बघा.

दिसला साप की घे काठी लाग त्याच्या पाठी हे बंद करा. 


तुम्हाला कदाचित पटणार नाही पण आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये एक घुबड जे खाली पडलेले होते, त्याच्या मागे कुत्री लागलेली होती.

 ते मी न घाबरता हातात धरून घरी आणून त्याला प्राणी मित्रांकडे सोपवून पुन्हा जंगलात सोडलेले आहे. ते पण मी कामावर जाण्याच्या गडबडीत होते, पण घरी आणून मुलांच्या हातात ते ठेवले.

 मुलांनी दिवसभर बास्केटमध्ये ठेवून सांभाळले आणि प्राणी मित्राला सर्च करून बोलावून येऊरच्या जंगलात सोडले आणि त्याने पण जंगलात सोडल्याचा व्हिडिओ करून आम्हाला पाठवला. 

* *इलेक्ट्रिसिटी वाचवणे*


 तीदेखील वाचवणे आपल्या हाती आहे, लाईट बिल पण कमी येईल बचत पण होईल .आणि इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी लागणारा कोळसा पाणी याची देखील बचत होईल. माझ्या सरकारी कार्यालयात मी आरडाओरडा करून लाईट पंखे बंद करायला लावत होते.

 नाहीतर आपल्याकडे सवय असते कोणी नसेल तरी पंखे चालू असतात.

माझ्या स्वतःच्या घरात देखील एका खोलीतले लाईट पंखे बंद करूनच दुसऱ्या खोलीत आम्ही प्रवेश करतो. 

एसी दर दोन तासांनी बंद करा .

इलेक्ट्रिक वस्तूंचे वेळच्यावेळी सर्विसिंग केले तरी तुमच्या इलेक्ट्रिकच्या बिलामध्ये बचत होईल.


*पाण्याचे प्रदूषण*

तेदेखील टाळणे आपल्या हाती आहे आता मोठ्या मोठ्या कंपन्यांचा कचरा पाण्यात मिसळतो तिथे आपण काही करू शकलो नाही तरी तक्रार तर करू शकतो. 

शिवाय तीर्थक्षेत्री जाताना प्रत्येक ठिकाणी नदीची पूजा करण्यासाठी लोक धावतात, मग त्या पाण्यात दिवे सोडायचे तिची ओटी भरायची या साऱ्या गोष्टी मी कधीही करत नाही कारण ते पाण्याचे दिवे नदीत बुडतात त्याला तुपाचा तवंग येतो त्याने मासे मरतात.

कपडा फुले नदीमध्ये कुजतात, त्यामुळे मी तिथे विक्रीला बसणाऱ्या लोकांकडून आजतागायत कधी अशी ओटी घेऊन नदीची पूजा केली नाही सर्वांनी एवढे पाळले तरी नद्या प्रदूषण कमी होईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational