STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics

4  

Jyoti gosavi

Classics

प्रियतमा

प्रियतमा

2 mins
25

 प्रियतमा

 प्रियतमा म्हणल्यावर मला तर अशोक सराफ यांचे गाणं आठवले प्रीतम्मा प्रीतम्मा दे मला एक चुम्मा प्रेम दिवाना नंदी मी ग तू तर माझी हम्मा काय पण विचार!😃 काय पण कल्पना, अर्थात ते गाणं नायक म्हाताऱ्या रूपात असून नायिकेला छळण्यासाठीच आहे, म्हणून मी नंदी आणि तू हम्मा अशी कल्पना असते. आणि मग प्रियतमा या शब्दावरची अनेक गाणी मग तो प्रीतम असो किंवा प्रियतमा असो. फुल तुम्हे भेजा है खत मे फुल नही मेरा दिल है प्रियतम मेरे मुझको लिखना क्या तुम्हारे काबिल है यातील तिने त्याला पाठवलेले फुल आणि आवडलं का तुला हे विचारण्याची लकब! प्रिया, प्रीतम, प्रियतमा एकाच अर्थाचे अनेक शब्द. माझ्या कोशात तरी प्रियतमा म्हणजे कोणती वस्तू, मैत्रीण, जागा, असू शकत नाही तर ती प्रेयसीच असू शकते. चांदण्या रात्री, चांदण्याचे धवल वस्त्र नेसलेली ती अभिसारिका, ती असते प्रियतमा कमळासारख्या टवटवीत चेहऱ्याची, ओलेत्या अवगुंठणात असणारी ती मुग्ध कलिका, ती असते प्रियतमा ती अप्सरा ती उर्वशी, ती रंभा , ती मेनका, नवरंग मधला आपल्याच पत्नीमध्ये प्रियतमा शोधणारा आणि तिची विविध रूपे स्वप्नात पाहणारा महिपाल, ती असते प्रियतमा पत्नी प्रियतमा होऊ शकत नाही कारण ती तुम्हाला सकाळ, दुपार ,संध्याकाळ भेटते, आणि अगदी केसाच्या झिपऱ्या, आळसावलेला चेहरा चुरगाळलेले कपडे, अशा रूपात पण भेटते. अहो घरामधले कांदे बटाटे संपलेत घेऊन या, बंड्याच्या शाळेची फी भरायची आहे हे सांगणारी त्याला कधी प्रियतमा वाटत नाही. पण लग्नाआधीच्या भेटीगाठी असतात ना! तो हसरा टवटवीत चेहरा, भेटीची ओढ, लटका राग, सांग मी कशी दिसते हा डोळ्यात असणारा भाव ती असते प्रियतमा, लाजून हासणे अन् हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे असं वाटतं ना तेव्हा ती असते प्रियतमा हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे कधी भेटीचा आनंद देणारी, कधी दुराव्याची हुरहुर लावणारी, कधी रुसून बसलेली मग तो तिला म्हणतो हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना अबोला त्यामध्ये भेटते ती असते प्रियतमा. फक्त प्रियतमा भेटण्यासाठी त्याची नजर देखील तशी पाहिजे. 🌹🌹🌹❤️


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics