माऊली ( अलक )
माऊली ( अलक )
बाजाराचा दिवस चहाच्या टपरीवर चहाचे पैसे देतांना दंडाला हात लावून कोण बोलवतय म्हणून पाहिले तर...
एक ६० - ६५ वयाची अनोळखी व्यक्ती हात पुढे करून उभी होती....
" १ - २ रुपये दया माऊली "
" कशाला ? चहा घ्या ना ! "
" २ - ३ चहा झाले "
" मग आता कशाला पैसे ? "
" पोटाला जेवायला ? "
" काय खाणार ? "
" जे देणार "
" अरे गोपाल , यांना काय पाहिजे ते दे खायला. पैसे मी देतो. " चहाच्या टपरीच्या बाजूला राजस्थानी स्वीट हॉटेल होती तेथील मालकाला सांगितले.
थोडया वेळाने तृत्प होवून ती व्यक्ती बाहेर आली.
गोपालला पैसे दिले.
गोपाल माझ्याकडे .....
मी त्या अनोळखी व्यक्तीकडे....
अन् ती व्यक्ती माऊलीकडे....
पाहत होती.....