kanchan chabukswar

Classics Inspirational

4.4  

kanchan chabukswar

Classics Inspirational

श्रेष्ठ दान

श्रेष्ठ दान

10 mins
1.0K


ऋतुपर्ण लंडनहून फोनवर आपल्या आईशी कितीतरी वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता, काही केल्या त्याचा फोन लागत नव्हता. ऋतुपर्ण आणि बाबा मोठ्या ब्रिटिश कंपनीमध्ये काम करत होते, कलकत्त्याला मुख्य कार्यालय असून, ऋतुपर्ण चे बाबा आशुतोष चॅटर्जी, कंपनीच्या कामानिमित्त सतत मुंबई, दिल्ली, चेन्नई असा प्रवास करत. ऋतूला पहिल्यांदाच कंपनीने लंडनला पाठवले होते. आठवड्याची मीटिंग करून तो पुढच्या रविवारी परत येणार होता. ऋतुपर्ण आणि त्याच्या बाबा आशुतोषचे असे बाहेर जाणे देवकीला माहित होते. महिन्यातून तीन आठवडे तरी दोघेजण कंपनीच्या कामानिमित्त इकडे तिकडे जात असत. देवकी स्वतः बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. ऋतुपर्ण च्या पाठीवर झालेल्या रिया आणि रिमा या दोन जुळ्या मुली बरोबर देवकी बराच काळ कलकत्त्याला एकटीच असायची. रिया आणि रीमा बारावीच्या परीक्षेची तयारी करत होत्या, यांचे कॉलेज, क्लासेस, छंद यामध्ये दोघीजणी गुंग असायचा असायच्या.


   सोमवारी रात्री आशुतोषने ऋतुपर्ण सकट मुंबईची फ्लाईट पकडली, बरोबरच मुंबईपर्यंत जाऊन, मिटींग अटेंड करून, ऋतुपर्ण पुढे लंडनला जाणार होता. त्याचं दहा दिवसानंतर कलकत्त्याचा तिकीट होतं. सगळं काही आलबेल चालू होता होतं. बुधवारी संध्याकाळी आशुतोषचा सेक्रेटरीचा देवकीला फोन आला, मीटिंग चालू असताना, अचानक आशुतोष बेशुद्ध झाल्यामुळे खाली कोसळला होता. कंपनीच्या डॉक्टरने ताबडतोब आशुतोषला सुप्रसिद्ध अशा वेदवती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, जिथे त्यांच्या कंपनीचा अकाउंट चालू होता. बुधवारी उशिरा, कंपनीकडून देवकीला मुंबईचे तिकीट पाठवण्यात आले, घाई-घाईने घरी येऊ येऊन, रिया आणि रीमाला घरी बोलावून घेतले, त्या दोघींना कल्पना देऊन, शेजारच्या काकांना सांगून, जुजबी सामान घेऊन, देवकी मुंबईला रवाना झाली झाली. आशुतोष बेशुद्ध पडला, म्हणजे कदाचित, रक्तदाब वाढला असेल, जेवण नीट झाले नसेल, किंवा कंपनीच्या अकाउंट मधला काही घोटाळा त्याला नजरेला आला असेल, देवकीला वाटले. पहाटे शांताक्रुज ला उतरल्यानंतर, देवकीने तडक वेदवती हॉस्पिटल गाठले


कंपनीचे काही वरिष्ठ लोक हॉस्पिटलच्या लाऊंजमध्ये देवकीची वाट बघत होते. आधी त्यांनी देवकीला चहा आणि नाश्ता दिला आणि मग ते सगळेजण डॉक्टरांना भेटण्यास केले गेले. सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दलाल आणि त्यांचा चमू आशुतोषवर देखरेख ठेवून होता. देवकीच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर दलाल म्हणाले “आशुतोष कोमामध्ये गेला आहे. “ तिच्या पायाखालची जमीनच सरकली, मटकन खाली बसत, आधाराला खुर्ची पकडली जी तिच्यासकट खाली पडली. दोनच दिवसापूर्वी आशुतोष आणि ऋतुपर्ण मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले होते, मीटिंग संपल्यानंतर ऋतुपर्ण ला लंडनच्या फ्लाईटमध्ये आशुतोष नेच तर बसवलं होतं आणि तोच आजचा लोळागोळा होऊन पडलाय. बाकीच्या अधिकाऱ्यांनी आणि नर्सने देवकीला सांभाळले, तिला बेडवर झोपवून रिलॅक्स होण्याचे इंजेक्शन दिलं. अनपेक्षित आलेल्या संकटाने देवकी गांगरून गेली गेली. अचानकअसं कोणी कोमामध्ये जातं? धडधाकट असलेला माणूस, मोठे मोठे निर्णय घेणारा अधिकारी, महिन्यातले पंधरा ते अठरा दिवस भारत आणि विदेशामध्ये कंपनीच्या कामासाठी जाणारा अतिशय सक्षम असा अधिकारी अचानक कोमामध्ये जावा? देवकीच्या डोक्यामध्ये वावटळ उठली.


आता पुढे काय? आशुतोषच्या बरोबरीच्या अधिकाऱ्याला देवकीने प्रश्न विचारला.

वेदांत म्हणाला,"वेदवती हॉस्पिटल मुंबई, आशुतोषवर योग्य उपचारही इथेच होईल. कितीही दिवस लागले तरी चालतील, कंपनी खर्चाचा भार उचलेल."

    खरं म्हणजे ही तर एक क्रिमिनल केस होती, आशुतोष कंपनीची मीटिंग घेत होता, कुठे तरी गडबड झाली असावी, बेशुद्ध पडणे ठीक आहे, पण एखाद्या लोळा गोळा झालेल्या निर्जीव अवस्थेत? किती दिवस राहणार असा? प्रश्न प्रश्न आणि अनुत्तरित प्रश्न.

    

देवकीने मुलींना काहीच सांगितले नाही, त्या एकट्याच होत्या, घाबरून गेल्या असत्या. आज चौथा दिवस होता, तिथल्या बेड एरियामध्ये देवकी राहत होती. तिला स्वतःला डायबिटीस असल्यामुळे रोज इन्शुलिनच्या औषध इंजेक्शन घ्यावच लागतो होत. एखादा रुग्ण जेव्हा आयसीयूमध्ये असतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांना एका हॉलमध्ये एक बेड, तोदेखील फक्त रात्रीसाठी, दिला जायचा, हॉलच्या शेजारी बाथरूमची व्यवस्था असायची, आणि खाण्याची व्यवस्था कॅन्टीनमध्ये. रुग्णाच्या नातेवाईकांनी आपले सामान लॉकरमध्ये ठेवायचं आणि दिवसभर इकडेतिकडे बसायचं अशीच प्रथा असायची. हॉस्पिटल पण बरोबरच आहे, रुग्णाकडे बघणार का रुग्णाच्या नातेवाईकांकडे? नातेवाइकांचे लांब चेहरे, डोक्यात चालणारे पैशाचे हिशोब, अन्नाच्याकडे न बघता फक्त घशात घास ढकलणारे नातेवाईक. सुकलेल्या अश्रू भरल्या डोळ्यांचे आई वडील, बावरलेली मुले. हॉस्पिटलचे वातावरण असेच तर असणार.


आशुतोष आयसीयूमध्ये असल्यामुळे, दिवसातून तीन किंवा चार वेळेलाच फक्त देवकीला त्याच्याजवळ जात येत होते , नर्स येता-जाता देवकीला धीर देत होत्या, बरे झालेल्या रुग्णांचे नंबर देत होत्या. डॉक्टरांवर चा विश्वास वाढवत होत्या. आशुतोष ला हाका मारायला सांगत होत्या. नुसतं बसून त्याच्याशी बोलायला सांगत होत्या. त्यांच्यामते कोण जाणे, कधीतरी मेंदू मधल्या नाड्या एकमेकांची जुळतील आणि आशुतोष डोळे उघडेल. त्याची अशी अवस्था बघून देवकीला कायम भडभडून येत होते.

    

बहुतेक कंपनीने ऋतुपर्णला कळवले असाव, त्याचा देवकीला फोन आला ,"मा मी परत येतो, मुंबईलाच येईन, आपण दोघे मिळून बाबांना कलकत्त्याला घेऊन जाऊ. माझी मिटिंगमध्ये लक्ष लागत नाही."

देवकी....." तुझं बाबा कोमामध्ये आहे, हे तुला कळत नाही, तू मीटिंग सोडून येऊ नकोस, काम नीट कर, काम झाल्यावरतीच मुंबईला ये, तोपर्यंत डॉक्टर दलाल काहीतरी सुचवतील. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण पुढे जाऊ."

      "बाबा कसा आहे? मा, तू परत केव्हा येणार? बाबा ला काय झाले? आम्ही दोघी तिकडे येऊ का? घरी फार भीती वाटते ग,"

स्वतःचे अश्रु सारून देवकी मुलींना आणि ऋतुपर्णला धीर देत होती.


रोज रात्री एखाद्या बेघर असल्याप्रमाणे त्या हॉलमध्ये बरोबर एका कोपऱ्यामध्ये कसंतरी झोपायचं, डायबिटीस असल्यामुळे खाणं तर कम्पल्सरी होतं, घशाखाली अन्न जात नसलं तरी, तरी पण मुलांच्यासाठी उभ रहायचं होतं. आशुतोष जरी कोमामध्ये असला तरी तो जिवंत होता, त्यामुळे आशा होती की कधीही तो डोळे उघडून बघेल आणि देवकीला, मुलांना हाक मारेल. घशात खुपसलेलं व्हेंटिलेटर, हातात खूपसलेल्या सलाईन च्या सुया, आणि हाताला लागणारा गरम स्पर्श फक्त जिवंतपणाचं लक्षण होतं.


रात्री झोपताना देवकीच्या मनात परत परत प्रश्न वर येत होते आशुतोष, फक्त कोमामध्ये आहे? का ब्रेन डेड आहे? कोमामध्ये रुग्णांची परत शुद्धीवर येण्याची संख्या फक्त एक टक्का होती आणि ब्रेन डेड तर, फक्त लाईफ सपोर्ट वरची जगणारी. हॉस्पिटल देखील काही दिवसानंतर पेशंट्सना ठेवत नव्हती. काय उपयोग त्यांचा? काही उपयोगच नव्हता.


     चौथ्या दिवशी रात्री जेव्हा देवकी हॉलमध्ये झोपण्यासाठी आली, झोप तर काही येत नव्हती, पण तिचा नुकताच डोळा लागला आणि हमसून हमसून रडण्याने तिला खाडकन जाग आली. शेजारच्या बेडवरची स्त्री फोनवर बोलत होती आणि खूप रडत होती. तिच्या मुलाचा एक्सीडेंट झाला होता, पोटातून आरपार लोखंडी सळई घुसली होती, आयआयटीचा मुलगा, लिव्हर मध्ये सळई घुसल्यामुळे, जीवन-मरणाच्या दारात उभा होता. कोणी जर स्वतःचं लिव्हर त्याला दान केलं तर त्याची जगण्याची काहीतरी शक्यता होती, हुशार अनिरुद्ध, स्वतःच्या हिमतीवर, जीवापाड मेहनतीने आयआयटीमध्ये इंजिनिअरिंग करणारा, एका उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघणारा मुलगा, रोड एक्सीडेंट मध्ये, जखमी होऊन वेदवती हॉस्पिटलमध्ये आला होता.

 अनिरुद्ध च्या आईचे रडणे ऐकून, बऱ्याच स्त्रिया जाग्या झाल्या. तीस वर्षाच्या मिलिंदच्या आईला किडनी डोनरची प्रतीक्षा होती. दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, वेळ फार कमी होता, दोन-तीन दिवसात मिळाल्या तर मिलिंद जगण्याची काही आशा होती.


   28 वर्षाचा श्री, हृदयाच्या झडपा बिघडण्याचा मुळे वेदवती मध्ये कोणी हार्ट डोनर मिळतो का हे बघण्यासाठी ऍडमिट झाला होता. जन्मजातच श्रीचा हृदयामध्ये झडपा निकामी होत्या. तरीपण हुशार श्री तरीपण आपल्या मेहनतीच्या जोरावर सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. जगण्याची उमेद होती पण हृदयाची साथ नव्हती. निशाची आई पण निशा साठी कोणी कातडी दान करेल का याची वाट बघत होती, विचित्र प्रियकराने निशा वरती ऍसिडचा चा हल्ला केला होता. जेजे स्कूलमध्ये शिकणारी निशा एक उत्तम चित्रकार म्हणून नावारूपाला येत होती, इंटेरियर डिझाईन मध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची तिची फार इच्छा होती आणि तसे तिचे प्रयत्न होते. जुजबी ओळखीवर झालेल्या मैत्रीमुळे ती आज वेदवती च्या आयसीयूमध्ये भाजलेल्या अवस्थेत पडली होती.


    शेवटी डोनर म्हणजे तरी कोण? माणूस? ज्याच्या मरणाची सगळेजण जणू काही वाटच बघत होते. मरणाच्या दारात असलेल्या माणसाची त्याचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला परत ओढण्याची व्यवस्था करत होते,  तर , तर ज्यांचे काही अवयव निकामी झाले आहेत असे लोक एखाद्या उदार ब्रेन डेड माणसाची वाट बघत होते. झोपण्यासाठी दिलेला हॉल म्हणजे वेदनामय नातेवाईकांचा जणूकाही एक मेळावा होता. रात्रीच्या अंधारात आपल्या अश्रूंना वाट देत प्रत्येक जण आपल्या हृदयातील वेदना बोलून दाखवत होता.

   

पाचव्या दिवशी आशुतोषला बघून आल्यावर देवकी खालच्या बागेमध्ये विनाकारणच हिंडत होती. तिचा डोक्याचा नुसता भुगा झाला होता, पुढे काय करायचं, केव्हा येणार आशुतोष शुद्धीवर? जवळच्या बेंचवरती बसून देवकी मुलींना निरोप पाठवत होती. तेवढ्यात श्रीची आई तिच्या जवळ आली श्रीची आई आणि इतर काही जणी सिद्धिविनायक, महालक्ष्मी, आणि माउंट मेरी नवस करायला जात होते होत्या. दोन तासात परत येऊन म्हणाल्या, देवकी यांच्या बरोबर निघाली, आता देवच फक्त आशुतोषला तारणार होता.

  

     पुरुषभर उंचीच्या मंद उजेडाच्या समस्यांमध्ये महालक्ष्मीचे चेहरे तिला तिच्या काली माँ सारखे वाटले, बंगालची काली माँ जणू तिच्याकडे बघून मंद हसत होती. महालक्ष्मीच्या दर्शना मुळे देवकीला खूप बरे वाटले. त्यानंतर सगळ्या जणी श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्या, शांतपणे कोपऱ्यामध्ये उभा राहून बराच वेळ डोळे मिटून देवकी देवाला साकडे घालत होती, काहीतरी मार्ग दाखव, किंवा पैलतीर, मिटलेल्या अश्रू भरल्या डोळ्यांनी गणपतीला साकड घालत होती," देवा अशी त्रिशंकू अवस्था नको, काही तरी मार्ग दाखव."


    माउंट मेरीला गेल्यानंतर मेंदूच्या आकाराची मेणबत्ती जेव्हा तिने पेटवली तेव्हा बाकीच्या स्त्रिया चमकून तिच्याकडे बघायला लागल्या. कारण आतापर्यंत तिने तिचे वेदवती हॉस्पिटलमध्ये येण्याचे कारण काही सांगितलेच नव्हते. तोंडातून शब्दही न काढता सगळ्याजणी वेदवती हॉस्पिटलमध्ये परत आल्या. आपल्या आपल्या रुग्णांना भेटून झोपण्याच्या हॉलमध्ये आल्या. झोप तर काही येत नव्हती, म्हणून देवकी परत लाऊंजमध्ये येऊन बसली. सहजच म्हणून तिने आशुतोष ची फाईल उघडली, आणि परत बंद केली. लाऊंज पूर्ण माणसांनी भरलं होतं लावून म्हणून एक गृहस्थ ती बसली होती त्याच सोप्या वरती येऊन बसले. उतरलेला चेहरा, चेहऱ्यावरचं काळजी चे जाळ काही लपत नव्हतं. त्यांच्या पलीकडे बसलेली स्त्री, आपले डोळ्यातले अश्रू काही केल्या आवरू शकत नव्हती. कोणीही कोणाला समजावण्याच्या स्थितीत नव्हतं.


         नर्सबरोबर ते डॉक्टरच्या दिशेने चालू लागले. अर्ध्या तासांनी दोघेजण परत आले, चेहऱ्यावरती मिश्र भाव, आणि प्रचंड अशी काळजी. काय करणार? कोणाला सांगणार? नर्स ने त्यांना डोनर मिळवण्यासाठी असलेला फॉर्म भरण्यास दिला. फॉर्म भरत असताना देवकीच्या लक्षात आले की त्यांच्या तरुण मुलाला लॅबमध्ये काम करताना आपले डोळे गमवावे लागले आहेत, कोणी कॉर्निया दिल का? त्याच्यासाठी ते फॉर्म भरत होते. परत परत तेच, काहीजण आपल्या प्रियजनांना काहीही करून वाचवण्याच्या तयारीत होते, डोनर मिळवणे सोपे नसते, डोनरचे सगळे अवयव उत्तम प्रतीचे असल्यास आणि रक्तगट जर संयुक्त असेल तरच ते अवयव रुग्णाला देण्यात येतात. शेवटी काहीही झालं तरी माणसाचं शरीर हे माणसाचं शरीर असतं, तिथे मशीन काहीही उपयोग नसतो.

             कितीतरी वेळेला गमती नी देवकी आशुतोषला म्हणायची

                ” तुझा ब्लड ग्रुप म्हणजे काय युनिव्हर्सल डोनरचा.”


देवकीच्या अंगावरती सरसरून काटा आला. तिने तो विचार एखाद्या पाली सारखा झटकून टाकला. नाही नाही आशुतोष पूर्ण बरा होईल, आम्ही परत कलकत्त्याला जाऊ, तिने आपल्या मनाला समजावले. आशा-निराशेच्या वावटळी मध्ये हे अडकून देवकी झोपण्यासाठी परत हॉलमध्ये आली.

उद्या ऋतुपर्ण येणार, आपल्याला काहीतरी ठाम निर्णय घेता येईल, परक्या ठिकाणी किती दिवस राहायचं?                                                                               

डॉक्टर दलाल म्हणाले “किती वेळ लागेल काही सांगता येत नाही, मेंदूतली गुंतागुंत कोणाला समजते. कदाचित आत्ता डोळे उघडेल, किंवा अजून काही वर्षांनी.“

     

ठरल्याप्रमाणे ऋतुपर्ण वेदवतीमध्ये पोहोचला, त्याच्याबरोबर आशुतोषच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पण होते. ऋतुपर्णला मिठी मारून देवकीने आपले अश्रू मोकळे केले. पुढे काय करायचं? सगळ्यांनाच काहीतरी निर्णय घेण्याचे होते, हलक्या आवाजात ते एकमेकांशी काहीतरी बोलत होते. ऋतुपर्ण काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता, सगळेजण डॉक्टर दलाल यांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर दलालांकडे त्यांच्यासाठी फार वाईट बातमी होती,


डॉक्टर दलाल:”आशुतोषच्या  मेंदूकडून जिवंत असण्याचे कुठलेही सिग्नल्स येत नव्हते, मेंदूवर केलेल्या सगळ्या चाचण्या एकच उत्तर देत होत्या की अशुतोषचा मेंदू निकामी झाला आहे. आय एम सॉरी टू से, मिस्टर आशुतोष इज ब्रेन डेड .“

कंपनीच्या अधिकाऱ्यांना आशुतोष ब्रेन डेड आहे याची पूर्ण कल्पना होती, फक्त देवकी एकटीच असल्यामुळे ऋतुपर्ण येईपर्यंत वाट बघण्याचे त्यांनी ठरवले होते.


         ऋतुपर्ण आणि देवकी यांची जीभ जशी टाळूला चिकटली? म्हणजे तो जिवंत नाही? तेवढ्यात डॉक्टर बन्सल डॉक्टर दलालांच्या केबिनमध्ये आले, त्यांनी खूप समजावून सांगितलं आणि ऋतुपर्णच्या हातात अवयव दान करण्यासाठी असलेला फॉर्म ठेवला. ऋतुपर्ण आणि देवकी यांना काही वेळ देऊन डॉक्टर बन्सल म्हणाले की जरी आशुतोषचा मेंदू निकामी झाला असला तरीही त्याचे बाकीचे अवयव व्यवस्थितरित्या चालू आहेत. तो कधीही शुद्धीवर येणार नाही, त्याच्यामुळे आता त्याचे अवयव जर एखाद्या योग्य व्यक्तीच्या कामास आले तर एका अशुतोषमुळे जवळजवळ सात ते आठ जणांना नवजीवन मिळेल. जोपर्यंत लाइफ सपोर्ट सिस्टिम आहे तोपर्यंतच आशुतोषचे शरीर चालू राहील पण त्याला काहीच अर्थ राहणार नाही. दलालांच्या केबिनमधून देवकी धावतच बाहेर आली, तिचे अश्रू अनावर होत होते, 

आता जिवंत असलेल्या माणसाच्या अंगातून त्याचे अवयव काढून घ्यायचे? डॉक्टर आहेत का कसाई? मुद्दाम तर मारलं नसेल आशुतोषला? आपण पुढे कसं जगायचं? अजून लहान आहेत सगळी मुलं?


देवकीची अवस्था बघून नर्सने तिला एका रिकाम्या केबिनमध्ये नेले. देवकी अगदी हंबरडा फोडून रडत होती, तिला काहीच सुचत नव्हतं, आपल्या आईची अशी अवस्था बघून ऋतुपर्णला काही सुचेना पण आता घरामध्ये मोठा तो होता, काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता. ऋतुपर्णला मिठी मारून देवकीने आपले मन त्याच्यापाशी मोकळे केले. देवकीला आशुतोषला कलकत्त्याला घेऊन जायचे होते. काही झालं तरी तिथे त्याचं घर होतं, कोणीतरी सावध राहायला पाहिजे होतं, तो परत डॉक्टर दलाल यांच्या केबिनमध्ये आला आणि त्यांनी डॉक्टर बन्सलला विचारलं,”निर्णय किती वेळात करायचा? “

डॉक्टर बन्सल म्हणाले, जेवढा वेळ घालवाल तेवढा देह निकामी होत जाईल. खूप समजूत घातली डॉक्टर बंसल यांनी. खूप समजावून सांगितलं, एका आशुतोषमुळे कितीतरी जणांना नवजीवन मिळणार होतं.


     शेवटी देवकी आणि ऋतुपर्ण यांनी अवयवदानाच्या फॉर्मवर सही केली. सहजच विचारलं,”काय काय दान करता येईल?“

डोळे, हृदय, कातडी, लिव्हर, किडनी, बोन मॅरो, चांगल्या अवस्थेत असलेले पोट, आतडी, सगळं काही.

    काही क्षण देवकीला वाटलं, हे सगळे कावळे आहेत, एका माणसाच्या मरणाची वाट बघत आहेत, टोचून टोचून त्याचे अवयव काढतील 

आणि स्वतः जिवंत राहतील.

 दुसऱ्या क्षणी तिला तिची लाज वाटली, मोठे मन करून डॉक्टरांना म्हणाली,"जेवढ्या जास्त लोकांचा फायदा होईल तेवढा करून घ्या, फक्त माझा आशुतोष मला व्यवस्थितरित्या परत द्या. माझ्या मुलींना त्यांचे बाबा बघायचे आहेत, मी त्याला कलकत्त्याला घेऊन जाईल, त्याचे अंतिम संस्कार होतील."

  डॉक्टर बन्सलनी प्रेमाने देवकीच्या पाठीवर थोपटले, ऋतुपर्णला हलकेच मिठी मारून म्हणाले,"आय कॅन अंडरस्टँड यू सन... आय ऍम प्राऊड ऑफ यू." 


आशुतोष कंपनीची मीटिंग घेत असताना कोसळल्यामुळे त्याला भरपूर कॉम्पेन्सेशन मिळणार होते. अपघाती विमा कंपनीतर्फेदेखील आशुतोषच्या वारसाला रक्कम मिळणार होते होती. आशुतोष अतिशय वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे त्याच्या वारसाला इच्छा असल्यास नोकरी, आणि आशुतोषला मिळत असलेला पगार चालू राहणार होता.


आशुतोषने आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू अतिशय भक्कम केली होती. देवकीला काय वाटले कोणास ठाऊक, आशुतोषचे सगळे सोपस्कार उरकल्यानंतर, देवकी, वेदवती हॉस्पिटलच्या डोनेशन काऊंटरपाशी गेली आणि दहा लाखाचा चेक भरून तिने सही केली, आणि काउंटरवर जमा केला. फॉर्मवर लिहिताना म्हणाली, ज्यांना कोणाला आशुतोषचे अवयव मिळणार आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ही लहानशी भेट. काउंटरमागच्या नर्सच्या डोळ्यात पाणी आले, ती म्हणाली,"मॅडम पेशंट बरा होऊन घरी गेला की लोक डोनेशन देतात, पण तुमचा पेशंट तर..."

डोळ्यातले पाणी सारून देवकीने तिला थांबवले, म्हणाली,"माझ्या आशुतोषसाठी..."


         पुढचे सगळे सोपस्कार करून देवकी ऋतुपर्ण कलकत्त्याला परतले, आशुतोषचे व्यवस्थित अंतिम संस्कार करून त्यांनी आपले आयुष्य पुढे चालवले. वेळ आणि काळ कोणासाठी जसा थांबत नाही आयुष्यही कोणाचं थांबत नाही...


        आज आशुतोषची पहिली पुण्यतिथी. नातेवाईकांबरोबरच काही नवीन नातेवाईक पण आले होते... हो, ज्यांच्या शरीरामध्ये अजूनही आशुतोष जिवंत होता असे सगळे नवीन नातेवाईक. श्रीच्या शरीरात आशुतोषचे हृदय धडधडत होतं, मिलिंदला किडनी मिळाली होती, निशाचा चेहरा आणि हात आशुतोषच्या कातडीने व्यवस्थित झाला होता, अनिरुद्ध नवीन लिव्हरसकट व्यवस्थित राहात होता. नितेशला वेळेवर कॉर्निया मिळाल्यामुळे तो आता पाहूपण शकत होता.


रिया, रिमा आणि ऋतुपर्णला नवीन भाऊ-बहीण मिळाले होते. आपल्या कुटुंबासोबतच, जाताजाता आशुतोषने कितीतरी जणांचे कल्याण केले होते. आशुतोषच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवून ऋतुपर्ण म्हणाला, “बाबा तुम्ही कुठेही गेला नाहीत, तुम्ही इथेच आहात आमच्यापाशी."


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics