kanchan chabukswar

Thriller Children

4.5  

kanchan chabukswar

Thriller Children

स्मार्ट चिकू

स्मार्ट चिकू

7 mins
297



   मुळामध्ये आई बाबा छोटू परत अहमदाबादला यायचं कारण म्हणजे एक तर आजोबांची ची तब्येत ठीक होती, बाबां ची नोकरी आणि आईचा व्यवसाय मध्ये जी सुट्टी झाली होती ती आता भरून काढायची होती. तसेच इतके दिवस ऑनलाइन शाळा असल्यामुळे ती चिकमंगळूर वरून वरून पण छोटू आणि चिकूची शाळा व्यवस्थित चालू होती.


    आता जवळजवळ करोना संपला होता, त्यामुळे चिकू आणि छोटू च्या" न्यू वर्ल्ड" शाळेने प्रत्यक्ष शाळा भरवायची ठरवली. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हजर राहणे भाग होते.


 तसा आता मार्च संपत आला होता, फक्त एप्रिल महिना जेमतेम शाळा होणार होती ती देखील पंधरा दिवस कारण एप्रिल महिन्यामध्ये असतात भरपूर सुट्ट्या. शाळेच्या व्यवस्थापकांच्या मते थोडे दिवस शाळा भरून नंतर उन्हाळ्याची सुट्टी दिली की मुलांना पण ताण येणार नाही, आणि शाळा सुरळीत चालू करण्यात काहीच धोका राहणार नाही. याप्रमाणे भराभर बसच्या कॉन्ट्रॅक्ट वाल्या एजन्सीला निमंत्रण गेली, पालकांनी भराभर बसची आणि शाळेची उर्वरित फी भरून शाळा सुरू झाली.


    खरं म्हणजे पालकांना मार्च एप्रिल मे अशी तीन महिन्याची शाळेची तशीच बस ची फी एकदम द्यायची होती. शाळेची फी मध्ये काही सुटका नव्हती म्हणून बसची फी पालक वर्ग हळूहळू भरत होता. दररोज नवीन मुलं बसमध्ये चढत आणि त्याप्रमाणे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर रोज नवीन रस्त्यावरून बस फिरवत.


    छोटू पण बरोबरच शाळेत जाये करत होता त्याच्यामुळे चिकूच्या आई-बाबांना छोटू ची काळजी नव्हती. नाव समर आहे बर का छोटू च, आणि आपल्या चिकू चे नाव तेजस्विनी.


  त्या दिवशी झालं असं की नेहमीचे नागराज काका[ ड्रायव्हर काका] दुसऱ्या बस वरती गेले होते त्यामुळे एक नवीनच ड्रायव्हर चिकूच्या बस वरती आला होता. तसाच नेहमीचा कंडक्टर पण आलेला नव्हता त्यामुळे बदली कण्डक्टर चिकूच्या बसवर आला होता.


  मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बऱ्याच पालकांनी बस चे पण पैसे भरले आणि आपल्या मुलांना बस मध्ये पाठवले.


चिकूच्या वर्गामध्ये हरीम नावाची दांडगट मुलगी होती, ती आणि तिचा भाऊ हसन, दोघेही नव्यानेच बस मध्ये चढले होते. हसनने दांडगाई करून चिकूच्या भावाची खिडकीची सीट पटकावली होती, तसेच हरिमने दुसऱ्या एका मुलीची खिडकीची जागा बळजबरी करूनच घेतली होती. त्यांनी बस मध्ये भांडाभांडी करून ड्रायव्हर काकाला भंडावून सोडलं," हमे पहिले उतारो, हम बाकी बच्चों के साथ घुमेंगे नही!" असा त्यांनी आल्यापासून धोषा लावला.

हरीमने खिडकीपाशी बसलेल्या ज्वाला चे केस जोरदार ओढले, आणि तिची पोनी सोडून टाकली. त्याबरोबर दोघींचीही भरपूर मारामारी केस ओढा ओढी झाली. ज्वाला च्या मदतीला निशा पण आली हे सगळे चालू बस मध्ये चालले होते.

 हसन पण काही कमी नव्हता, त्याने राजू चा डब्बा खाली पाडून दिला त्याच्यामुळे छोट्या राजूने जोरदार भोंगा पसरला. कंडक्टरला लहान पोरं आवरता येईना. शेवटी कंटाळून तो बसच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला. नाहीतरी बस अर्धा तास फिरणार होती तोपर्यंत मुलांना काय करायचं ते करू देत असा विचार त्यांनी केला.

ड्रायव्हर नवीन होता, त्यातून त्याला अहमदाबादच्या सगळ्या रस्त्यांची व्यवस्थित माहिती पण नव्हती. त्याचे असे की घाईघाईने शाळा सुरू झाल्या तसे घाईघाईने ड्रायव्हर लोकांना बोलवण्यात आले आणि जे आले नाहीत त्यांच्या बदली तात्पुरते ड्रायव्हर घेतले गेले.


ड्रायव्हर राकेश गुप्ता पोरगेलासा तरुण होता, बस मधल्या हाणामारी ने तो वैतागून गेला. हसन आणि हरीमला खरोखरच पहिले उतरवण्यासाठी म्हणून त्यांनी बस वळवली. आणि तिथेच घोटाळा झाला.


  जिथे बस वळवली िथला रस्ता खड्डे खणून तयार होता रस्त्याचं नूतनीकरण चालू होतं त्याच्यामुळे सगळा ट्राफिक दुसर्‍याच दिशेने जात होता. राकेशला नाईलाजाने सगळ्या प्रवाहाबरोबर बस न्यावी लागली. जसा तो पुढे पुढे जात राहिला तर अशा ओळखीच्या खुणा मागे पडत गेल्या. शेवटी गल्ली-बोळातून बस काढत त्याचा रस्ता पूर्णपणे चुकला. जवळ-जवळ तासभर बस अनजान रस्त्यांवरून चालत राहिली.

   नेहमीची वेळ टळून गेल्यामुळे छोटू एवढ्या लहान मुलांनी भुकेने भोकाड पसरले. ज्यांच्या बहिणी किंवा भाऊ बसमध्ये होते ती मुलं शांत होती पण जे एकेकटे होते ते मात्र घाबरले. मार्च चा शेवटचा आठवडा, आमदाबाद मध्ये ऊन म्हणतोय मी! बस तापलेली, दुपारी एक वाजता ची वेळ, खरं म्हणजे बारापर्यंत मुलं घरी पोहोचत असत. एक वाजून गेला तरीही मुलं घरी आली नाही तेव्हा पालकांनी शाळेमध्ये फोन केले. कोणीही उत्तर दिली नाही कारण त्यांनाच काही माहीत नव्हते.


    थॉमस कंपनीची बस असल्यामुळे कंपनीच्या ऑफिसमध्ये एकदम गडबड सुरू झाली. नवीन ड्रायव्हर कोण, त्याचा फोन नंबर काय, सगळ्यांची भराभर माहिती एकमेकांना कळवली गेली.

राकेश गुप्ता कडे जुना डबडा मोबाईल असल्यामुळे त्याचा चार्ज केव्हाच संपलेला होता. ड्रायव्हरचा संपर्क होईना आणि मुलं तर सगळी लहान त्याच्यामुळे सगळीकडे जबरदस्त घबराहट पसरली.


चिकू आणि छोटू च्या आईने पण शाळेमध्ये धाव घेतली. शेवटी मुलं आणि बस गेली कुठे?


    सगळ्या छोट्या मुलांच्या आई धीर सुटून रडायला लागल्या. शाळेच्या मॅनेजमेंट नि पोलिसांकडे जाऊ नका अशी काकुळतीने विनंती केली. चार दिवस झाले शाळा सुरू होऊन आणि पूर्ण बस मुलांसकट गायब झाली होती.


पालकांचा धीर सुटायला लागला, मुलांना किडन्याप केले का? त्यांना दुसऱ्या प्रदेशात नेऊन विक्री तर नाही होणार? मन चिंती ते वैरी न चिंती अशी स्थिती सगळ्या पालकांची झाली.


नेहमीचा ड्रायव्हर नागराज आपली स्कूटी घेऊन नेहमीच्या रस्त्यावरून फेरफटका मारून आला पण शाळेची बस कुठेही दिसली नाही.


    राकेश ड्रायव्हरला आता घाम फुटला होता. बसमधले पेट्रोल पण संपत आलेलं होतं. त्याला रस्ता सापडत नव्हता.

चिकूच्या लक्षात हा सगळा प्रकार आला.

एक मोठे डेरेदार झाड बघून चिकू न ड्रायव्हरला बस थांबवायला सांगितली. नशीब म्हणजे ड्रायव्हर कर्नाटका चा होता, बदली ड्रायव्हर म्हणून तो आला होता, त्याला आमदाबाद ची गुजराती भाषा अजिबातच येत नव्हती, त्यामुळे त्यामुळे जेव्हा चिकू न कानडी भाषेमध्ये त्याला समजावून सांगितले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. चिकूला गुजराती हिंदी कानडी आणि इंग्रजी अशा चार चार भाषा येत होत्या. त्यामुळे तिने ड्रायव्हर काका ला मदत करायचे ठरवले.

 आजोबा आजींनी चिकूला एक शिकवण दिली होती, चिकूच्या चड्डीच्या खिशामध्ये कायम दोनशे रुपये ठेवलेले असत. काही वेळ आली तर, कुठे चिकू हरवली तर, किंवा अजून काही गरज पडली तर, चिकूच्या आईने पण तीच शिस्त अहमदाबादला देखील चालू ठेवली होती.

 आता दोन वाजले होते सगळ्या मुलांना भूका लागल्या होत्या.


मोठ्या डेरेदार पिंपळाच्या वृक्षाखाली बस थांबली त्याच्या बाजूलाच एक छोटे किराणा चे दुकान होते, चिकू कंडक्टर ला घेऊन त्या दुकानापाशी गेली, आपल्या खिशातले शंभर रुपये देऊन दोन रुपये वाले पार्ले जी चे 

50 पुडे विकत घेतले. 48 मुलांना वाटले एक ड्रायव्हर काकाला आणि एक कंडक्टर दादाला. राकेश ड्रायव्हरला तिने प्रेमाने सांगितले की आपण थोडा विचार करू या की आपण कुठे आले आहोत. चिकू न गुजराती मध्ये आजोबांच्या वयाच्या असलेल्या दुकानदार आजोबां बरोबर गुजराती मधून संवाद साधला.


 दुकानदार आजोबांना वाटले होते की एखाद्या शाळेची बस” राणी का वाव” बघण्यासाठी इथे आले आहे, पण जेव्हा त्यांच्या लक्षात मध्ये सगळा प्रकार आला तेव्हा त्यांनी पण मदत करायचे ठरवले. चिकूला तिथल्या एरिया चा पत्ता सांगितला. आपला मोबाईल फोन त्यांनी मोठ्या विश्वासाने चिकूच्या हातात सोपवला, त्यांच्या फोनवरून चिकू ने आईचा नंबर फिरवला. पण आई कोणा कोणापाशी चौकशी करण्या मध्ये एवढी व्यग्र होती की तिचा नंबर कायमच बिझी येत होता.

त्याच दिवशी नेमकं क्लास टीचर ने सगळ्यांना शाळेची डायरी रिमार्क लिहिण्यासाठी म्हणून शाळेमध्ये ठेवून घेतली होती त्यामुळे शाळेचा नंबर देखील पाठ नव्हता. राकेश ड्रायव्हर नवीन होता त्याचा फोन बंद पडला होता त्याच्यामुळे त्याला पण कोणाला फोन करता येत नव्हता.


   शेवटी चिकू न दुकानदार काकांच्या मदतीने थेट आपल्या आजोबांना फोन लावला. आजोबांनी चटकन फोन घेतला, पटापट त्यांना कळलं की चिकू आणि छोटू कुठल्या संकटात सापडले आहे ते. त्यांनी ताबडतोब आईला आणि बाबांना मेसेज केला. तसेच आमदाबाद डीआयजी यांनादेखील चिकूच्या आजोबांनी पटापट मेसेज केला. चिकू ने व्यवस्थितपणे ड्रायव्हर काकाचं नाव कंडक्टर दादाचं नाव बस् नंबर हे आजोबांना सांगितले तसेच ती कुठे उभी आहे हेदेखील आजोबांना व्यवस्थित सांगितले.


  राकेश ड्रायव्हर आता रडायला लागला होता, पोलीस यांच्याकडे केस गेली तर त्याला भरपूर मार पडणार होता, त्याची नोकरी पण जाणार होती, कदाचित मुलं पळवण्याच्या केस खाली सगळे पालक त्याला ठोकून काढणार होते. त्याचं कुटुंब आई-वडील आता उपाशी मरणार म्हणून तो डोळे कान नाक लाल करून रडत होता. त्याच्या प्रमाणे त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेला कंडक्टर दादा पण त्याच्याच बाजूला पाठीला पाठ लावून बसून रडत होता. प्रेमाने दिलेली बिस्किट त्याने खाली पण नाहीत.

 बस मधल्या मुलांनी पार्ले जी बिस्कीट खाल्ल्यामुळे त्यांना थोडीशी हुशारी वाटली. हरिम आणि हसन आता गडबड न करता शांत बसले होते. उषा निशा, ज्वाला परी, छोटू चे सगळे मित्र आता शाळेत शिकवलेली गाणी म्हणत होते. पार्ले जी बिस्कीट खाल्ल्यामुळे त्यांना थोडीशी हुशारी आली होती. बस झाडाखाली उभी होती त्याच्यामुळे बस थोडी गार पण झाली होती.


बस शहराच्या बाहेर, जेथे, पाच मजली "राणी का वाव" आहे, तिथे आलेली होती.

अर्धा-पाऊण तास तसाच गेला, दूरून पोलिसांची जीप आणि थॉमस कंपनीची अजून एक बस येताना दिसली.


  शाळेची अजून एक बस बघून सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सगळी मुलं शांत गुण्यागोविंदाने बसली होती. प्रत्येकाच्या हातामध्ये पार्ले जी चे पुडे रिकामे केलेले दिसत होते.


थॉमस कंपनी च्या बसमधून सगळे पालक खाली उतरले आणि वेगाने बस मध्ये चढले. ज्याने त्याने आपापल्या पोरांना हुडकून आधी त्यांना गळ्याशी लावलं ,भरभर मुके घेऊन त्यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांच्यापुढे केला.


  थॉमस कंपनीचा मालक जेकब थॉमस बस मधून खाली उतरला आणि त्यांनी राकेश च्या अंगावर धावून जात त्याच्या मुस्काडीत मारण्यासाठी हात उचलला, ते बघून चिकू मध्ये पडली. तिने झालेला प्रकार सगळ्यांना समजावून सांगितला.

दुकानदार काकांनी देखील चिकू ने दिलेले शंभर रुपये तिला परत केले. शहाण्या चिकूचे सगळ्यांनी खूप कौतुक केले. आईच्या डोळ्यातून तर चिकू बद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. छोटू ने पण आईला चिकू ताई ने त्याला कसे सांभाळले त्याच्याबद्दल बोबड्या बोलIत वर्णन करून सांगितले.

   हरिम आणि हसन च्या आईने सगळ्यांची माफी मागितली, मुलांच्या दांडगाई मुळे आणि भांडाभांडी मुळे राकेश गुप्ता ड्रायव्हरने बसचा नेहमीचा रस्ता बदलावा लागला आणि तो चुकला. मुले सुखरूप बघून आई-वडिलांनी राकेश गुप्ता आणि कंडक्टरला माफ केले. तसेच थॉमस कंपनीकडे बसला जीपीएस लावण्यासाठी भाग पाडले.


    आजचा दिवस चिकूच्या प्रसंगावधानामुळे, हुशारीमुळे आणि तिने लक्षात ठेवलेल्या आजोबांच्या फोन नंबर मुळे सुखरूप पार पडला. आईने ताबडतोब आजोबांना फोन करून चिकूला त्यांच्याशी बोलायला दिले. आजी ,आजोबा, बाबा ,छोटू सगळे एकदम खूष झाली.


   त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये न्यू वर्ल्ड चा मुख्याध्यापकांनी शाळेची सभा बोलावून चिकूचा सगळ्यां समक्ष सत्कार आणि खूप खूप कौतुक केले. ते म्हणाले "अशी तेजस्विनी मुलगी आमची विद्यार्थिनी आहे याचा आम्हाला अभिमान आहे."



Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller