Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Pooja Tikone

Thriller


3.3  

Pooja Tikone

Thriller


"पिराची स्वारी"

"पिराची स्वारी"

2 mins 23.3K 2 mins 23.3K

......"पिराची स्वारी"......

    मी लहान असताना मला एक वेगळाच अनुभव आलेला तो क्षण आठवला कि आजही माझ्या अंगावर काटा येतो .माझी सातवीची परीक्षा संपल्यावर मी मामाच्या गावी गेले होते.माझे मावस भाऊ,मामे भाऊ असे आम्ही सगळे आठ जण बच्चे कंपनी होतो .दिवसभर खेळून दमल्यामुळे रात्री लवकर जेवण करून लवकरच झोपी गेलो.

    रात्री बारा-एकच्या आसपास आमचा कुत्रा सूजी भूंकत असल्यामुळे मला जाग आली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सर्वजण अंगणात निंबोळीच्या झाडाखाली झोपलो होतो.लाईट गेलेली असल्यामुळे झाडांवर बसलेल्या काजव्यांचा लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला होता.आकाशही निळेशार दिसत होते.आकाशात लुकलुकणारे चांदण्या जणू माझ्याकडेच पाहत आहे असे वाटत होते.मी अंगणातला दरवाजा उघडून बाहेर गेले.बाहेरही काळाकुट्ट अंधार पडला होता.दरवाज्यामधून मी सुजीला आवाज दिला त्यांनतर बाहेर जावून पाहिल तर तो शांत झोपला होता.रोडवर चहु बाजूला पाहिल तर दूरवर पर्यंत कोणी दिसत नव्हत मग आवाज कोणाचा येत होता, हाच विचार करत मी दरवाज्या बंद करुन पुन्हा आत येईला निघाले तोच अचानक मला एक माणूस माझ्या दिशेने येताना दिसला.त्या माणसाने पांढऱ्या रंगाचा सदरा,पांढऱ्या रंगाचे धोतर आणि पांढऱ्या रंगाचा फेटा घातला होता. हातामध्ये घुंगरू असलेली एक काठी होती. तो माणूस जसजसा पुढे येत होता, तसतसा उंच होत चाललेला दिसत होता.मला वाटले मी झोपेतच आहे म्हणून पुन्हा डोळे चोळले आणि पाहिल तर खरच आशोकाच्या झाडापेक्षाही उंच असा माणूस हळुहळु माझ्याच दिशेने येत होता.जसजसा माझ्या दिशेने येत होता, तसतसा मोठा होताना दिसत होता.अंधार असल्यामुळे त्या माणसाचा चेहरादेखील नीट दिसत नव्हता. फ़क्त पांढरेशुभ्र कपडे दिसत होते. भूत दिसले या विचारानेच मला घाम फुटला.माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तो माणूस माझ्या समोरुन जात असताना माझ्याकडे पाहिले देखील नाही.नंतर मी मागे वळून पाहिले तो पर्यंत तो माणूस गायब झाला होता. भीतीने दरवाज्या बंद न करताच जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आजीला घडलेला प्रकार सांगितला मग तेव्हा मला आजीने सांगितले की, मला हि एकदा अश्या प्रकारचा अनुभव आलेला. तो माणूस भुत नाही तर गावाबाहेर एक बापूजीवा देवाच मंदिर आहे आणि तो माणूस नसून बापुजीवा देव आहे. रात्री बारा-एकच्या दरम्यान पीराची स्वारी मंदिराकडे जाईला निघते. आजीने सांगितले की सगळ्यांनाच बापुजीवाचे दर्शन घडत नाही. क्वचितच लोकांना पिराच्या स्वारीचे दर्शन होते.

    पण मला आजही हे कळत नाही की मला खरच हा अनुभव आलेला आहे की मला भास झालेला आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Pooja Tikone

Similar marathi story from Thriller