kanchan chabukswar

Thriller

4.5  

kanchan chabukswar

Thriller

ट्रेक

ट्रेक

11 mins
1.0K


दोन महिन्याचे ट्रेनिंग आटपून अजय आणि त्याची सहकारी अनिता भारतात परतली होती. रितू आर्किटेक्चर ची विद्यार्थिनी तिच्या मित्राबरोबर कुठेतरी ट्रेक ला जाण्याचे ठरवीत होते होती. मंदार आणि त्याचा मित्र सुमित यांना पण ट्रेकची आवड होती. यावर्षी राखी पौर्णिमेची सुट्टी शुक्रवारी आली होती त्याच्यामुळे सगळ्या मंडळींना शुक्रवार शनिवार रविवार अशी जोडून सुट्टी आली होती.


भूमी ट्रेकने या संधानात लोणावळ्याहून भीमाशंकरचा ट्रेक आखला होता. काळे काका भीमाशंकरच्या ट्रेक प्रमुख म्हणून काळे काका जाणार होते. भूमि ही संस्था अतिशय सुरेख रित्या ट्रेक चे आयोजन करत असते. लहान मुले देखील आपल्या आई-वडिलांचा भूमी ट्रॅक बरोबर जरूर जात असत.

चार दिवसाचे ठरली ट्रॅक. गुरुवारी रात्री लोणावळ्याच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती भेटण्याचे ठरले.


पावसाळी हवामान आणि लोणावळ्याचा ट्रेक सगळ्यांना फारच मजा वाटायची. रितू ची आजी ट्रॅक च्या संदर्भात थोडी साशंक असायची असायची. तिला वाटायचं एकटीच मुलगी कुठे जंगलात फिरणार? काही झालं तर वेडंवाकडं झालं तर ? जिथे शहरांमध्ये मुलींची सुरक्षा थोडी कठीण होती तिथे जंगलामध्ये अनोळखी माणसांसोबत जाणं म्हणजे आजीला भीतीदायक वाटायचं. आणि . रितू मात्र बिनधास्त होती.


बऱ्याच मुला-मुलींनी लोणावळ्याच्या ट्रेकसाठी आपलं नाव नोंदवलं, भूमी ट्रेकची एक शिस्त होती, कमीत कमी सामान, कमीत कमी पैसे, आणि सगळ्यांचे सहकार. ज्या गावात ते थांबायचे, त्या गावाच्या पाटलाला माणशी पन्नास रुपये देऊन गावच्या धर्म शाळेमध्ये स्वतःची सोय करून घेत असत. मुलांबरोबर एक अनुभवी काका जात असत, काकांच्या बॅगमध्ये स्वयंपाकाची मोठी भांडी आणि काही जरुरीच्या वस्तू असतात. अनुभवी ट्रेकर्सकडे बाकीचे सामान काही दोऱ्या काही छत्र्या आणि जरूरीपुरते औषध असत. आजूबाजूच्या परिसरामध्ये भूमी ट्रॅक्स होतं फार नाव होतं.

पालक बिनधास्तपणे आपल्या मुलांना भूमी ट्रॅक बरोबर सोडत असत.


अजय अनिता रितू, मंदार, विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत, निलेश, रमाकांत, श्रीहरी, नेहमी जाणारे लोणावळ्याच्या प्लॅटफॉर्मवर जमले. बघतात तो काय तिथे चित्रविचित्र पोषाख केलेले जवळजवळ पंचवीस मुले-मुली ट्रेकसाठी आले होते. त्यातल्या एका शिष्ट मुलांनी अजयला विचारलं की बस केव्हा येणार आहे? बहुतेक ते कुठल्या तरी ट्रीपच्या सारखेच ट्रेक असते असं समजून आले होते. प्रत्येक मुलाकडे एक व्हीलर बॅग होती आणि भरपूर सामान होतं, कोल्ड्रिंग च्या बाटल्या, बटाट्याचे चिप्स, कुरकुरे, अजयला हसूच आलं. ट्रॅकवर ती मुले कधीही कोल्ड्रिंग किंवा ड्रिंक घेत नसत हा तिथला अलिखित नियमच होता, प्लास्टिकच्या पिशवीतले कुठलेही सामान ट्रॅक वर नेले जात नसे.


त्या मुलांचे उत्साह लोणावळ्याच्या प्लॅटफॉर्मवरती वाहून गेले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता काळे काकांनी आपली बॅग उचलली आणि सगळ्यांना आपल्या पाठीमागे यायला सांगितले. मुलांना यायचं होतं एका लाईनमध्ये काळे काकांच्या मागे चालु लागले, बाकीची मुलं घरी परत गेली.

रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली होती, आणि लोणावळ्याला तर साडे पाच वाजताच अंधार पडायला सुरुवात झाली.


रीतुला चिक्की फार आवडायची म्हणून म्हणून मंदारने धावत जाऊन विकत आणली होती. त्याने आल्या आल्या दोन तुकडे रीतुला दिले आणि बाकी सगळे बरोबरच्या मित्रांना वाटले. या मुलांना पावसात खेळणे फार आवडायचे पावसात खेळ!-- सगळी मंडळी फारच उत्साहात होते आणि श्रीकांत, निलेश तर विनोद सांगण्यात फार हुशार होते त्यामुळे गप्पा मारत मजे मध्ये त्यांचा ट्रेक सुरु झाला. लोणावळ्यापासून भीमाशंकर 14 तासांवर होते, ट्रेक करताना 14 तासाचे कधीकधी सोळा तास पण होतात, चार तास चालल्यानंतर थोडं थांबायचं थोडी विश्रांती घ्यायची काही खायचं आणि मग पुढे जायचं असा त्यांचा नियम होता. असं ठरलं होतं की रात्री येणाऱ्या गावांमध्ये मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे भीमाशंकरकडे निघायचं त्यानुसार पहिले गाव आल्यानंतर काळेकाका पुढे झाले आणि त्यांनी पोलीस पाटलांना भेटून रात्रीच्या राहण्याची व्यवस्था केली. रात्रीची व्यवस्था नेहमी साधीच असायची, आपली आपली स्लीपिंग बॅग उघडून आणि मुलींना मध्ये ठेवून सगळे गोलाकार झोपायचे, रात्री झोपताना देखील पायात आणि हातात मोजे, आणि डोक्याला कानटोपी असा नियमच होता. पोलीस पाटील जेवायची व्यवस्था करत होते पण मुलांनी पहिल्या दिवशीच रात्रीचा जेवण बरोबरच आणल्यामुळे जेवणाची गरज नव्हती. दुसऱ्या दिवशीचा ट्रॅक हा पुष्कळ लांब असल्यामुळे काळे काकांनी सगळ्यांना झोपायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच काकांनी सगळ्यांना उठवले आणि सहा वाजता मुलांनी पुढचा रस्ता पकडला, मजेत फोटो काढत , वनस्पतींची माहिती करून घेत,      

      

सगळे जण भीमाशंकरच्या दिशेने चालले होते नेहमीचाच रस्ता आणि काकांचा अनुभव त्याच्यामुळे सगळे बिनधास्त होते अजय अनिता मंदार हे पुढे चालत होते मध्ये रितू आणि तिच्या मागे बाकीचे, काकांची जड बॅग मधून मधून सगळे जण आपल्या पाठीवर घेत होते.  वाटेत लागलेल्या ओढ्याच्या किनारी काळेकाका थांबले आणि म्हणाले इथे आपण थांबू काही खाऊ आणि मग पुढे जाऊ. अजय अनिता आणि विजय वाळलेला पाला आणि लाकूड आणायला गेले, तेवढ्यात सारंग आणि सौरभ ने चूल तयार केली, ओढ्याच्या काठी बसून काकांनी तांदूळ धुतले, आणलेले बटाटे पण धुतले आणि पातेले तयार ठेवले. चूल पेटली अर्ध्या तासामध्ये सुरेख चवदार खिचडी तयार झाली, रितुने त्याच विस्तवावर थोडे पापड भाजले भाजले आणि आजीने दिलेले लोणचे सगळ्यांना वाढले, काळे काकांनी येताना सांज्याच्या पोळ्या पण आणल्या होत्या, मजेत जेवण करून मुलांनी भांडी घासली आणि सामान आवरून पुढे चालण्यास सुरुवात केली.


सारंग फार सुरेख बासरी वाजवायचा, सगळ्यांनी आग्रह करून त्याला बासरी वाजवायला सांगितले, बासरीच्या गोड आवाजात वाट कशी सरली ते कोणालाच कळलं नाही. अचानक चारी बाजूनी अंधार दाटून आला खरं म्हणजे फक्त अडीच वाजले होते, पण इतके ढग जमून आले आणि कडकड विजा चमकायला लागल्या, पुढचे गाव येण्यासाठी तर अजून दोन तास होते वाट पूर्ण निर्मनुष्य आणि जंगलाची होती, काकांना जरी काळजी वाटली तरी मुले बिनधास्त होती, जेवण झाले होतं साथीला सारंगा ची बासरी होते सगळ्यांनी ठरवले असेच पुढे जायचं.


अर्धा तास झाल्यानंतर काळोख अजूनच गडद झाला, आणि नेहमी न लागणार ओढा अचानक मध्ये आला. काळे काकांच्या तर पायाखालची वाट होती मग हा ओढा आला कसा? अजय आणि विजय ते पण नेहमीचे ट्रेकर्स होते आधीच्या ट्रेक मध्ये हा ओढा व्त्यांनी कधीच बघितला नव्हता.

ओढ्याच्या दूरवर दोन मुली दिसत होत्या, त्यांना बहुतेक ओढा ओलांडून पलीकडे जायचं होतं. रानातल्या कातकऱ्यांच्या मुली असतील असं वाटून, रितू धावतच त्यांच्याकडे गेली.

दोघी मुली दिसायला सारख्याच होत्या, सारखेच कपडे घातले होते, हनुवटी वरती हिरव्या गोंधळाचा ठिपका तसाच होता, कासा मारलेला हिरवं लुगडं, हातात हिरव्या बांगड्या, विस्कटलेल्या केसांचा बुचडा, गळ्यात काळी पोत, कपाळाला मोठा लाल कुंकू, कमरेला कोयता दोऱ्याचे वेटोळं.

दोघींच्याही डोक्यावरती टोपल्या होत्या. त्यांना रस्ता माहिती असेल असं वाटून रीतू त्या दोघींकडे गेली, त्यांनी हसूनच ओढ्याच्या उताराकडे बोट केलं, आणि आपल्या मागून या अशी खूण केली.


रीतूने बाकीच्या ग्रुपला यायची खूण केली. अजयला जरा विचित्र वाटत होतं पण काही इलाज नव्हता, आता सारंग ने बासरीवर" गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी" गाणं वाजवायला सुरुवात केली. त्यासरशी सगळ्यांना खूप हसू आले. मुलींनी मागे वळून बघितले, त्यांची नजर एकदम थंड आणि कोरडी होती, ती बघून अनिताच्या अंगावर शहारा आला.


अचानक कुठून तरी कुत्र्याचे दोन पिल्लू त्या मुलींच्या मागे चालू लागली, असेल सोबत म्हणून मुलांनी लक्ष दिलं नाही, काळोख दाटून येत होता, कुठेही गावाचं नामोनिशाण नव्हतं, फक्त त्या दोन मुलींचा आधार होता. अचानक कुत्र्याचे पिल्लू मोठी व्हायला लागली, हळूहळू त्यांची शेळी झाली.


    ओढ्याच्या पाण्याला उतार पडण्यापेक्षा उतार पडण्याऐवजी अजून वाढतच चाललं होतं. आता शेळीचे लहान गाढव झाली, मुली पुढे पुढे चालत राहिल्या, बाकीच्या मुलांचे डोकं जणूकाही बंद झालं होतं, त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं काही भानच नव्हतं. मुलींच्या डोक्यावरचे टोपल्या हळूहळू मोठ्या होत होत्या, अजय ने रमाकांतचे हात धरून त्याला मागे ओढले, बहुतेक ते सगळेजण कुठल्यातरी विचित्र भोवऱ्यात सापडले होते.


ओढा एका वळणावरती आल्या तशा त्या दोघी जणी डोक्यावर टोपली मध्ये बसून पाण्यामध्ये शिरल्या, आणि गायब झाल्या. आता गाढवांचे घोडे झाले होते, एका घोड्याने श्रीहरीला मागून धक्का दिला, दोन्ही घोडे त्यांच्या मागून चालत होते, जणू काही त्यांनी मागची वाट बंद करून टाकले होते होती.

        

देशमाने प्रॉपर्टी, अशी पाटी लागली, कंपाउंड दार उघड होतं, तिथे सगळ्यांना ढकलून, त्या दोन घोड्यांचे आता दोन कावळे झाले होते. सगळी मुलं अचानक शुद्धीवर आली, आतापर्यंतच्या भरलेल्या वातावरणामुळे त्यांना काहीही कळत नव्हता, सौरभ च्या आजीने मोहरीची पेस्ट त्याच्या बॅगेमध्ये ठेवली होती त्यामुळे तो थोडाफार तरी शुद्धीवर होता.


देशमाने प्रॉपर्टी जंगलाच्या मध्यभागी असून बरीच प्रचंड प्रमाणावर पसरलेली होती, एवढ्या मोठ्या गर्द हिरव्या जंगलात, देशमाने प्रॉपर्टीमध्ये तर झाडे जळून गेली होती, मध्यभागी भल्यामोठ्या वाडा, फारच भयानक दिसत होता. मागे जाण्याचा प्रयत्न केला तर तो ओढा जणू वाट अडवून उभा होता.


  अजयने रमाकांत आणि अनिताचा हात धरून मागे ओढले होते तेवढे ओढ्याच्या पलीकडे राहिले होते. मध्ये वाहणारे ओढा यामुळे या तिघांना काहीही करता येत नव्हतं. हतबल होऊन बाकीची टीम वाड्यात शिरताना त्यांना दिसत होती.


वाड्याचा भलामोठा दरवाजा करकरत उघडला, आत मधल्या दालनांमध्ये स्वच्छ प्रकाश दिसत होता, धोतर, सोवळे, नेसलेले

आणि खांद्यावर उपरणे घेतलेले बरेच लोक काहीतरी काम करत होते. काळ धोतर नेसलेला एक पैलवान सारखा दिसणारा माणूस त्यांच्या दिशेने आला, आणि गोड आवाजात म्हणाला," अण्णा, पाहुणे आले बर का!"


       लाल भडक रेशमी सोवळे नेसलेला प्रौढ माणूस होम कुंडापासून उठून दरवाजापर्यंत आला, त्याच्या कपाळावरती लाल फुली काढली होती. तोंड उघडल्यावर त्याच्या तोंडातली धारदार सुळे चमकले. जाड बसक्या आवाजात म्हणाला,"या, शेवटी तुम्ही पोहोचलातच."


    तोंडाचे बोळके उघडून क्लक क्लक क क असला आवाज करत एक म्हातारी पुढे आली, पांढऱ्या जटा, लाल साडी, कमरेतून वाकलेली, हातात एक वेडावाकडा बांबू, तिच्या कपाळावरती लाल फुली होती. आपले पांढरे डोळे गरागरा फिरवत म्हणाली," बरोबर! आता चित्र पुरे होईल." परत म्हातारी क्लबक्लक क्लबक्लक आवाज करत हसली.. रितु च्या हाताला धरून म्हातारी ने तिला आपल्याबरोबर ओढत ओढत जिन्या पर्यंत नेले. काहीतरी फार भयानक होत होते.


जिन्याच्या एका खांबाला म्हातारीने रितूचे पाय बांधले. विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत, यांना लाल सोवळे नेसलेल्या नेसलेल्या गृहस्थाने फक्त डोळ्याच्या नजरेने ढकलले आणि एका खोलीत बंद केले. काळ धोतर नेसलेल्या एका माणसाने या चौघांनाही जांभळ्या रंगाच धोतर नेसायला सांगितला .

बांधल्यानंतर काळे काकांना स्वयंपाक घरामध्ये नेण्यात आलं, स्वयंपाक घरामध्ये, मोठा दगडी पाटा आणि विचित्र आकाराचा वरवंटा ठेवला होता. वरवंटा विचित्र पद्धतीने आपोआपच पाट्यावरती आपटत होता. सगळं काही फार भयानक होत. काळे काकांच्या बॅग मधून भांडी बाहेर काढण्यात आली, म्हातारी परत हसली, एका मोठ्या भांड्यामध्ये तिने काळे काकांना बसायला सांगितले, आणि त्यांच्या डोक्यावर जोरदार वरवंटा हाणला. काळेकाका एकदम लहान मुलगा होऊन भांड्यामध्ये घुसले. भांड्यावर झाकण ठेवून म्हातारीने ते एका मोठ्या चुलीवर ठेवून दिले.


  “लक लक लक क्लक क्लक “ आवाज करत म्हातारीने ओरडून सांगितले "प्रसाद तयार होतोय बरं." काहीतरी भयानक अमानवी प्रकार चालू होता.

निलेश आणि सारंग, यांना पण काळया धोतरवाल्या माणसाने पकडले, त्यांचा डावा हात आणि डावा पाय एकत्र बांधून त्यांना हॉलमधल्या खांबाशी बांधून ठेवले.


    तेवढ्यात त्या दोघी मुली तिथे आल्या, यज्ञवेदीपाशी उभे राहून, आपले केस सोडले, डोके गरागरा फिरवत, यज्ञ वेदीवर आपले केस आपटायला सुरुवात केली." होउदे, होऊ दे, घेऊन जा, घेऊन जा, मुक्त कर, मुक्त कर " असे काहिसे शब्द पुटपुटत त्या आपले केस आपटत होत्या. हळूहळू त्यांचा आवाज वाढायला लागला. लाल सोवळे नेसलेल्या गृहस्थाने निलेश, सारंग, आणि रितू च्या कपाळावर लाल फुली काढली. फुली काढता क्षणी, निलेश आणि सारंग रूपांतर मांजर मध्ये झालं.


रितू तशीच उभी होती, तिने पटकन आपल्या मोकळा हात घालून, बागेतून मोहरीची पेस्ट काढली मोहरी, आणि स्वतःच्या तोंडाला लावली, तसं तिने आपल्या हाता पायाला देखील पटपट मोहरीची पेस्ट लावली. डोळ्यांनी खुणा करून तिने निलेश आणि सारंगला आपल्याजवळ बोलावले. आता ते दोघं मांजर झाले होते, पण त्यांच्या कपाळावर मात्र लाल फुली तशीच होती. रितुने जोर-जोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. तिने ठरवले की आजूबाजूला काही बघायचेच नाही. दोघा मांजरांच्या तोंडाला तिने मोहरी ची पेस्ट लावली आणि ज्यांना स्वयंपाकघरात जायला खुणावले. मांजर झालेला निलेश उड्या मारत स्वयंपाक घरात गेला आणि त्यांनी काळे काकांच्या तोंडाचा पापा घेतला. काळे काका गरम भांड्यामध्ये बसले होते, त्यांचे हात पाय त्यांना तिथून निघता येत नव्हते, तरीपण त्यांनी जोर लावून स्वतःला भांड्यातून बाहेर काढलं, मोहरीची पेस्ट तोंडाला लागल्यामुळे म्हातारी किंवा लाल सोवळ वाला गृहस्थ त्यांना काहीही करू शकत नव्हता.


  त्या दोघी मुलींचे केस आपटणे चालू होते, आता यज्ञवेदी मधून आगीचे लोळ वरती उठायला लागले, आणि अचानक तिथल्या नारळाला, केस येऊ लागले. नारळाचे डोक्यावरचे केस लांब लांब होत, विजय सारंग सौरभ श्रीकांत यांच्या खोलीपर्यंत पोहोचले. या चौघांनाही केसांमध्ये बांधत यज्ञवेदीपर्यंत खेचण्यात आले. लाल धोतरवाल्या गृहस्थाने चारी मुलांचे केस वस्तऱ्याने काढले, आणि ते यज्ञामध्ये फेकले. आता ते चौघेही मुले अतिशय भयानक दिसत होती. आता तो नारळ घडाघडा हलू लागला," बळी द्या बळी द्या," असे म्हणून घुमायला लागला.


कुठल्या तरी भयानक वाड्यामध्ये सगळी मुले अडकली होती, बाहेर पडायला रस्ता नव्हता, कुठे दारच नव्हतं, सगळीकडे नुसत्या भिंती, त्या भयानक घरामधले मधले सगळे लोक आता, यज्ञI भोवती बसून घुमायला लागले होते. त्या खोली मधली सगळी चित्र आता जिवंत झाली, आणि ती चित्रातल्या चित्रात घुमायला लागले लागली. भिंतीवर टांगलेली हरणांची वाघांची तोंड पण डोळे गरागरा फिरवायला लागली. एक फूट उंचीच्या चार माणसांनी एक मोठा लाकडी ओंडका यज्ञवेदीपाशी आणला. काळे काका, रितू, मंदार, विजय, सारंग, सौरभ, श्रीकांत, निलेश, श्रीहरी, त्यांच्या जीवनाचा अंत होणार होता.


आता रमाकांत अजय आणि अनिता सोडले तर सगळेजण संकटामध्ये होते. रमाकांत आणि अजय आणि बराच विचार केला कसं वाचवायचे यांना, इंजिनियर मुलांना मांत्रिक तांत्रिक ची काहीच माहिती नसते पण आई-वडिलांच्या संस्कारामुळे आलेली भक्ती, देवावरचा दृढविश्वास, त्यांना, या पण संकटातून तारून नेणार होता. अनितानं जोरजोरात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली, रमाकांत आणि अजयने आपली बॅग तपासली त्याच्या मध्ये असलेली लिंब, सुरी, लोखंडी आकडे, काही दोर असे त्यांनी काढून घेतले, अनिता नको नको म्हणत असताना देखील तिला ओढ्याच्या त्याच तीरावर ठेवून दोघेजण पटकन पाण्यामध्ये शिरले. आता त्यांनी तोंडामध्ये राम नामाचा जप करत देशमाने कंपाऊंडमध्ये प्रवेश केला, दोघांनीही लिंबू कापून ठेवले होते आणि मधून मधून ते त्याचा वास घेत होते, तसेच अनिता न आणलेली मोहरीची पेस्ट देखील त्यांनी आपल्या तोंडाला आणि हातापायाला लावून घेतली होती. दोघांनी पण माकड टोपी घातल्यामुळे त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हतI.


आता सूर्यास्ताचा वेळ झाला होता, अनिता एका झाडाखाली बसून हनुमान चालीसा सतत जप करत राहिली. मोबाईलची रेंज लागतच नव्हती त्यामुळे कुठल्याही फोनचा काहीही उपयोग नव्हता. थोडासा अंधार झाल्या नंतर रमाकांत आणि अजय देशमाने यांच्या वाड्या मध्ये शिरले.


वाड्यामध्ये येण्यासाठी जो दरवाजा होता तो मागे वळून बघितल्यावर ती त्याची भिंत झालेली होती. आता बाहेर जायची वाट खुंटली होती. त्या दोघांनी विचार केला होता सगळ्या टीमला बाहेर काढूनच ते बाहेर जातील. आत मधले दृश्य बघून अजय आणि रमाकांतच्या च्या अंगावर सरसरून शहारा आला. आपल्या मित्र-मैत्रिणींचा अवतार आणि अवस्था बघून त्यांची जीभ टाळ्याला च चिटकली. तरीपण डगमगून न जाता दोघांनीही एका विचाराने प्रयत्न करायचे ठरवले.


रितुने त्या दोघांना बघितले आणि आपल्या पाशी बोलावले, मध्यभागी असलेल्या यज्ञकुंडचा लाल पिवळा प्रकाश सगळ्या बळींच्या चेहऱ्यावरती चमकत होता. रितुने अजयला स्वयंपाक घर कुठे आहे ते दाखवले, अजय ने पटकन जाऊन पातेल्यामध्ये पाणी आणले आणि धाडकन यज्ञकुंड यामध्ये ओतून दिले.


डोळे मिटून बसलेला लाल सोवळ्यातला माणूस खाडकन जागा झाला, त्याने रागाने आजूबाजूला नजर फिरवली, पण आता अंधारून आले असल्यामुळे आणि अजय आणि रमाकांत ने घातलेल्या निळ्या कपड्यांमुळे , ते त्याला दिसले नाहीत. लाल लुगड्यातली म्हातारी आता तिचा वेडावाकडा बांबू जोर जोरात घुमवू लागली," टप्, आटपा आटपा, क्लक क्लक क्लक क्लक क्ल क्ल क्ल क्ल," म्हातारी ओरडू लागली.

लांब काथ्या झालेले नारळ गडाबडा लोळून" बळी द्या बळी द्या" असे ओरडू लागले.


अजयने म्हातारीच्या कमरेमध्ये एक सणसणीत लाथ घालून तिच्या हातातला बांबू हिसकावुन घेतला, लोळणाऱ्या दोन्ही नारळांना त्यांनी फटाफट यज्ञकुंडामध्ये ढकलून दिले, यज्ञकुंडातली आग परत भडकली," स्वाहा स्वाहा!" असा आवाज आता यज्ञकुंडातून यायला लागला. त्याच्यातून आता दोन हात वर आले, ते बघताक्षणी रमाकांत ने म्हातारीला उचलले आणि अजयने लाल सोबळे नेसलेल्या माणसाला उचलून आगीमध्ये फेकले.

त्या दोघांनाही आगीमध्ये ढकलता क्षणी, चार बुटके हळूहळू मोठे होऊ लागले, जसे ते मोठे होत होते तसे त्यांचे पाय गायब झाले आणि ते हवेमध्ये तरंगायला लागले, यज्ञकुंडाभोवती एक गोलाकार रिंगण घालून चारही तरंगणाऱ्या बुटके यांनी यज्ञकुंड यामध्ये उडी घेतली, "मुक्ती मुक्ती" असा आवाज चारी बाजूंनी घुमू लागला. आजूबाजूलाही भयानक असे आवाज येऊ लागले, बाहेर वादळ सुटले असं वाटू लागलं, विजा चमकू लागल्या, आणि बघता बघता वाडा जमीनदोस्त झाला.


        अनिता रडवेली होऊन सगळ्यांना गदागदा हलवत होती, "उठा रे आता" सारखे म्हणत होती, डोळे चोळत सगळे मुले, रितु आणि काळेकाका जागे झाली. त्यांनी आजूबाजूला बघितले, कुठेही ओढा नव्हता किंवा वाडा नव्हता, एक भयानक दु:स्वप्न असल्यासारखा कालचा त्यांचा अनुभव होता. जर अजय आणि रमाकांत वेळेवरती त्यांच्या मदतीला आले नसते तर कदाचित सर्व मुले आणि काळेकाका कुठल्यातरी कावळ्याच्या रुपामध्ये जंगलामध्ये हिंडत असते. ईश्वरावरील श्रद्धा, समय सूचकता याच्यामुळेच आज ट्रेकवरील सर्व मुले आणि त्यांचे गाईड काळेकाका वाचले होते.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller