kanchan chabukswar

Tragedy

4.0  

kanchan chabukswar

Tragedy

कसाई

कसाई

5 mins
285


युसुफ कसाई ची केस कोर्टामध्ये उभी राहिली आणि वकील पोलिस ऑफिसर यांच्या सगळ्यांच्या अंगावरती वरती काटा आला.


युसुफ कसायची केस अली असगर खान लढवत होते, तर सरकारकडून रणजीत सिंग.


  एक जज म्हणून मला फैसला करणं अतिशय अवघड जात होतं. सदोष मनुष्य वधाचा खाली शिक्षा होणे गरजेचं होतं तर दुसरीकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची भूक भागवण्यासाठी त्यांनी केलेलं कृत्य मानवतेला काळिमा फासणारा होतं.

अली असगर खान आर्ग्युमेंट होतं

म्हटलं की जेव्हा सैनिक उपाशीपोटी कुठल्यातरी भयानक वाळवंटामध्ये त्यांचे विमान कोसळून अडकलेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्याच सहकाऱ्यांचे मृतदेह फाडून खाल्ले होते.

पण रणजीत सिंग आर्ग्युमेंट होतं की त्या वेळेला ते सैनिक मृतावस्थेत होते युसुफने जिवंत माणसांचा बळी देऊन जे काही कृत्य केलं होतं ते अतिशय अधम असून अशा माणसाला मानवीय दृष्टीक्षेपात संवेदनशील होऊन, दया दाखवली आणि जगण्यासाठी मोकळीक मिळाली तर समाजामध्ये ही पद्धत रूढ होऊ शकते. बलवान माणूस कमजोर माणसांचा बळी देत आपली भुक भागवण्यासाठी किंवा आपले जीवन वाचविण्यासाठी सरळ सरळ एकमेकांवर हल्ले चढवले आणि देशांमध्ये अराजकता वाढेल.

 गेल्या वर्षभराच्या लोक डाऊन मुळे बऱ्याच माणसांचे कामधंदे कारखाने नोकरीपेशा वाल्या लोकांचे नोकरीधंदे सगळेच बुडीत खात्यात गेले होते पण तरी पण एकमेकांचा बळी घेण्याची मुभा कुठलेही सरकार कोणालाही देणार नाही.


  अली असगर खान परत परत परिस्थिती चा दाखला देत कसाई ने केलेले कृत्य हे निराशेपोटी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेले असे ठासून सांगत होते. संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावे नुसार युसुफ कसायला दोन निरपराध माणसांच्या मृत्यू साठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून फाशीची शिक्षा मी ठोठावली.


     यास्मिन, नवरा युसुफ आणि तिची दोन मुले आनंदाने गांधीनगर च्या झोपडपट्टीत राहत होती. खाली वर खोली, खाली रसोई तर वर झोपायची खोली आणि शंभर फुटावर ती युसुफ मास विक्रीचे दुकान. 2015 मध्ये युसुफ आणि यास्मिन चे अतिशय आनंदात लग्न झाले होते वर्षभरातच मीना आणि रुस्तुम यांचा जन्म झाला होता. चौघांचे कुटुंब गरिबीमध्ये पण पण दोन्ही वेळेला खाऊन-पिऊन व्यवस्थित रहात होते. यास्मिन ची आई वडील तसेच युसुफ कुटुंब गावाकडे राहत होते. गावामध्ये अबाची छोटीशी पोल्ट्री होती, तिथल्या आणि आजूबाजूच्या कोंबड्या मिळवून अब्बा युसुफकडे आठवड्याला पोल्ट्री पाठवत असत. तसेच आठवडी बाजारात जाऊन युसुफ मेंढ्यांची खरेदी करत असे. आठवड्याला खर्च वजा जाता तीन ते चार हजार रुपये आरामात घरात येत होते. करुणा महामारी आलेली नव्हती त्यामुळे लोक पण आनंदात साडे पाचशे सहाशे रुपये किलोने मटण किंवा चिकन खरेदी करत असत. थोडासा दारूचा शौक, थोडी कुटुंबावर खर्च असं करून युसूफ जेमतेम खर्चाची तोंड मिळवणी करत असे.


      2020 सली आलेल्या महामारी ने मात्र कुटुंबाला होरपळून टाकले.

लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे साडेपाचशे रुपये किलोचा मटण कोणीही घेईन असं झालं. रोज दुकानात बसून माशा हाकलत बसण्या शिवाय युसुफला काहीच काम नव्हते. कापलेले मटण शेवटी सोडून फेकून द्यावे लागत होते.


तशातच एक दिवशी हनी सिंग दुकानावर आला. त्याने एकदम तीन किलो मटणाची ऑर्डर दिली. बोलता बोलता म्हणाला" तुझ्याकडेच मटणाची खरं असतं रे, बाकीचे लोकं कुत्र्या मांजरीचे मास देखील एकत्र करून विकतात खरं-खोटं कळत नाही .ते कळत नाही बाल बच्चा ना खाऊ घालायला चांगलंच मटण पाहिजे नाही का?" घासाघीस करत दीड हजार रुपये युसुफच्या हातावर टेकवत हनीसिंग मटण घेऊन गेला.

त्याच्यानंतर दोन आठवडे दुकानाकडे कोणी फिरकले देखील नाही. आता कुटुंबाची उपासमार व्हायला लागली.

यास्मिन त्यारात्री युसुफला म्हणाली" बच्चों को नाना नानी के पास भेज देते है, उनका खाना पिना तो ठीक ठीक होगा, यहापर हम दोनो रहेंगे."

      दुपारी अचानक जेव्हा युसुफ घरी आला होता तेव्हा त्याला घरातून हनी सिंग बाहेर पडताना दिसला. एके दिवशी असाच तो भलत्याच वेळी घरी आला तेव्हा घरातून एक सदन दिसणारा गृहस्थ बाहेर पडताना त्याला दिसला. यास्मिन च्याकडे कशाचाच जबाब नव्हता. " मी त्यांच्याकडे काम पकडले आहे" असे थातूरमातूर जबाब यास्मिन द्यायला लागली. पर्स मधले पैसे बघून युसुफचा टाळकं सरकलं.


रोज रात्री यास्मिन मुलांना गावी पाठवण्यासाठी हट्ट करत असे, जणू काही तिला घरामध्ये मुलांची अडचण होत होती.


 त्या दिवशी दुपारी युसुफ मुलांना घेऊन निघाला, दुसऱ्या दिवशी तो दुकानावरती जाऊन बसला. मटण अडीशे रुपये किलो अशी पाटी दुकानावरती लावून टाकली.

आजूबाजूच्या हॉटेलमध्ये त्याने फोन करून कळवले की माझ्याकडे ताजे मटण अडीशे रुपये किलोने मी विकणार आहे त्याबरोबर गांधीनगर च्या बाजूला असलेले चार हॉटेल मधले कर्मचारी युसुफकडे मटण न्यायला आले. कमी झालेली किंमत बघून गरीब देखील अर्धा किलो, पाव किलो मटणासाठी रांग लावून उभे राहिले.

रांग ओलांडून यास्मिन दुकानात शिरली आणि पातेल्यामध्ये थोडेसे मास घेऊन घरी जायला लागले. युसुफ ने तिला थांबायला सांगितले आणि त्याच्याकडे असलेली ताजी मासळी तिला काढून दिली आणि म्हणाला," आज मटन नको आज मछली पकाव "


  युसुफ बरोबर असलेली मिना बघून यास्मिन आश्चर्य वाटले. त्यावर युसुफ म्हणाला," रुसतुमच घरी राहिला, मिना राहायला तयार नव्हती म्हणून मी तिला परत आणले. आज संध्याकाळच्या गाडीने मी जाऊन तिला पण सोडून येईल."

संध्याकाळी येऊन युसूफ आणि मीना घाईघाईने जेवले. युसुफने मीनाला चांगलं नवीन चमचमणारा ड्रेस घातला तिची पिशवी भरली आणि नानी कडे सोडण्यासाठी म्हणून तो निघाला.

त्या रात्री यास्मिन आणि युसुफ असे कुठलेही बोलणे झाले नाही. युसुफ चा फोन बंदच येत होता. दोन दिवसानंतर युसुफ घरी परत आला. " नाना-नानी गावी गेले होते म्हणून थांबावे लागले "अशी थाप युसूफ न यास्मिन ला मारले. युसूफ चा शर्ट धुताना त्याच्या खिशातून मुंबई ची तिकीट बाहेर पडली तेव्हा यास्मिन च्या डोक्यामध्ये संशय निर्माण झाला.


ती परत परत आपल्या आई-वडिलांना फोन करून मुलांची चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. तिने आपल्या सासऱ्यांना देखील फोन लावले पण कोणा कडूनच काही जबाब आला नाही.


येताना युसूफ न दहा हजार रुपये आणले होते. " अब्बा ने दिले " असं त्याने पैशाचं उत्तर दिलं.


त्यादिवशी रात्री यास्मिने युसुफला पूर्णपणे झिडकारून खोलीच्या बाहेर काढल्यावर त्याचा संताप अनावर झाला. तिच्याकडे दुपारी येणारे गिराईक त्याला माहीत झाले होते. या सगळ्यात जगण्याचा त्याला एक प्रकारे वीट आला होता. खोलीमध्ये बळजबरीने शिरून त्यांनी यास्मिन ला व्यवस्थित धडा शिकवला. मृतदेहाचं काय करायचं हे त्याला आता चांगलंच कळून चुकलं होतं.

दुसऱ्या दिवशी त्याने दुकानावर "दोनशे रुपये किलो मटण" ची पाटी लावली आणि भराभर पुरावा नष्ट केला.


     चार दिवसानंतर अचानक यास्मिन चे आई वडील तिच्याकडे चौकशीसाठी म्हणून आले. युसुफने दिलेले थातूरमातूर उत्तर त्यांना पटले नाही आणि त्यांनी रीतसर पोलिसांमध्ये तक्रार केली.

 युसुफने आणलेले ढोंग जास्त वेळ टिकले नाही. पोलिसांच्या माराला कंटाळून त्याने कबुलीजबाब दिला. अडीशे रुपये किलो चे मास रुस्तुम चे होते आणि दोनशे रुपये किलो चे मटण यास्मिन चे होते ,मीनाला त्याने मुंबईच्या कामाठीपुरा मध्ये विकले होते.


    अली असगर खान यांनी बोलताना सरकारवर दोषारोपण केले, आलेली महामारी, आलेलं जागतिक संकट, माणसांची होणारी भूकमारी, त्यातून निर्माण झालेले असले गुन्हे याला कोण जबाबदार?


   जजमेंट देताना मी स्वतःच्या मनावर ती अतिशय ताबा ठेवून आयपीसी धारा 302, आयपीसी धारा 307 त्याच्याखाली रुस्तुम आणि यास्मिन च्या खुनाबद्दल तसेच आयपीसी सेक्शन तीनशे सतरा च्या खाली आपल्या नाबालिक मुलीला विकण्यासाठी युसुफला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

मीनाला ज्या कामाठीपुरा मध्ये विकले गेलेले होते तिथे सरकारने तिची सुटका करून तिला तिच्या नानी कडे सुपूर्द करावे अशी देखील मी सरकारला सूचना केली.

एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा कुठलाही रोग न होता देखील गेलेला बळी ही अतिशय मोठी दुर्घटना ठरली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy