STORYMIRROR

kanchan chabukswar

Inspirational

3  

kanchan chabukswar

Inspirational

एअरपोर्टवर चिकू

एअरपोर्टवर चिकू

6 mins
188


   झाल् असं की अतिशय गर्दीची वेळ असल्यामुळे चिकूच्या बाबांना मध्यरात्रीच बेंगलोर वरून वाया आमदाबाद जाणारं अमेरिकेच्या विमानाचं तिकीट मिळाल्.

चिकूच्या बाबांचं ऑफिस अहमदाबादला असल्यामुळे आणि आता सुट्टी पण संपत आली असल्यामुळे चिकू आई-बाबा आणि छोटू चिकमंगळूर च्या हिरव्यागार वातावरणा मधून आपल्या आमदाबाद च्या घरी निघाले होते. प्रवास दूरवरचा आणि दोन्ही मुले लहान म्हणून बाबा नेहमी विमानाचं तिकीट काढत. या वेळेला दिवसाच्या विमानाचे त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा बेंगलोर अमेरिका असं विमान त्यांनी निवडले आणि त्याचं तिकीट मोठ्या मुश्किलीने त्यांनी मिळवले. ठरल्याप्रमाणे चिकमंगळूर भरून केंपेगोवडा इंटरनॅशनल एअरपोर्ट कडे चिकूचे कुटुंब घर च्या गाडीने निघालं.

.

    खरं म्हणजे आजोबांना बरं नसल्यामुळे परतीचा प्रवास निश्चित नव्हता, पण ठीक आहे, आजोबांची तब्येत थोडी सुधारल्यानंतर चिकूच्या बाबांनी, बाबा आई चिकू आणि छोटू यांचं विमानाचं तिकीट काढलं.


    चिकमंगळूर वरून बेंगलोर पर्यंतचा रस्ता घरच्या गाडीने करून बाबांनी आईला, चिकू आणि छोटूला एअरपोर्टवर सोडले.

इंटरनॅशनल विमानामध्ये कुठलीही पावडर वगैरे चालत नाही त्याच्यामुळे आजी-आजोबांनी दिलेली कॉफीची पावडर, घरची मिरपूड, मसाल्याचे सामान, आणि खूप सार्‍या वस्तूचं बाबांनी एक मोठं पार्सल बनवलं आणि आता कुरिअर कंपनीकडे द्यायला बाबा गेले होते.


    खरं म्हणजे अहमदाबादच्या रखरखाटपेक्षा सगळ्यांना आजोबांच्या घरीच बरे वाटायचे, पण काय करणार बाबाचा ऑफिस होतं आणि आईचा बिझनेस होता म्हणून चौघांनाही परत जाणं भाग होतं.


       रात्रीच्या बारा वाजता फ्लाइट असल्यामुळे तीन तास अगोदर सगळ्या कुटुंबाने एअरपोर्टवर ती हजेरी लावली.


बरच सामान कुरियर मध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडे सुटसुटीत सामान होतं. त्याचं कारणही होतं कारण छोटू खूपच लहान होता आणि सारखा धावपळ करायचा त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आईला भागच होतं.


      रात्रीचे दहा वाजले होते, अचानक दिवसभराच्या दगदगीमुळे चिकूच्या पोटात दुखायला लागलं, बहुतेक तिला नंबर टूआली होती. बाबा महत्त्वाचं काम करायला एअरपोर्टच्या दुसऱ्या ठिकाणी गेले होते आणि छोटू आईच्या मांडीवर झोपला होता त्याच्यामुळे आईने चिकूला एकटीलाच प्रसाधन गृहात जायला सांगितले. आईने छोटूला हळूच उचलले आणि प्रसाधनगृहात च्या समोर असलेल्याच खुर्च्यांवर ती सामानासकट बैठक मांडली.


    आपली चिकू तशी फार शहाणी, समजूतदार आणि स्मार्ट, आईचे अडचण ओळखून ती पण न रडता म्हणाली," मी एकटी जाऊन येते तू काही काळजी करू नको."

      आपली छोटीशी रुमाल असलेली पर्स सावरत चिकू प्रसाधन गृहामध्ये धावली. समोरच एक बुरखा घातलेली स्त्री उभी होती, तिच्या बाजूला तिची पण एक लहान मुलगी तिच्या हाताला धरून उभी होती. विचित्र म्हणजे मुलीचे पोट खूपच मोठं होतं.

बुरखा घातलेली बाई जवळची ती लहान मुलगी आपल्या पोटावर ती हात मारत रडत होती," इसको निकालो, , दर्द हो रहा है" असं काहीसं ती म्हणत होती. बुरखा वाली बाई तिला दुसऱ्याच भाषेमध्ये रागवत होती. 

खरंच त्या मुलीचं पोट जरा जास्तच मोठं दिसत होतं. चिकूला वाटलं तिचं पण पोट दुखत असेल. पण चिकूला स्वतःची घाई असल्यामुळे तिने ते छोट्या मुलीकडे लक्ष दिले नाही.

   चिकू पटापट टॉयलेट ब्लॉक्स बघितले, बहुतेक सगळे एंगेज होते फक्त एक इंडियन टॉयलेट ब्लॉक उघडा होता.


   चिकमंगळूर या सगळ्याची सवय होती त्याच्यामुळे तिने पटकन आत जाऊन दार लावून घेतले, दरवाजाला जराशी फट होती त्याच्यातून तिला बाहेरचं पण दिसत होतं. बुरखा वाली स्त्री समोरच्या टॉयलेटमध्ये शिरली, टॉयलेट वेस्टर्न असल्यामुळे त्याच्या दरवाजाला खालून दीड फुटाची गॅप होती.


 खरं म्हणजे असं दुसऱ्याच्या ब्लॉक मध्ये बघू नये पण गंमतच होती, समोरच्या स्त्रीने आपल्या बुरखा वर केला, तिचे पाय भयंकर जाडे होते, पायावरती मोठे स्टॉकिंग घातले होते, तिने बूट काढले आणि स्टॉकिंग खाली केले, अरे बापरे हे काय!


पायाला जड जड पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या घट्ट बांधलेले होत्या. त्या लपविण्यासाठी म्हणून परत तिने आपले स्टॉकिंग त्याच्यावरून घालून घेतले, घाईघाईने पायामध्ये मोठे बूट घातले, फ्लश ओढून ती बाहेर आली.

 

तिची छोटी मुलगी टॉयलेटच्या दरवाजावर हात आपटत राहिली. रडणार्‍या मुलीला घेऊन बुरखा वाली बाईने तिला खसकन आत ओढले, दरवाजा थोडासा उघडा होता म्हणून चिकूला आत मध्ये काय चाललय ते व्यवस्थित दिसत होते. 

टरटर टेप चा आवाज आला. त्या मुलीच्या पोटाला बांधलेलं काहीतरी त्या बाईने काढलं. ती छोटी मुलगी अक्षरशः पाय आपटत होती. अचानक तिच्या पोटाला बांधलेली एक पातळ पिशवी खाली पडली, पांढऱ्या रंगाची पिशवी होती. चिकूला नवलच वाटलं. 

 कधीकधी प्रवासाच्या वेळेला आई आपल्या सलवार-कमीज मध्ये पैसे लपवून तसे पण असं तोंडाला लावायची पांढरी पावडर कशाला पोटापाशी बांधायची? चिकूला गंमतच वाटली. आता त्या बाईने आपल्या पर्समधून नवीन टेप काढली आणि त्या मुलीच्या पोटाला ती पांढरी पातळ पिशवी व्यवस्थित बांधून दिली. त्याच्यावरून त्या छोट्या मुलीचं बनियन घातलं आणि त्याच्यावरून तिचा मस्त फ्रील फ्रील वाला लाल रंगाचा फ्रॉक. बाहेर आल्यावर हातपाय न धुता त्या बाईने पर्स मधले चॉकलेट काढून मुलीच्या हातावर ठेवले. त्यासरशी ती छोटी मुलगी गप्प झाली.


    चिकू ने नैसर्गिक काम उरकलेलं होतं त्याच्यामुळे तिला जरी ह्या प्रकाराची भीती वाटत होती तरी ती हिम्मत करुन हळूच बाहेर आली. बाहेरच्या बेसिन पाशी प्रसाधनगृह आतले दोन कर्मचारी फर्ष साफ करत होते त्याच्यामुळे चिकूला त्यांचा आधार वाटला.

हात, तोंड स्वच्छ धुऊन चिकू नये उड्या मारुन पेपर नॅपकिन नि हात पुसून घेतले. ती बुरखा वाली स्त्री आणि तिची मुलगी तरातरा तरातरा बाहेर पडल्या आणि गेट नंबर वीस पाशी जाऊन धाडकन बसल्या.


   त्या स्त्रीच्या तोंडावरती जरी बुरखा असला तरी तिच्या मुली मुळे चिकूला ती व्यवस्थित ओळखता येत होती.


चिकू बाहेर आली तेव्हा बाबा आई पाशी येऊन बसले होते, छोटू गाढ झोपेत होता. बाबांच्या हाताला लटकत चिकू म्हणाली," चला ना बाबा आईस्क्रीम खाऊया"

दिवसभर शहाण्या मुलीसारखं वागली होती तेव्हा बाबांना पण हट्ट मोडवेना, आईने गोड हसून मान डोलावली.


चिकू आणि बाबा उड्या मारत आईस्क्रीम पार्लर पाशी गेले. तिथे बसल्यावर चिकू नये प्रसाधनगृह मध्ये तिने बघितलेली गोष्ट बाबांच्या कानात हळूच सांगितले. आपल्या डोळ्यांनी खूण करून ती बुरखा वाली बाई आणि तिची मुलगी देखील बाबांना हळूच दाखवली.


बाबांना अतिशय धक्का बसला. त्यांचं विमान पण गेट नंबर 20 लाच येणार होतं. ती बाई कदाचित अहमदाबादहून पुढे अमेरिकेच्या विमानात बसणार होती. घातलेल्या बुरखा त्याच्याखाली घातलेली जीन्सची पॅन्ट त्याच्यामुळे तिने लपवलेले सामान सहजासहजी दिसत नव्हते. तरीपण एक जबाबदार नागरिक असल्यामुळे बाबांनी चिकूचे आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर एअरपोर्ट ऑफिसर बरोबर संपर्क साधला.


   आई आणि छोटू तिकडे मागेच बसले होते त्यांना बाबा आणि चिकू काय करताहेत काहीच कल्पना नव्हती.


न घाबरता चिकू न, तिने प्रसाधनगृहात काय बघितले, त्या स्त्रीचे वर्णन सांगितले आणि तिच्या बरोबर असलेल्या मुलीचे पण वर्णन सांगितले तेव्हा एअरपोर्ट सेक्युरिटी खात्री पटली. ती बुरखा वाली स्त्री आमदाबाद - जर्मनीच्या मार्गावरून अमेरिकेला जाणार होती. तिच्या सामना मध्ये आक्षेप घेण्या जोगते काहीही नव्हतं. उलटपक्षी अमेरिकेला जाण्यासाठी जेवढं सामान लागतं तेवढं देखील तिच्या कडे नव्हतं. मात्र सामान्यांमध्ये भरपूर बदाम अक्रोड पिस्ते यांची पाकीट होती, बॅगेचा तळ उघडून बघितला तेव्हा तिथे डॉलर्सच्या भरपूर नोटा व्यवस्थित रित्या पॅक केलेल्या होत्या. एअरपोर्ट सिक्युरिटी चा संशय बळावला. त्यांनी ताबडतोब लोकल पोलिसांची संपर्क साधला.


   विमानाची वेळ झाली होती त्याच्यामुळे सगळेजण लाईन मध्ये उभे राहत होते. चेकिंग च्या नावाखाली प्रत्येकाला एका वेगळ्या रूममध्ये नेण्यात येऊ लागले. बुरखा वाली बाई आणि तिच्या मुलीला जेव्हा रूम मध्ये नेण्यात आले तेव्हा त्यांची कसून तपासणी झाली. त्यांनी लपवलेलं सगळं सामान सिक्युरिटी च्या ताब्यात मिळालं. बुरखा घातलेली बाई आपल्या पायावर ती पांढऱ्या पावडरच्या रूपामध्ये भयंकर घातक असे ड्रग्स लपवलेले होते तसेच तिच्या मुलीच्या पोटावर तीदेखील पातळ पिशव्यांमध्ये त्याच प्रकारचे ड्रग्स बांधलेले होते. लहान मुलांचे कोणी चेकिंग करत नाही म्हणून ती निर्धास्तपणे मुलीच्या पण पोटावरती पिशव्या बांधून दूरवरच्या प्रवासाला निघाली होती.


     त्या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरू केली. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी चिकूचे मनापासून कौतुक केले तिच्या आई वडिलांचे इतकी गोड मुलीला एवढे व्यवस्थित वळण लावल्याबद्दल अभिनंदन केले आणि आता सरकार तर्फे देखील चिकूला बक्षीस जाहीर झाले आहे. बाबांनी मात्र एयरपोर्ट अथॉरिटी चिकू चा फोटो न काढण्याबद्दल सांगितले ,त्यांना आपल्या मुलीची फार काळजी वाटत होती, न जाणे, तिच्या या शहाणपणा मुळे तिचं आयुष्य धोक्यात यायला नको.

चिकूच्या सावधपणा मुळे एका भल्या मोठ्या इंटरनेशनल तस्करी करणाऱ्या व्यावसायिकाचा थांगपत्ता एअरपोर्ट ऑथोरिटी च्या हातात लागला आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational