kanchan chabukswar

Others

3.5  

kanchan chabukswar

Others

आय सी यु

आय सी यु

5 mins
97


  अण्णांचे ब्लड प्रेशर फारच खालीवर व्हायला लागले म्हणून अनुराधाने अण्णांना हॉस्पिटल मध्ये नेले.

कोरडा खोकला, चिडचिड, धाप, ही सगळी लक्षणे जरा वेगळीच होती. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले," काय अण्णा, फार दगदग करून घेता का? चला तुमचं ऑक्सिजन बघू." नेहमीचे हसतमुख अण्णा काहीच बोलले नाहीत. एक तर उन्हाळा म्हणतो मी, त्यातून थोडसं चाललं तरी लागणारी धाप, अण्णा अगदी वैतागून गेले होते.


  ऑक्सिजनची चाचणी झाल्यावर, डॉक्टर कुलकर्णींच्या चेहऱ्यावर ती काळजी दिसली.

अनुराधा ला बाजूला बोलवून डॉक्टर कुलकर्णी यांनी आपली शंका बोलून दाखवली.

मग काय! अनुराधा थोडी त्यांना ऐकणार होती, अण्णांचं काहीही न ऐकता अनुराधाने अण्णांना शुश्रूषा हॉस्पिटल च्या आयसीयू मध्ये भरती करून टाकले.

चिडचिड अतिशय वाढली अण्णांची. त्यातून त्यांना होणारा सारखा लघवीचा त्रास. आयसीयूमध्ये युरीन पॉट मागून मागून त्यांच्या घशाचा अगदी खुर्दा झाला. सिस्टर ब्रदर, सगळ्यांवर ती जाम चिडचिड आणि शिव्या. नशीब सगळे सिस्टर आणि ब्रदर केरळी होते, त्यांना मराठीतल्या शेलक्या शिव्या कळत नव्हत्या, नाहीतर केव्हा अण्णांना बाहेर टाकून दिले असते.

भराभर नळ्या लावून अण्णांना पलंगाची जखडून टाकण्यात आलं. ही टेस्ट ती टेस्ट, प्रत्येक वेळेला बोटाला हलकेच टोचून सतत रक्तातल्या साखरेची तपासणी.. पहिली रात्र अण्णा ना अतिशय जड गेली.. टीव्ही मोबाइल काही नाही. नुसते समोर बघत बसा. नशीब कायम पडदा सारलेला असल्यामुळे आजूबाजूचे पेशंट देखील अण्णांना व्यवस्थित दिसत होते.. तिन्ही बाजूला वेगवेगळे रुग्ण.


पलंग उंच असल्यामुळे, बाजूच्या काचेतून बाजूचा रुग्ण स्पष्ट दिसत होता. एक कुठलीतरी खेडेगाव वाहून आलेली स्त्री बाजूच्या पलंगावर ती पडली होती. तिचं काहीतरी मणक्याचा त्रास सुरू असलेला नर्सने बोलताना बोलताना सांगितलं. जशी रात्र झाली तशी बाईन आपला आवाज काढून शेलक्या भाषेत कोणालातरी शिव्या घालायला सुरुवात केली. बहुतेक नवर्‍याला असाव्या. सिस्टर रंजनाने अण्णांना येऊन हळूच सांगितले किती बाई नवऱ्याच्या मोटरसायकलवर बसून माहेराला निघालेली असताना मोटर सायकल खड्ड्यात पडून झालेल्या एक्सीडेंट मध्ये तिच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली. दोष कुणाचाच नव्हता, दोष खड्ड्याचा होता पण, बाईच्या मते नवऱ्याने मुद्दामच खड्ड्यांमध्ये मोटरसायकल घातली आणि तिला पाडली.

बिचारा नवरा आयसीयू च्या बाहेरच्या कंपनियन रूममध्ये त्या बाईची बरी होण्याची वाट बघत दिवस काढत होता.


   त्याच्यापुढे एक अतिशय वृद्ध बाई नाकातोंडात नळ्या अशा अवस्थेमध्ये पलंगाला जखडून ठेवलेली दिसली. तिला तर भेटायला कोणीच आलं नाही. पहिला दिवस गेला तसं ती बाई एकटीच कोणालातरी हाका मारत असताना वाटत होती. तोंडात नळी असल्यामुळे आवाज बोबडा येत होता. रात्रीतून तिचे विव्हळणे कानाला त्रासदायक होत होते. कधी केविलवाण्या स्वरात कधी ठेवणीतल्या भरजरी आवाजात ती बाई कोणालातरी हाका मारत होती." आनंद आनंद"


     त्याच्या पुढचं रुग्ण शांतपणे पडलेला होता. रात्री कोणीतरी स्त्री येऊन त्याला जेवण भरवून गेली. जाताना हळूच तिने चेकबुक पुढे केले आणि त्याला सह्या करण्यासाठी सांगितले. त्यांनी जोर-जोरात तिला कुठल्याही पैशाला हात न लावण्याबद्दल सांगितले. स्त्री नाराज झाली. बिल भरायचे असतील, हॉस्पिटल, औषध, ऑपरेशन, कशाकशाला मिळून भरपूर पैसे लागत होते. आतापर्यंत शांत वाटणाऱ्या गृहस्थाने जोरात तिला बांगड्या विकण्या बद्दल सांगितले. डोळ्यात पाणी आणून ती स्त्री परत गेली.


    त्याच्या पलीकडचा बेड एका पन्नाशीच्या स्त्रीचा होता. हिंदी भाषिक स्त्री सतत" गोपाल गोपाल" असा धोशा लावून होती. गोड आवाजात ती सतत गोपाल नावाच्या कोणालातरी हाका मारत होती. रात्रीच्या वेळेस" गोपाल तुम्ही हो ना मेरे पास?" असं विनवणीच्या स्वरांमध्ये सतत बोलत होती. अंजना सिस्टर ने तिच्या बद्दल पण माहिती दिली. गोपाल तिचा मुलगा, अतिशय मातृभक्त, त्याने आईला पाठीवर बसवून हॉस्पिटल पर्यंत आणले होते. गरीब गोपाल दुसऱ्या दिवशी जवळ-जवळ पाच वेळेला कुठल्याही सिक्युरिटीचे तमा न बाळगता आई पाशी येऊन तिचे पाय दाबून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून हातात हात धरुन तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेऊन गेला." नही घबराना , मै बाहर ही बैठा हुI" सतत आईला आश्वासन देत गोपाल अतिशय मनोभावाने आईची सेवा करत होता, त्या दोघांचे ऋणानुबंध बघून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले.


आयसीयू च्या मोठ्या हॉलमध्ये, सतत लाईट चालू असल्यामुळे वेळेचे काही भानच राहात नव्हते. किती वाजले, काय झालं, कशाचा कशाला पत्ता नाही. सगळे रुग्ण आपल्या आपल्या पलंगाला जखडलेले.


पिवळ्या प्लास्टिकच्या ट्रे मध्ये खोबणी मध्ये असलेल्या भाज्या आमटी चे पाणी फडफडा भात बघून अण्णांचा डोकं फिरलं. त्यांचा आरडाओरडा ऐकून अनुराधाला आत मध्ये बोलवण्यात आलं." काय पाहिजे अण्णा " अनुराधाने प्रेमाने अण्णांना विचारलं.

चटकन लक्षात आलं की अण्णांना आणलेलं अन्न आवडलेलं नाही. ताबडतोब डायटीशियन ला बोलावून अनुराधाने अण्णांसाठी दहीभात, गोडी बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर ची ऑर्डर दिली. दहा मिनिटात जेवण आलं, अनुराधा नी अण्णांना प्रेमाने जेवण भरवले.

अण्णांच्या आग्रहाखातर तिने पण अण्णांबरोबर त्यांच्या फ्लॅटमध्ये दोन घास खाल्ले.

रात्रभर प्रत्येकाच्या पलंगाजवळ असलेल्या मशीन मधून, टण टण, धोक्याची घंटा सततच वाजत होती, त्याच्यामुळे कोणालाच अशी झोप येत नव्हती. सतत येणाऱ्या सिस्टर, तपासत असलेली औषधे, खायच्या सतराशेसाठ गोळ्या, नाहीतर इंजेक्शने असाच मारा जवळपास सगळ्याच रुग्णांवर चालू होता. त्यातून सिस्टर, ब्रदर, डॉक्टर अतिशय सहनशील वाटत होते. कोणी रुग्ण कितीही चिडचिड किंवा त्रागा करत असला तरी त्यांच्या कपाळावरची रेस देखील हलत नसे, "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा "असे व्रत घेतलेले सर्वजण तिथे शांतपणे कार्यरत होते.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच समोरच्या वृद्ध स्त्री ला भेटायला कोणीतरी मध्यमवयीन महिला आणि तिचा मुलगा धावतच आयसीयू च्या कक्षामध्ये शिरले. आनंद आनंद करत म्हातारीने नातवाला गळ्याशी लावले." किती वाट पाहू तुझी" म्हातारी न लाडिक प्रश्न नातवाला केला. नातवाने आपल्या आईकडे बघितले," काळजी करू नकोस ग आजी, तू घरी येईपर्यंत मी इथेच तुझ्याजवळ थांबेल." आनंद मोठ्या प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तिचा हात आपल्या छातीशी धरत आजीला आश्वासन दिले. मुलीने हलके-हलके आईचे पाय, पाठ प्रेमाने मसाज करून दिली.


   बाजूच्या नवऱ्याला शिव्या घालणाऱ्या खेडूत स्त्रीला सोडलं तर बाकीचे सगळे नातेवाईक प्रेमाने आपल्या रुग्णांची विचारपूस करत होते. ती बाई पण डोळे विस्फारून बाकीच्या रुग्णांचे नातेवाईक आसासून बघत होती. का बरं असं! तिला थोडी कोणीच नव्हतं! तिचा नवरा बाहेर तिची वाट बघत बसलेला असे, सिक्युरिटी ने सोडल्यास तो पण आत येऊन तिच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलून जात असे. त्याला पण भरपूर लागलेल्या दिसत होतं हात पाय खरचटले होते कपाळावर ती पट्टी होती पण त्याच्या तोंडावर ती कधीच राग नव्हतच मुळी.


आजूबाजूच्या लोकांचे दुःख आणि सुख बघून अण्णा बरेच शांत झाले. अनुराधा ने दिलेले अन्न ते मुकाट्याने खायला लागले. हळूहळू ब्लड प्रेशर नॉर्मल झालं, ऑक्सीजन वर आला, बरेच चांगले वाटू लागले.


  एक तर म्हातार वयात एकटा रहायची भीती, दुःख सगळ्या रुग्णांच्या डोळ्यातून स्पष्टच दिसत होतं, भरलेल्या घरातून अचानक एकट्यालाच एखाद्या गार हवेच्या खोलीमध्ये पलंगाला बांधून ठेवलं तर, पण जबरदस्तीच्या विश्रांतीमुळे अण्णांचे सगळेच पॅरामीटर्स हळूहळू नॉर्मल होऊ लागले आणि डॉक्टरांनी अनुराधाला अण्णांना घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली.


सगळ्यांचा हसतमुखाने निरोप घेत अण्णांनी मनोमनी ठरवलं, व्यवस्थित राहायचं, आणि रोज म्हणत असलेली " अनIयासेन मरण म !

विना दैन्यएन जीवनम्, 

देही मे कृपया शंभो 

भक्ती अचनम चलम !

 प्रार्थना खरोखरच अमलात आणायची.


Rate this content
Log in