kanchan chabukswar

Others

4.3  

kanchan chabukswar

Others

माया आणि चिकू

माया आणि चिकू

9 mins
248


ठरवलं होतं चिकूच्या आईने [वसुंधरा] उन्हाळ्याच्या सुट्टीत चिकू छोटू आणि आई आईच्या माहेरी लाडघर ला जाणार.


   आईचे बाबा म्हणजे अण्णांचं मोठं बस्तान लाडघर मध्ये होतं, मोठी अमराई, नारळाची सुपारी चे झाड, उन्हाळाभर चाळणारी धांदल, गोठ्यातल्या तपकिरी रंगाच्या गाई, त्यांची वासरं, सगळी मजाच असायची.


तसं बघायला गेलं तर आमदाबाद लाडघर हा फारच मोठा पल्ला होता, त्याच्यामुळे तिघही जण मुंबई पर्यंत विमानाने येऊन पुढे घरच्या गाडीने प्रवास करणार होते. तसे अण्णांचा विश्वासातला ड्रायव्हर वसुंधरा ताई ला घ्यायला येणारच होता.


.. जशी तिकडच्या आजोबांकडे कॉफीची बाग होती तशी अण्णांच्या कडे आंब्याची बाग होती दोन्हीही आजोळी चिकू आणि छोटूची खूपच मजा होत असे, त्यातून भरीस भर म्हणजे आनंद मामाची मुलगी मधुरा, आपले चिकू एवढीच होती, तिच्याशी खेळायला पण खूप मजा येई.


       एक दिवसाची विश्रांती झाल्यावर अण्णांनी चिकू छोटूला मधुरा बरोबर आंब्याच्या बागेमध्ये नेले.


 अण्णांची बाग डोंगराच्या डोक्यावर होती तिथपर्यंत जायला गाडी चा रस्ता नसल्यामुळे पाई जावे लागे, छोटूला तर पूर्णवेळ रामुकाकांनी डोक्यावरती उचलूनच घेतले होते. स्वयंपाक पाणी झाल्यावर आजी आणि वसुंधरा दोघी पण बागेमध्ये येणार होत्या.


   देवाच्या अवकृपेमुळे मधुरा ची आई म्हणजे चिकू ची मामी मधुराच्या बाळंतपणाच्या वेळेला देवाघरी गेली होती, आजी आणि अण्णा मधुराचे व्यवस्थित संगोपन करत होते. मामा, आनंद मामा आंबा नारळ सुपारीच्या व्यवसायाबरोबर गावांमध्ये पोलीस पाटीलकी पण करत असे. कधी कधी मोटर सायकल वर तर कधी जीप मध्ये बसून आनंद मामा लाडघर च्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये हिंडत असे.


    दोन-तीन दिवस हा कार्यक्रम चालला, अण्णांच्या बागे मधल्या आंब्याच्या पेट्या भरून तयार होत होत्या, मजुरांच्या डोक्यावरती देऊन, अण्णा लाडघर ला पाठवत होते, तिथून पुढे व्यापारी या पेट्या मुंबई-पुण्याकडे पाठवीत.


    खायला मिळणारे हवे तसे आंबे, गोड नारळाचं पाणी, निरोगी वातावरण, त्याच्यामुळे आई चिकू आणि छोटू ची तब्येत एकदम मस्त होत होती.


   बागे कडून घरी येण्याच्या वाटेवर ती एक जुना दगडी बंगला लागे, अंगण काही साफ नसे, पालापाचोळा तसाच पडलेला, छोट्या विहिरीवरचा रहाट पण जुनाट, बंगल्याचं कंपाऊंड चांगलं तगडे होतं, लाकडी दरवाजा शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांना बंगल्यामध्ये शिरू देत नसे.


   त्यादिवशी आई आणि आजी बागेमध्ये आल्या नाहीत, अण्णांना आंब्याच्या पेट्या भरायचं भरपूर काम होतं, त्यामुळे जेवणासाठी म्हणून मधुरा चिकू आणि छोटू एकटेच घराकडे निघाले. तशी पायवाट माहितीची होती, आणि सगळ्या गावाला अण्णांच्या नातवंडांची माहिती होते, घाबरण्याचे काहीच कारण नव्हतं.

कोकिळेचा गोड आवाज, वाहणाऱ्या झऱ्याचे मंद संगीत, सगळीकडे असलेली ओली हिरवाई, ोक्‍यावरून उडणारे छोटे पक्षी, भुंगे, एक अजब भारावलेलं वातावरण तयार झालं होतं. अचानक उतारावरून येताना झुडपांमध्ये काहीतरी हल्ले, एक मोठा कुत्रा, आपले सुळे बाहेर काढून, भुंकत भुंकत बाहेर आला, चिकू ,छोटू, मधुरा घाबरून गेले, पळायला लागले, तसा रस्ता उताराचा होता, चिकू, छोटू चा हात घट्ट पकडला, समोर वाट दाखवायला मधुरा तर मागे चीकू, छोटू, आणि त्यांच्यामागे तो मोठा भयानक कुत्रा.


मधुरा टणाटण उड्या मारत, नेहमीच्या वाटेने निघून गेली, छोटू लहान, एवढ्या जोरात त्याला पळता पण येत नव्हतं, दगडी बंगली दिसली तशी, चिकुन खाडकन त्याचा दरवाजा उघडला आणि दोघेही कंपाउंडमध्ये शिरले. कंपाउंड ची दार चिकूने घट्ट लोटून टाकलं.


   बाहेरची गडबड, कुत्र्याचे भुंकणे, हे ऐकून बंगले मधून एक झुळझुळीत इरकली साडी नेसलेली तरुण मुलगी बाहेर आली, तिने ओरडून कुत्र्याला शांत केले, तसा तो कुत्रा मान खाली घालून तिच्या पाशी येऊन बसला. ती कुठल्यातरी अगम्य भाषेमध्ये कुत्र्याला रागावत राहिली. त्याच्यानंतर तीने चिकू आणि छोटूला अतिशय घाबरलेल्या अवस्थेत पाहिले. प्रेमाने त्यांच्याकडे बघत ती दोन पावले पुढे आली, तसा छोटू धावत जाऊन तिला बिलगला. छोटूला आणि चिकूला प्रेमाने हाताशी धरून तिने आपल्या बंगली मध्ये त्यांना नेले.


बाहेरून दिसत होती त्याच्यापेक्षा बंगली आतून खूपच वेगळी होती. अद्ययावत फर्निचर, मंद दिवे, मोठ्या फोटो फ्रेम्स, दिवाणखान्याच्या मधून वर्तुळाकार जाणारा जिना, सगळीकडे असलेली स्वच्छता आणि टापटीप, दिवाणखान्याच्या कोपऱ्यामध्ये असलेला छोटा पोपटाचा पिंजरा, वाऱ्यावरती बोलणाऱ्या मंजुळ घंटा. बंगली खूपच आवडली चिकूला.


   ती तरुण मुलगी त्यांच्याशी गोड आवाजात बोलली आणि त्यांना बसायला सांगितले, तिने चटकन फ्रिज उघडून त्या दोघांसाठी सरबत बनवलं, कैरीचे आंबट गोड सरबत पिऊन चिकू आणि छोटूला तरतरी आली, आता कुत्रा पण शांत झाला होता, त्या तरुण मुलीच्या मागे तो आत मध्ये येऊन स्वयंपाक घराच्या फरशीवर बसला, तसे तिने फ्रीजमधून त्याचे खाणे काढून त्याच्यापुढे वाटी ठेवली. घरामध्ये अजून कोणीच दिसत नव्हते. दिवाणखाने मध्ये मध्यभागी एका तरुण स्त्रीचे मोठं चित्र लावलेलं होतं, त्या स्त्रीच्या अंगावर ती जुन्या जमान्यातला ड्रेस होता, पण तिचा चेहरा तरुण मुली बरोबर तंतोतंत जुळत होता.


" मी माया, ही माझी आजी" फोटो कडे बोट दाखवत माया म्हणाली.

" तुम्ही दोघं कोणाची मुलं? मी गेल्याच वर्षी इथे राहायला आले मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही." माया म्हणाली.

चिकू न मायाला स्वतःची ओळख करून दिली. " अरे वा! अण्णांच्या घरचे पाहुणे वाटतं!" तिने बोलत बोलत फ्रीजमधल्या नारळाच्या वड्या देखील काढल्या आणि छोटू आणि चिकू समोर ठेवल्या. चिकूला नाही तरी भूक लागलेली होती, पण आईने शिकवल्या प्रमाणे आडवे वेढे घेत तिने कशा तरी दोन वड्या खाल्ल्या, छोटू ला पण दिल्या. धावून धावून छोटूचे गाल लाल टोमॅटो सारखे झाले होते.

दोघे जण शांत झाल्यावर चिकू नये मायाला तिला घरी जायचे आहे हे सांगितले.

परत यायचे आमंत्रण स्वीकारून चिकू आणि छोटू सावकाश डोंगर उतरून आपल्या घराकडे आले.

मराठी गेम

   घरामध्ये कोण गोंधळ चालू होता, मधुरा घरी येऊन तिने कुत्रा पाठीमागे लागल्याचे सांगितले त्यासरशी आजी एकदम कावरीबावरी झाली होती. बागेचे वाटेवर फक्त दगडी बंगल्यामध्ये कुत्रा होता. आजच मत काही दगडी बंगल्या बद्दल चांगलं नव्हतं. तिच्या मते तिथे राहणारी व्यक्ती मंत्र तंत्र आणि चे चेटूक करणारी होती. डोक्याला हात आजीने जवळपास टाहो फोडला.


   तेवढ्या मध्ये आनंद मामा घरी आला होता, माया मध्ये चेटुक भेटूक काही नव्हतं. माया त्याच्या ओळखीची होती आणि ती अतिशय सरळ मुलगी होती.

चिकू आणि छोटू हळूहळू चालत घरी पोहोचले, आजीने दोघांना अधिक कवटाळले, अलाबला घेतल्या, ीठ मोर्‍यांनी लाल मिरची सकट कडकडीत दृष्ट काढली. एवढ्या सगळ्या मसाल्याचा घाणेरडा वास येणारच तसा आल्यावर ती तिने रडून रडून सांगितले," बघा मी म्हणत नव्हते माया चेटकिन आहे म्हणून." त्यात भर म्हणजे जेव्हा चिकू न त्यांनी खाल्लेलं आणि प्यायलेले गोष्टी बद्दल वर्णन करून सांगितले तेव्हा. आता मात्र आजीची सहनशक्ती संपली. जावयाची पोरं, त्यांच्यावर जबाबदारी होती, काही करता काही झालं म्हणजे?


   आजीने आधी छोटू आणि चिकू चे कपडे काढून त्यांना कडकडीत पाण्याने अंघोळ घातली, देवा समोर बसवून उदबत्तीचा अंगारा दोघांच्याही कपाळाला लावला, देवापुढे नाक घासून शंभर वेळेला कशाची तरी क्षमा मागितली. कधी नव्हे ते चिकू आणि छोटूला एकटे सोडल्याबद्दल मधुराला तर रागवली पण खाडकन फोन करून अण्णांवर पण तोंडसुख घेतले.


    आजचा दिवस तसा खरं म्हणजे नारळाची वडी आणि कैरीच्या सरबत आणि गोड झालेला होता पण आजीच्या वागणुकीमुळे सगळा दिवस खराब झाला.

आजीच्या रागामध्ये अजूनच भर पडली जेव्हा अंघोळ घालताना छोटूची फुटलेली ढोपर, आणि खरचटले ला चिकूचा हात बघितला. चिकूच्या खिशातून एक छोटी मलमाची डबी पण बाहेर पडली. मायाने दोघांचाही जखमेला मलम लावून उरलेलं मलम चिकूला डबी मध्ये घालून दिलं होतं. मायाच्या औषधांनी चिकू आणि छोटू च जखमेमुळे आग होणे थांबलं होतं. आजीने चक्क डबी उचलून फेकून दिली. तरातरा जाऊन खोबरेल तेलामध्ये बचकाभर हळद का लावली आणि दोघांच्याही जखमेला लावली.


  चिकू काहीच बोलली नाही पण नंतर शहाण्या चिकू न हळूच नकळत जाऊन ती डबी उचलून आणली.


रात्री आजी तावातावाने वसुंधरेला माया बद्दलच्या अनेक गोष्टी सांगत होती. खालच्या आळीतल्या सरला बाईंना मूल होत नव्हतं आणि मायाच्या औषधांनी आता सरला बाईला दिवस गेले आहेत. काहीतरी जादूटोणा करते असा सगळ्या गावाचा विश्वास झाला होता. ढाले पाटलांच्या बाळूला सतत आकडी येत असे त्याच्यावर देखील मायाने उपचार केले होते, त्याला सतत काहीतरी हुंगायला लावून त्याची आकडी बरी केली होती.

मुळामध्ये आजीचं म्हणणं की ह्या मुलीचं काही शिक्षण नाही काही नाही आणि ती अशी कशी लोकांना बरे करते नक्कीच काहीतरी काळी जादू करत असेल. देशमुखांची मातारी देखील बर्‍याच महिन्यांपासून अंथरुणाला खिळून होती, म्हातारीने मायाला बघण्याचा धोशा घेतला होता, शेवटी देशमुखांनी कंटाळून मायाला घरी बोलावले, मायाच्या औषधाने आणि सुगंधी द्रव्य चा वास घेतल्यामुळे म्हातारीच्या जीवाची तगमग शांत झाली आणि ती सुखेनैव देवा घरी रवाना झाली.


   आजी झोपायला गेल्यावरती आनंद मामा आईजवळ आला, त्याने माया बद्दल बरीच माहिती दिली. आनंद मामा च्या मनामध्ये कुठेतरी माया बद्दल ओलावा जरूर होता.

 जखमा बऱ्या झाल्या नंतर परत छोटू चिकू मधुरा आंब्याच्या बागेच्या दिशेने रवाना झाले. आता मायाचI जंगली कुत्रा त्यांच्यावर भुंकत नसे.

बऱ्याच वेळेला चिकू छोटू मधुरा माया कडे जाऊ लागले. एक दिवशी माया म्हणाली," फोटोमध्ये आहे ना ती माझी आजी, तिला झाडपाला वनस्पती औषध उपचार याच्या बद्दल प्रचंड माहिती होती आणि तिने अभ्यास पण केला होता, तिने माझ्या आईला शिकवले, माझे वडील कायम बोटीवर असल्यामुळे आम्ही देश-विदेशातील जागी हिंडत असू, तिथल्या पण औषधांचा माझ्या आईने अभ्यास केला, हा सगळा साठा अनायासेच माझ्याकडे आला. चार वर्षांपूर्वी जहाजाच्या दुर्घटनेमध्ये आई वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे राहायला जागा नाही आणि नातेवाईकही कोणी नाही म्हणून मी आपल्या आधीच्या गावांमध्ये आजीच्या घरामध्ये येऊन राहिली होती."

चिकू, छोटू आणि माया ची चांगलीच गट्टी झाली होती. माया त्यांना देश-विदेशात असलेल्या मजेशीर गोष्टी सांगे आणि चिकू आणि छोटू टपोरे डोळे अजूनच मोठे करत ऐकत असे.


माया आता गावामध्ये छोटा दवाखाना आणि औषधाचे दुकान पण काढण्याच्या बेतात होती.

तिच्या कडे खूप सार्‍या जादुई गोष्टी पण होत्या, पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात मध्ये अंगणामध्ये बसून ती कसली कसली औषध तयार करे, त्याच्यामुळे गावाने तिला चेटकीण ठरवले होते.

गावातला अनाथ नंदू हा चौदा पंधरा वर्षाचा मुलगा मायाने आपल्या घरी सांभाळला होता, नंदू, माया आणि तिचा जंगली कुत्रा हे एकमेकांना धरून त्या गावांमध्ये राहत होते.


     तिच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळी आनंद मामाने तिला भरपूर मदत केली, दुकान सजवण्यासाठी सामान आणण्यासाठी आनंद मामा तिला नेहमीच मदत करत होता. करता-करता उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. एका अमावस्येच्या

रात्री मात्र माया धावतच आनंद मामाकडे आली, काही अज्ञात लोकांनी तिच्या दुकानाची तोडफोड केली होती, घाणेरडे शब्द दरवाज्यावर लिहीले होते आणि बरंच नुकसान केलं होतं.

शोध घेतला तेव्हा सरपंचांच्या व्रात्य मुलांनी हि नासधूस केल्याचे लक्षात आले. ताबडतोब आनंद मामाने त्या दोघाही मुलांना पकडले गावासमोर हजर केले गावांमधल्या बहुतांश पिडलेल्या लोकांना मायाच्या औषधाचा चांगला परिणाम झाला होता त्यामुळे सगळ्यांनी एक मताने सरपंच यांच्या मुलांना दोषी ठरवून त्यांच्या कडूनच दुकानाच्या नुकसानीची भरपाई घेण्याचे ठरवले.

 कधीकधी मधुरा एकटीच माया कडे जात असे, मधुरा च्या अभ्यासामध्ये माया तिची मदत करत असे. आजीला याच्याबद्दल फारच आपत्ती होती. आजोबांना पण माया चेटकीण नसून वैद्य आहे असं वाटत असे. पण आजीला कोण समजवणार?


  एके दिवशी चिकू छोटू आणि आई परत जाणार म्हणून आजीने कोकमाची फळे काढून आणण्याचा हुकुम सोडला. फळे काढता काढता खूपच उशीर झाला, बागेतल्या चुली वरती वरती आंब्याचा रस उकळत ठेवलेला होता. सगळ्या मुलांची गडबड गडबड चालू होती एक तर संध्याकाळ होत आली होती आणि आता आजीची घरी जायची घाई चालू झाली होती. तेवढ्यात गडबड झाली, धावणार्या छोटू ने आजीला धक्का दिला,आटवलेला रस ओतताना काही रस आजीच्या चक्क पायावरती पडला आणि चिटकून बसला. गरम रसामुळे आजी एकदम कळवळून ओरडली. एवढ्या वरती डोंगराच्या टोकावर ती बागेमध्ये कोण वैद्य येणार आणि कुठला औषध उपचार होणार. शेतावरच्या गड्यांनी ताबडतोब आजीला खुर्चीवर बसवले आणि पाठमोरी टाकून डोंगर उतरायला सुरुवात केली, आजी कळवळून रडत होती.

डोंगर उतरताना मायाने बघितले आणि ती धावतच घराच्या बाहेर आली. गड्यांना थांबवून तिने आजीला घरात घेतले. आजीला आधी प्यायला पाणी देऊन शांत केले आणि हळुवार हाताने तिच्या पायावर चिकटलेला रस औषध लावून सोडवायला सुरुवात केली. तिच्याकडे कसले गार औषध होते देवास ठाऊक, पण हळूहळू आजीच्या पायावरच्या वेदना कमी व्हायला लागल्या, औषध लावताना माया कसलातरी जप पण करत होती. हळूहळू चिटकलेला सगळा रस निघाला तेव्हा आजीच्या पायाची कातडी पण सोलून बाहेर आल्यासारखी झाली. आजीला प्रचंड वेदना होत होत्या, नंदू आजीला वारा घालत होता, आणि माया तिच्या पायावरती ताजे लेपण लावत होती. तिने आजीला हुंगायला सुगंधी वासाचे द्रव्य दिले त्याच्यामुळे हळूहळू आजी गुंगी मध्ये गेली. शांत झाली. मायाची

चाललेली धडपड आणि आजीची केलेली सेवा बघून आईने मायाच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि हलकेच तिची पापी घेतली.

 गड्यांनी उचलून आजीला मायाच्या घरच्या मोठ्या पलंगावर ती झोपवले. नंदू आजीला वारा घालतच राहिला.

मायाने फ्रिज उघडून कसलेतरी इंजेक्शन बाहेर काढले आणि पटपट आजीला दिले. नंतर तिने आजोबांना सांगितले की तिने धनुर्वात होऊ नये म्हणून आजीला इंजेक्शन दिले. रात्रभर आई आणि आजी मायाच्या घरी राहिले. सकाळी थंड वेळेला गड्यांनी आजीला उचलून घरी आणले.

आजीला आता बरेच सुख वाटत होते. मायाच्या औषधाचा आजीवर चांगलाच परिणाम झाला होता.


    " कसा झाला चेटकिणीच्या घरचा पाहुणचार?" आनंद मामाने हसून आजीला विचारले. आजी काहीच बोलली नाही. दोन दिवसानंतर आई ,चिकू ,छोटू अहमदाबादला परत यायला निघाले. आजीआता हळूहळू चालू शकत होती. माया स्वतःहून तिच्या पायावर मलम लावत असे. आजीला आता ती चेटकीण वाटतच नव्हती मुळी.


      आजोळच्या रम्य आठवणी घेऊन चिकू छोटू आई परत अहमदाबादला आले असेच काही महिने गेले आणि अचानक आजोबांचा फोन आईला आला त्यांनी सगळ्यांनी मिळून दिवाळीच्या नंतर मुहूर्तावर मायाला चिकूची नवीन मामी करून घेण्याचे ठरवले होते आणि त्याच्यासाठी सगळ्यांना आग्रहाचे आमंत्रण होते.

चिकू तर जाम खुश झाली नाही तरी तिला माया अतिशय आवडत होती.

   


Rate this content
Log in