kanchan chabukswar

Thriller

4.1  

kanchan chabukswar

Thriller

खो-खो....

खो-खो....

7 mins
238


या जागतिक महामारी च्या दिवसा दिवसातदेखील सगळेजण बाहेर जाण्यासाठी पळवाटा शोधत असत.

  मी आणि रुमा याला अपवाद नव्हतो. आयटी कंपनी मधला दिवसभराचा कंप्युटर समोरचा कंटाळवाणा जोब, कधी एकदा मशीन बंद करतो आणि विश्रांती घेतो असा मला रोजच वाटे. पण आयटी कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या पगाराचं पॅकेज एवढं आकर्षक होतं की आमची स्वप्न, स्वप्न म्हणजे तरी काय, टू बीएचके फ्लॅट, चांगली ऑटोमॅटिक गाडी, घरामध्ये अद्ययावत मशीन. हे सगळं करता करता तोंडाला फेस येत असे. शेवटी मी ठरवलं, सरळ गाडी काढून पाचगणीला विश्रांतीसाठी जायचं.

मला आणि रुमाला माथेरान च्या गर्दी पेक्षा , नाहीतर काय महाबळेश्वर काय आणि माथेरान काय मुंबई सारखेच गर्दी, म्हणून आम्हा दोघांनाही पाचगणी ला शांत खूपच छान वाटायचं.


    रुमा च म्हणणं होतं की दोघांनी पण स्वतःची गाडी चालवत जाण्या पेक्षा टॅक्सी करून जावं म्हणजे तेवढीच विश्रांती पण मिळेल, पण मला गाडी चालवायची अतिशय हाऊस, मुंबईच्या गर्दीमध्ये शंभर वेळा क्लच ब्रेक करत चालवण्यापेक्षा महाबळेश्वरच्या वाटेवरची सुंदर शांत वाट मला नेहमीच खुणावत असे.


    निघायच्या दिवशी देखील अचानक ऑफिस काम आल्यामुळे आम्ही दोघं तीन वाजेपर्यंत घरामध्ये अडकलो. हिवाळ्याचे दिवस, अंधार लवकर पडत होता. पाचगणीच्या हॉटेलचं बुकिंग झालेलं होतं त्याच्यामुळे ऐनवेळेस जाण्याची चिंता नव्हती.

करता करता आम्ही दोघं साडेतीन वाजता शेवटी निघालो. चार तास मजेत ड्रायव्हिंग झाल्यानंतर अचानक गाडी हिसके देऊ लागली.

खरं म्हणजे आमची नवीन गाडी, तक्रारीला काही वावच नव्हता, पेट्रोल टाकी पण फुल होती, गाडीच्या कंडेन्सर मध्ये भरपूर प्रमाणात कुलंट पण होतं पण तरीपण काय माहिती नाही, तिन्हीसांजेच्या वेळेला नेमकी गाडी बंद पडू लागली.

जंगलाच्या रस्त्यावरती जास्त रहदारी पण नव्हती, आजूबाजूला कुठेही दिवा दिसत नव्हता.

बॉनेट उघडून थोडा वेळ आम्ही दोघेही शांत बसून राहिलो. आणलेली कॉफी आणि सँडविचेस खाऊन घेतले, न जाणो किती वेळ थांबावे लागते किंवा गाडी सुरू व्हायला किती वेळ लागेल.

  असल्या शांत वातावरणात खरं म्हणजे आमच्या प्रणयाला बहरच येत होता, पण जसा जसा अंधार पडायला लागला तशी रुमा घाबरू लागली.

    अर्ध्या तासानंतर मी परत प्रयत्न केला ,अचानक गाडी चालू झाली, देवाचं नाव घेत मी जोरदार गाडी हाकायचा प्रयत्न करू लागलो. तासभर व्यवस्थित गेला, आता जावळीच्या खोऱ्यात मधलं अहिरे गाव दूरवर दिसू लागलं, गाडीने परत बंद पडायचं नाटक केलं. पाचशे फूट दिशेने एक घर दिसत होतं, आजूबाजूला तुरळक वस्ती पण दिसत होती, कदाचित हॉटेल असेल असं वाटून मी आणि रोमा हात धरून घराच्या दिशेने निघालो.

    उघड्या पडवी चे छोटेसे घर दिसत होते. घराच्या बाहेर मोटरसायकल थांबली होती, तसेच बाहेरच्या अंगणामध्ये जुनाट ट्रॅक्‍टर दिसत होता. बाहेरच्या टीम टीम दिव्यामध्ये उभारून आम्ही बराच विचार केला, शेवटी मी पुढे होऊन बेल दाबली.


   आत मधे काहीच आवाज झाला नाही म्हणून परत दोन वेळेला बेल दाबली. अचानक माझे लक्ष घराच्या नावाकडे गेले," खो खो" असं विचित्र नाव घराला कोणी देतं का माझ्या मनात विचार आला तोच....

एका मध्यमवयीन स्त्री ने दार उघडले, सुरेख हिरव्या रंगाची लाल काठ असलेली साडी, लाल ब्लाऊज, हातात लाल बांगड्या, कपाळावर मोठे कुंकू, गळ्यामध्ये जाडजूड मंगळसूत्र, अशा स्त्रीला बघून आम्हाला फारच बरे वाटले.

  स्त्री ने दार उघडले म्हणून रुमाने पुढे होऊन काय झाले ते सांगितले, आणि मदतीची याचना केली.


मंद हसत त्या स्त्रीने आम्हाला आत येण्याचे निमंत्रण दिले, " मालक शेताकडे गेले आहेत, आमचं गडी बघेल तुमच्या गाडीकडे, तुम्ही आत या, आरामात बसा, मी कॉपी करून आणते, दमला असाल."

  आम्हा दोघांनाही खूपच बरे वाटले म्हणून आम्ही त्यांच्या दिवाणखान्यात येऊन बसलो.

 दिवाणखाना साधाच होता, जुन्या प्रकारचे सोपे, काही जुनी चित्र, पूर्वजांच्या तसबिरी, मात्र कोपऱ्यामध्ये एका कुंडीमध्ये एक सुरेख शेंद्री गुलाबाचं झाड होतं, आणि झाडावर ती एक सुरेख टवटवीत चमचमणारं शेंदरी रंगाचे फूल आलेलं होतं.


    अचानक बाहेरचं दार वाजलं आणि एक दणकट राकट माणूस आत मध्ये आला. त्याच्याबरोबर कदाचित त्याचा गडी खांद्यावरती ओझं घेऊन आत मध्ये आला, आणि थेट आम्हाला ओलांडून आम्हाला न बघता मागच्या बाजूला निघून गेला.

  " कोण तुम्ही? आणि माझ्या घरात काय करत आहे?" त्या राकट माणसांनी आम्हाला विचारले.

तेवढ्यात ती मध्यमवयीन स्त्री बाहेर आली तिच्या हातामध्ये चार कॉफीचे कप होते. त्या स्त्रीने आमच्याबद्दल तिच्या नवऱ्याला सांगितले.

गडगडाटी हसत तिचा नवरा म्हणाला," हत्तीच्या एवढेच काय, मी आता गाडी इथे आणून लावतो, आणि तुम्ही दोघेही आता जेवल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका."

" घाबरू नका माझ्याकडे टोइंग व्हॅन पण आहे या रस्त्यावर ती जेव्हा केव्हा गाड्या बंद पडतात त्यांच्या मदतीला आम्हालाच कॉल येतो मी आत्ताच एका गाडीला पुढच्या गावापर्यंत सोडून आलो आहे."


" इथे तर नेट वर्क पण नाहीये, आमचे दोघांचेही फोन बंद पडलेत, तुम्हाला कॉल कुठून येतो." मी चौकसपणे प्रश्न केला.

" अहो घराच्या उजवीकडचा दिवा लागला की समजायचं घाटाखाली गाडी बंद पडली, डावीकडचा दिवा लागला की समजायचं घाटावर ती गाडी बंद पडली. आम्हाला नेटवर्क ची काही आवश्यकता लागत नाही." मालक हसून म्हणाले.


मी रूमाचा हात घट्ट धरला खरं म्हणजे आम्हाला खूप बरं वाटत होतं. आता आमच्या वागण्यामध्ये जरा मोकळेपणा पण आला होता. तो राकट माणूस दिसायला जरी राकट असला तरी स्वभावाने फारच अघळ पघळ होता. मध्ये जोरात ओरडून त्याने त्यांच्या गड्याला मागच्या अंगणातली कोंबडी कापून चिकन शिजवायला टाकायला सांगितले. खरं म्हणजे आम्ही दोघेही नको नकोस म्हणत होतो तरी पण त्यांनी खूप आग्रह करून आम्हाला थांबायला सांगितले.


  रुमाला फुलझाडांची अतिशय आवड असल्यामुळे ती सहजच शेंद्री गुलाबा विषयी चौकशी केली. म्हणता क्षणी त्या दोघांच्याही चेहर्‍यावरचे भाव अतिशय पालटले. अचानक त्यांचा चेहरा खूपच आग्रही झाला. फक्त ते परत परत सांगत राहिले चुकूनही गुलाबाचा वास घेऊ नका किंवा त्याला हात लावू नका.

रोमाने प्रश्न केल्यावरती कॉफी पिऊन मला वरती वरती तरंगायला वाटत होतं त्यामुळे मी पण प्रश्न केला," काय हो तुमच्या एवढ्या सुंदर घराचे नाव खोखो का म्हणून ठेवलं?" खेळाची आवड आहे का तुम्हाला? बहुतेक तुम्ही कॅप्टन वगैरे असाल खो-खो टीमचे," मी हसत हसत म्हटलं.

   त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं प्रश्नार्थक मुद्रेने आणि मिळाले, समजेल हो तुम्हाला खोखो चा अर्थ.

खो म्हणजे काय एकाने दुसऱ्याला रिप्लेस करणे किंवा एकानी खो दिल्यावर बसलेला किंवा अडकलेला माणूस जणूकाही तुरुंगातून सुटतो, नियतीचे पण तसेच आहे एका माणसाला एक माणूस दोन माणसाला दोन माणसं, एका स्त्रीला एक स्त्री असंच नाही का खो-खो चा अर्थ."

खरं म्हणजे आम्हाला दोघांना आता हवेमध्ये तरंग आल्यासारखं वाटत होतं काहीच लक्षात येत नव्हतं.

     अचानक मालकांनी गड्याला हाक मारले, " जा रे यांची गाडी टो करून घेऊन ये." मला नंबर प्लेट वगैरे विचारून कुठल्या रंगाची गाडी आहे आणि कुठे बंद पडली आहे हे त्यांनी जुजबीच विचारलं.

मी बसलेल्या ठिकाणांपासून खिडकी दूर होती पण मला गडी जाताना दिसत होता. अचानक आमची गाडी हवेतून उडत उडत येताना दिसायला लागली. गाडी घरावरून चक्क मागच्या अंगणात उतरवली गेली.


" आता काळजी करू नका, मी सकाळी मेकॅनिकलI बोलून तुमची गाडी ठीक करून देतो वरच्या मजल्यावर ती दोन खोल्या आहेत तिथे तुम्ही जाऊन आराम करा. जेवण झालं की तुम्हाला बोलावून घेतो."

   मालक म्हणाले.


 मला आणि रूमाला अचानक पोटामध्ये कळा यायला लागल्या, खरं म्हणजे आम्हाला दोघांनाही बाथरूम ला जायची फारच घाई झाली होती, जिना वरच्या पायऱ्यांचा दिवा लावून मालकांनी आम्हाला वरच्या रूम कडे जाण्यास सांगितले.


    " गुलाबाच्या कुंड्या ना हात लावू नका बाकी तुम्ही आराम करा" मालकांनी ओरडून सांगितले.

रुमा आधी बाथरूम मध्ये गेली, तोंड धुऊन फ्रेश होऊन ती बाहेर आली. खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये तसेच शेंदरी गुलाबाचे झाड होते. मी बाथरूम मध्ये गेलो आणि बाहेर आलो.

 खोलीमध्ये दोन-तीन मधमाशा गुणगुणत शिरल्या होत्या आणि त्या फुलावर ती घोंगावत होत्या.

रात्रीच्या वेळी आणि मधमाशा? माझ्या मनात बरेच प्रश्न डोकावला.

   रुमाला काय वाटले कुणास ठाऊक," इथे तर आपण दोघेच आहोत की नाही मला त्या फुलाला हात लावून बघायचा आहे इतका वेगळा फुल जगामध्ये कुठेच नसेल बहुतेक. आणि त्याचा वासही वेगळा असेल नाहीतर मधमाशा रात्री का येतील बरं?"

रुमाला फुलाचा मोह आवरतच नव्हता. नाहीतरी खोलीमध्ये आम्ही दोघे जण होतो आम्ही दोघेही त्या फुल झाडापाशी जाऊन उभे राहिलो, रुमाने हळुच फुलाला हात लावला माझा हात धरून तिने हळूच फुलावरून फिरवला तसेच आम्ही दोघांनीही वाकून फुलाचा नाक भरून सुगंध घेतला.

" जेवण तयार आहे या खाली दोघेजण." त्या मध्यमवयीन स्त्रीचं हाक कानावर आली.

केस विंचरण्यासाठी म्हणून रुमा आरशापुढे उभे राहिली, तर आरशात कोणाचं प्रतिबिंब नव्हतं, आता दचकणे ची पाळी माझ्यावरती होती, मी पण भांग काढण्यासाठी म्हणून आरशासमोर उभा होतो पण आरशामध्ये कोणाचंच प्रतिबिंब दिसत नव्हतं.

 आता मात्र आमच्या दोघांची ही अतिशय सर्टारली.. धडपडत दोघेही जिना उतरून खाली आलो.


 टेबलावरती दोनच ताटं मांडली होती आणि संपूर्ण जेवण मांडून तयार होतं. खिडकीतून दिसत होतं की बाहेरच्या अंगणामध्ये मालकांचा गडी आमच्या गाडीला नवीन रंग देत होता आणि त्याची नंबर प्लेट पण बदलत होता.

     त्याचं काम अतिशय झटपट आणि वेगात चालू होतं. मी ओरडून मालकांना विचारलं,


मालक आणि मालकीण बाई त्यांनी दोघांनीही वळून आमच्याकडे बघितलं, " तुम्ही गुलाबाला हात लावून आमच्या दोघांचीही सुटका केली तुम्ही आम्हाला खो दिलात, आता तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या खोची वाट बघा." दोघेही अतिशय खुश दिसत होते आमच्या गाडीत बसून बदललेल्या नंबर सकट आणि बदललेल्या रंगा सकट ते दोघेही निघून गेले.


     गडी आत आला, त्यांनी आमच्याकडे बघून स्वतःचं बोळक पसरत, त्यातले दोन चमकदार सुळे दाखवत मोठं हास्य केलं. " समजलं का खो-खोचा अर्थ"

    ंडीचा सिझन संपत आला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाचगणी कडे येणार्‍यांची गर्दी वाढू लागली, एके संध्याकाळी गड्यांनी येऊन आम्हाला सांगितले, घाटात एक गाडी अडकली आहे, आता तुम्हाला खो मिळण्याची पुरेपूर संधी आहे.


  आमच्या घराची बेल वाजली, रुमाने पुढे होऊन दरवाजा उघडला, दारामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं दिसत होतं.

" या, आत् या, बसा, मी कॉफी करून आणते." रुमा अत्यानंदाने म्हणाली.

" घाबरू नका माझ्याकडे टोइंग व्हॅन पण आहे या रस्त्यावर ती जेव्हा केव्हा गाड्या बंद पडतात त्यांच्या मदतीला आम्हालाच कॉल येतो मी आत्ताच एका गाडीला पुढच्या गावापर्यंत सोडून आलो आहे." मी हसत हसत म्हटलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller