देवाल (अलक)
देवाल (अलक)


एक गाव होते. गावाच्या मधोमध शाळेला लागून बाजारचौक होते. त्या बाजार चौकात रात्री 12 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती उघड्यावर शौच करण्यास लोटा घेऊन निघाला. तो घाबरट स्वभावाचा होता. बाजार चौकात एक वेडी स्त्री उभी होती. तिचे केस विखुरलेले होते. त्याचे लक्ष तिच्यावर गेले. तो तिला देवाल समजून, घराकडे धूम पळाला. दुसऱ्या दिवशी गावभर देवाल दिसली म्हणून चर्चा..!
बोध- मनातली भीती अस्तित्वहीन गोष्टींना जन्म देते.